ताजमहाल कसा बांधला, ?
तो वेदकालीन आहे काय ? @)
गेली दोनशे वर्षे ताजमहालविषयी अनेक दंतकथा पसरल्या आहेत. त्या सर्वांत एक ब्रह्मवाक्य मात्र कायम असते, ते म्हणजे `बांधकामासाठी २० हजार माणसे २२ वर्षे सतत काम करत होती.' आज ही गोष्ट जगातील सगळया अबालवृद्धांना ठाऊक आहे. साहजिकच प्रश्न पडतो की, हे आकडे आले कोठून
ब-याच दिवसापूर्वी मला एक इ-मेल आला होता, त्यात ताजमहालाबद्दल बरेच काही लिहिले होते, त्याला छायाचित्रांची जोड होतीच. असेच इ-मेल्स ब-याच जणांना गेली असतील, त्यात पुरातत्व खात्यातील लोकसुद्धा असतील... मलासुद्धा असा प्रश्न पडतो की जर इतके सबळ पुरावे असतीलच तर मग ते प्रकाशात का येत नाहीत?