Skip to main content

क्यालीफोर्नियाचा कोकण....

लेखक विजुभाऊ यांनी शुक्रवार, 07/11/2014 12:07 या दिवशी प्रकाशित केले.
आपले राजकारणी कोकणचे क्यालिफोर्निया करायच्या बर्‍याच बाता करत असतात. कोकण खरेच निसर्गसुंदर आहे. निसर्गाचा इतका वरदहस्त महाराष्ट्रात इतर कोणत्याच भागास मिळालेला नाहिय्ये. लाम्बच लांब समुद्रकिनारा. त्यांची जणु सोबत करत असल्या सारख्या लागुनच असलेल्या डोंगर रांगा. ती तांबडीलाल माती, वार्‍यावर डुलणारी नारळी पोफळीची झाडे. या सार्‍याला दृष्ट लागु नये की काय म्हणून असणारे गरीबीचे देणे, लोकाना असलेले रीकामपण, बेकारी , अशिक्षण , त्यातून निपजलेला तिरकस स्वभाव हे सगळे कोकणातच आढळतात. आपले राजकीय नेते कोकणचा क्यालिफोर्निया करण्याच्या घोषणा करतात. मात्र त्यासाठी आवश्यक सोयी सुवीधांबद्दल काही करणे सोडा कोणी त्याबद्दल बोलतसुद्धा नाही. समजा उद्या एखाद्या युरोपातील किंवा दुबईतील किंवा अमेरीकेतील राजकीय नेत्याने युरोपचा किंवा दुबईचा किंवा क्यालिफोर्नियाचा कोकण करायची घोषणा केली तर त्यासाठी त्या प्रान्तात कोकणची सारी वैषिष्ठ्ये आणण्यासाठी काय करावे लागेल? उदा: १)क्यालिफोर्निया च्या "करेक्षनल ट्रेनिंग फ्यासिलीटीत खास रत्नागिरीतील मधल्या आळीतील तज्ञांचे तिरकस बोलण्याचे क्लासेस चालवावे लागतील" २) क्यालिफोर्नियातील रस्त्याम्वर स्पीडब्रेकर नामक छोट्या टेकड्या उभ्या कराव्या लागतील ( आणि त्यावरील मार्किंग पुसून टाकावे लागेल) आणखी काही सूचना असतील तर सांगा ना

वाचने 11822
प्रतिक्रिया 53

प्रतिक्रिया

शिवास रिगल, ग्लेन्फिडीच जॅक डॅनियल्स वगैरे बंद करुन ताडी, माडी, फेणीची भरपुर उघडावी लागतील ओपेरा शो ऐवजी दशावतारी नाटके ;) बाकी आठवेल तसे टंकतो कोकणभुषण आणि कॅलिफोर्निया किंग पिवळा डांबिस यांच्या प्रतिसादाच्या प्रतिक्षेत

In reply to by सौंदाळा (verified= न पडताळणी केलेला)

शिरां पडो त्या विजुभाउचें तोंडार! अवदसा आठवली मेल्याक!!!!! :( माझे बाकीचे सजेशन नंतर, राग थंड झाल्यावर दितंय.... :)

In reply to by पिवळा डांबिस

शिरां पडो त्या विजुभाउचें तोंडार! डाम्बीसकाका आम्हा पच्छीम म्हाराष्ट्रातल्या माणसांक "शिरा" असे म्हंटले की रव्याचा सांजा आठवतो. तोसुद्धा मस्त सांगलीच्या तासगावची "बेदाणे मनुका "घातलेले. त्या अर्थाने "शिरा" इज वेलकम.

In reply to by विजुभाऊ

ओके, व्हॉटेव्हर दॅट मेक्स यू फील सुपिरियर!!!! आता आमचे सजेशन.... १. कॅलिफोर्नियातल्या सगळ्या शेकडो एकर शेतांचे तुकडे पाडून माणशी अर्धा एकर असाच मॅक्सिमम जमिनीचा तुकडा दिला पाहिजे. २. बदाम, पिस्ते याचे मळे तोडून तिथे रातांबे, जगमं, अणि आंबाड्यांच्या झाडांचीच लागवड करावी... ३. द्राक्षं आणि स्ट्रॉबेरीजची शेतं बंद करून तिथे नाचणी, वरी आणि नागलीसारख्या कॅश क्रॉपची जोपासना करावी. ४. बाहेरुन आलेल्या टूरिस्टशी आदराने वा फेअरली न वागता त्याचे शक्य तितके पैसे पिळवटून कसे घेता येतील याच्याच सदैव योजना आखाव्यात. ५. ... ६. ... ७. ... ८. ... ९. ... १०. बाहेरच्याकडून शक्य तितकं सगळं पिळून घ्यावं पण त्याबदल्यात जर त्याने आंबे मागितल्यास, "औंदू मोहर जल्लो, काय्येक आंबो गावूक नाय!!!" हे वारंवार बजावण्यास विसरू नये!!!!_ :)

In reply to by पिवळा डांबिस

ते सगळे कराल हो, पण त्या शिंच्या पाण्याच्या दुर्भिक्षाचे काय करायचे? ;) बाकी कोकणचा कॅलिफोर्निया करण्याची गोष्ट माझ्या आठवणीप्रमाणे ७७ सालातले रेल्वे मंत्री मधु दंडवते यांनी केली होती. आता कोणी करत असेल तर माहित तरी नाही.

In reply to by विकास

शक्य आहे. मला वाटत होते उद्योगपती बा म गोगटे यांनी ती कल्पना मांडली होती. आमचे एक बंधू म्हणतात, "फेणीला परवानगी द्या, कोकणाचं काय पायजे ते करता येईल".

In reply to by विकास

पण त्या शिंच्या पाण्याच्या दुर्भिक्षाचे काय करायचे?
हां, तां बाकी खरां! ;)

रोचक आहे कल्पना. मुळात पलीकडल्या आवारातल्या शेजा-याच्या आंब्याची खांदी आपल्या परसात आली तर त्यावरच्या कै-या चुपचाप उतरवून नंतर वरुन त्या खांदीची तक्रार नोंदवणे शिकले पाहिजे. उदा. आमच्या कौलाला तुमची खांदी घासते. तुमच्या कै-या पिकून आमच्या कौलांवर पडतात त्याचा आवाज होतो. तुमच्या खांदीवरुन काल घरात जनावर आले. आमच्या घरी पोरेबाळे आहेत. ( शेजा-याला नसतील तर या वाक्यावर जोर) उद्या तुमची खांदी आम्ही उपभोगली असा आरोप आमच्यावर नको. तस्मात ती खांदी तोडा.

In reply to by गवि

"शेजा-याला नसतील तर या वाक्यावर जोर" >>> हे लैच भारी !!! :)) बाकी, @ आंब्याची खांदी >> आमच्याकडे फांदी किंवा ढांपी म्हणतात.

सगळे शक्य आहे पण आमच्या कोकणात पडणारा धोधो पाउस कुठुन आणणार ? "प्रत्येक घरातुन एक केस कोर्टात" या धर्तीवर तिथे तेवढी न्यायालये लागतील..तेवढीच एकमेकान्बरोबर भांडणारी माणसे कोकणातुन आयात करावी लागतील. कोकणात चालणारी यष्टी तिकडे न्यावी लागेल. पानाची सुपारीची दुकानं. पान खाउन पचा पचा थुकणारी माणसं येवडा सगला पायजे. तवा कायता कोकन दिसुक लागल !!

In reply to by खटपट्या

पण मी पाहीलेत थुंकताना. एस टी स्टॅन्ड तर रंगलेले असतात. ते होय.विसरलात का कोकणच्या मातीचा रंगच लाल असतो. अवांतरः ते थुंकणारे थुंकायच्या वेळेपुरते भय्या रुपात असतात.

उत्तम कल्पना रे विजू. हॉटेलांमध्ये 'थंडगार कोकम सरबत' ठेवावे लागेल. तिकडच्या स्त्रियांनि करवंदाचा जॅम्,लोणचे,सुपारी बनवायला शिकले पहिजे. आंबे विकणार्यांनी त्यांच्या व्यवसायचे नाव 'निक्सन बंधू आंबेवाले'वगैरे ठेवायला शिकले पाहिजे.

अहो विजूभाऊ, आहात कुठे? दोन तीन महाराष्ट्र मंडळ वा तत्सम मराठीभिमुख संस्था काढून आणि आपापसात वाद घालात त्या सॅन ओझे वाल्यांनी मधल्या आळीचं नाव सार्थ केलय म्हणॅ.. खरा काय ता तिथलीच मंडली सांगतिल.. ;)

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

जरा कुठे गंमत करायची म्हटलं तर काका लोकांना पाहवत नाही. :( रच्याकने, श्यान होज्येला लई येळा गेल्तो.

लिंबू मिरची मिळतात काय हो क्यालिफोर्नियात ? नाही म्हणजे करणी करायला अडचण येऊ नये, झालेच तर मुंजे, हडळ, खवीस, झोटींग इ. इ. जमाती एक्स्पोर्ट कराव्या लागतील.

In reply to by धर्मराजमुटके

क्यालिफोर्नियाची संस्कृती इतकीही प्रगत नाही. अजूनही ते उत्क्रांतीच्या मंदिर याच पायरीवर आहेत.

नुकत्याच एका सेल-बाय-डेट होऊन गेलेल्या कोकणी नेत्याने म्हटल्यानुसार, प्रथम गुजरात्यांना बडवून काढावे लागेल. आता कोकणचा कॅलिफोर्निया करतांना काय अथवा कॅलिफोर्नियाचा कोकण करतांना काय, गुजरात्यांचा त्यात संबंध काय, असे विचारायचे नाही.

In reply to by प्रदीप

तुमका काय म्हनायचा तां म्हना वो. पण कुठेही जा गुजराती येतीलच तेथे. निदान एखादे पटेल मोटेल तरी असेल. कोकणात पटेलमोटेल ला धर्मा भंडार्‍याची खानावळ म्हणतात इतकेच.

In reply to by अर्धवटराव

बफेलोमधून मागवा. मात्रं तिला आयुष्यभरात मिळून दहा दहा शेर दूधदेण्यासाठी वेगळ्या प्रकारची इंजेक्शने द्यावी लागतील. आणि तिचं चांदी नाव कुणाला नाय कळलं तर मूनहेड ठेवावे लागेल.

आणि मग .... सॅमचे श्याम मूरचे मोरू अ‍ॅनीचे अनू मायकलचे मछिंन्द्र इ.इ. नावे बदलावी लागतील मग म्हणा..... यावा,कॅलिफोर्निया आपलाच आसा.

किनार्‍यावर, नवसाला पावणारे, कुठल्याशा उत्खननात सापडलेले गंपती/येशू बसवावे लागतील. बिकनी-बेब्जना पोकल बांबूचे फटके दिले जातील. पुरषांनी फक्त चट्टेरी-पट्टेरी चड्ड्या आणी 'प्यांटी' (हो, माहीत्याय माका याक्रण) घालावे आणी बायांनी फक्त साडी/च्युडीडार!!

चट्टेरी-पट्टेरी चड्ड्या घालून गडग्यावर एक पाय ठेवून मशेरी लावता आली पाहिजे.रशिया-जपानच्या पंतप्रधानापासून ते कुडाळच्या सरपंच- सर्वांची मापे काढता आली पाहिजेत.

क्यालिफोर्नियाचो कोकन करुचा आसा तर तेथल्या वकिलांना खटले निकाली न सोडवण्यासाठी खास ट्रेनिंग द्यायलाच हवे.

कॅलिफोर्निया म्हणजे काली-पूर्णिया हो मूळची!!!! पौर्णिमा आणि अमावस्या अर्थात 'काळी' रात्र या दोन्ही वेळेस जी चांगली वाटते ती कालीपूर्णिया. त्याचा आता या हरामखोर इ. इंग्रजांनी अपभ्रंश केला ही गोष्ट वेगळी.

अदुगर शेराच्या मध्यावर एक पिंपलाच्या झाडासर पार आनी चावडी बांदूक व्हयी.. गाववाले थयसर सुशेगात बसूक तम्हाखूचा बार टाकत आजूबाजूच्या गावातल्या खबरींची देवान घेवान करतले.... अवांतर....सोकाजीनानांक क्यालीफोर्नियाचो म्हापौर करूक व्हया...

तुमच्या त्या pier 39 वर सोलकढी,कोंबडी वडे,गोटी सोडा ठेवावयास हवा.शॉपिण्ग मॉलमध्ये आंबा पोळी,खास उग्र वासाची फणस पोळी,तळलेले गरे हवेत. .

In reply to by माईसाहेब कुरसूंदीकर

हा हा.

In reply to by विश्वजीत भोसले पाटील

लेका...आरं कुठं त्ये शिकाकाई का काय ते...कुठं आपलं साखरसम्राटाचं सांगली ? तुलनाच सोड रे...

हे वाक्य पहिल्यांदा कोणी म्हंटले कोणास ठाउक. नंतर कायम चिकटले आहे कोकणाच्या बाबतीत. कॅलिफोर्निया आणि कोकण यात दोन्ही पश्चिम किनार्‍यावर आहे हे सोडले तर काय साम्य आहे मला माहीत नाही. अमेरिकेच्या एखाद्या भागाशी साम्य शोधायचेच म्हंटले तर हवाई शी जास्त आहे. तेथील निसर्ग, फळे, फुले ही जास्त कोकणासारखी वाटतात.

नारबाची वाडी हा त्यांचा णॅशणल शिनेमा घोशित करा. राजकारणातल्या नारोबाचं तिकडं पुनर्वसन होतय का पाहा.

नाष्ट्याला आम्लेट पावाऐवजी उसळ पाव

विजुभाऊ उथळ निव्वळ कॉमेडी चालू केलीत पण शेवटी फारच शिरेस काकांसारखे बोलताय. टेँपो जातो ना अशाने. मस्त अर्ध पान चुना आणि बकणाभर सुपारी तोंडात कोंबून चिऱ्यावर बसायचं. अगोदर पंचमंडळी मुंडी हलवू देत. मग दशावतार रंगेल इकडे. असं सह्याद्री मुलाखतीसारखं लगेच आवराआवर करायची नाही.सध्या पुण्यावरचं वादळ कोकणात गेलं म्हणून जरा दम खाऊ दे त्यांना. तोपर्यँत प्रतापगडावरची चर्चा जोर पकडतेच आहे.

जपानचे पंतप्रधान एकदा बोधगयेचे दर्शन करण्यासाठी बिहार मध्ये गेले होते. त्यावेळी तत्कालीन मुख्यमंत्री लालूप्रसाद यांना भेटले होते. त्यांनी लालूजींना सुचवले की बिहारची सर्वसत्ता त्यांच्याकडे पाच वर्षे सोपवली तर ते बिहारचा जपान करून दाखवतील. त्यावर लालूजी म्हणाले त्यात काय मोठे!तुम्ही माझ्याकडे तीन वर्षासाठी सत्ता सोपवली तर मी जपानचा बिहार करून दाखवतो .

ठिव तुझो डबो, सोन्याचो नाय तो. कॅलिफोर्नियात मालवणा नेमके कुठे शोभून दिसेल ;-) ?

In reply to by श्रीरंग_जोशी

अरे शिरीरंगा, कोकण म्हटलो कि माझो रवळनाथाचो मंदिर इला, जीते माझो रवळनाथ तिते माझो मालवण. बाकी येवडे दिवस तुमचा कायता कैलिफोर्निया बगीतला, आमच्या कोकनाचि सर त्याका नाय रे. नुसता रकरकित यकदम. जल्ली मानसाच नायत. जी काय दिसतत ती बोलत नायत. मनसा कशी पटापटा बोलूक व्हयीत. आमच्या कोकनात कसा, गावात नवीन मानूस इला रे इला कि अख्या गावाक खबर. बाकी जे काय मिलता त्या पण यकदम बुलबुलीत. आंब्यायेवडो टमाटो पण रकेचि चव नाय त्याका. कदी रसरशीत सुरमय, बांगडा, बगुक नाय. शेवटी माजा कोकन तो कोकन. कदी येकदा येयन असा झालाय माका.

ता खरांहा रे खटपट्या. हांव तुका काय सांगताहा ता ऐक. कोकनचो क्याली की कसलोसो फोरण्या कसला करताहा. इथे कोकणांत कोकण्याक कोण इचरत नाय. कोकणरेल्वे तर सगळे भैय्येच असतात. क्यालिफोर्नियात कोण असेल त्यांच्या जागी

In reply to by विजुभाऊ

ह्यां बाकी पाईंटाचा इचारलाव. आता हयसर तर कोन भैया मानूस दिसा नाय. पन भैयांची जागी ते मेक्सिकन का कोन फेक्सिकन हायत ना ते दिसतत. (बगावं तवा मेल्यांचो त्वांड सुजलेला). मेल्यांची भाषा पन काय. सुत्रा, पुत्रा असं काय तरी बड्बड्तत. मेक्सिकन चेडवा बाकी सुंदर हां. आनि ते आफ्रिकेचे कांडे चोर मेले हायतंच. हे रेड्यासारखे माजलेलं. आता हयसर पन गोऱ्यांका कोण इचारूक नाय. आजकल तर कायवबी कामा करंतत. पैल्यासारको रुबाब र्‍हायला नाय सायबाचा. आनी कशाचाच काय र्‍हायला नाय....मेले कांडेचोर गोर्‍या पोरीवांगडा फिरतंत आनि गोरे पोर काळ्या पोरीवांगडा... जल्ला कशाचा पायपोस कशाला नाय.