मला वाटतं की भौगोलिक परिस्थितीचा देखील विचार करावयास हवा. हिमाचल, दिल्ली, चंदिगड ह्या बाजुकडच्या लोकांचं शरीर तुलनेने आपल्यापेक्षा अधिक मजबुत असतं. ते मांस सहज पचवतात. त्यांचा आहार तसा तगडा असतो.
काही लोक असा युक्तीवाद करतात की, मांसाहार करणार्या लोकांची वृत्ती कालांतराने तामसी बनते. मला तरी हे विधान पटत नाही. पुर्ण शाकाहारी पण जमदग्नीचा अवतार असलेले लोक आपल्याला पहायला मिळतात.
शेवटी ज्याला जे पटतं आणि पचतं त्यानी तो आहार करावा हे उत्तम!!!
-ह्रषिकेश
http://sucheltas.blogspot.com
हिमाचल, दिल्ली, चंदिगड ह्या बाजुकडच्या लोकांचं शरीर तुलनेने आपल्यापेक्षा अधिक मजबुत असतं. ते मांस सहज पचवतात
सहमत.. ज्याला पटेल ते व पचेल ते खाव॑.. 'चराचर सृष्टी ही मुळात चरणारी सृष्टी आहे..(पुल॑चा हसवणूक मधला 'माझे खाद्यजीवन' हा लेख (लाळ गाळत)वाचावा :)
पुर्ण शाकाहारी पण जमदग्नीचा अवतार असलेले लोक आपल्याला पहायला मिळतात
क्रूरकर्मा हिटलर हे तामसी शाकाहारी माणसाचे उत्तम उदाहरण आहे! तो मद्यपानही करीत नसे.
भारतातील विशेषतः पुण्या- मु॑बईकडच्या शहरी माणसा॑नी शाकाहारावरच भर द्यावा असे माझे मत आहे. कारण शहरी जीवनमानात शरिराचे व्हावे तेव्हढेही चलन-वलन होत नाही, व्यायम करायला वेळ नसतो. बैठे काम करणार्या॑ची स॑ख्या जास्त आहे. त्यामुळे पचायला हलका आहार असावा. बद्धकोष्टतेमुळे अमेरिकन लोका॑मध्ये कोलॉन कर्करोगाचे प्रमाण जास्त आहे हे सत्य आहे. शाकाहार स्वस्तही आहे व पूरकही आहे. तसेच बर्ड फ्ल्यू वगैरेची भितीही नाही. (फवारलेल्या कीटकनाशका॑ची मात्र आहे). शहरी लोका॑मध्ये 'य॑ग मायोकार्डियल इन्फार्क्ट' म्हणजेच तरूण वयात हृदयविकाराने मृत्यूचे प्रमाण वाढत आहे ज्यास 'हरी, वरी, करी' म्हणजेच अतिमहत्वाका॑क्षा, चि॑ता व मसालेदार आहार कारणीभूत आहेत हे सिद्ध झाले आहे. मटण-चिकन म्हटले की भरपूर मसाला, तेल वगैरे आलेच. त्यामुळे ते कमी खावे. हा॑, आता खवैय्या॑नी महिन्यातून एकदा नळी ओरपायला हरकत नाही पण व्यायाम करून जिरवायचीसुद्धा तयारी हवी!
(रोस्ट कबाब चवीने खाणारा) प्रसाद
आठवड्यातून एक/दोनदा मांसाहार करणार्याला मांसाहारी म्हणता येणार नाही...ज्याचा आत्मा दिवसातून किमान एकदा तरी "तंगडी" तोडल्याशिवाय तृप्त होत नाही तो खरा मांसाहारी...अमेरिकेतील मंडळी तिकडच्या खर्या मांसाहारी मंडळींच्या खाण्याविषयी जास्त सांगू शकतील...
आपली इच्छा असल्यास ते समीकरण समजावून देण्याचा प्रयत्नतरी मी करु शकते. इच्छा नसली तर पुढचं स्पष्टीकरण वाचू नका.
सर्व जिवंत प्राणी, पक्षी, झाडं, अमीबा, इत्यादी, जगण्यासा लागणारी ऊर्जा सूर्यापासून मिळवतात. पण त्यातल्या काहिच सजीवंकडे ही ऊर्जा शोषून घेण्याची क्षमता आहे, उदा. झाडं. नुसतं उजेडात बसून प्राण्यांचं पोट भरत नाही. प्राण्यांना झाडं किंवा इतर प्राणी खावे लागतात (याला अपवाद असले तर मला कल्पना नाही). तर शाकाहारी माणसाला मांसाहारी माणसांपेक्षा (खवीस, मुंजे, हडळ पकडून सर्वांना) ऊर्जा लवकर मिळते. शाकाहारी झाडं खातात, जी झाडं सूर्याची ऊर्जा अन्नात रुपांतरीत करतात. मांसाहारी माणसांबाबतीत हा मार्ग थोडा लांबचा होतो. झाडं -> प्राणी --> माणूस असा होतो.
मी जी लिंक दिली होती त्यातील शेवटच्या कोष्टकावरून असं अनुमान काढता येईल की:
एका वर्षात, एका चौरस मीटरमधे शाकाहारातून मांसाहारापेक्षा जास्त ऊर्जा मिळेल. याचाच अर्थ, जमिनीचा एक तुकडा, एका ठराविक कालावधीमधे मांसाहारींच्या तुलनेत जास्त शाकाहारी लोकांची भूक भागवेल.
तर्कट (आणि अनाकलनीय?) संहिता.
आपली इच्छा असल्यास ते समीकरण समजावून देण्याचा प्रयत्नतरी मी करु शकते. इच्छा नसली तर पुढचं स्पष्टीकरण वाचू नका.
आम्ही सगळ्या बाजूंनी विचार करतो. आणि ज्ञानग्रहणासाठी खविस लोक तरी सर्व ईंद्रीये ऊघडी ठेवतात(हाडळींच माहीत नाही).
तर शाकाहारी माणसाला मांसाहारी माणसांपेक्षा (खवीस, मुंजे, हडळ पकडून सर्वांना) ऊर्जा लवकर मिळते
मला वाट्ट ..तुम्ही अवांतर वाचन सॉरी लिखाण जास्त करता. इथे मांसाहार खाल्ल्याने होणार्या रोग यावर चर्चा चाल्लेली आहे. असो.
माझ्या माहीती नुसार मांसाहारी प्राणी हे शाकाहारी प्राण्यांपेक्षा(अपवाद हत्ती) शक्तीशाली असतात. (खविस हाडळी द्या सोडून.. त्यांची ताकद ऊर्जेवर नका कमेंट करू .. झेपनार नाय...) ऊर्जा लवकर ऊशिरा मिळण्याचा तुमचा मूद्दा असेलही बरोबर . पण आमची बॅटरी शुद्ध शाकाहार्यांपेक्षा थोडी लेट चार्ज झाली तरी चालेल. (आम्ही पूर्ण मांसाहारी आहोत, व्हेज ला तोंड पण नाय लावत आसं वाट्ट्य का?)
नाही हो मी भारतात आठवड्यातून एकदा आणि ईकडे ४ वेळा मांसाहार (चिकन,मासे) करतो. देवानी काही आणि मेहनतीने काही अशी मूबलक ऊर्जा साठवून आहे. चार शूद्ध शाकाहार्यांची ऊर्जा संपवायची ऊर्जा आहे आमच्यात.
आपण जे मुल्यवान(वाटत नसलं तरी) ज्ञान दिलंत त्या बद्दल आयूष्यभर आभारी राहील हा खवीस.
(स्वगतः आजचा दिवसंच वाईट , झालय काय कुबड्या? कोणी तुझा कुबड कलम करतोय , कोणी नको ते मुद्दे ऊठवतोय , कोणी आमची ऊर्जा जाळतोय ? बर्र तात्यांचा त्रिनेत्र ऊघडला नाहीए)
तुर्कट (आणि बिनडोक? ) कु.ख.
माझ्या माहीती नुसार मांसाहारी प्राणी हे शाकाहारी प्राण्यांपेक्षा(अपवाद हत्ती) शक्तीशाली असतात.
असहमत...
मांसाहारी प्राणी तो ज्याच्यावर उपजिवीका करतो त्याच्यापेक्षा शक्तीशाली असतो (बहुतेक वेळा). उदा. चित्ता हरणापे़क्षा शक्तिशाली असेल पण तो झेब्रा/गवा यांच्यापेक्षा शक्तिशाली आहे असे आपल्याला वाटते का? एका गव्याची शिकार करणे हे एका सिंहाचे काम नाही...म्हणजेच सिंह गव्यापेक्षा शक्तिशाली नाहीत...
१ टू १ कंप्यारिझन करता काहो? मग सांगा मांसाहारी डायनॉसोर पेक्षा शक्तीशाली कोण ? आणी ते तुमचा गवा एकदम छडमाड आसतंय बगा . तुमाला पण घाबरल. रानरेडा म्हणायचं असेल तुम्हाला. ऊद्या म्हणाल मांजर (मांसाहारी) काय तुमच्या गव्यापेक्षा(शाकाहारी) शक्तिशाली का ?
जरा क्लास ठेवा हो . एका साईड ला सगळे मांसाहारी आणि एका साईड ला सगळे शाकाहारी ठेऊन विचार करा ...
म्हणजेच सिंह गव्यापेक्षा शक्तिशाली नाहीत...
मास्तर दिसताय ... त्याच्या शिवाय ईतकी चूकीची माहीती एवढ्या आत्मविश्वासाने दिलीत. असो. मी अफ्रिकेत असतो. ईथे वन्यजिवनाशी चांगला संबंध आला म्हणून सांगतो. तो गवा अतिशय भित्रा प्राणी आहे आणि एक स्वस्त गिर्हाईक असत ते मांसाहार्यांच. ईव्हन रेडा आणि हती,गेंडा देखील सिंहाला पाहून त्याच्या नादी न लागणे पसंत करतात. हे मी डोळ्याने पाहीलेले आहे.
राजू गाईड) कु.ख.
टीका व्यक्तिगत पातळीवर करताय याचा अर्थ तुम्हाला मुद्यांवर चर्चा करायची नाहिये...मुद्दे नसले कि अशी चिडचिड होणं स्वाभाविक आहे. विषय काय आणि चर्चा कशाची! मांसाहारी असण्याचा आणि शक्तिशाली असण्याचा काय संबंध?
फक्त माहितीसाठी-
१)सगळे डायनॉसोर मांसाहारी होते का हो? एकदा इथे डोकवा - http://www.livescience.com/animals/060301_big_carnivores.html
२)गव्याची शिकार हे एकट्या सिंहाचे काम नाही...म्हणूनच ३-४ सिंह (खरंतर सिंहीणी) मिळून शिकार करतात.
माझा आक्षेप फक्त "मांसाहारी प्राणी हे शाकाहारी प्राण्यांपेक्षा(अपवाद हत्ती) शक्तीशाली असता" या तुमच्या विधानाला होता. चुकीची माहिती पसरवू नका. बाकी कोण काय खातं हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे...
सर्वप्रथम एक सांगू ईछीतो की टीका कोणावर वैयक्तिक रीत्या केलेली नाही. आंगावर ओढून घ्यायचं असेल तर खुशाल घ्या.
आणि कशावरून चिडचिड हो? विषयांतर कोणी कुठे कसे सूरू केलंय ते पून्हा एकदा तपासा.. क्रियेला प्रतिक्रिया झाली एवढंच.
आम्ही कोणतीही चूकीची माहीती पसरवंत नाहीये. कोणाच्या जिवावर ऊठणारी अफवा ऊठवल्याचे भासवू नका ऊगाच. राहीला प्रश्न डायनॉसोर चा .. मी चक्क म्हंटलय की "मांसाहारी डायनॉसोर" आणि ते त्या वेळचे सर्वात शक्तिशाली प्राणी होते. "शाकाहारी डायनॉसोर" पेक्षा सूद्धा. आणि मला आता असल्या कुचकट ....ना प्रतिक्रीया द्यायची ईच्छाच ऊरलेली नाहीये. ईथे खरच विषयांतर होतंय आणि तुम्हीही त्याला हवा दिलीच की हो? तुम्ही कुठले धुतलेले तांदूळ.
काही चूक झाली असेल तर मिपाकरांची माफि मागतोय. एक गाढव झालं तर दुसर्याने होऊ नये.
मला ऊर्जा म्हणायचं होतं, शक्ती नाही! ऊर्जेला विंग्रजीत energy म्हणतात आणि शक्तीला power! आता माझ्यासारखे शाकाहारी पामर शक्तिशाली मांसाहारींशी दोन हात काय करणार? पण कळफल़क बडवण्याएवढी ऊर्जा आमच्या पालापाचोळ्यातून मिळते म्हणून एवढी हिम्मत केली.
तो मुद्दा सोडून आणखी एका मुद्द्यावर कोणी स्पष्टीकरण देऊ शकेल काय? तो मुद्दा असा की, प्राणी जर नीट शिजवले (किंवा नाही) तर त्यांच्यातील जंतू जास्त हानीकारक ठरतात का? तसंच सर्व प्राण्यांच्या शरीरातील सर्व अमिनो ऍसिड्स माणसांसाठी चांगलीच असतात का? मी कुठेतरी ऐकलं होतं की सापाचं विष म्हणजे प्रथिनंच असतात, पण आपण त्यांचं आपल्यासाठी योग्य अशा अमिनो ऍसिड्स मधे रुपांतर करु शकत नाही, म्हणून ते विष ठरतं. तर जे प्राणी आपण खात नाही, किंवा प्राण्यांचे जे भाग आपण (मांसाहारी माणसं, आणि भूतं-खेतंही) खात नाही, त्यामधे असा काही विचार आहे का?
विचारी आणि बिचारी संहिता
माझं नाव संहिता "जी" नसून संहिता "जे" (जोशी) आहे. गेलाबाजार त्याचं पांढय्रा लोकांनी सह्निता, सॉन्या (आपल्यासाठी सोनिया), सोन्जा असं केलं होतं. पण एवढं "जी" वगैरे भारदस्त संबोधन माझ्यासारख्या फाटक्या लोकांना नाही शोभत!
"मी कुठेतरी ऐकलं होतं की सापाचं विष म्हणजे प्रथिनंच असतात, पण आपण त्यांचं आपल्यासाठी योग्य अशा अमिनो ऍसिड्स मधे रुपांतर करु शकत नाही, म्हणून ते विष ठरतं""
नाही, जर आपण ते पोटात घेतल, आनि रक्तात मिसळू न देता त्याच पचन केल, तर ते प्रोटिन म्हणुनच काम करत, पन जर ते रक्तात न पचता तसच मिसळल(सर्पदंश) तर ते अपाय करते.
माझ्या माहितीत भर घालण्याबद्दल धन्यवाद.
माणूस चावल्याने साप मेला असंही मी गेल्या ५-६ महिन्यांत म.टा.मधे वाचल्याचं आठवतंय. सापालाही आपली लाळ विषारी ठरली असेल का?
सामान्य माहिती कमी असणारी संहिता.
सामंत साहेब ....
सुंदर विषय काढ्लात.
मी डॉ. अभय बंग यांचे "माझा साक्षात्कारी ह्रुदयरोग" हे पुस्तक गीते समान मानतो. त्यात ही हेच दिले आहे.
सुंदर लिखाणा बद्द्ल आभार. अजुन येवू द्या.
--- आपला.. बबलु-अमेरिकन
बबलुजी,
आपण केलेल्या प्रशंसे बद्दल आभार.
"मी डॉ. अभय बंग यांचे "माझा साक्षात्कारी ह्रुदयरोग" हे पुस्तक गीते समान मानतो. त्यात ही हेच दिले आहे."
हे आपले वाक्य वाचून मला पण थोडा धीर आला. आभार.
www.shrikrishnasamant.wordpress.com
श्रीकृष्ण सामंत
"कृष्ण उवाच"
shrikrishnas@gmail.com
प्रतिक्रिया
मला वाटतं
हिमाचल,
सुरेख प्रतिसाद
समतोल विचार
भारतातील बहुतेक मंडळी शाकाहारी!
कु. खवीस साहेब,
(आचार) संहीता मॅडम ,
माझ्या
बरं बरं (गटणे स्टाईल)
काहीही !
?????
नाय नाय नाय कु.ख. राव
कु.ख.... माझ्या नावात आपण चूक केलीतः
मजा आली बुआ
"मी
धन्यवाद
सामंत साहेब -- छान लिखाण
आभार
मला लेख आवड्ला
लेख आवड्ला
आभार
माझी व्याख्या......
धागालेखकाचे धमाल विनोदी विचार