मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

सस्नेह निमंत्रण (ऋचा)

ऋचा ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
प्रति, समस्त मिसळपाव.कॉम कुटुंबीय, सप्रेम नमस्कार, येत्या जुलै महिन्याच्या १२ तारखेस तुमचा मैत्रिण "ऋचा" विवाहबध्द होत आहे. वैयक्तिकरित्या सर्वांनाच व्यक्तिशः भेटून निमंत्रण पत्रिका देणे केवळ अशक्य असल्याकारणे,इथेच आमंत्रण देत आहे. कृपया हेच आग्रहाचे निमंत्रण समजुन ह्या विवाहसोहळ्यास उपस्थित राहून आम्हांस आपले शुभाशिर्वाद द्यावेत ही नम्र विनंती. आपलीच, ऋचा उपाख्य क्षितिजा विवाहस्थळ : कोहीनूर मंगल कार्यालय, एरंडवणा प्रभात रस्ता,गल्ली क्र. ८, गरवारे कॉलेज समोर पुणे-४ मुहुर्तः १२ जुलै-२००८ वेळः स. १० वा. १८ मि.

सस्नेह निमंत्रण

ऋचा ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
प्रति, समस्त मिसळपाव.कॉम कुटुंबीय, सप्रेम नमस्कार, येत्या जुलै महिन्याच्या १२ तारखेस तुमचा मैत्रिण "ऋचा" विवाहबध्द होत आहे. वैयक्तिकरित्या सर्वांनाच व्यक्तिशः भेटून निमंत्रण पत्रिका देणे केवळ अशक्य असल्याकारणे,इथेच आमंत्रण देत आहे. कृपया हेच आग्रहाचे निमंत्रण समजुन ह्या विवाहसोहळ्यास उपस्थित राहून आम्हांस आपले शुभाशिर्वाद द्यावेत ही नम्र विनंती. आपलाच, ऋचा उपाख्य क्षितिजा विवाहस्थळ : कोहीनूर मंगल कार्यालय, एरंडवणा प्रभात रस्ता,गल्ली क्र. ८, गरवारे कॉलेज समोर पुणे-४ मुहुर्तः १२ जुलै-२००८ वेळः स. १० वा.

संवाद-३ [कुठलाही वाचा, ही मालिका नाही]

चाणक्य ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
संवाद-१ संवाद-२ --------------------------------------------------------------------------------------- संवाद-३ "पण म्हणून मी का त्यांच्यासाठी काही करावं?" तो तावातावाने मला विचारत होता. "कारण तुझी तेवढी क्षमता आहे" मी त्याला समजवण्याचा प्रयत्न करत होतो. "क्षमता? महिना २० हजाराला तू क्षमता म्हणतोस?" "of course, निदान माझ्यापेक्षातरी नक्कीच जास्त आहे.

मी लेलेंना शोधतोय....

दिनेश५७ ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
त्यांचं आडनाव लेले नाही. म्हणजे, लेलेच आहे, की नाही, ते मला नक्की माहीत नाही. त्यांचा नक्की पत्ता मला माहीत नाही. प्रभादेवीच्या सिद्धिविनायक मंदिराजवळ कुठेतरी ते राहातात. एवढंच मला माहीत आहे. म्हणजे, माझ्या सहकार्‍यानं मला त्यांच्याबद्दल सांगितलं, तेव्हा ते तिथं कुठतरी राहातात, एव्हढच मला कळलं होतं. तेव्हापासून, सिद्धिविनायकासमोरून येताजाताना मी त्या दिशेनं भक्तिभावानं हात जोडतो. अर्धा सिद्धिविनायकाला, आणि अर्धा त्या लेले, की कुणी, त्यांना... सिद्धिविनायकाच्या शेजार्‍याला... ...

अशी ही एक श्रद्धा

श्रीकृष्ण सामंत ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
"मी लहान असताना घरासमोरून जाणाऱ्या रस्त्यावरच्या गाड्याना पाहून एक दिवस कुणी तरी गाडी थांबवून उतरणारी व्यक्ति माझे वडिल व्हावेत अशी मी उगाचच कल्पना करीत रहायचो.

आयुष्यावर प्रेम करावे--

पुष्कराज ·
लेखनविषय:
Taxonomy upgrade extras
कधी वाटते सोडून जावे अवतीभवतीचे हे सारे कुठुन कशाची ओढ लागते पुन्हा गुंततो इथे कसा रे कधी वाटते का जाउ मी सोडून माझे सखे सोबती अशाच वेळी श्वास कोंडतो विझुनी जाते जीवन ज्योती येणे जाणे आणि थांबणे आपुल्या हाती नाहीच काही तोच मांडतो खेळ पसारा तोच नकळता आवरून घेई तरीही येथे गुंतुन जावे आयुष्यावर प्रेम करावे मातीत शेवटी जाणे आहे कुठे तरी पण नाव उरावे

अशी गुमसुम आवडतेस मला

धनंजय ·
लेखनविषय:
Taxonomy upgrade extras
अशी गुमसुम आवडतेस मला *** अशी गुमसुम आवडतेस मला, ... जणू नसतेसच इथे खूप दुरून ऐकतेयस - माझा ... आवाज तुला नाही शिवत. वाटते तुझी दृष्टी तुला ... सोडून गेलीये दूर उडून एक चुंबन जणू तुझे ... ओठ असावे घट्ट शिवत. * सगळ्याच गोष्टी आहेत जशा ... माझ्या आत्म्याने भरलेल्या माझ्या आत्म्याने भरलेली ...

सबनीसांचा वसंता

श्रीकृष्ण सामंत ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
आम्ही त्याला वसंता कधीच म्हटलं नाही.त्याला आम्ही सबनीस म्हणूनच ओळखत होतो.त्यालापण सबनीस म्हणून हांक ऐकण्याची संवय झाली होती. हा सबनीस मडुऱ्याचा.हे एक सावंतवाडी तालुक्यातलं लहानसं खेडं. दहा पांच घरं सबनीसांची होती.लहानपणी जवळच्या मराठी शाळेत शिकून झाल्यावर, सबनीस सावंतवाडीला ईग्रजी शिकायला आपल्या एका नातेवाईकाच्या घरी राहात होता.त्याचे वडील, त्याच्या खर्चाचे पैसे नियमीत पाठवीत असत सबनीसाचं शिक्षणात जास्त मन रमलं नाही.जेमतेम मॅट्रीक झाल्यावर, तो वडीलांची परवानगी घेऊन मुंबईला गेला.