मदत हवी आहे - मुकबधिर मुलांसाठी मराठी व्याकरण
मी खरंच ब्लँक झाले आहे...
काही महिन्यांपुर्वी टेचात एक जवाबदारी घेतली होती... मुकबधिर मुलांसाठी मराठी व्याकरण शिकण्यास मदत व्हावी म्हणुन काही प्रेझेन्टेशन बनवायचे आहे.. त्यात चित्र / हलती चित्र (अॅनिमेशन) वगैरे वापरुन मुलांना "बघुन / वाचुन" समजेल अशा स्वरुपात हे काम करायचे आहे. ह्यात नाम, सर्वनाम, क्रियापदे, प्रत्यय, अव्यय इ सगळंच आलं.. मला क्रियापदे आणि प्रत्यय हे काम दिलं गेलं...
मुलं पहिली - चौथी ह्या वयोगटातली असावीत.. मी शाळेला भेट देऊ शकले नाही पण हे काम ज्याने सुरु केले त्याच्या कडुन कळालं की साधारण ४ पायर्या आहेत.. त्याला आपण पहिली ते चौथी म्हणु.. पण वयोगट सामान्य मुलांपक्षा जास्त असु शकतो.. मुळात ही मुलं इतर मुलांचाच अभ्यासक्रम शिकतात.. परीक्षाही तीच देतात.. आणि मग अर्थातच मागे पडुन शिक्षण सोडुन देतात. अगदीच मोजकी मुलं दहावी पास होतात...
मला इतका बिनडोकपणा आणि क्रुरपणा शिक्षणखात्याकडुन अपेक्षित नव्ह्ता...
असो....
तर सुरवात केली ती साध्या क्रियापदांनी.. .gif शोधुन काढल्या.. खाणे, पिणे, हसणे, रडणे, बसणे, तळणे, फुटणे वगैरे चित्र लगेच सापडली.. पण आहे-नाही हे कसं सांगावं ते कळेना.. ही मला न सापडलेल्या क्रियापदांची लिस्ट..
हवे - नको, आहे- नाही, लावणे (ह्यात किती तरी छटा आहेत, रेडिओ लावणे, भांडण लावणे, कडी लावणे..), शोधणे - सापडणे, आठवणे - विसरणे, ओलांडणे, कंटाळा येणे, खोटं बोलणे....
काही मला सापडत नाहीयेत.. काही मला कळतच नाहीयेत की काय शोधु..
पुढचा प्रश्न विभक्ती प्रत्यय....
समजा मला बोलता येत नाही तर मी "मला पाणी हवे आहे" हे हातवारे करुन सांगेन. तेव्हा "मी".."पाणी" अशा मुख्य गोष्टींकडे मी निर्देश करेन.. मी, माझा,मला.. ह्यात ही क्रिया एकच असेल.. मला माहित नाही की ह्या मुलांना जी हातवार्यांची भाषा शिकवली जाते ती नक्की कशी असते.. पण ही भाषा बोलताना विभक्ती प्रत्यय लागत असतील का? नसतील तर ह्या मुलांना हे कसं समजवावं?
मी एक तक्ता बनवुन देऊ शकते.. पण मग ते तर त्यांना पुस्तकातही मिळेल..
मला सांगा की मी कसं समजावुन सांगु? कुणाला मुकबधिर मुलांसोबत कामाचा अनुभव असेल तर कृपया मदत करावी...
वर्गीकरण
प्रतिक्रिया
आपला धागा लेख वाचल्या नंतर या
आम्ही आमच्या कंपनी तर्फे हे
होय, ते उद्योग माझेच आहेत.
अहो प्रश्न पैशाचा नाहीये..
जो ऑनलाईन शोध घेतो आहे बहुधा
वाचलं पण सुचत नाही.
एक आगंतुक सल्ला असा, की
हम्म.. मुकबधीरांचे पण
हो ते डोक्यात आहेच.. सगळ्यात
* हा एक दुवा पहावा
रोचक
आधी कठीण कामासाठी शुभेच्छा!
:-|
बोलतांना मूक बधिरांना
काही मूकबधीर मित्र आहेत
चलचित्र करून दाखवता येईल
मदत अशी खरच काही करु शकत नाही
भाषेशी ओळख झाली
लेखन स्वतःच स्वतः अभ्यासण्या विभक्ती आणि क्रिया महत्वाच्याच
विकिमीडिया कॉमन्सवरील अ
रेडिओ लावणे एवजी पंखा लावणे
साईन लँग्वेज बद्दल मला काहीच
त्यापलीकडे जाऊन मराठीची
विभक्ती हा ट्रिकी भाग आहे.
या प्रेझेंटेशनच्या मदतीने
मला जेवढी माहिती आहे
माझे भाउजी मुकबधिर शाळेत
जमल्यास व्यनि करावा..धन्यवाद!
मस्त धागा आणि तितकेच माहितीपुर्ण प्रतिसाद
प्रेझेन्टेशन स्वरुपात
हम्म.. आपण परभाषी
क्रियापदं शिकवणं अवघड नाहीये.
पिराताई स्टँडर्ड साईन लँग्वेज
साईन लँग्वेजमध्ये विभक्ती वा
माझे सासू-सासरे दोघेहि मूक
व्य.नि. केलाय.
सध्यापर्यंत मिळालेली माहिती:-
प्रभा घाटेंच पुस्तक