मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

अंधार क्षण भाग ३ (लेख ९)- वंश

बोका-ए-आझम ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
अंधार क्षण भाग ३ - वंश वंश आणि त्याच्या अनुषंगाने येणारे इतर सांस्कृतिक मुद्दे दुस-या महायुद्धात फार महत्त्वाचे होते. या भागात ज्या ४ जणांच्या मुलाखती आहेत ते सर्वजण - २ जपानी, १ अमेरिकन आणि १ जर्मन - या युद्धात सैनिक म्हणून लढले आहेत. यांच्या मुलाखती जरी इथे एकाच भागात असल्या तरी मी त्या वेगवेगळ्या ठिकाणी (स्पष्टपणे सांगायचं तर तीन वेगवेगळ्या खंडांमध्ये) आणि वेगवेगळ्या काळात घेतलेल्या आहेत.

विसावा भाग १

मालविका ·
विसावा २०१०मध्ये आम्ही (मी आणि नवरा)आम्ही ब्लेक फोरेस्टच्या ट्रिपला होतो.बरेच दिवस फिरायला जायच म्हणत होतो पण कुठे ते ठरत नव्हत.शेवटी घाई गडबड नको,दगदग नको असा विचार करून आम्ही ब्लेक फोरेस्टची निवड केली.फार फिरायचं नाही पण जाऊन ४ दिवस विश्रांती तरी घ्यायची.दोघानाही रोजच्या दिनक्रमातून काहीतरी विसावा हवा होता.शिवाय तेव्हाच मी गरोदर असल्याने अजिबात धावाधाव करायची नव्हती.फक्त विश्रांती साठी जायचं हे पाहिलं आणि मग तिथली प्रेक्षणीय स्थळ पाहन असा आमचा एकूण मूड होता.अशा मूड साठी ब्लेक फोरेस्ट हे योग्य ठिकाण आहे. सुरवात तयारीपासून होती.कुठून जायचं,कस जायचं याची माहिती इंटरनेट वरून काढायची काढायची त्य

महाराष्ट्राचे केजरीवाल !

ओंकारा ·
>>> उद्धव आणि आदित्यला सांभाळा, असं आवाहन शिवसैनिकांना बाळासाहेब ठाकरेंनी दसरा मेळाव्यातल्या शेवटच्या भाषणात केलं होत. बाळासाहेब असं का म्हणाले असावेत हे आज कळतंय. सत्तेची हाव, मुख्यमंत्रिपदासाठी हावरटपणा, फाजील आत्मविश्वास, युती तुटल्यावरही केंद्रात सत्तेत राहणं, तेंव्हा लोकसभेचा आणि विधानसभेचा काही संबंध नाही, आताच्या पत्रकार परिषदेत आधी केंद्रात चांगली मंत्रिपद मग राज्याचा विचार, राष्ट्रवादी - शिवसेना नेत्यांच्या भेटीच्या बातम्या सर्व माध्यमांनी दाखवल्या. त्याचं खंडन अजिबात नाही. पण भाजपाला मात्र राष्ट्रवादीबाबतची भूमिका स्पष्ट करण्यासाठी अल्टीमेटम.

क्या अच्छे दिन आ गये ?

hitesh ·
अच्छे दिन आ गये .. ही जाहिरात करत मोदी सरकार सत्तेवर आले. सरकारवर टीका होताच मोदीप्रेमी म्हणायचे अरे थांबा. वाट पहा . पण आता पाच वर्षातील अर्धे वर्ष संपत आले. या सहा महिन्यात अच्छे दिन कुठे खरोखरच आलेत का ? १. महागाई कमी करु म्हणणार्‍या सरकारने महागाई वाढवुनच ठेवली आहे. पेट्रोल डिझेलचे दर सव्वा रुपयाने कमी झाले की मोदी प्रेमी आनंदाने चित्कारतात ! पण रिक्षाचे भाडे मात्र दोन रुपयानी का वाढले कुणी सांगेल का ? डायलिसिसचे दर जवळजवळ २० % ने वाढले. रक्ताच्या एका पिशवीचे दर आठशे हजारावरुन दोन हजारात गेले. प्लेटलेटही महाग झाले. सातशे वरुन एकदम पंधराशे !

पूर्वेच्या समुद्रात- १

सुबोध खरे ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
मुंबईच्या आश्विनी रुग्णालयात काम करीत असताना एप्रिल १९९८ मध्ये एक दिवस मला विशाखापट्टणम च्या तटरक्षक दलाच्या वज्र जहाजावर पोस्टिंग झाल्याचे पत्र मिळाले. मुळात मुंबईत येउन मला एक वर्ष सुद्धा झालेले नव्हते (१० महिनेच झाले होते). शिवाय मी क्षकिरण तज्ञ म्हणून पाच वर्षे काम केल्यावर परत एम बी बी एस चे काम करण्यासाठी का पाठविले ते कळत नव्हते. आमच्या एका महानिदेशकाच्या (DIRECTOR GENERAL) डोक्यातील सुपीक कल्पनेची हि फलश्रुती होती कि प्रत्येक बढती नंतर डॉक्टरने सुद्धा परत समुद्रावरील नोकरीचा अनुभव घ्यायला पाहिजे.

आनंद-कार्लसन, सोची २०१४ - डाव २

चतुरंग ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
आज काय बघायला मिळणार? कालचा ग्रुन्फेल्ड? चला बघूयात

जम्मू कश्मीर मदतकार्य अनुभव- ५

मार्गी ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
जम्मू कश्मीर मदतकार्य अनुभव- १ जम्मू कश्मीर मदतकार्य अनुभव- २ जम्मू कश्मीर मदतकार्य अनुभव- ३ जम्मू कश्मीर मदतकार्य अनुभव- ४ सर्व वाचकांना धन्यवाद! जम्मू क्षेत्रातील मदतकार्य . . आज आपत्ती येऊन गेल्यानंतर सुमारे दोन महिन्यांनी हे लिहित असताना कोणाला असा प्रश्न पडेल की, आता हे सर्व लिहिणं खरोखर आवश्यक आहे का? इतकी ह्याची गरज आहे का? ह्याची‌ आवश्यकता आहे.

द्रिश्यम/ दृश्यम

यश राज ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
माझे काही मल्लू सहकारी खुप दिवसांपासुन सांगत होते की द्रिश्यम म्हणुन एक खुप सुंदर मल्याळम सिनेमा आहे, त्याने यंव बिझेनेस केला,त्यंव रेकॉर्ड केले व तु नक्की बघ.मी त्यांचे बोलणे हसण्यावारी नेले.