Skip to main content

दर्शन -- भक्तिगीत

लेखक कौस्तुभ यांनी गुरुवार, 10/07/2008 12:02 या दिवशी प्रकाशित केले.
पांडुरंग पांडुरंग दर्शन दे रे कधीचे प्राण माझे नयनी उभे रे ॥धृ॥ नाण्यावरी ठसा जसा, दिवा मंदिरात तसा तूच सामावला माझ्या अंतरात वितळू दे काया, तुझ्या मुर्तीत घे रे ॥१॥ पांडुरंग पांडुरंग ... ऐकीयले जनाघरी जाते तू ओढीले नरहरी सोनाराचे दागिने करीले देई हाक येथ पहा, लेकरु तुझे रे ॥२॥ पांडुरंग पांडुरंग ... जन म्हणे विठोबाच्या नादी खुळावला दृष्टाळला जन्म सारा, संसार नासला उत्तराया तूच नाथा, प्रकटोनी ये रे ॥३॥ पांडुरंग पांडुरंग ... भक्तिगीत --कौस्तुभ
Taxonomy upgrade extras
लेखनविषय:

वाचने 1979
प्रतिक्रिया 0

प्रतिक्रिया