Skip to main content

मंडळी , येताय चिकन खायला?

लेखक आंबोळी यांनी सोमवार, 21/07/2008 12:21 या दिवशी प्रकाशित केले.
प्रेरणा : मदनबाणाची कणसे चिकन धूवुन घ्या. हळद, आले-लसणाची पेस्ट लाउन अर्धा-पाउण तास ठेउन द्या. बटर गरम करून बारीक चिरलेला कांदा परतून घ्या. मग त्यात आल्,लसूण,मिरची, कोथींबीर्,कांदा यांची पेस्ट आणि मसाला घालून परता. चिकनचे तुकडे घालून व्यवस्थीत हलवा.

अनमोल ठेव.....

लेखक उदय सप्रे यांनी सोमवार, 21/07/2008 10:50 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार मिपा कर ! आज बरेच दिवसांनी मी "त्या" फाऊंटन पेन नी लिहिताना मागच्या आठवणी जाग्या झाल्या आणि या पेनामागची कथा तुम्हाला सांगाविशी वाटली.बघा तर वाचून .....

अरे पावसा पावसा, तु आहेस तरी कुठं !!!

लेखक प्रा.डॉ.दिलीप बिरुटे यांनी सोमवार, 21/07/2008 10:27 या दिवशी प्रकाशित केले.
आभाळ भरुन येतंय, पण पावसाच पत्ताच नाही. १९३६, १९७२, आणि आता २००८ म्हणजे बरोबर छत्त्तीस वर्षानंतर आता पाऊस पडणारच नाही, भयंकर दुष्काळ पडणार आहे, अशी भविष्यवाणी आमच्या एका दोस्ताने केली. आणि पुन्हा आम्ही कवितेच्या पुस्तकात घुसलो. कविता वाचता...वाचता.......कवितेच्या शब्दा-शब्दावरुन. लिंकवर क्लिक केल्यावर जसे इतर दूवे उघडतात तसे मनाचे अनेक दुवे उघडत गेले ....दररोज, कडाक्याचे ऊन पडत असल्याने पावसाची कोणतीच लक्षणे दिसत नाहीत. केवळ शेतकरीच नव्हे तर सामान्य माणूसही पावसाने डोळे वटारल्याने हवालदिल झाला आहे. आषाढीच्या पांडुरंगाचे दर्शन घेऊन वारकरी एकदा परतला की तो पाऊस घेऊन येतो असा एक समज आहे.

मासे पण शिकवतात

लेखक श्रीकृष्ण सामंत यांनी सोमवार, 21/07/2008 10:20 या दिवशी प्रकाशित केले.
"आयुष्यात येणार्‍या अडचणीना सामोरं कसं जायचं हे पाण्यातल्या प्रवाहाबरोबरच्या भोंवर्‍यात तरंगून आपला जीव कसा वाचवावा हे समजणार्‍या माश्याकडून मी शिकलो" हे दत्तुचे शब्द माझ्या चांगलेच लक्षात राहिले आहेत. त्याचं असं झालं त्यावेळी आम्ही वरसोवाला राहत होतो.आमच्या घराजवळ "फिशरीजरिसर्च इंन्सटीट्युट" आहे.एकदां मला त्यांच्या डिग्री समारंभाच्या कार्यक्रमाला आमंतत्रण होतं. त्या गर्दीत मला एक ओळखीचा चेहरा दिसला.त्याला ओळख विचारावी म्हणून त्याच्या जवळ जावून मी प्रश्न विचारण्याचं साहस केलं "काय रे तू घोडग्यांचा दत्तु का?" तो म्हणाला "होय.

कैदी आणि अंकूर

लेखक अरुण मनोहर यांनी सोमवार, 21/07/2008 08:50 या दिवशी प्रकाशित केले.
जी ए कुलकर्णी ह्यांच्या 'स्वामी' कथेतील एका प्रसंगाचे कवितेत रुपांतर. काळकोठडी मध्ये टाकला एक बंदिवान काळ्या दगडात विसरला काळाचे भान आहे ठाऊक पक्के त्याला, नशीब ह्या जन्मीचे सुटण्यासाठी सहाय्य, केवळ मिळेल मरणाचे किती खोल अन् कुणास ठाऊक, खोली तुरूंगाची तसूभरही ना दुसरे जीवन, न चाहुल कोणाची भिंतीमधली झडप उघडुनी, ताट येतसे आत तोच एक आवाज जगाचा, बाकी सारी मयत आंधाराहून कृष्ण छाया, स्वतःचीच पाहतो नीरव अश्रू विना हुंदके, अंतरीच दाबतो बाह्यजगाशी एकच नाते, नलीका हवेसाठी तिच्याच योगे जगते आहे, शरीराची काठी क्षीण कवडसा कधी उतरतो, नलीकेतून खाली मित्रची जणू येई भेटाया, दुर्गम बंदीश
Taxonomy upgrade extras

माझं आवडतं नाटक : फ़ायनल ड्राफ़्ट

लेखक भडकमकर मास्तर यांनी रविवार, 20/07/2008 21:30 या दिवशी प्रकाशित केले.
नाटक : फ़ायनल ड्राफ़्ट लेखक आणि दिग्दर्शक : गिरीश जोशी कलाकार : मुक्ता बर्वे गिरीश जोशी निर्मिती : महाराष्ट्र कल्चरल सेंटर, पुणे जसे नाट्यलेखनाच्या मूलभूत नियमांबद्दल लिहिले, तसेच लेखनाच्या ठराविक आडाख्यांपासून दूर जाणारे, नियमांच्या साचेबद्ध चौकटी तोडणारे नाट्यलेखन यावरही लिहित आहेच..... चाहूल, साठेचं काय करायचं, लूज कंट्रोल यावर पूर्वी लिहिलं आहेच... तसंच थोडंसं वेगळं हे दोन अंकी नाटक ...

मनःशांती

लेखक ॐकार यांनी रविवार, 20/07/2008 20:30 या दिवशी प्रकाशित केले.
मनःशांतीचा शोध घेत होतो खूप दिवसांपासून याहूवर शोधले, रेडीफवर आलो जाऊन विकिपिडिया पाहिले नेट काढले गूगलून भाषा पाहिली बदलून चित्रेही शोधत राहिलो शब्द झाले फिरवून ब्लॉग्जही वाचत फिरलो निवांत क्षणी एका उघडले डोळे, उजळली कांती लॅपटॉप बंद झाला सापडली मनःशांती भारनियमनाचा मला कळलेला हा एकमेव फायदा बाकी तीच महागाई, तेच राजकारण आणि तोच कायदा -ॐकार
Taxonomy upgrade extras

आली फिरून उत्कंठा जगण्याची

लेखक श्रीकृष्ण सामंत यांनी रविवार, 20/07/2008 20:17 या दिवशी प्रकाशित केले.
(अनुवादीत. कवी-शैलेंद्रसिंग) पदर ओढिला काट्यानी चाळ तोडिला पायानी उडत्या माझ्या मनाला कुणि आता नका आवरूं चालले होऊन माझे मन जणू वाऱ्या वरचे पाखरूं आली फिरून उत्कंठा जगण्याची आला फिरून ईरादा मरण्याचा गत रात्रीच्या कभिन्न अंधारातून देखिले चोहिकडे नयन मिचकावून बहरले जीवन फुला फुलातून निश्चय झाला मग हे देखून आली फिरून उत्कंठा जगण्याची आला फिरून ईरादा मरण्याचा का भारावलेले असे माझे जीवन का मोकाट सुट्लेले मी असे तुफान मन होई साशंक करीता जीवन प्रवास वाटे जाईन हरवून मी तुझा सहवास आली फिरून उत्कंठा जगण्याची आला फिरून ईरादा मरण्याचा श्रीकृष्ण सामंत

छायाचित्र परिक्षण - २

लेखक सूर्य यांनी रविवार, 20/07/2008 20:13 या दिवशी प्रकाशित केले.
मँगलोरहुन उडुपीला जाताना सुरतकल येथे एन.आय.टी.के नावाचे कॉलेज आहे. कॉलेज कॅम्पसचा भाग म्हणुन एक बीच आहे. (इथे शिकलो असतो तर किती बरे झाले असते ;) ). उडुपीहुन परत मॅगलोरला येताना संध्याकाळ्च्या सुमारास इथे थांबुन सुर्यास्त बघण्याचा योग आला. कॅमेराचा उपयोग करण्याची संधी मी सोडली नाही. त्यापैकीच एक चित्र इथे ड्कवीत आहे. जरुर परिक्षण करा.