मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

अगतिक....

ज्ञानोबाचे पैजार ·

In reply to by बॅटमॅन

सतिश गावडे 07/11/2014 - 18:55
जेव्हा तुम्ही मांस किंवा मच्छी खात असता तेव्हा तुम्ही एका मृत प्राण्याचे शरीर खात असता. - ग्रीक तत्ववेत्ता मार्कस ऑरेलियस

In reply to by सतिश गावडे

बॅटमॅन 08/11/2014 - 00:11
अर्थातच. गव्हाची चपाती खात असताना एका मेलेल्या झाडाचे चूर्ण करून, त्यात पाणी मिसळून वर त्याला आगीवर भाजून त्यावर प्राण्यापासून जबरदस्तीने घेतलेल्या दुधापासून (ब्याक्टेरियांना निर्घृणपणे मारून इ.) बनवलेले तूप ओतून चवीने खाणार्‍यांचीही तेवढीच मजा वाटते. -आम्ही. बाकी - मार्कस ऑरेलियस हा ग्रीक नसून रोमन होता. अन नुसताच तत्त्ववेत्ता नव्हता, तर रोमन राजा होता.

In reply to by बॅटमॅन

सतिश गावडे 08/11/2014 - 00:21
गव्हाची चपाती खात असताना एका मेलेल्या झाडाचे चूर्ण करून, त्यात पाणी मिसळून वर त्याला आगीवर भाजून त्यावर प्राण्यापासून जबरदस्तीने घेतलेल्या दुधापासून (ब्याक्टेरियांना निर्घृणपणे मारून इ.) बनवलेले तूप ओतून चवीने खाणार्‍यांचीही तेवढीच मजा वाटते.
वनस्पतीस मेंदू नसतो. तस्मात त्यांची गणना मांसाहारात करणे चुकीचे आहे. दुधात ब्याक्टेरीया असले तरी ते असतीलच याची खात्री देता येत नाही. असले तरी ते उघडया डोळ्यांनी दिसण्यासाठी कुण्या व्यास मुनींनी दिव्य दृष्टीचा आशिर्वाद द्यावयास हवा. जे साप्रंत कलियुगी होणे नाही.
मार्कस ऑरेलियस हा ग्रीक नसून रोमन होता. अन नुसताच तत्त्ववेत्ता नव्हता, तर रोमन राजा होता.
होय तो राजा होता हे मान्य. बिचारा दिवसा तलवार चालवायचा आणि रात्री तत्वचिंतन करायचा. मात्र ग्रीक हा स्थान उल्लेख आम्ही सांप्रत काळाच्या अनुषंगाने केला आहे. आताचे ग्रीक पूर्वी रोमन साम्राज्याचा भाग होते म्हणून आजही त्यास रोमन साम्राज्य म्हणणे आम्हांस चुक वाटते.

In reply to by सतिश गावडे

बॅटमॅन 08/11/2014 - 00:28
वनस्पतीस मेंदू नसतो. तस्मात त्यांची गणना मांसाहारात करणे चुकीचे आहे.
पण आम्ही कधी काय म्हटले? जित्याजागत्या जिवाला ठार मारून त्याचे प्रेत खाणे हे शाकाहार व मांसाहारात कॉमन आहे इतकेच म्हटले आहे.
मात्र ग्रीक हा स्थान उल्लेख आम्ही सांप्रत काळाच्या अनुषंगाने केला आहे. आताचे ग्रीक पूर्वी रोमन साम्राज्याचा भाग होते म्हणून आजही त्यास रोमन साम्राज्य म्हणणे आम्हांस चुक वाटते.
मार्कस ऑरेलियसला उचकी लागली असेल एलिसियम मध्ये. अहो सरजी, ग्रीस हा रोमन साम्राज्याचा भाग असला तरी त्याचा संबंध काय इथे? रोमन साम्राज्याचे 'कोअर' इटली प्रांत होता, जसे मराठा राज्याचे कोअर म्हणजे पश्चिम महाराष्ट्र + कोकण हा प्रदेश होता. ऑरेलियसची फ्यामिलीही तिथलीच-किमान त्याच्या जन्माच्या काही (४-५) पिढ्या अगोदरपासून ते लोक रोममध्ये रहात होते. त्याचा पणजा रोमन संसदेत सेनेटर होता.

In reply to by बॅटमॅन

सतिश गावडे 08/11/2014 - 00:40
जित्याजागत्या जिवाला ठार मारून त्याचे प्रेत खाणे हे शाकाहार व मांसाहारात कॉमन आहे इतकेच म्हटले आहे.
अहो माणसाला जगण्यासाठी काहीतरी खावेच लागणार. नुसती हवा खाल्ली तर शरीरास आवश्यक असणारी उर्जा कोठून मिळणार. मग अशा परिस्थितीमध्ये मेंदू असलेल्या आणि म्हनूनच भाव-भावना असलेल्या प्राण्यांपेक्षा मेंदू नसलेल्या वनस्पती खाणे तुलनात्मकरीत्या चांगले.
मार्कस ऑरेलियसला उचकी लागली असेल एलिसियम मध्ये.
कैच्याकै. तुम्ही एव्हढे मोठे संस्कृत पंडीत असून चार्वाकाचा "भस्मीभूतस्य देहस्य पुनरागमनोकुत:"हा श्लोक वाचला नाही का?
अहो सरजी, ग्रीस हा रोमन साम्राज्याचा भाग असला तरी त्याचा संबंध काय इथे? रोमन साम्राज्याचे 'कोअर' इटली प्रांत होता, जसे मराठा राज्याचे कोअर म्हणजे पश्चिम महाराष्ट्र + कोकण हा प्रदेश होता. ऑरेलियसची फ्यामिलीही तिथलीच-किमान त्याच्या जन्माच्या काही (४-५) पिढ्या अगोदरपासून ते लोक रोममध्ये रहात होते. त्याचा पणजा रोमन संसदेत सेनेटर होता.
आम्ही तत्वज्ञानाचा अभ्यास केला आहे. इतिहास आणि भुगोलाचा नाही. त्याहीपेक्षा मार्कस ऑरेलियस कुठला होता यापेक्षा त्याने जगाला कोणता संदेश दिला हे आमच्या दृष्टीने महत्वाचे आहे.

In reply to by सतिश गावडे

बॅटमॅन 08/11/2014 - 00:55

आपण वनस्पती व प्राणी खातो, वनस्पती प्रकाश 'खातात'. त्यामुळे सर्व ऊर्जा अल्टिमेटली हवेतूनच पैदा होते. ते एक असोच. पण त्याचा आणि वनस्पती व प्राणी खाण्याच्या चांगल्यावाईटाचा संबंध कळाला नाही. खरेतर वनस्पतींना मारून शेतीवरील ताण वाढवण्याऐवजी प्राण्यांना खाऊन शेतीस मदत करावी हाच योग्य मार्ग आहे.

मार्कस ऑरेलियसला संस्कृत येत नसल्याने चार्वाकाचा नियम त्याला लागू होत नाही.

साम्राज्यभर लढाया करून वर शांतीसंदेश देणारा ऑरेलियस पक्का ढोंगी होता.

In reply to by बॅटमॅन

सतिश गावडे 08/11/2014 - 01:03
आपण वनस्पती व प्राणी खातो, वनस्पती प्रकाश 'खातात'. त्यामुळे सर्व ऊर्जा अल्टिमेटली हवेतूनच पैदा होते.
अ = ब आणि ब = क म्हणून अ = क हे गणिती तत्व जगण्याला लागू होत नाही.
पण त्याचा आणि वनस्पती व प्राणी खाण्याच्या चांगल्यावाईटाचा संबंध कळाला नाही.
दगडापेक्षा वीट मऊ.
खरेतर वनस्पतींना मारून शेतीवरील ताण वाढवण्याऐवजी प्राण्यांना खाऊन शेतीस मदत करावी हाच योग्य मार्ग आहे.
जीभेचे चोचले पुरवण्यासाठी हा शेतीचा बहाणा चांगलाच आहे तुमचा.

आपल्या प्रजेचे परकीय आक्रमणापासून संरक्षण करणे हे राजाचे कर्तव्य असायचे. ऑरेलियस त्याचे राजा म्हणून असलेले कर्तव्य पार पाडत असे.

In reply to by सतिश गावडे

बॅटमॅन 08/11/2014 - 01:11

पळवाट छान आहे, परंतु लॉजिक डजंट लाय. ते तस्सेच आहे नि तस्सेच लागू होते.
दगडापेक्षा वीट मऊ.
दोन्हींची पर्पज एकच.

क्यालरीजच्या थप्प्या लावलेली तुपाळ मिठाई ही व्हेज असल्याने चोचल्यांत जमा होत नसावी बहुधा. तदुपरि व्हेजवाले लोक एकदा नॉनव्हेजची चटक लागेस्तोवरच व्हेज व्हेज करत बसतात. नॉनव्हेजची चव लागली रे लागली की मग हाडेही सोडत नाहीत. (सोडतात पण अन्य मार्गाने, दुसर्‍या दिवशी.)

हो पण रोमन राजे एक नंबरचे विस्तारवादी अन क्रूर होते. जर्मनांनी बरी खोड मोडली त्यांची.

In reply to by बॅटमॅन

@पण आम्ही कधी काय म्हटले? =))))) @जित्याजागत्या जिवाला ठार मारून त्याचे प्रेत खाणे हे शाकाहार व मांसाहारात कॉमन आहे इतकेच म्हटले आहे.>>> =)) मला आधि वाटलेलं,बिनतोड मुद्द्यामुळे स.गा. जिंकला..पण या मेल्या वाघुळानी अंगावर न घेता चेंडू असा काहि सोडलन,की आउटही होऊ नये,आणि बाइज ४ रन पण मिळावे!!!!!!!!!!!!! http://www.sherv.net/cm/emoticons/memes/troll-face-meme-smiley-emoticon.gif

In reply to by बॅटमॅन

विजुभाऊ 08/11/2014 - 10:17
तुम्ही जेम्व्हा कच्च्या भाज्या खाता तेंव्हा एक सजीव जिवंतच चिरुन खात असता. तुम्ही जेंव्हा धान्ये भरडून खात असता तेंव्हा सगर्भावस्थेत असलेल्या अनेक जिंवत पेशीना खात असता. जेंव्हा तुम्ही मोड आलेली कडधान्ये , कवळी काकडी वगैरे खात असता तेंव्हा तुम्ही भृण हत्या करत त्याला चावून खात असता ..........मिपा तत्ववेत्त्ता विजुभाऊ शुन्यमार्क कायकेलीस.......

टायटलमदेच सुद्द्लेकन चुकलं बगा राव. ते "अगतिक" पायजे होतं. आणी त्यांना ट्रकमंदी नाय कोंबत तो टेंपो असतो राव. ट्रकचा मान बोकडांना आणि गोवंशियांना. थोड डिटेलींग कडं लक्ष द्या कि राव !

In reply to by धर्मराजमुटके

मुटकेकाका, आगतिक च्या पुढे .... ही लिहिले आहेत याची कृपया नोंद घ्यावी. त्या .... मधे योग्य ते शब्द भरा. पैजारबुवा,

In reply to by अर्धवटराव

सतिश गावडे 07/11/2014 - 23:41
कोंबडीच्या आत्म्याला केव्हाच सद्गती मिळालेली असते. ताटात असतो तो कोंबडीचा मर्त्य देह. त्या मर्त्य देहातून चैतन्य निघून गेल्यावर कसले बोलणे आणि कसले चालणे.

स्वप्नज 08/11/2014 - 00:27
काय स्साले नशीब असते कोंबडीचे... खरं तर तिच्या बलिदानाची जाण ठेवून तिला 'राष्ट्रीय (किंवा मिपा)पक्षी' केले पाहिजे व बोकडाला 'राष्ट्रीय प्राणी'. (प्राणी, पक्षी व 'पाखरं'प्रेमी) स्वप्नज

रेवती 08/11/2014 - 01:22
बर्‍याचजणांना पयल्या ओळीत कळलं होतं म्हणे! मला नव्हतं कळलं. असो. एकंदरीतच न बघवणारा प्रकार. मला काही ते पदार्थ बनवता येत नाहीत, मग शनिवारी भेटलेल्या एक बाई म्हणत होत्या की त्या मला सोप्पा प्रकार कागदावर लिहून पाठवतील. अमूक पद्धतीने मसाला करा, तमूक पद्धतीने परता मग चिकनचे असे असे तुकडे करा.......झालं, अहो तेच तर जमत नाही.

लेखनविषय:
लेखनप्रकार
आमच्या विरोधाची पर्वा न करता त्यांनी बेफाम चालणार्‍या, जाळीच्या ट्रकमधे, आम्हाला कोंबल. सगळ्याजणी भेदरलेल्या होत्या. जीव मुठीत धरुन, आम्ही कशाबशा जाळीला पकडुन बसलो होतो. आमच्यातल्या दोघीजणी ट्रक मधेच मरण पावल्या. ट्रक थांबला. दहाबारा जणींना उतरवले. नराधमांनी अक्षरशः पायाला धरुन फरपटत त्यांना बाहेर ओढले. एकीने निसटायचा प्रयत्न केला. पण चारपाच टग्यांनी तिला घेरलेच. तिचा आकांत निमूटपणे पहाण्याशिवाय आमच्यापुढे पर्याय नव्हता. पुढे मला पण उतरवले गेले. पळण्याची हिम्मतच नव्हती. आम्ही होतो तिकडे येउन लोक एखादीकडे बोट दाखवत. तिला ते लगेच बाहेर काढत. माझ्याकडेही एकाने हात केला, खुप घाबर

क्यालीफोर्नियाचा कोकण....

विजुभाऊ ·

सौंदाळा 07/11/2014 - 12:13
शिवास रिगल, ग्लेन्फिडीच जॅक डॅनियल्स वगैरे बंद करुन ताडी, माडी, फेणीची भरपुर उघडावी लागतील ओपेरा शो ऐवजी दशावतारी नाटके ;) बाकी आठवेल तसे टंकतो कोकणभुषण आणि कॅलिफोर्निया किंग पिवळा डांबिस यांच्या प्रतिसादाच्या प्रतिक्षेत

In reply to by सौंदाळा (verified= न पडताळणी केलेला)

शिरां पडो त्या विजुभाउचें तोंडार! अवदसा आठवली मेल्याक!!!!! :( माझे बाकीचे सजेशन नंतर, राग थंड झाल्यावर दितंय.... :)

In reply to by पिवळा डांबिस

विजुभाऊ 08/11/2014 - 10:01
शिरां पडो त्या विजुभाउचें तोंडार! डाम्बीसकाका आम्हा पच्छीम म्हाराष्ट्रातल्या माणसांक "शिरा" असे म्हंटले की रव्याचा सांजा आठवतो. तोसुद्धा मस्त सांगलीच्या तासगावची "बेदाणे मनुका "घातलेले. त्या अर्थाने "शिरा" इज वेलकम.

In reply to by विजुभाऊ

ओके, व्हॉटेव्हर दॅट मेक्स यू फील सुपिरियर!!!! आता आमचे सजेशन.... १. कॅलिफोर्नियातल्या सगळ्या शेकडो एकर शेतांचे तुकडे पाडून माणशी अर्धा एकर असाच मॅक्सिमम जमिनीचा तुकडा दिला पाहिजे. २. बदाम, पिस्ते याचे मळे तोडून तिथे रातांबे, जगमं, अणि आंबाड्यांच्या झाडांचीच लागवड करावी... ३. द्राक्षं आणि स्ट्रॉबेरीजची शेतं बंद करून तिथे नाचणी, वरी आणि नागलीसारख्या कॅश क्रॉपची जोपासना करावी. ४. बाहेरुन आलेल्या टूरिस्टशी आदराने वा फेअरली न वागता त्याचे शक्य तितके पैसे पिळवटून कसे घेता येतील याच्याच सदैव योजना आखाव्यात. ५. ... ६. ... ७. ... ८. ... ९. ... १०. बाहेरच्याकडून शक्य तितकं सगळं पिळून घ्यावं पण त्याबदल्यात जर त्याने आंबे मागितल्यास, "औंदू मोहर जल्लो, काय्येक आंबो गावूक नाय!!!" हे वारंवार बजावण्यास विसरू नये!!!!_ :)

In reply to by पिवळा डांबिस

विकास 10/11/2014 - 07:46
ते सगळे कराल हो, पण त्या शिंच्या पाण्याच्या दुर्भिक्षाचे काय करायचे? ;) बाकी कोकणचा कॅलिफोर्निया करण्याची गोष्ट माझ्या आठवणीप्रमाणे ७७ सालातले रेल्वे मंत्री मधु दंडवते यांनी केली होती. आता कोणी करत असेल तर माहित तरी नाही.

In reply to by विकास

नितिन थत्ते 10/11/2014 - 17:40
शक्य आहे. मला वाटत होते उद्योगपती बा म गोगटे यांनी ती कल्पना मांडली होती. आमचे एक बंधू म्हणतात, "फेणीला परवानगी द्या, कोकणाचं काय पायजे ते करता येईल".

गवि 07/11/2014 - 12:15
रोचक आहे कल्पना. मुळात पलीकडल्या आवारातल्या शेजा-याच्या आंब्याची खांदी आपल्या परसात आली तर त्यावरच्या कै-या चुपचाप उतरवून नंतर वरुन त्या खांदीची तक्रार नोंदवणे शिकले पाहिजे. उदा. आमच्या कौलाला तुमची खांदी घासते. तुमच्या कै-या पिकून आमच्या कौलांवर पडतात त्याचा आवाज होतो. तुमच्या खांदीवरुन काल घरात जनावर आले. आमच्या घरी पोरेबाळे आहेत. ( शेजा-याला नसतील तर या वाक्यावर जोर) उद्या तुमची खांदी आम्ही उपभोगली असा आरोप आमच्यावर नको. तस्मात ती खांदी तोडा.

खटपट्या 07/11/2014 - 12:27
सगळे शक्य आहे पण आमच्या कोकणात पडणारा धोधो पाउस कुठुन आणणार ? "प्रत्येक घरातुन एक केस कोर्टात" या धर्तीवर तिथे तेवढी न्यायालये लागतील..तेवढीच एकमेकान्बरोबर भांडणारी माणसे कोकणातुन आयात करावी लागतील. कोकणात चालणारी यष्टी तिकडे न्यावी लागेल. पानाची सुपारीची दुकानं. पान खाउन पचा पचा थुकणारी माणसं येवडा सगला पायजे. तवा कायता कोकन दिसुक लागल !!

In reply to by खटपट्या

विजुभाऊ 08/11/2014 - 14:07
पण मी पाहीलेत थुंकताना. एस टी स्टॅन्ड तर रंगलेले असतात. ते होय.विसरलात का कोकणच्या मातीचा रंगच लाल असतो. अवांतरः ते थुंकणारे थुंकायच्या वेळेपुरते भय्या रुपात असतात.

उत्तम कल्पना रे विजू. हॉटेलांमध्ये 'थंडगार कोकम सरबत' ठेवावे लागेल. तिकडच्या स्त्रियांनि करवंदाचा जॅम्,लोणचे,सुपारी बनवायला शिकले पहिजे. आंबे विकणार्यांनी त्यांच्या व्यवसायचे नाव 'निक्सन बंधू आंबेवाले'वगैरे ठेवायला शिकले पाहिजे.

उपास 07/11/2014 - 19:16
अहो विजूभाऊ, आहात कुठे? दोन तीन महाराष्ट्र मंडळ वा तत्सम मराठीभिमुख संस्था काढून आणि आपापसात वाद घालात त्या सॅन ओझे वाल्यांनी मधल्या आळीचं नाव सार्थ केलय म्हणॅ.. खरा काय ता तिथलीच मंडली सांगतिल.. ;)

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

सतिश गावडे 07/11/2014 - 23:28
जरा कुठे गंमत करायची म्हटलं तर काका लोकांना पाहवत नाही. :( रच्याकने, श्यान होज्येला लई येळा गेल्तो.

लिंबू मिरची मिळतात काय हो क्यालिफोर्नियात ? नाही म्हणजे करणी करायला अडचण येऊ नये, झालेच तर मुंजे, हडळ, खवीस, झोटींग इ. इ. जमाती एक्स्पोर्ट कराव्या लागतील.

In reply to by धर्मराजमुटके

सतिश गावडे 07/11/2014 - 20:43
क्यालिफोर्नियाची संस्कृती इतकीही प्रगत नाही. अजूनही ते उत्क्रांतीच्या मंदिर याच पायरीवर आहेत.

प्रदीप 07/11/2014 - 22:51
नुकत्याच एका सेल-बाय-डेट होऊन गेलेल्या कोकणी नेत्याने म्हटल्यानुसार, प्रथम गुजरात्यांना बडवून काढावे लागेल. आता कोकणचा कॅलिफोर्निया करतांना काय अथवा कॅलिफोर्नियाचा कोकण करतांना काय, गुजरात्यांचा त्यात संबंध काय, असे विचारायचे नाही.

In reply to by प्रदीप

विजुभाऊ 08/11/2014 - 09:58
तुमका काय म्हनायचा तां म्हना वो. पण कुठेही जा गुजराती येतीलच तेथे. निदान एखादे पटेल मोटेल तरी असेल. कोकणात पटेलमोटेल ला धर्मा भंडार्‍याची खानावळ म्हणतात इतकेच.

In reply to by अर्धवटराव

साती 08/11/2014 - 12:00
बफेलोमधून मागवा. मात्रं तिला आयुष्यभरात मिळून दहा दहा शेर दूधदेण्यासाठी वेगळ्या प्रकारची इंजेक्शने द्यावी लागतील. आणि तिचं चांदी नाव कुणाला नाय कळलं तर मूनहेड ठेवावे लागेल.

भिंगरी 08/11/2014 - 13:46
आणि मग .... सॅमचे श्याम मूरचे मोरू अ‍ॅनीचे अनू मायकलचे मछिंन्द्र इ.इ. नावे बदलावी लागतील मग म्हणा..... यावा,कॅलिफोर्निया आपलाच आसा.

यसवायजी 08/11/2014 - 14:40
किनार्‍यावर, नवसाला पावणारे, कुठल्याशा उत्खननात सापडलेले गंपती/येशू बसवावे लागतील. बिकनी-बेब्जना पोकल बांबूचे फटके दिले जातील. पुरषांनी फक्त चट्टेरी-पट्टेरी चड्ड्या आणी 'प्यांटी' (हो, माहीत्याय माका याक्रण) घालावे आणी बायांनी फक्त साडी/च्युडीडार!!

चट्टेरी-पट्टेरी चड्ड्या घालून गडग्यावर एक पाय ठेवून मशेरी लावता आली पाहिजे.रशिया-जपानच्या पंतप्रधानापासून ते कुडाळच्या सरपंच- सर्वांची मापे काढता आली पाहिजेत.

बॅटमॅन 08/11/2014 - 19:47
कॅलिफोर्निया म्हणजे काली-पूर्णिया हो मूळची!!!! पौर्णिमा आणि अमावस्या अर्थात 'काळी' रात्र या दोन्ही वेळेस जी चांगली वाटते ती कालीपूर्णिया. त्याचा आता या हरामखोर इ. इंग्रजांनी अपभ्रंश केला ही गोष्ट वेगळी.

अदुगर शेराच्या मध्यावर एक पिंपलाच्या झाडासर पार आनी चावडी बांदूक व्हयी.. गाववाले थयसर सुशेगात बसूक तम्हाखूचा बार टाकत आजूबाजूच्या गावातल्या खबरींची देवान घेवान करतले.... अवांतर....सोकाजीनानांक क्यालीफोर्नियाचो म्हापौर करूक व्हया...

तुमच्या त्या pier 39 वर सोलकढी,कोंबडी वडे,गोटी सोडा ठेवावयास हवा.शॉपिण्ग मॉलमध्ये आंबा पोळी,खास उग्र वासाची फणस पोळी,तळलेले गरे हवेत. .

In reply to by विश्वजीत भोसले पाटील

लेका...आरं कुठं त्ये शिकाकाई का काय ते...कुठं आपलं साखरसम्राटाचं सांगली ? तुलनाच सोड रे...

फारएन्ड 09/11/2014 - 01:02
हे वाक्य पहिल्यांदा कोणी म्हंटले कोणास ठाउक. नंतर कायम चिकटले आहे कोकणाच्या बाबतीत. कॅलिफोर्निया आणि कोकण यात दोन्ही पश्चिम किनार्‍यावर आहे हे सोडले तर काय साम्य आहे मला माहीत नाही. अमेरिकेच्या एखाद्या भागाशी साम्य शोधायचेच म्हंटले तर हवाई शी जास्त आहे. तेथील निसर्ग, फळे, फुले ही जास्त कोकणासारखी वाटतात.

hitesh 09/11/2014 - 13:45
नाष्ट्याला आम्लेट पावाऐवजी उसळ पाव

कंजूस 09/11/2014 - 16:55
विजुभाऊ उथळ निव्वळ कॉमेडी चालू केलीत पण शेवटी फारच शिरेस काकांसारखे बोलताय. टेँपो जातो ना अशाने. मस्त अर्ध पान चुना आणि बकणाभर सुपारी तोंडात कोंबून चिऱ्यावर बसायचं. अगोदर पंचमंडळी मुंडी हलवू देत. मग दशावतार रंगेल इकडे. असं सह्याद्री मुलाखतीसारखं लगेच आवराआवर करायची नाही.सध्या पुण्यावरचं वादळ कोकणात गेलं म्हणून जरा दम खाऊ दे त्यांना. तोपर्यँत प्रतापगडावरची चर्चा जोर पकडतेच आहे.

रमेश आठवले 10/11/2014 - 08:25
जपानचे पंतप्रधान एकदा बोधगयेचे दर्शन करण्यासाठी बिहार मध्ये गेले होते. त्यावेळी तत्कालीन मुख्यमंत्री लालूप्रसाद यांना भेटले होते. त्यांनी लालूजींना सुचवले की बिहारची सर्वसत्ता त्यांच्याकडे पाच वर्षे सोपवली तर ते बिहारचा जपान करून दाखवतील. त्यावर लालूजी म्हणाले त्यात काय मोठे!तुम्ही माझ्याकडे तीन वर्षासाठी सत्ता सोपवली तर मी जपानचा बिहार करून दाखवतो .

In reply to by श्रीरंग_जोशी

खटपट्या 10/11/2014 - 10:24
अरे शिरीरंगा, कोकण म्हटलो कि माझो रवळनाथाचो मंदिर इला, जीते माझो रवळनाथ तिते माझो मालवण. बाकी येवडे दिवस तुमचा कायता कैलिफोर्निया बगीतला, आमच्या कोकनाचि सर त्याका नाय रे. नुसता रकरकित यकदम. जल्ली मानसाच नायत. जी काय दिसतत ती बोलत नायत. मनसा कशी पटापटा बोलूक व्हयीत. आमच्या कोकनात कसा, गावात नवीन मानूस इला रे इला कि अख्या गावाक खबर. बाकी जे काय मिलता त्या पण यकदम बुलबुलीत. आंब्यायेवडो टमाटो पण रकेचि चव नाय त्याका. कदी रसरशीत सुरमय, बांगडा, बगुक नाय. शेवटी माजा कोकन तो कोकन. कदी येकदा येयन असा झालाय माका.

विजुभाऊ 11/11/2014 - 10:51
ता खरांहा रे खटपट्या. हांव तुका काय सांगताहा ता ऐक. कोकनचो क्याली की कसलोसो फोरण्या कसला करताहा. इथे कोकणांत कोकण्याक कोण इचरत नाय. कोकणरेल्वे तर सगळे भैय्येच असतात. क्यालिफोर्नियात कोण असेल त्यांच्या जागी

In reply to by विजुभाऊ

खटपट्या 11/11/2014 - 11:56
ह्यां बाकी पाईंटाचा इचारलाव. आता हयसर तर कोन भैया मानूस दिसा नाय. पन भैयांची जागी ते मेक्सिकन का कोन फेक्सिकन हायत ना ते दिसतत. (बगावं तवा मेल्यांचो त्वांड सुजलेला). मेल्यांची भाषा पन काय. सुत्रा, पुत्रा असं काय तरी बड्बड्तत. मेक्सिकन चेडवा बाकी सुंदर हां. आनि ते आफ्रिकेचे कांडे चोर मेले हायतंच. हे रेड्यासारखे माजलेलं. आता हयसर पन गोऱ्यांका कोण इचारूक नाय. आजकल तर कायवबी कामा करंतत. पैल्यासारको रुबाब र्‍हायला नाय सायबाचा. आनी कशाचाच काय र्‍हायला नाय....मेले कांडेचोर गोर्‍या पोरीवांगडा फिरतंत आनि गोरे पोर काळ्या पोरीवांगडा... जल्ला कशाचा पायपोस कशाला नाय.

आपले राजकारणी कोकणचे क्यालिफोर्निया करायच्या बर्‍याच बाता करत असतात. कोकण खरेच निसर्गसुंदर आहे. निसर्गाचा इतका वरदहस्त महाराष्ट्रात इतर कोणत्याच भागास मिळालेला नाहिय्ये. लाम्बच लांब समुद्रकिनारा. त्यांची जणु सोबत करत असल्या सारख्या लागुनच असलेल्या डोंगर रांगा. ती तांबडीलाल माती, वार्‍यावर डुलणारी नारळी पोफळीची झाडे. या सार्‍याला दृष्ट लागु नये की काय म्हणून असणारे गरीबीचे देणे, लोकाना असलेले रीकामपण, बेकारी , अशिक्षण , त्यातून निपजलेला तिरकस स्वभाव हे सगळे कोकणातच आढळतात. आपले राजकीय नेते कोकणचा क्यालिफोर्निया करण्याच्या घोषणा करतात.

( ओळखलत का साहेब मला?)

अमोल केळकर ·

In reply to by आयुर्हित

दिनेश सायगल 07/11/2014 - 23:05
उठता बसता कुणालाही श्रेय न देता कॉपी पेस्ट करणार्‍यांनी श्रेय देण्याची आठवण करावी हे पाहून डोळे पानावले.

विवेकपटाईत 07/11/2014 - 20:08
कोकणी आंब्याची परिस्थिती सध्या लाजिरवाणी आहे, मुख्यमंत्री होण्याचे स्वप्न स्वप्नच राहिले, आता कुर्सी ही गेली. परतीची वाट धरतील का?

असे कार्यकर्ते आहे म्हणूनच नेते आहेत. यात कोणत्याही प्रकारे लाचारीचे समर्थन नाहिये. "अहो महापुरे झाडे जाती तेथे लव्हाळे वाचती." माणसाने कसे लवचिक असले पाहिजे. कार्यकर्त्याने चार दिवस वाघाचे जीवन जगण्यापेक्षा हजार वर्षे शेळीचे जीवन जगले पाहिजे. शेवटी चार दिवसात काय रिझल्ट मिळणार हो ? शेवटी क्वांटिटी महत्त्वाची. क्वालीटीच काय घेऊन बसलात भाऊ ? मोडेन पण वाकणार नाही इ. इ. सुविचार फळ्यावर आणि पुस्तकात लिहायला चांगले असतात.

ओळखलत का साहेब मला?’ परत आला कोणी, कपडे होते फाटलेले पण, मधाळ त्याची वाणी क्षणभर बसला नंतर हसला बोलला वरती पाहून, ‘पक्षामध्ये फुट पडली, आलो तिकडे राहुन’. कार्यकर्त्यांसह आम्हाला, चार आश्वासने भेटली, स्वबळावर सत्ता येता, आमची वाट लावली . पक्ष सोडला, चूक झाली, होते नव्हते ते गेले, निवडणूक होईपर्यंत त्यांनी, फक्त राबवून घेतले कार्यकर्त्यांना घेउन संगे, साहेब आता लढतो आहे राहिलेली कामे पुर्ण करून, मतदारसंघ घडवत आहे खुर्चीकडे लक्ष जाताच हसत हसत उठला ‘पद नको साहेब ’, जरा एकटेपणा वाटला. आलेल्या लाटेत खुर्ची गेली, तरी मोडला नाही कणा, पक्षात परत घेउन तुम्ही, फक्‍त लढ म्हणा (लढाऊ ) सैनीक ७/१

एक उदास कंटाळवाना चेहरा

प्रकाश१११ ·

पाषाणभेद 07/11/2014 - 11:52
प्रतिमांच्या सुयोग्य वापराने कविता परिणामकारक झाली आहे. कविता आवडली. अवांतर (ह. घ्या) : मुपि वरील आम्रविका, परदेश प्रवास ( अन अर्थातच मुपिवरील लेखांचे आमचे आद्य विडंबन ( ही आमची झैरात बरं का!) आठवले.

पाने गळू लागलीत झाडांची हवा वाहत असते नको तितक्या वेगाने थरथरत राहतात त्याच्या खिडकीवरचे पडदे दरवाजा बंद असला तरी हवा टकटकत बसते दारावर एक उदास वातावरण झपाटून टाकते मनाला बाहेर प्रकाश असून अंधारून गेलेला दिवसा देखील कानांना येत राहतो रातकिड्यांचा आवाज उगाचच एखादं पाखरू वळचणीला एखादं पान गळणा-या फांदीवर घट्ट बसून रुतलेलं काळ्या काळ्या फांदीच्या बोटाना धरून बसलेलं आवळून टाकलाय गळा आपल्या निष्टुर हातानी तरीही तो स्वताला ढकलीत रहातो पर्णहीन झाडाची पायवाट अंगावर शिरशिरी नि नाक झडून गेल्याचा भास तळे शुभ्र एक उदास तवंग त्याच्या अंगावर मृत होताना ताठरून जाते जसे एक

चिनू ची गोष्ट !!

फिझा ·

समीरसूर 07/11/2014 - 11:33
गोष्ट जमली आहे. बहुधा चिनू वेडी असावी आणि तिला निरनिराळे भास होत असावेत. असंच ना?

योगी९०० 07/11/2014 - 12:20
गोष्ट जमली आहे..लिखाणशैली उत्तम... यावरून मला एअरपोर्ट आणि आणखी एक गोष्ट (नाव आठवत नाही पण एक मुलगा स्वतःला मोठा शास्त्रीय गायक समजून आपल्याच विश्वात रहात असतो) हे आठवले...

जुईचे फूल 07/11/2014 - 14:31
पहिलाच प्रयत्न असूनही कथेची बांधणी आणि लेखनशैली फार सुंदर जमलीये फिझा... असं सुघड, मोजकंच आणि तरीही भिडणारं लिहिणं सगळ्यांनाच जमत नाही... चिनूची गोष्ट आवडली...

चिनू ची गोष्ट !! मे महिन्याचे दिवस होते.यंदाची मे ची सुट्टी काकांच्या गावाला साताऱ्याला घालवायची असे समस्त बच्चे कंपनी चे ठरले होते. मला ते साताऱ्याचे घर फार काही आवडायचे नाही. तसा वाडा मोठा होता, पण जुनाट वाटायचा. रात्रीच्या वेळी तर भयंकर शांततेचा आणि भकास वाटायचा. कधी मुक्काम केलाच तर कधी एकदा उजाड़ते आणि सगळे उठतात ....अस होऊन जायचं मला. आईला मी म्हणायचेही नेहमी... की मला नाही आवडत इथे.... पण काय ...आई काहीतरी सांगुन विषय टाळायची.....उगीच काका काकूंना काय वाटेल असे त्यांनी ऐकले तर...... काकांची आर्थिक परिस्थिति तशी बेताचीच.

पांढरा रस्सा

जागु ·

कपिलमुनी 06/11/2014 - 16:43
मस्त रेसिपी . गरम गरम रस्सा प्यायला मस्त वाटतो. कोपु मधे आधि २-३ वाट्या पिउन मग जेवणाला सुरवात असते

सौंदाळा 06/11/2014 - 17:08
सहिच तोंपासु. पिंपरी मंडईत सुक्या माशाच्या दुकानात याचे पाकिट मिळते. २५ रु. ला. शिजवलेल्या चिकनचे पाणी, नारळाचे दुध त्यात घालायचे आणि तेलावर मिरी, लवंग, दालचिनी घालुन हे सगळे एकत्र करायचे.पाणी वाढवुन २० वाट्या पांढरा रस्सा तयार होतो. एकदम छान लागतो. आणि एक (त्या पाकिटावर लिहिले होते तेच सांगतोय) शाकाहारी लोकांसाठी चिकनऐवजी मसुर शिजवलेले पाणी घालुन पण पांढरा रस्सा उत्कृष्ट होतो.

In reply to by कपिलमुनी

सौंदाळा 06/11/2014 - 18:57
पिंपरी पुलाखाली मंडई आहे तिकडे मासे विकण्यासाठी वेगळी जागा (बंदिस्त गाळेवजा) आहे त्याच्या अलीकडेच दोन सुक्या माशाची दुकाने आहेत (तिकडे गेलात की वासावरुन कळेलच) त्यापैकी एका दुकानातुन मी घेतले होते. मला फारशा अपेक्षा नव्हत्या पण करुन पाहिले आणि मज्जा आली. या विकेंडला मी पण परत घेणार आहे. कोणी येणार असेल तर खरड्/व्यनी करा, भेटु तिकडे

जेपी 06/11/2014 - 17:45
मस्तच. आमच्याकड मार्केट मध्ये ready to cook पांढरा रस्सा पाकीट मिळत मसाल्याच. आता हे करुन पाहीन.

जागु 07/11/2014 - 11:29
बहुगुणी धन्स. मी पाहीले नव्हते आधी धागे. लाल रस्सा नेक्स्ट टाईम नक्की. सगळ्यांना धन्यवाद. हो ह्याचे एक रेडीमेड पॅकेट मिळते मार्केट मध्ये. मी पण आणले होते. तीही चव चांगली असते.

खर तर पांढरा रस्सा म्हटल की कोल्हापूर डोळ्यासमोर आल्याशिवाय राहत नाही. कोल्हापूरी स्पेशल मेनू मध्ये गणला जाणारा हा पांढरा रस्सा आणि सोबत असणारा तांबडा रस्साही नाव काढल्याबरोबर अगदी तोपासु होत. कोल्हापूरात ह्यासाठी लागणारे मसाले खास गिरणीत दळून आणतात असे ऐकले आहे. कोल्हापूरकर ह्यावर अजून माहीती देतीलच. माझ्या वाचनात ही रेसिपी आली आणि ती करून मी करून पाहीली. फारच झ्याक (टेस्टी) लागला हो. पारंपारीक पद्धत अजून वेगळी असू शकते ती जाणून घ्यायची इच्छा आहे कोल्हापूरवासियांकडून.

दिवाळी पोस्त.

हरकाम्या ·

योगी९०० 06/11/2014 - 13:56
लेखी स्वरुपात पोस्त मागणारा " प्रामाणिक प्राणी " मला पहिल्यांदाच भेटला. आपल्याला असे कोणी असामी भेटलेत का? आम्हीच दुसर्‍यांकडे मागत असल्याने आम्हाला अजून कोणी असामी भेटलेला नाही...

आदूबाळ 06/11/2014 - 18:05
घेतल्या लाचेची लेखी पावती देणारा एक नरपुंगव मला मध्यप्रदेशात भेटला होता. पुढच्या वेळेला ही पावती घेऊन आलास तर लाचेत डिस्काऊंट देईन (व्हॅटच्या क्रेडिटप्रमाणे) असंही कबूल केलं होतं. "दिल्या-घेतल्या नोटांची शपथ तुला आहे" असं गाणंही सुचलं मला.

In reply to by आदूबाळ

सुबोध खरे 06/11/2014 - 18:29
आदु साहेब लाचेची पावती देणारे कारखाना तपासनीस इ लोक सर्रास पाहण्यात येतात. पहिल्यांदा मी हा प्रकार माझ्या मित्राच्या कारखान्यात पहिला होता. त्याला काहीतरी परवाना पाहिजे होता त्यासाठी या तपासनीसाने पैसे मागितले त्यावर माझा मित्र म्हणाला साहेब माझा सर्व धंदा चेक द्वारे होतो. त्यावर हा तपासनीस शांत पाने म्हणाला माझ्या बायकोच्या नावाने सल्लागाराची फी म्हणून द्या. आणि त्यातून तुम्हाला काय जी आयकरात वाजवत करायची ती करून मला इतके पैसे मिळतील हे पहा म्हणजे झाले. आणि विश्वास ठेवा हा प्रकार सर्रासपणे चालतो. पूर्वी दूरध्वनी वाले पोस्टमन हे हक्काने "पोस्त"मागून नेत असत. हा सक्तीची "खुशी"चा मामला असे. ज्यांचे शेअर बाजाराचे डिव्हिडंडचे चेक येत असत अशा लोकांना पोस्टमन अडून सुचवत असत कि साहेब तुमचे सगळे चेक मी एकदम वेळेत पोहोचवितो कि नाही.( यात गर्भित धमकी असे). आता भ्रमणध्वनी आल्याने एम टी एन एल वाले पोस्त मागायला सुद्धा येत नाहीत आणि डिव्हिडंड थेट बँकेत जमा होत असल्याने पोस्टमन पोस्त साठी विनंती करतात. जग रहाटी अशीच आहे पूर येतो तेंव्हा मासे मुंग्यांना खातात आणि दुष्काळ पडतो तेंव्हा मुंग्या माशांना खातात.

In reply to by सुबोध खरे

आदूबाळ 06/11/2014 - 18:51
सर - बायकोच्या नावाने सल्लागाराची फी, मेव्हण्याच्या कंपनीला कसलेकसले प्रोफेशनल फीज, लँडस्केपिंग एक्सपेंसेस वगैरे प्रकार तर आहेतच. हल्ली हे अवघड होत चाललंय, कारण कोण कधी स्टिंग ऑप्रेशन करेल नेम नाही. अजून एक भन्नाट प्रकार म्हणजे "मी लाच घेत नाही. तुम्हाला काही द्यायचंच असेल तर अबक चॅरिटीला दान द्या." त्या अबक चॅरिटीकडून या गृहस्थांना त्यांचे टक्के मिळतात. दान देणार्‍याला वजावट अधिक ८०जीची सवलतही मिळते! मी जे म्हणत होतो ते एका रस्त्याच्या वापरासंबंधी होतं. हा रस्ता प्रायवेट होता, आणि तिथे असलेल्या लोखंडाच्या खाणींमुळे तो रस्ता प्रायवेट ठेवण्यासाठी मालक इच्छुक होता. पण रखवालदार महोदय रस्ता वापरण्यासाठी "चुंगी" घेत आणि त्याची रीतसर हस्तलिखित पावती देत. किती चुंगी द्यायची असं विचारल्यावर "जितने आप चाहो" असं तो विलक्षण नम्रतेने म्हणत असे!

In reply to by आदूबाळ

शिद 06/11/2014 - 20:13
अजून एक भन्नाट प्रकार म्हणजे "मी लाच घेत नाही. तुम्हाला काही द्यायचंच असेल तर अबक चॅरिटीला दान द्या." त्या अबक चॅरिटीकडून या गृहस्थांना त्यांचे टक्के मिळतात. दान देणार्‍याला वजावट अधिक ८०जीची सवलतही मिळते!
हे जबराट आहे. सगळीकडेच विन-विन सिच्यूएशन.

In reply to by शिद

आदूबाळ 06/11/2014 - 20:37
नाही, विन विन नाही. त्या चॅरिटीला ८५% उत्पन्न "चॅरिटेबल पर्पज" साठी खर्च केलं हे सिद्ध करावं लागतं तरच कलम १२ खाली करसवलती मिळतात. पण या टक्केवारीच्या गळतीत तो चॅरिटेबल ट्रस्ट तरी कुठून हे खर्च आणणार? मग खरंखुरं काम करणार्‍या कार्यकर्त्यांना निम्माच पगार देऊन पूर्ण रकमेच्या पावत्यांवर सह्या घेणे, खोटे प्रोजेक्ट्स दाखवणे, कमी दर्जाच्या वस्तू वाटणे असले प्रकार घडतात. म्हणजे खराखुरा लूजर वेगळाच असतो. आणि त्याला ते फार झोंबतं. असो.

In reply to by आदूबाळ

नाखु 07/11/2014 - 12:40
म्हणजे ५ जणात ४च चड्ड्या असल्यासारखे आहे!! जो साखळीत शेवटचा (खालच्य स्तरावर) तो कायम विवस्त्र राहणारच. बळी तो कान पिळी या न्यायाने.

In reply to by आदूबाळ

सुबोध खरे 09/11/2014 - 21:51
अशा धर्मादाय संस्था सुद्धा आहेत जेथे आपण देणगी द्या त्याची रीतसर पावती मिळते. त्याच्या ९० ते ९५ टक्के रक्कम रोख परत करतात( त्यांच्या दान पेटीत जमा झालेल्या रकमेतून). म्हणजे आपला १५ टक्के कर वाचतो ( देणगीची ५० % रक्कम उत्पन्नातून वजा केली जाते). म्हणजे खिशातून काहीच जात नाही १० टक्के नफा शिवाय देणगी दिल्याचे पुण्य मिळते. मेरा भारत महान

मिपाकरांना दिवाळी " पोस्त " हा प्रकार माहिती असेल. माझ्या बालपणी मला दिवाळी पोस्त हा प्रकार माहिती होता. त्यावेळी हक्काने पोस्त मागणारी एकच असामी अस्तित्वात होती ती म्हणजे " पोस्टमन " लोक त्याला न मागताही पोस्त देत असत त्याबद्दल काही वावगे वाटात नसे. हा सगळा देणारा आणि घेणारा यांच्या राजीखुशीचा मामला असे. या दिवाळीत मला दोन वेगळे अनुभव आले. सकाळी " Morning Walk " ला गेलो असताना " Gas Cylinder" घरी पोचवणारा माणुस भेटला त्याने मला थांबवुन " काय साहेब दिवाळी पोस्त " विसरलात काय.

मदत हवी आहे - मुकबधिर मुलांसाठी मराठी व्याकरण

पिलीयन रायडर ·

माहितगार 06/11/2014 - 13:31
आपला धागा लेख वाचल्या नंतर या मागच आव्हान उमगल. काम सहज सोपे लहान असणार नाही हे लक्षात येते आहे. इंटरेस्ट असेल तर खाजगी आणि शासकीय डोनेशन मागवून काम करावे असे सुरवातीसच सुचवावेसे वाटते आहे . कदाचित "मुकबधिर मुलांसोबत कामाचा अनुभव" शिवाय सहज पुढे जाता येणार नाही. (याचे कोर्सेस वगैरे असतात असे वाटते) मुकबधिरांसाठीच्या हातवारे भाषे संबंधी इंग्रजीतील प्राथमिक माहिती युट्यूब विकिहाऊ इत्यादी स्थळांवरून कदाचित मिळावयास हवी. पण इंग्रजीतील माहिती जशीच्या तशी उपयोगी होणार नाही हेही खरे परंतु ते लोक कोणती साधने कशी वापरतात हे कदाचित लक्षात येण्यास उपयोग होईल. दुरदर्शनच्या मुकबधीरांच्या बातम्या आणि इतर अशाच चित्रफितींचे साठी संपर्क करून कॉपीराईट मुक्तता मिळवून त्याचे कट पेस्टींगने वेळ वाचू शकेल असे वाटते. खाप्रे डॉट ऑर्ग मुकबधिरांना आर्थीक मोबदला देऊन काम करून घेत असल्याचे त्यांच्या वेबसाईटवर वाचले होते. दुर्दैवाने खाप्रे डॉट ऑर्ग सध्या बंद आहे असे दिसते. विकिंमाध्यमाच्या संदर्भाने काही मदत लागत असल्यास कळवावे. या चांगल्या कामास शुभेच्छा

In reply to by माहितगार

आम्ही आमच्या कंपनी तर्फे हे काम करत आहोत. त्यामुळे मर्यादा आहेत. त्यातल्या त्यात जे शक्य आहे ते करतोय. मी विभक्तीबद्दल गुगलत असताना हे पान सापडले. तुम्ही लिहीले आहे काय? थोडं सोप्प करुन लिहीता येईल का तिथे? म्हणजे उदाहरणच दिले आहे.. मुळ विभक्तींचा तक्ता हवा होता. मी गडबडीत वाचलं आहे.. अजुन नीट वाचुन सांगते.. तसं मला अजुन एक पान मिळालं.. हे जास्त सोप्पं वाटलं..

In reply to by पिलीयन रायडर

माहितगार 06/11/2014 - 14:24
होय, ते उद्योग माझेच आहेत. ह्या (आपणास सोप वाटलेल्या पानातील) विभक्ती पानातील मुंगी शब्दाच्या विभक्ती मॅन्यूअली भरल्या आहेत. आपण हे जे दुसरं पान आहे त्यात एका साचा-पानात 'शब्द भरायचा तो शब्द सर्व विभक्ती प्रत्ययांसोबत दिसतो. (मुख्य उद्देश विभक्ती शोधण्याचे मिळवण्याचे काम लवकर होऊ शकते अमराठी लोकांना सोपे जाऊ शकते.) असा प्रकार, थोडा अधीक प्रकारात मराठी विक्श्नरीवर विक्शनरी:प्रत्यय उपसर्ग अभ्यास येथे उपलब्ध केला आहे. विकिपीडियात साचा पान कसे काम करते याची माहिती या ऑनलाईन गूगल सादरीकरणातून मिळू शकेल. येथे साधुसाधित शब्द बनताना धातूला (क्रियापदे) जोडल्या जाणाऱ्या प्रत्ययांची रूपे आणि क्रियापदांची मोठी यादी आहे. अर्थात माझ्या उपरोक्त प्रयोगशीलतेचे मूळ हेतु वेगवेगळे राहीले आहेत अर्थात आपणास कसा बदल हवा आहे ते सांगीतल्यास काय करता येईल ते पहाता येईल. भारतीय विभक्ती प्रत्ययांसाठी काही साईन लँग्वेज/चित्रलिपी असल्यास खरेतर बरे पडेल असे वाटते. जाता जाता इंग्रजी विकिपीडियावर हा लेख आढळला.
आम्ही आमच्या कंपनी तर्फे हे काम करत आहोत. त्यामुळे मर्यादा आहेत.
एनीवे आर्थीक मर्यादा याना त्या प्रकारे येणार ह्याची कल्पना आलीच, त्यात कंपनी असल्यामुळे एनजीओ प्रमाणे सरकारी अनुदानेही मिळणार नाहीत. दानशूर मिपाकरांनो विचार करा एवढेच म्हणावेसे वाटते.

In reply to by माहितगार

अहो प्रश्न पैशाचा नाहीये.. आम्ही फक्त स्टडी मटेरियल बनवुन देत आहोत जे त्यांच्या शिक्षकांना उपयोगी पडेल.. Visual Aid सारखं.. पण ते ही करता करता तोंडाला फेस आलाय. वाटलं तसं अजिबातच सोपं काम नाहिये हे..

In reply to by पिलीयन रायडर

माहितगार 06/11/2014 - 15:04
जो ऑनलाईन शोध घेतो आहे बहुधा अद्याप भारतात साईन लँन्ग्वेजच प्रमाणीकरण झालेल नाही. महाराष्ट्रात मराठीसाठी एकसारखी साईन लँग्वेज वापरली जाते का याची माहिती घ्यावी लागेल. तुम्ही म्हणता तो व्याकरणीय प्रॉब्लेम लक्षात आला पण ज्यावर कधीच काही मॅन्यूअल काम पण झाल असेल-नसेल ते स्क्रॅचपासून करणे आले. तुम्ही शाळेत एक वेळ भेट देऊन पाहू शकाल त्याने शिक्षकांशी पूर्ण संवाद साधला जाणार नाही शिक्षक तुमच्या ऑफीसमध्ये बोलावणे आले की खर्च चालू झाला. तुम्ही वेळ वाचवला नाहीत तर पुरेसे काम होणार नाही वेळ वाचवण्याच्या कामासाठी खर्च येत असतो वर्कींग कॅपीटलचे महत्व अधोरेखीत करण्याच्या दृष्टीने आर्थीक बाबी बद्दल म्हणालो एवढेच असो.

In reply to by बॅटमॅन

माहितगार 06/11/2014 - 14:31
हम्म.. मुकबधीरांचे पण सुशिक्षीत पालक बघावे लागतील. शिक्षक शोधले तर त्यांच्या मोबदल्याच्या अपेक्षा सहाजिक असणार ज्या अ‍ॅडीशनल स्पॉन्सरशीप शिवाय सहज होऊ नाही शकणार.

In reply to by बॅटमॅन

हो ते डोक्यात आहेच.. सगळ्यात सोप्पं म्हणजे त्या शाळेला जाऊन भेट देणे.. पण त्यांची आणि आमची वेळ जुळत नाहीये. तोवर उशीर होऊ नये म्हणुन हा धाग्याचा प्रपंच.. ही भाषा जाणणारं दुसरं कुणी माहित नाही मला..

बहुगुणी 06/11/2014 - 18:07
सहज शोध घेतला (तसा तुम्हीही घेतला असणारच) तेंव्हा इथे कदाचित काही उपयुक्त माहिती मिळेल असं वाटलं.... पुण्यात असाल तर खालील शाळा आहेत असं या दुव्यात सापडलं, (तिथेच देशभरातील इतरही शाळांची माहिती आहे), यांपैकी कुठेतरी तुम्हाला हवी ती माहिती मिळेल कदाचित: SUHRUD MANDAL, PUNE'S CHINCHWAD BADHIR MUK VIDHYALAYA, SECTOR NO. 26, P.C.N.T.D.A.SINDHU NAGAR, NIGADI, PUNE – 411044 MUK BADHIR VIDHYALAYA, J.E.S - MUK BADHIR VIDHYALAYA, AT POST-JUNNER, PUNE – 410502 INDIAN RED CROSS SOCEITY'S SCHOOL FOR THE DEAF, 5TH FLOOR, ATUR SANGATANI RED CROSS HOUSE, NO. 11 M.G. ROAD, PUNE – 411001 C.R. RANGANATHAN RESIDENTIAL SCHOOL FOR DEAF, S. NO. 161/13, ADARSHA COLONY, KRANTI CHOWK, ROAD NO. 1. TINGARENAGAR, VISHRANTWADI, PUNE – 411015 RESIDENTIAL SCHOOL FOR DEAF, SURVEY NO. 156, MAZADA BLDG., FLAT NO. 1, MOHANWADI, YERWADA, PUNE - 411006 Y.M.C.A. GARLAND CRAIG MEMORIAL SCHOOL FOR THE DEAF, 6, ARJUN MARG, NEAR RACE COURSE, PUNE – 411001 BADHIR MOOK SHIKSHAN KENDRA, 805, SMRUTI, BHANDARKAR ROAD, SHIVAJINAGAR, PUNE – 411004 MAHARASHTRA FELLOWSHIP FOR DEAF, 93/3, MOHAMMAD WADI RD., HADAPSAR, NEAR H.V. DESAI EYE HOSPITAL, PUNE - 411028

एस 06/11/2014 - 19:14
शुभेच्छा देण्यापलिकडे सध्या काही करू शकत नाही याची खंत आहे. पण आपणांस या कार्यात भरघोस यश लाभो ही प्रार्थना... मला काही सापडल्यास जरूर कळवेन.

कंजूस 06/11/2014 - 21:43
बोलतांना मूक बधिरांना विभक्तिंची फारशी गरज लागत नसावी. आपणही दूरच्या गच्चीवरच्या व्यक्तीशी खुणेने सांगण्याची वेळ आली तर काय करू? कमीतकमी खुणांनी सांगू ना ?उदा॰ १)पुस्तकावर/कांवर नाव/नावे लिही. २)कुत्र्याला मारू नको. ३)पतंगाची दोरी सोड. ४)आई घरात नाही. ५)बाबांना बोलव.

रामपुरी 06/11/2014 - 23:37
त्यामुळे एवढे सांगू शकतो की खुणांच्या भाषेत (sign language) मध्ये विभक्तींची (आणि एकूणच व्याकरणाची) फारशी गरज भासत नाही. मला वाटतं, कि एका शब्दाची विविध रुपे लिहून दाखवुन त्याचा वाक्यात उपयोग कसा होतो हे खुणांच्या भाषेत दाखविल्यास उपयोग होऊ शकेल. चित्र दाखवून फार उपयोग होणार नाही असं वाटतंय. उदा पडणे हे क्रियापद घेतलं तर त्याचे वेगवेगळे अर्थ त्याना माहीत असतील पण त्याची वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळी रूपे कशी होतात हे वाक्यात उपयोग करुनच त्याना जास्त लवकर कळेल. काम मोठं आहे यात शंकाच नाही. शुभेच्छा... पुण्यात असाल तर पेरूगेट जवळ भावे स्कूलला भेट द्या असं सुचवेन.

यापैकी क्रियापदे अशी समजावून सांगता येतील. एक लहान मुलगा आणि एक मुलगी असे दोन स्वयंसेवक नट घ्या. त्यांना हि क्रियापदे अभिनय करून दाखवायला सांगा जसे हवे आहे म्हणजे एक बाल नट दुसऱ्याला खुणेने एखादी गोष्ट हवी का ते विचारतो आणि तो खुणेने (उदा थम्ब्स अप, किंवा हाताने दे ची खूण करून) हो म्हणतो. त्याच वेळी तोंडाने पण हो म्हणायला लावा. विडिओच्या सुरुवातीला आणि नंतर क्रियापद लिहिलेले दाखवा. त्यानंतर या विडिओ आवाजा शिवाय जिफ मध्ये कनवर्ट करा. -निखिल

स्पंदना 07/11/2014 - 04:30
मदत अशी खरच काही करु शकत नाही, पण शुभेच्छा मात्र देउ शकते. एक विचारु का? एकदा भाषेशी ओळख झाली की मग ही मुलं वाचु शकत नाहीत का? मग वाचनातुन त्यांना व्याकरण शिकवता येउ शकेल ना?

In reply to by स्पंदना

माहितगार 07/11/2014 - 09:36
भाषेशी ओळख झाली
खाणाखूणांच्या भाषेतून विभक्ती आणि बर्‍याच शब्दांच्या छटा सुटत असण्याची शक्यता नाकारता येत नाही. कारण खाणाखूणांच्या भाषेतून एकुण संवादाचे प्रमाण कमी होते त्यामुळे खाणाखुणा आणि भाषा यात या लोकांसाठी एक दरी शिल्लक राहतेच. भाषेची ओळखच पूर्ण होत नसेल तर लिखित मजकुर पूर्ण सहज सुगम होणार नाही. पाणी दाखवून पाणी हा शब्द दाखवल्यास तो ते चित्र म्हणून लक्षात ठेवेल मणी दाखवून मणी हा शब्द चित्र म्हणून लक्षात ठेवेल. पण 'ण'चे मूळात उच्चारणच माहित नसल्यास दोन्ही ठिकाणी ण का येतोय ते समजणारच नाही. स्थळ/गावांची नावांची पहिली ओळख आणि नकाशा वाचनही या मुलांना कसे करवले जात असेल असा प्रश्न पडतोय. एकुण हे सहज सोप प्रकरण नक्कीच असणार नाही.

माहितगार 07/11/2014 - 09:25
व्यक्तीगत संवादात खाणाखूणा करून दाखवता येते. पण या विशीष्ट आवश्यकता असलेल्या विद्यार्थ्यांच्या निरतंर आणि स्वतःची स्वतः अभ्यासण्याची क्षमता आणि दस्तएवज हाताळण्याची क्षमता ज्याचा पुढील जीवनातील व्यावसायीक निर्णय क्षमतेशीही संबंध असेल त्यात विभक्ती क्रिया आणि इतरही व्याकरणाचे ज्ञान उपयूक्त आणि महत्वाचे ठरणारे असेल असे वाटते.

माहितगार 07/11/2014 - 11:01
विकिमीडिया कॉमन्सवरील अ‍ॅनीमेशन्स कुठे वापरता आल्यास पहावे असे सुचवावेसे वाटते. उदाहरणार्थ फिरणे या क्रियेसाठी रोटेशन अ‍ॅनिमेशन कॅटेगरीतील मल्टीपल अ‍ॅनिमेशन्स एकाच वेळी दाखवल्यास कदाचीत फिरणे संबंधीत विवीध क्रिया एकदम दाखवता येतील. फिरणे क्रियापद माणूस फिरतो, पृथ्वी फिरते सोबत सोबत दाखवलेतर क्रिया कदाचित कन्फ्यूज होतील का ?

माहितगार 07/11/2014 - 11:26
रेडिओ लावणे एवजी पंखा लावणे टिव्ही लावणे अशा क्रिया दाखवणे अधीक सोपे जाईल. असे वाटते. भांडण लावणे मध्ये आधी केवळ भांडणे दाखवून = भांडण आणि = भांडण लावणे असे दाखवता येईल असे वाटते.

पिशी अबोली 07/11/2014 - 12:13
साईन लँग्वेज बद्दल मला काहीच महिती नाही. पण भारतात वापरली जाणारी साईन लँग्वेज ही 'इंडो-पाक साईन लँग्वेज' च्या स्टँडर्ड ने बनवली जात असावी. माझ्या माहितीप्रमाणे यात खुणांसोबतच तोंडाने बोलणे यालाही महत्व आहे, व सर्वसाधारण भाषेप्रमाणेच याचे व्याकरणही तितकेच गुंतागुंतीचे आहे. त्यांना मराठी व्याकरण शिकवायचं, म्हणजे नक्की काय शिकवायचंय हे मला नीटसं कळलेलं नाही. त्यांना परस्परांशी संपर्क करण्यासाठी शिकवायचं आहे, का जी मराठी भाषा सर्वसाधारणपणे वापरली जाते, ती समजण्यासाठी (एस्पेशली, वाचण्यासाठी) शिकवायचं आहे, ते बघावं लागेल. मला जेवढं लक्षात आलं, त्यावरून असं वाटतंय की त्यांच्या साईन्स ठरलेल्या असतील. त्यांना संकल्पना शिकवायच्या आहेत, राईट? वर निखिलचे शाईपेननी सांगितलेली कल्पना मला वाटतं, क्रियापदांसाठी वापरता येईल. आहे/नाही साठीही ही कल्पना वापरता येईल. (उदा. पाण्याने भरलेला ग्लास-पाणी आहे, पाणी ओतून टाकले-पाणी नाही अशी उदाहरणे जी सर्वसाधारणपणे नवीन भाषा शिकवताना वापरली जातात त्याचे व्हिडिओ बनवता येतील का?) क्रियापदांच्या वेगवेगळ्या अर्थच्छटा हव्या असतील तर मला वाटतं त्याबद्दल पुरेशी माहिती इंटरनेट वर मिळावी. त्यापलीकडे जाऊन मराठीची भाषाशास्त्रीय व्याकरणे आहेत, पण ती कॉपीराईटेड आहेत. त्यामुळे त्याबाबतीत नक्की काही सांगू नाही शकत. विभक्ती हा ट्रिकी भाग आहे. संस्कृत भारतीच्या संस्कृत संभाषण शिबिरांची पद्धत इथे कदाचित उपयोगी पडेल. तिथे आधी षष्ठी विभक्तीपासून सुरुवात होते कारण ती शिकवण्यासाठी सोपी आहे. (माझा हात, माझे पुस्तक, माझी शाळा इ.) पुन्हा इथे व्हिडिओज तयार करावे लागतील. द्वितीया/चतुर्थीमधे मराठीत शिकवण्याइतका फरक नाही. (दे या क्रियापदासाठीचा व्हिडिओ इथे वापरता येईल-मला दे इ.) पंचमी, सप्तमी शिकवणं सोपं जावं. याव्यतिरिक्त मराठीमधे अनेक प्रत्यय या विभक्तींसाठी वापरले जातात. त्यांची लिस्ट बनवावी लागेल. पण मुळात विभक्ती ही संकल्पना समजली तर हे कठीण जाऊ नये. मी फारच व्हेग बोलत असेन कदाचित, पण हे एवढंच आत्ता सुचतंय. काही मदत लागली, तर मी नक्की करेन.

In reply to by पिशी अबोली

माहितगार 07/11/2014 - 17:33
त्यापलीकडे जाऊन मराठीची भाषाशास्त्रीय व्याकरणे आहेत, पण ती कॉपीराईटेड आहेत.
अपंग व्यक्तींसाठी तयार करावयाच्या साधनांसाठी पण संबंधीतांना योग्य मोबदल्याची किंमत/रॉयल्टी द्यावी लागते पण ओनरला कॉपीराईट लायसन्स विथहोल्ड करणे अभिप्रेत नसते. सुयोग्य फॉर्मॅट मध्ये विनंती आल्यास भारत सरकारचे कॉपीराईट ऑफीस हस्तक्षेप करू शकते.

In reply to by पिशी अबोली

माहितगार 07/11/2014 - 17:51
विभक्ती हा ट्रिकी भाग आहे. संस्कृत भारतीच्या संस्कृत संभाषण शिबिरांची पद्धत इथे कदाचित उपयोगी पडेल. तिथे आधी षष्ठी विभक्तीपासून सुरुवात होते कारण ती शिकवण्यासाठी सोपी आहे. (माझा हात, माझे पुस्तक, माझी शाळा इ.) पुन्हा इथे व्हिडिओज तयार करावे लागतील. द्वितीया/चतुर्थीमधे मराठीत शिकवण्याइतका फरक नाही. (दे या क्रियापदासाठीचा व्हिडिओ इथे वापरता येईल-मला दे इ.) पंचमी, सप्तमी शिकवणं सोपं जावं.
विभक्ती चालू करण्या पुर्वी एकवचन अनेकवचन दाखवावे लागेल. कारण वचनानुसार विभक्ती बदलतात ते प्रथमेत होऊन जाईल. आपण म्हणता तसे माझे तुझे इतरांचे या संकल्पना त्यांना सहसा माहित असणार, षष्ठी विभक्ती कशा सांगावयाच्या ते पहावे लागेल. आधी संबोध विभक्ती दाखवून द्वितीया आणि चतुर्थी विभक्त्या दाखवल्यास सोपे जाईल का ? पंचमीत कशातरीपासून वाली संकल्पना आहे आणि सप्तमीत कशाच्या तरी आत ही संकल्पना आहे त्याही विद्यार्थ्यांना माहित असणार शिक्षकांसोबत एकदा भेट झाली की विभक्ती कशा दाखवायच्या उलगडा होईल असे वाटते. म्हणजे विभक्तींबद्दल अगदीच संकल्पना शिकवणे असे होणार नाही. भांडण लावणे सारखी अनपेक्षीत क्रियापदे आणि शोधणे - सापडणे, आठवणे - विसरणे, ओलांडणे, कंटाळा येणे, खोटं बोलणे. अवघडच असेल

इनिगोय 07/11/2014 - 12:24
या प्रेझेंटेशनच्या मदतीने त्यांना परीक्षेचा अभ्यास करायला मदत व्हावी असा उद्देश आहे का? उच्चार समजणा-या मुलांना सोपी पुस्तकं वाचायला देऊन व्याकरण शिकवता येईल का? मात्र ते प्रेझेंटेशनमध्ये कसं घ्यावं समजत नाही.

मला जेवढी माहिती आहे त्याप्रमाणे ह्या मुलांना नॉर्मल मुलांसारख्याच (खरं तर त्याच.. तोच अभ्यासक्रम.. तोच पेपर) परीक्षा द्याव्या लागतात. म्हणुन त्यांना मराठी ह्या विषयासाठी हा अभ्यासक्रम आहे. त्यात ४ पातळ्यांवर हा अभ्यासक्रम आहे. मी क्रियापदे समजावण्यासाठी अशा .gif चा वापर केलाय. 1 2 ह्या प्रमाणे मला बर्‍याच क्रियापादांसाठी चित्रे मिळाली... मी त्या शाळेलाच भेट देण्याचे ठरवले आहे. मला जी माहिती कळेल ती इथे नक्की टाकेनच.

प्रेझेन्टेशन स्वरुपात सांगायचे असेल तर काही कल्पनांसाठी एखादे परकीय भाषा शिकतानाचे पुस्तक मिळाले तर काही त्यावरून सुचू शकेल का? जसे की उदा. जर्मन, फ्रेंच वगैरे. भाषा शिकताना त्यात क्रियापद, शब्द या सगळ्यासाठी अशा पुस्तकांमध्ये बरीच चित्र वापरली जातात. आता नेमकी तशी चित्र आन्जावर शोधायची हे करावे लागेल पण कदाचित काय शोधायचे यासाठी मदत होऊ शकेल. आणि यात काही क्रमाने ही क्रियापद शिकवली जातात बरेचदा. उदा. एक चित्र सकाळी शाळेत निघालेल्या मुलाचे, मग शाळेत गेल्यावर पुस्तक वाचणे, खेळाच्या तासाला खेळणे अशा क्रमाने चित्रांच्या स्वरुपात समजावले जाते आणि वेगवेगळ्या क्रियापदांची ओळख होते. असे काही करता येईल का? मी काल माझी दोन तीन पुस्तकं चाळली आणि कदाचित थोडी मदत करू शकेन. तू वर सांगितलेली क्रियापदे बघून विकांताला मला चित्रे किंवा तत्सम शोधत आलं तर पाठवते. पण नक्की हे असं हवंय की अजून काही हे मला कळत नाहीये.

In reply to by मधुरा देशपांडे

माहितगार 07/11/2014 - 17:19
हम्म.. आपण परभाषी विद्यार्थ्याला मराठीतील शब्द समजावून देतोय असा विचार करून काम केले तर कदाचीत किंचीततरी सोपे जाईल असे वाटते.

क्रियापदं शिकवणं अवघड नाहीये... मला विभक्ती कशा सांगाव्यात हे कळत नाहीये... म्हणजे मुळात त्यांना त्याची गरजच नाहिये. आजवर पडली नसेलही.. त्यांना की कन्सेप्ट किती विचित्र वाटेल.. मला वाटतं की मी त्या शाळेत जाउन आले की अजुन नीट उलगडा होईल...

In reply to by पिलीयन रायडर

पिशी अबोली 07/11/2014 - 16:04
पिराताई स्टँडर्ड साईन लँग्वेज मधेपण विभक्ती किंवा तत्सम काँन्सेप्ट्स असतात. सो त्यांना माहीतपण असेल. विभक्ती आणि त्यांची नावं नाही अगदी, पण अशा प्रकारच्या भाषिक स्ट्रॅटेजी माहीत असतील. शाळेत जाऊन येणे बेस्ट आय्डिया.. ऑल द बेस्ट...

In reply to by पिशी अबोली

बॅटमॅन 07/11/2014 - 17:53
साईन लँग्वेजमध्ये विभक्ती वा तादृश कल्पना कशा सांगत असावेत, एतत्संबंधी काही माहिती असल्यास द्यावी, ही विनंती.

स्वैरG3 07/11/2014 - 23:41
माझे सासू-सासरे दोघेहि मूक-बधिर आहेत. त्यांच्याशी बोलताना आलेल्या experiemce वरून एक सांगु शकते कि त्यांनी त्यांच्या आजूबाजूला असणाऱ्या लोकांबरोबर communicate करण्यासाठी त्यांच्या आकलन क्षमतेनुसार किवा सोयीनुसार काही खुणांचे संकलन केलेले असते. काही ठराविक खुणा सोडल्या (alphabets, काही कृती) तर प्रत्येक मूक-बधिरचा स्वतःच्या आजुबाजूच्या माणसांना कळेल असा तो खुण-संचय असतो. Sign language प्रमाणीकरण जर केलेले असेल, तरीही प्रत्यक्ष व्यवहारात खुणा वापरताना व्यक्ती सापेक्ष बदल होतात हा माझा अनुभव आहे. त्यांच्याशी msg द्वारा communicate करताना आम्ही फक्त काही शब्द एका मागोमाग लिहितो. Msg लिहिताना विभक्ती किंवा प्रत्यय वापरले तर त्यांचा गोंधळ होतो, अर्थ समाजत नाही. e.g. "मला घरी यायला उशीर होणार आहे. बस traffic मध्ये अडकली आहे" हा msg जसाच्या तसा पाठवला तर त्यांचा गोंधळ होतो. काही शब्द "यायला", "अडकली", "होणार" त्यांना काळात नाही. हा msg आम्ही असा लिहितो " मी घर उशीर येणार. बस traffic खूप." हा msg त्यांना लगेच कळतो. मूक-बधिर शाळेत शिकवणाऱ्या काही लोकांचे contact numbers सवडीने व्यनि करीन.

सध्यापर्यंत मिळालेली माहिती:- समजा त्या मुलांना म्हणायचे आहे : माझा तर स्वतःकडे खुण करुन "झा" ची साईन करायची.. मला - स्वतःकडे बोट करुन "ला" ची साईन करायची. जर एखाद्या वस्तुच्या लिंगाकडे निर्देश करायचा असेल तर - त्या वस्तुची साईन आणि स्त्री/पुरुष/नपुसकलिंगाची साईन आता विचार करा, ह्या मुलांना लिंग आणि वचन दोन्ही एकदम समजायला हवे.. त्यात पण त्या प्रमाणे क्रियापद सुद्धा बदलायचे आहे.. योग्य विभक्ती वापरायची आहे... आणि हे सगळं साईन्स वापरुन... म्हणजे खरं तर स्वतःकडे बोट दाखवुन काम झालं असतं..पण टेक्निकली करेक्ट असण्यासाठी "झ"/"ल" पण सांगायचे... मी मराठी भाषेसाठी साइन्स असणारं प्रभा घाटेंच पुस्तक आहे म्हणे.. ते शोधतेय.. कुणाला ठाउक असल्यास सांगावे..

In reply to by पिलीयन रायडर

माहितगार 11/11/2014 - 14:28
प्रभा घाटेंच पुस्तक मिपाप्रतिसादातून उपलब्धता कितपत शक्य होईल याची शंका वाटते आहे. http://ayjnihh.nic.in/hindi/aboutus.asp अली यावर जंग राष्ट्रीय श्रवण विकलांग संस्थान येथे त्यांचे संपर्क क्रमांक दिसत आहेत त्या संपर्क क्रमांकावर विचारल्यास कदाचित माहिती मिळू शकेल असे वाटते. किंवा संबंधीत शिक्षकांशी संपर्क करूनच.

मी खरंच ब्लँक झाले आहे... काही महिन्यांपुर्वी टेचात एक जवाबदारी घेतली होती... मुकबधिर मुलांसाठी मराठी व्याकरण शिकण्यास मदत व्हावी म्हणुन काही प्रेझेन्टेशन बनवायचे आहे.. त्यात चित्र / हलती चित्र (अ‍ॅनिमेशन) वगैरे वापरुन मुलांना "बघुन / वाचुन" समजेल अशा स्वरुपात हे काम करायचे आहे. ह्यात नाम, सर्वनाम, क्रियापदे, प्रत्यय, अव्यय इ सगळंच आलं.. मला क्रियापदे आणि प्रत्यय हे काम दिलं गेलं... मुलं पहिली - चौथी ह्या वयोगटातली असावीत.. मी शाळेला भेट देऊ शकले नाही पण हे काम ज्याने सुरु केले त्याच्या कडुन कळालं की साधारण ४ पायर्‍या आहेत.. त्याला आपण पहिली ते चौथी म्हणु..

<< पंगत- नवमीपाकरांची - भाग १>>>

जेपी ·

हॉटेलात आल्याआल्या "तुम्हाला १ संदेश आला आहे" अशी पाटी दिसली आणी काळजात धस्स ! झाल. ( या व्यनी चा हल्ली मि धसकाच घेतलाय. सारखी भिती वाटते संम चा तंबी देणारा निरोप आला कि काय
ख्या ख्या ख्या....... ;-) अवांतर- जरा मोठा भाग टाक रे... पुढचं आंदोलन कधी?

आपले तर ठरले होते ना? की नक्की काही झाल्याशिवाय इथे काही टाकायचे नाही म्हणून... कुणाची दात-दुखी ऐनवेळी सुरु होईल, ते सांगता येत नाही. असो, संध्याकाळी भेटूच...

अजया 06/11/2014 - 12:53
हॉटेलात आल्याआल्या "तुम्हाला १ संदेश आला आहे" अशी पाटी दिसली आणी काळजात धस्स ! झाल. ( या व्यनी चा हल्ली मि धसकाच घेतलाय. सारखी भिती वाटते संम चा तंबी देणारा निरोप आला कि काय)
जेपी भौना वाटदिवसाच्या शुबेच्चा अाणि पुस्प्गुच्च!! =))

In reply to by टवाळ कार्टा

स्वप्नज 06/11/2014 - 17:45
टकाजी, संपादकीय म्हणायचे असेल तर ५ * लिहा ***** असे. *** म्हणजे ३ अक्षरी शब्द वाटतो. बादवे *** मधला तिसरा * दीर्घ ना हो....

गवि 06/11/2014 - 12:59
तंबी वापरा धागा लांबवा... आय मीन धागा वाचवा..

In reply to by जेपी

>>>>> पुडच्या भागात वाट लावु का संमची. जेपी इकडे तिकडे वेळ घालवन्यापेक्षा. चांगलं काहीतरी लिहा. पाहा कसं जमतं ते ! -दिलीप बिरुटे.

कंजूस 06/11/2014 - 19:02
कुटं कुटं भेटायचं ,कुणाकुणाची वाट लावायची, काही गुप्त फावण्यांना व्यनी०कुरून बुलवून फिटा बांधणार, घाम-फुटल-छाप-जबर्या-मेन्यु बी हाय, फारच गूढ हुत चाललंया फंगत-परकरण. यिक इचारतो. मुंब्हई -फुणेकर यिणार म्हंजी कार्ल्याला हाय का? नवमिपाकऱ्हांची सोभा न्हाई ना करणार मुरल्याली लोकं? अगुदर तारीक कळीवल्यास तय्यारी कुरून ठिवतो.{आपला नम्र की काय कदी लिवतात ते }किरपाभिलाषी कंजूस.

कंजूस 06/11/2014 - 20:17
आमची ऱ्हास ऱ्हुच्चिक.हाकडि धेखा लेकिन न्हांगी न्हाई धेखा ।या सहयादऱ्हीच्या धुंड्या धुंड्याखाली असतोया हाम्ही .घाम फुटला तर पंखा हाई, न्हांगी ल्हागली तर हिलिकोपटरच बुलवावं ल्हागतंया .

@ जेपी:- सरजी,कसली पंगत ? केंव्हा होणार आहे ? कुठे होणार आहे ? कोणकोण येणार आहे ? मुवि:- जेपी, आजुन काहि पुर्ण तयारी झाली नाहि.मी आणी पुणेकर अत्रुप्त आत्मा आयोजक आहोत. आज रात्री माझी अत्रुप्त आत्मा यांच्या सोबत (प्लँचेट नावाच्या http://www.sherv.net/cm/emoticons/christian/small-angel-smiley-emoticon.gif प्लॅन चॅटवर) मिटींग आहे >>> असं पायजे! :D आंम्ही प्लँचेटवर(बोलावले तर.. ;) ) भेटतो..! http://www.sherv.net/cm/emoticons/rage/troll-typing-by-feet-smiley-emoticon.gif

In reply to by खटपट्या

सतिश गावडे 07/11/2014 - 00:15
अहो ते स्वतःच अत्रुप्त आत्मा आहेत. भुताटकी आणायला त्यांना काही विशेष काही करावे लागत असेल असं वाटत नाही. भुतांना बोलवायचे दोन चार मंत्रही त्यांना माहिती असतील. :)

चांगलं येतंय, आवडतंय. भाग अजून थोडे मोठे टाकता येतील तर बघा.... अवांतरः तुम्ही दिलेल्या लिंका वापरून माझेच ते पूर्वीचे दोन भाग आज बर्‍याच काळानंतर वाचले. मिपावरच्या आता नसलेल्या, असलेल्या आणि असून दुरावलेल्या मित्रांच्या आठवणीने मन खूप सुखावलं! एखाद्या खूप जुन्या अत्तराचा कडवट-गोड वास घेतांना मन सुखावतं, तसंच! तो अनुभव दिल्याबद्दल अनेक धन्यवाद!!

In reply to by पिवळा डांबिस

स्पंदना 07/11/2014 - 03:24
अतिशय सुरेख प्रतिसाद. बघा जेपी हे अस लिहायच असत, तुमच्या धाग्यातल्या लेखणापेक्षा हा प्रतिसाद अतिशय सुंदर वाटला. शिका जरा, आणि लिहा असल काहीतरी. नाहीतर एका दिवसात स्टार बनायच्या कल्पनाविश्वात खरोखरचे तारे दिसायचे.

जेपी 07/11/2014 - 10:18
१)जेपी भौना वाटदिवसाच्या शुबेच्चा अाणि पुस्प्गुच्च!! २)जेपी इकडे तिकडे वेळ घालवन्यापेक्षा. चांगलं काहीतरी लिहा. पाहा कसं जमतं ते ! -दिलीप बिरुटे. ३) वल्लीदा चा प्रतिसाद काढला गेला. जरा स्पष्टच बोला की नेमक काय चुकल. आडुन बोलायची सवय नाही , त्यामुळे आडुन बोललेले कळ्त पण नाही. आणखीन एक. प्रतिसाद आवडला. aparna akshay - Fri, 07/11/2014 - 03:24 अतिशय सुरेख प्रतिसाद. मलाही प्रतिसाद आवडला. बघा जेपी हे अस लिहायच असत, हम्म, पिडां काकाला जितका अनुभव आसेल तेव्हढ माझ वय हि नाहि. तुमच्या धाग्यातल्या लेखणापेक्षा हा प्रतिसाद अतिशय सुंदर वाटला. बरोबर आहे. पण सगळ्यानां चागंल लिहिता यायला पायजे आस काहि नसत ना. शिका जरा, आणि लिहा असल काहीतरी. हम्म प्रयत्न करतो. नाहीतर एका दिवसात स्टार बनायच्या कल्पनाविश्वात खरोखरचे तारे दिसायचे. याचा आणी लेखाचा काय सबंध. स्टार लोकांना ईथे लिहायसाठी काय मानधन मिळत का ?

जेपी 08/11/2014 - 07:39
दुसर्याच्या शेकोटीवर शेकत बसु नये.भडका उडाल्यास पोळण्याचा संभव असतो. जमल्यास स्वत: शेकोटी पेटवावी पायजे असल्यास लाकड (पक्षी-काड्या) घेऊन येतो.

उगाचच शेकोट्या पेटवायची जरूर नाही. जेपींचा हा पहिला भाग आम्हाला आवडला आहे. किंबहुना ते पुढचे भाग कधी टाकतात या प्रतिक्षेत आम्ही आहोत. बाकी प्रत्येक लेखकाची स्टाईल निरनिराळी असते. अपर्णाने केलेल्या सूचना या कळकळीने केल्यात असं आम्हाला वाटलं (आता कोल्हापूरकरीण असल्याने जरा तिखट थोडं जास्त असायचंच!! ;) त्याला विलाज न्हायी!!) तेंव्हा जेपी, तुम्ही या प्रतिसादांच्या युद्धात न गुंतता पुढले भाग लवकर टाकावेत हे उत्तम! प्रतिक्षेत आहे....

एस 09/11/2014 - 22:56
अच्छा असंय होय? मला आधी द्वितिया, तृतिया, चतुर्थी,..., अष्टमी, असली 'नवमी'ची पंगत वाटली! नवमीला पाखरं बोलावलीत की काय अशा धास्तीनेच धागा उघडला! ;-)

मुळ प्रेरणा :- पिवळा डाबिंस यांचे हे दोन लेख.भाग १ आणी भाग २ डिसक्लेमियरः- १) सदरिल लेखातिल पात्रे जरी खरी असली तरी प्रसंग काल्पनीक आहे. भविष्यात आसे काहि घडल्यास जबाबदारी माझी नाहि. २) सर्वानीं हलके घ्यावे.

अंधार क्षण भाग २ - व्लादिमीर कँटोव्हस्की (लेख ८)

बोका-ए-आझम ·

मारवा 06/11/2014 - 13:01
एक विनंती संदर्भ सुची पुरवली तर म्हणजे या वरील लेखा संदर्भात कुठल्या पुस्तकांच वाचन तुम्ही केल ते लेखक प्रकाशकाच्या नावासहीत दिल्यास थोड अधिक खोलात जाण्याचा आनंद उपभोगता येइल. प्लिज...

एस 07/11/2014 - 00:29
सोवियेत रशियात दडपशाही आणि अभिव्यक्तीस्वातंत्र्याची गळचेपी कळसास पोहोचली असली तरी (पोलादी पडदा हे टोपण नाव आठवा.) एक गोष्ट मात्र होती. तिथे टपालसेवा विनामूल्य असे आणि तत्कालीन रशियातील एखादाच असा माणूस असेल ज्याने 'प्रिय कॉम्रेड स्तालिन' अशी सुरुवात करून त्या क्रूरकर्म्याला आयुष्यात एकदाही पत्र पाठवलेले नसेल. पुढे जेव्हा पेरेस्त्रोइका आणि ग्लासनोस्त चा जमाना आला तेव्हा आख्खा देश ढवळून निघाला. दुर्दैवाने आजचा रशियाही थोडाफार तसाच आहे. लोकशाहीची आपल्या मर्जीने व्याख्या करणारा...

बोका-ए-आझम 07/11/2014 - 08:03
जेव्हा १९७५ मध्ये आणीबाणी लागू करण्यात आली तेव्हा आंतरराष्ट्रीय स्तरावर इंदिरा गांधींवर प्रचंड टीका झाली होती पण सोविएत रशियाने पाठिंबा दिला होता. आपल्या पंचवार्षिक योजना या स्टॅलिनच्या पंचवार्षिक योजनांवरच आधारित होत्या. जेव्हा रशियाने १९५६ मध्ये हंगेरीत आणि १९६८ मध्येा झेकोस्लोव्हाकियामध्ये रणगाडे घुसवले तेव्हा अनुक्रमे नेहरू आणि इंदिरा गांधी तटस्थ राहिले होते. जर तुम्ही बघितलंत तर आपलं आर्थिक उदारीकरण आणि सोविएत युनियनचं पतन ह्या गोष्टी एकाच वर्षी झाल्या आहेत. आपली हक्काची बाजारपेठ बंद झाल्यावर उदारीकरण अापल्यासाठी अपरिहार्य झालं होतं.

अजया 07/11/2014 - 12:48
अत्यंत वाचनीय लेख.अात्तापर्यंतचा सर्वात आवडलेला(आवडलेला तरी कसं म्हणावं या लेखांना,त्यांची पार्श्वभूमी बघता)तुम्हाला आता या अनुवादाची लय सापडली आहे,असं वाटलं हा भाग वाचुन. पुभाप्र.

नया है वह 17/12/2015 - 18:59
मला जर कोणी आयुष्य आणि स्वातंत्र्य यांच्यात निवड करायला सांगितली तर मी स्वातंत्र्याचीच निवड करीन. ओम्स्क तुरूंगात भिंतींना पडलेल्या भेगांमधून आम्हाला आकाश दिसायचं. इथे आम्ही पाहिजे तेवढा वेळ आकाशाकडे बघू शकत होतो
हे आवडलं!

अंधार क्षण - व्लादिमीर कँटोव्हस्की साल १९४३. कडक रशियन हिवाळा. व्लादिमीर कँटोव्हस्की नावाचा २० वर्षांचा रेड आर्मीतला सैनिक सोविएत तटबंदीच्या मागे उभा होता आणि समोरच्या दाट झाडीकडे पाहात होता. झाडीत काही जर्मन सैनिक होते पण नक्की किती ते रशियनांना  माहित नव्हतं. कँटोव्हस्की ५४ व्या गुन्हेगार तुकडीत होता. त्याला माहीत होतं की आता कुठल्याही क्षणी आपल्याला त्या झाडीच्या दिशेने जायचा आदेश मिळेल आणि लढाईद्वारे टेहळणी करावी लागेल. तो आणि त्याचे सहकारी  जर्मन सैन्यरेषेच्या दिशेने जातील आणि जर्मन सैनिकांचं लक्ष वेधून घेतील.