Skip to main content

फुलपाखरे छायाचित्रे

लेखक कोलबेर यांनी बुधवार, 09/07/2008 22:31 या दिवशी प्रकाशित केले.
फुलपाखारांची चित्रे!
दोन्ही चित्रे कॅनन कॅमेरा टॅमरॉन टेलेफोटो लेन्स. ऍपर्चर ५.६ शटर : १/१२००
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 9423
प्रतिक्रिया 19

प्रतिक्रिया

पण दुसरे अधिक आवडले. डावीकडे वरचे धूसर-फोकसचे फूल फारच छान. पहिले तर सुंदर आहे, पण "इन्स्पिरेशन मेसेज पोस्टर" असतात, त्यासारखे वाटले. म्हणजे तंत्र उत्कृष्ट आहे, पण मला कुठली खास कथा ओळखू येत नाही आहे. (स्क्रीनवर हात ठेवून पूर्णच्यापूर्ण देठ कातरले - आणि तेच चित्र मला एकदम आवडले. ते उंच देठ बघून खाली असे कुठले रटाळ बोधवाक्य वाचण्याची अपेक्षा होते "मंजिल उंचावर आहे, पण पोचण्याचे फळ मधुर आहे.")

In reply to by धनंजय

स्क्रीनवर हात ठेवून पूर्णच्यापूर्ण देठ कातरले - आणि तेच चित्र मला एकदम आवडले.
पहिल्या चित्रात देठ कातरुन बघीतले होते पण दोन्ही चित्रांची तुलना केल्यावर लांब हिरवट देठामुळे चित्राच्या सुशोभीकरणात भर पडली आहे (तसेच चित्रातील फुलाला देखील त्यामुळे एक व्यक्तिमत्व आले आहे) असे मला वाटले म्हणून राहू दिले.

वरूणदेवा, मानलं तुला! दोन्ही चित्रे अतिशय सुरेख! तात्या.

दोन्ही चित्रे! अवांतर : फोटो काढल्यानंतर एडिट (फाईन ट्युन) केला आहे का थोडासा ?

In reply to by ब्रिटिश टिंग्या

फोटो काढल्यानंतर एडिट (फाईन ट्युन) केला आहे का थोडासा ?
होय. चौकट घालणे, नाव टाकणे, (गरज असल्यास) ब्राईटनेस काँट्रास्ट कमी/जास्त करणे इ.इ. "फाईन ट्युनींग" मी सर्व चित्रांवर करतो. त्याव्यतिरीक्त कोणतेही "मॅन्युपलेशन" (ह्या चित्रांमध्ये)केलेले नाही

In reply to by कोलबेर

मी मुख्यत: काँट्रास्ट अन् ब्राईटनेसकरिताच विचारणा केली होती....

दुसरं चित्र तर इतकं अल्टिमेट फोकस झालंय की सुगंधी ग्रीटिंग कार्डावर फुलपाखरु येऊन बसलंय की काय असं वाटतंय! :) मान गये कोलबेरसेठ!! चतुरंग

दोन्ही फोटो छान आहेत... पहिला फोटो जास्त आवडला.... (फुलपाखरांच्या मागे धावणारा..) मदनबाण.....

कोलबेरा, दोन्ही छायाचित्रे अफलातून! मला पहिले अधिक आवडले. मनस्वी "मृगजळाला पाहुन तुम्ही फसला नाहीत तर स्वतःच्या बुद्धीची तारिफ करु नका. हे मान्य करा की तुम्हाला तहान लागली नव्हती."