लेखकस्नेहश्रीयांनी शुक्रवार, 18/07/2008 14:47 या दिवशी प्रकाशित केले.
कधी कुणाचा कोणाला पत्ता नाही
कोण कुठे हे माहित नाही
आज इथे तर उद्या तिथे
लाईन लागते पैसा मिळेल तिथे
बोनस देत नाही टाकतो मी पेपर
इंक्रिमेंट नाही घ्या माझे लेटर
कोणाची कोणाला पडलेली नसते
कॉरपोरेट जगात हे असेच आसते
खोट रडणं नी खोट हसणं
आणि त्यातच आपल आयुष्य शोधणं
खोटी सहानभुती , मदत खोटी
यावर चालते आपली रोजीरोटी
कोणाला नाही चिंता आजुबाजुच्याची
अजिबात नाही पर्वा माणुसकीची.
लेखकआंबोळीयांनी शुक्रवार, 18/07/2008 13:02 या दिवशी प्रकाशित केले.
प्रेरणा : विजुभौंचा बैल
आपण सगळेच बैल असतो
कोणीतरी संस्थळ काढत असतो आणि आपण जॉईन करत असतो.
जिंदादीली आणि प्रशासक नसण्यावर खुष असतो.
रसिकाच्या एखाद्या इशार्यासरशी ऊर फ़ुटेतो लिहीत असतो
आपण सगळे बैल असतो.
रसिकाने यावे आपल्या लिखाणाला प्रतिसाद द्यावा
त्याने आपली कविता वाचावी
कधी काळी वाह वा , जबरा म्हणाव म्हणून वाट पहात असतो.
आपण सगळेच बैल असतो.
आपल्याला आपण विडंबवले गेलो आहोत याची काही लाज नसते.
ती जाणिवच थिजलेली आसते.
उत्क्रुष्ठ लेख वगैरे जाणीव कधीच निजलेली असते.
आपले लेख काढून टाकले तरी आपण तसेच असतो.
फ़ार तर नव्या संस्थळाच्य शोधात असतो.
आणि नव्य
लेखकबेसनलाडूयांनी शुक्रवार, 18/07/2008 12:09 या दिवशी प्रकाशित केले.
आपण सगळेच बैल असतो
बायको लटके रागवत असते आणि आपण घाबरत असतो
फक्त दोनवेळा जेवण आणि फोमच्या डबलबेडवर खूश असतो ;)
बायकोच्या एखाद्या इशार्या सरशी ऊर फुटेतोवर धावत असतो.
आपण सगळेच बैल असतो
बायकोने यावे आपल्या गळ्यावरची दाढी खाजवावी
अंघोळीला आपली पाठ चोळावी
कधी तरी पुरणपोळी चारावी म्हणुन वाटपहात असतो :(
आपण सगळेच बैल असतो
आपल्याला आपण फसवले गेलो आहोत याची काही लाज नसते
ती जाणीवच थिजलेली असते
उन्नत ध्येय वगैरे जाणीव कधीच निजलेली असते
बायको माहेरी गेली तरी आपण तसेच असतो
फार तर नव्या बायकोच्या शोधात असतो
आणि नव्या बायकोकडे गेलो की जुनी कशी चांगली होती (?!?!?!) याची गाणी गात बसतो
आपण सगळेच बैल असतो
लेखकविजुभाऊयांनी शुक्रवार, 18/07/2008 11:02 या दिवशी प्रकाशित केले.
आपण सगळेच बैल असतो
कोणीतरी फटके टाकत असतो आणि आपण पळत असतो
फक्त दोनवेळा अन्न आणिउतम निवार्यावर खुष असतो
मालकाच्या एखाद्या इशार्या सरशी ऊर फुटेतोवर धावत असतो.
आपण सगळेच बैल असतो
मालकाने यावे आपल्या गळ्याखालची पोळी खाजवावी
त्यानी आपली पाठ झाकावी
कधी काळी गुळपोळी चारावी म्हणुन वाटपहात असतो
आपण सगळेच बैल असतो
आपल्याल आपण बडवले गेलो आहोत याची काही लाज नसते
ती जाणीवच थिजलेली असते
उन्नत ध्येय वगैरे जाणीव कधीच निजलेली असते
वेसण काढुन टाकली तरी आपण तसेच असतो
फार तर नव्या मालकाच्या शोधात असतो
आणि नव्या मालकाकडे गेलो की जुना कसा चांगला होता याची गाणी गात बसतो
आपण सगळेच बैल असतो
लेखकउदय सप्रेयांनी शुक्रवार, 18/07/2008 09:44 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार "मिपा" कर आणि मिपा चे समस्त वाचक !
तात्यांनी वर पु.ल.,पंडीत भीमसेन जोशी,कुसुमाग्रज आणि बाबूजी यांच्या फोटोसोबत गुरुपौर्णिमेची एक छान सुरुवात करून दिलीच आहे , त्याचीच जाणीव म्हणून मी मागे लिहिलेला एक लेख माझ्या हस्ताक्षरात इथे प्रसिध्द करत आहे. ही माझी तमाम समाजाला गुरु म्हणून विनम्र अशी मानवंदना आहे !
लेखकश्रीकृष्ण सामंतयांनी शुक्रवार, 18/07/2008 08:42 या दिवशी प्रकाशित केले.
(अनुवादीत. कवी--हसरत जयपुरी)
पाहूनी तुला मजसमोरी
केस तुझे भूरभूरती वाऱ्यावरी
पदर तुझा तू न सांवरी
गं! राहू मी कसा भानावरी
नयन तुझे बिलोरी जांबापरी
ओठ तुझे थरथरत्या मैखान्यापरी
गं! राहू मी कसा भानावरी
पाहूनी तुला मजसमोरी
हंसणे तुझे जणू वीज चमकणे
श्वास तुझे जणू गुलाबी गंध दरवळणे
इतर बहकती पाहुनी तुझे ते चालणे
पाहूनी तुला मजसमोरी
गं! राहू मी कसा भानावरी
श्रीकृष्ण सामंत