मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

अगतिक....

ज्ञानोबाचे पैजार · · जनातलं, मनातलं
लेखनप्रकार
आमच्या विरोधाची पर्वा न करता त्यांनी बेफाम चालणार्‍या, जाळीच्या ट्रकमधे, आम्हाला कोंबल. सगळ्याजणी भेदरलेल्या होत्या. जीव मुठीत धरुन, आम्ही कशाबशा जाळीला पकडुन बसलो होतो. आमच्यातल्या दोघीजणी ट्रक मधेच मरण पावल्या. ट्रक थांबला. दहाबारा जणींना उतरवले. नराधमांनी अक्षरशः पायाला धरुन फरपटत त्यांना बाहेर ओढले. एकीने निसटायचा प्रयत्न केला. पण चारपाच टग्यांनी तिला घेरलेच. तिचा आकांत निमूटपणे पहाण्याशिवाय आमच्यापुढे पर्याय नव्हता. पुढे मला पण उतरवले गेले. पळण्याची हिम्मतच नव्हती. आम्ही होतो तिकडे येउन लोक एखादीकडे बोट दाखवत. तिला ते लगेच बाहेर काढत. माझ्याकडेही एकाने हात केला, खुप घाबरले एक सांड मला बाहेर खेचुन काट्यावर टाकत म्हणाला "दोनकिलो, जिवंत पाहिजे का कापून?" --------------------------------- पैजारबुवा,

वाचने 5403 वाचनखूण प्रतिक्रिया 34

पैसा 07/11/2014 - 18:40
नको वाटतं असं काही बघायला! :(

In reply to by बॅटमॅन

सतिश गावडे 07/11/2014 - 18:55
जेव्हा तुम्ही मांस किंवा मच्छी खात असता तेव्हा तुम्ही एका मृत प्राण्याचे शरीर खात असता. - ग्रीक तत्ववेत्ता मार्कस ऑरेलियस

In reply to by सतिश गावडे

बॅटमॅन 08/11/2014 - 00:11
अर्थातच. गव्हाची चपाती खात असताना एका मेलेल्या झाडाचे चूर्ण करून, त्यात पाणी मिसळून वर त्याला आगीवर भाजून त्यावर प्राण्यापासून जबरदस्तीने घेतलेल्या दुधापासून (ब्याक्टेरियांना निर्घृणपणे मारून इ.) बनवलेले तूप ओतून चवीने खाणार्‍यांचीही तेवढीच मजा वाटते. -आम्ही. बाकी - मार्कस ऑरेलियस हा ग्रीक नसून रोमन होता. अन नुसताच तत्त्ववेत्ता नव्हता, तर रोमन राजा होता.

In reply to by बॅटमॅन

सतिश गावडे 08/11/2014 - 00:21
गव्हाची चपाती खात असताना एका मेलेल्या झाडाचे चूर्ण करून, त्यात पाणी मिसळून वर त्याला आगीवर भाजून त्यावर प्राण्यापासून जबरदस्तीने घेतलेल्या दुधापासून (ब्याक्टेरियांना निर्घृणपणे मारून इ.) बनवलेले तूप ओतून चवीने खाणार्‍यांचीही तेवढीच मजा वाटते.
वनस्पतीस मेंदू नसतो. तस्मात त्यांची गणना मांसाहारात करणे चुकीचे आहे. दुधात ब्याक्टेरीया असले तरी ते असतीलच याची खात्री देता येत नाही. असले तरी ते उघडया डोळ्यांनी दिसण्यासाठी कुण्या व्यास मुनींनी दिव्य दृष्टीचा आशिर्वाद द्यावयास हवा. जे साप्रंत कलियुगी होणे नाही.
मार्कस ऑरेलियस हा ग्रीक नसून रोमन होता. अन नुसताच तत्त्ववेत्ता नव्हता, तर रोमन राजा होता.
होय तो राजा होता हे मान्य. बिचारा दिवसा तलवार चालवायचा आणि रात्री तत्वचिंतन करायचा. मात्र ग्रीक हा स्थान उल्लेख आम्ही सांप्रत काळाच्या अनुषंगाने केला आहे. आताचे ग्रीक पूर्वी रोमन साम्राज्याचा भाग होते म्हणून आजही त्यास रोमन साम्राज्य म्हणणे आम्हांस चुक वाटते.

In reply to by सतिश गावडे

बॅटमॅन 08/11/2014 - 00:28
वनस्पतीस मेंदू नसतो. तस्मात त्यांची गणना मांसाहारात करणे चुकीचे आहे.
पण आम्ही कधी काय म्हटले? जित्याजागत्या जिवाला ठार मारून त्याचे प्रेत खाणे हे शाकाहार व मांसाहारात कॉमन आहे इतकेच म्हटले आहे.
मात्र ग्रीक हा स्थान उल्लेख आम्ही सांप्रत काळाच्या अनुषंगाने केला आहे. आताचे ग्रीक पूर्वी रोमन साम्राज्याचा भाग होते म्हणून आजही त्यास रोमन साम्राज्य म्हणणे आम्हांस चुक वाटते.
मार्कस ऑरेलियसला उचकी लागली असेल एलिसियम मध्ये. अहो सरजी, ग्रीस हा रोमन साम्राज्याचा भाग असला तरी त्याचा संबंध काय इथे? रोमन साम्राज्याचे 'कोअर' इटली प्रांत होता, जसे मराठा राज्याचे कोअर म्हणजे पश्चिम महाराष्ट्र + कोकण हा प्रदेश होता. ऑरेलियसची फ्यामिलीही तिथलीच-किमान त्याच्या जन्माच्या काही (४-५) पिढ्या अगोदरपासून ते लोक रोममध्ये रहात होते. त्याचा पणजा रोमन संसदेत सेनेटर होता.

In reply to by बॅटमॅन

सतिश गावडे 08/11/2014 - 00:40
जित्याजागत्या जिवाला ठार मारून त्याचे प्रेत खाणे हे शाकाहार व मांसाहारात कॉमन आहे इतकेच म्हटले आहे.
अहो माणसाला जगण्यासाठी काहीतरी खावेच लागणार. नुसती हवा खाल्ली तर शरीरास आवश्यक असणारी उर्जा कोठून मिळणार. मग अशा परिस्थितीमध्ये मेंदू असलेल्या आणि म्हनूनच भाव-भावना असलेल्या प्राण्यांपेक्षा मेंदू नसलेल्या वनस्पती खाणे तुलनात्मकरीत्या चांगले.
मार्कस ऑरेलियसला उचकी लागली असेल एलिसियम मध्ये.
कैच्याकै. तुम्ही एव्हढे मोठे संस्कृत पंडीत असून चार्वाकाचा "भस्मीभूतस्य देहस्य पुनरागमनोकुत:"हा श्लोक वाचला नाही का?
अहो सरजी, ग्रीस हा रोमन साम्राज्याचा भाग असला तरी त्याचा संबंध काय इथे? रोमन साम्राज्याचे 'कोअर' इटली प्रांत होता, जसे मराठा राज्याचे कोअर म्हणजे पश्चिम महाराष्ट्र + कोकण हा प्रदेश होता. ऑरेलियसची फ्यामिलीही तिथलीच-किमान त्याच्या जन्माच्या काही (४-५) पिढ्या अगोदरपासून ते लोक रोममध्ये रहात होते. त्याचा पणजा रोमन संसदेत सेनेटर होता.
आम्ही तत्वज्ञानाचा अभ्यास केला आहे. इतिहास आणि भुगोलाचा नाही. त्याहीपेक्षा मार्कस ऑरेलियस कुठला होता यापेक्षा त्याने जगाला कोणता संदेश दिला हे आमच्या दृष्टीने महत्वाचे आहे.

In reply to by सतिश गावडे

बॅटमॅन 08/11/2014 - 00:55
अहो माणसाला जगण्यासाठी काहीतरी खावेच लागणार. नुसती हवा खाल्ली तर शरीरास आवश्यक असणारी उर्जा कोठून मिळणार. मग अशा परिस्थितीमध्ये मेंदू असलेल्या आणि म्हनूनच भाव-भावना असलेल्या प्राण्यांपेक्षा मेंदू नसलेल्या वनस्पती खाणे तुलनात्मकरीत्या चांगले.
आपण वनस्पती व प्राणी खातो, वनस्पती प्रकाश 'खातात'. त्यामुळे सर्व ऊर्जा अल्टिमेटली हवेतूनच पैदा होते. ते एक असोच. पण त्याचा आणि वनस्पती व प्राणी खाण्याच्या चांगल्यावाईटाचा संबंध कळाला नाही. खरेतर वनस्पतींना मारून शेतीवरील ताण वाढवण्याऐवजी प्राण्यांना खाऊन शेतीस मदत करावी हाच योग्य मार्ग आहे.
कैच्याकै. तुम्ही एव्हढे मोठे संस्कृत पंडीत असून चार्वाकाचा "भस्मीभूतस्य देहस्य पुनरागमनोकुत:"हा श्लोक वाचला नाही का?
मार्कस ऑरेलियसला संस्कृत येत नसल्याने चार्वाकाचा नियम त्याला लागू होत नाही.
आम्ही तत्वज्ञानाचा अभ्यास केला आहे. इतिहास आणि भुगोलाचा नाही. त्याहीपेक्षा मार्कस ऑरेलियस कुठला होता यापेक्षा त्याने जगाला कोणता संदेश दिला हे आमच्या दृष्टीने महत्वाचे आहे.
साम्राज्यभर लढाया करून वर शांतीसंदेश देणारा ऑरेलियस पक्का ढोंगी होता.

In reply to by बॅटमॅन

सतिश गावडे 08/11/2014 - 01:03
आपण वनस्पती व प्राणी खातो, वनस्पती प्रकाश 'खातात'. त्यामुळे सर्व ऊर्जा अल्टिमेटली हवेतूनच पैदा होते.
अ = ब आणि ब = क म्हणून अ = क हे गणिती तत्व जगण्याला लागू होत नाही.
पण त्याचा आणि वनस्पती व प्राणी खाण्याच्या चांगल्यावाईटाचा संबंध कळाला नाही.
दगडापेक्षा वीट मऊ.
खरेतर वनस्पतींना मारून शेतीवरील ताण वाढवण्याऐवजी प्राण्यांना खाऊन शेतीस मदत करावी हाच योग्य मार्ग आहे.
जीभेचे चोचले पुरवण्यासाठी हा शेतीचा बहाणा चांगलाच आहे तुमचा.
साम्राज्यभर लढाया करून वर शांतीसंदेश देणारा ऑरेलियस पक्का ढोंगी होता.
आपल्या प्रजेचे परकीय आक्रमणापासून संरक्षण करणे हे राजाचे कर्तव्य असायचे. ऑरेलियस त्याचे राजा म्हणून असलेले कर्तव्य पार पाडत असे.

In reply to by सतिश गावडे

बॅटमॅन 08/11/2014 - 01:11
अ = ब आणि ब = क म्हणून अ = क हे गणिती तत्व जगण्याला लागू होत नाही.
पळवाट छान आहे, परंतु लॉजिक डजंट लाय. ते तस्सेच आहे नि तस्सेच लागू होते.
दगडापेक्षा वीट मऊ.
दोन्हींची पर्पज एकच.
जीभेचे चोचले पुरवण्यासाठी हा शेतीचा बहाणा चांगलाच आहे तुमचा.
क्यालरीजच्या थप्प्या लावलेली तुपाळ मिठाई ही व्हेज असल्याने चोचल्यांत जमा होत नसावी बहुधा. तदुपरि व्हेजवाले लोक एकदा नॉनव्हेजची चटक लागेस्तोवरच व्हेज व्हेज करत बसतात. नॉनव्हेजची चव लागली रे लागली की मग हाडेही सोडत नाहीत. (सोडतात पण अन्य मार्गाने, दुसर्‍या दिवशी.)
आपल्या प्रजेचे परकीय आक्रमणापासून संरक्षण करणे हे राजाचे कर्तव्य असायचे. ऑरेलियस त्याचे राजा म्हणून असलेले कर्तव्य पार पाडत असे.
हो पण रोमन राजे एक नंबरचे विस्तारवादी अन क्रूर होते. जर्मनांनी बरी खोड मोडली त्यांची.

In reply to by बॅटमॅन

अत्रुप्त आत्मा 08/11/2014 - 00:43
@पण आम्ही कधी काय म्हटले? =))))) @जित्याजागत्या जिवाला ठार मारून त्याचे प्रेत खाणे हे शाकाहार व मांसाहारात कॉमन आहे इतकेच म्हटले आहे.>>> =)) मला आधि वाटलेलं,बिनतोड मुद्द्यामुळे स.गा. जिंकला..पण या मेल्या वाघुळानी अंगावर न घेता चेंडू असा काहि सोडलन,की आउटही होऊ नये,आणि बाइज ४ रन पण मिळावे!!!!!!!!!!!!! http://www.sherv.net/cm/emoticons/memes/troll-face-meme-smiley-emoticon.gif

In reply to by बॅटमॅन

विजुभाऊ 08/11/2014 - 10:17
तुम्ही जेम्व्हा कच्च्या भाज्या खाता तेंव्हा एक सजीव जिवंतच चिरुन खात असता. तुम्ही जेंव्हा धान्ये भरडून खात असता तेंव्हा सगर्भावस्थेत असलेल्या अनेक जिंवत पेशीना खात असता. जेंव्हा तुम्ही मोड आलेली कडधान्ये , कवळी काकडी वगैरे खात असता तेंव्हा तुम्ही भृण हत्या करत त्याला चावून खात असता ..........मिपा तत्ववेत्त्ता विजुभाऊ शुन्यमार्क कायकेलीस.......

धर्मराजमुटके 07/11/2014 - 20:23
टायटलमदेच सुद्द्लेकन चुकलं बगा राव. ते "अगतिक" पायजे होतं. आणी त्यांना ट्रकमंदी नाय कोंबत तो टेंपो असतो राव. ट्रकचा मान बोकडांना आणि गोवंशियांना. थोड डिटेलींग कडं लक्ष द्या कि राव !

In reply to by खटपट्या

धर्मराजमुटके 07/11/2014 - 22:35
गोवंशियांना नाही मलाही हम्माच म्हणायच होतं.

In reply to by धर्मराजमुटके

ज्ञानोबाचे पैजार 08/11/2014 - 16:47
मुटकेकाका, आगतिक च्या पुढे .... ही लिहिले आहेत याची कृपया नोंद घ्यावी. त्या .... मधे योग्य ते शब्द भरा. पैजारबुवा,

अर्धवटराव 07/11/2014 - 23:31
ताटातली कोंबडी कधि काहि बोलली नाहि याबद्दल अजुन :(

In reply to by अर्धवटराव

सतिश गावडे 07/11/2014 - 23:41
कोंबडीच्या आत्म्याला केव्हाच सद्गती मिळालेली असते. ताटात असतो तो कोंबडीचा मर्त्य देह. त्या मर्त्य देहातून चैतन्य निघून गेल्यावर कसले बोलणे आणि कसले चालणे.

स्वप्नज 08/11/2014 - 00:27
काय स्साले नशीब असते कोंबडीचे... खरं तर तिच्या बलिदानाची जाण ठेवून तिला 'राष्ट्रीय (किंवा मिपा)पक्षी' केले पाहिजे व बोकडाला 'राष्ट्रीय प्राणी'. (प्राणी, पक्षी व 'पाखरं'प्रेमी) स्वप्नज

रेवती 08/11/2014 - 01:22
बर्‍याचजणांना पयल्या ओळीत कळलं होतं म्हणे! मला नव्हतं कळलं. असो. एकंदरीतच न बघवणारा प्रकार. मला काही ते पदार्थ बनवता येत नाहीत, मग शनिवारी भेटलेल्या एक बाई म्हणत होत्या की त्या मला सोप्पा प्रकार कागदावर लिहून पाठवतील. अमूक पद्धतीने मसाला करा, तमूक पद्धतीने परता मग चिकनचे असे असे तुकडे करा.......झालं, अहो तेच तर जमत नाही.