Skip to main content

९ नोव्हेंबर १९८९ - शेवटाच्या सुरवातीची पंचविशी!

लेखक विकास यांनी सोमवार, 10/11/2014 या दिवशी प्रकाशित केले.
​९ नोव्हेंबर १९८९ जगाच्या नजरेत ऐतिहासिक दिवस. त्याचे महत्वाचे कारण म्हणजे १९६१ साली पूर्व जर्मनीच्या साम्यवादी सरकारने बांधलेली बर्लीन वॉल ही त्या दिवशी कोसळली. नव्हे जनतेने पाडली. हाताची पाचही बोटांची उंची सारखी असावी असा हट्ट करणार्‍या खुळचट साम्यवादाची जाहीरपणे अखेर होण्याची ती सुरवात होती. जाहीरपणे म्हणायचे कारण इतकेच की त्या आधीच १९७८ साली (म्हणजे माओच्या मरणानंतर दोन वर्षाच्या आत) चायनीज प्रेसिडंट डेंग झिआओपेंग यांनी मुक्तअर्थव्यवस्था चायनिज स्टाईल, हळूहळू चालू केली.

रहिमन धागा प्रेम का... ( प्रेमाचा धागा...)

लेखक विवेकपटाईत यांनी सोमवार, 10/11/2014 या दिवशी प्रकाशित केले.
रहिमन धागा प्रेम का, मत तोड़ो चटकाय । टूटे से फिर ना जुड़े, जुड़े गाँठ परि जाय l अत्यंत नाजुक अश्या प्रेमाचा धाग्याला सदैव जपून ठेवावे लागते. एकदा हा धागा तुटला, तर कधी-कधी पुन्हा गाठ मारणे ही शक्य होत नाही. आपली मीरा पतंग उडवीत होती, अचानक पतंगाची दोर तुटली. पतंग हवेत उंच उडाला. थेट स्वर्गात पोहचला. तिथे सोमरसा सोबत अप्सरांचे नृत्य पाहत स्वर्ग सुख भोगू लागला. इथे मीरा जमिनी वर पतंगाच्या विरहात अंतर्बाह्य बुडलेली होती. तिच्या मनात एकाच विचार, पुन्हा पतंग कधी भेटणार. पण धरती आणि आकाशाचे मिलन जवळपास अशक्यच असते.

ती....

लेखक सविता००१ यांनी सोमवार, 10/11/2014 या दिवशी प्रकाशित केले.
ही कथा यापूर्वी अनाहिता मध्ये प्रकाशित झाली आहे. तिथल्या मैत्रिणींच्या आग्रहाखातर इथे टाकत आहे. पहिलाच प्रयत्न आहे. सांभाळून घ्यावे.' ती.. एका वेगळ्या व्यथितांची प्रतिनिधी. सगळ्या जगाने सहज धुडकावली तिला ! काय दोष तिचा ? सगळ्यांसाठी खपली फक्त. अपेक्षा ठेवल्या नाहीत. तिच्या नशिबी असं का? मलाच का माया लावली इतकी तिने? असा काय ऋणानुबंध होता या मावशीचा अन माझा? हे उत्तर तर आजही मिळत नाही मला. काही काही कळत नाही मला......... **--** "सविता, चला आता घरी, शुभंकरोती म्हणायचय ना? आजोबा बोलावतायत" मी अगदी तीन वर्षांची असल्यापासून आजीचा हाच उद्योग.

ताजमहाल .....!!

लेखक फिझा यांनी सोमवार, 10/11/2014 या दिवशी प्रकाशित केले.
ताजमहाल ....! साल 2000. माझं दहावीचं वर्ष.भरपूर अभ्यास करून चांगले मार्क्स मिळवायचे, पुढे सायन्स ला एडमिशन घ्यायचे मग इंजिनीअरिंग करायचे असे आपले बाकीच्या चार चौघिंसारखे माझेही प्लान्स. अर्थात 'चारचौघी ' असं आपण जेव्हा म्हणतो तेव्हा प्रत्येकाचे आयुष्य वेगळे असते, हे मान्य असुनही बाकी सगळ्यांकड़े जे आहे ते सगळं माझ्याकडेही असावे अशी अपेक्षा. आणि वयाच्या १५ -१६ व्या वर्शी मित्र मैत्रिणिंचे तर आयुष्यात खुप महत्व. मग काय ते करतील ती पूर्व दिशा ! दहावी ची परीक्षा तोंडावर आली होती आणि रात्रि जागुन जागुन केलेल्या अभ्यासाच्या खुणा पण तोंडावर दिसत होत्या पिम्पल्स च्या स्वरूपात.

जडण-घडण १३

लेखक माधुरी विनायक यांनी सोमवार, 10/11/2014 या दिवशी प्रकाशित केले.
माझी रोजची कामं सुरू होतीच. फ्री लान्सींग बरं चाललं होतं. कंपन्यांना आवश्यकतेनुसार मजकूर द्यावा लागायचा. पण कधी तरी एखाद्या शुभेच्छापत्रांच्या दुकानात शब्द ओळखीचे दिसावेत, उत्सुकतेने कार्ड हातात घ्यावं आणि आपणच लिहिलेला तो मजकूर फार सुसंगत नसलेल्या चित्रासह दिसावा, अशी स्थिती झाली की मन खट्टू व्हायचं. कधी कधी तर मजकूर छापल्यानंतर तो तपासलाही गेलेला नसे. चुकीच्या ठिकाणी तोडलेली वाक्यं, व्याकरणाच्या चुका बघून वाईट वाटायचं. या कामासाठी मी वेगळे पैसे नाही घेणार, असं सांगूनही प्रत्येक वेळी ही तसदी घेतली जायचीच, असंही नव्हतं.

महाराष्ट्राच्या स्वयंघोषित मराठी सम्राटांना काही प्रश्न

लेखक चिनार यांनी सोमवार, 10/11/2014 या दिवशी प्रकाशित केले.
१. विधानसभा जागावाटपासाठीच्या चर्चेत २०-२२ वर्षाच्या मुलाला पाठवण्यामागची नेमकी भुमिका काय होती ? विधानसभेचे जागावाटप म्हणजे गणेशोत्सवातली खिरापत वाटण्यासारखं असतं का ? २. विधानसभेसाठी युती तोडायची आणि केंद्रात व राज्यातल्या एक महापालिकेत ती कायम ठेवायची असा पवित्रा म्हणजे गल्लीत गोंधळ अनं दिल्लीत मुजरा नव्हे काय ? ३. तुमच्याजवळ असलेल्या महाराष्ट्राच्या नकाशात मुंबईबाहेरील किती जिल्हे समाविष्ट आहेत ? ४. समोरच्या पक्षाला बहुमत मिळालं नाही म्हणजे आपला पक्ष जिंकला असं संविधानात कुठे लिहिलंय ? ५.

ग्रेट भेट - राजगड आणि आप्पा परब

लेखक वेल्लाभट यांनी सोमवार, 10/11/2014 या दिवशी प्रकाशित केले.
रा'जांनी ज'गलेला गड रा'जपण ज'पणारा गड रा'जांचा ज'वळचा गड रा'जधानीचा ज'बरदस्त गड 1 प्रातःकिरण वरील विस्तारित शब्दांना विशेष अर्थ नाही. राजगडाची आठवण काढल्यावाचून राहणं कठीण होतंय, म्हणून आपलं काहीतरी. पहिल्या वेळेस राजगड भेट झाली तेंव्हाच पुन्हा यायचं हे निश्चित केलं होतं. त्या 'पुन्हा' चा जो योग आला तो फार वेगळा आणि विशेष होता. शिवशौर्य ट्रेकर्स तर्फे राजगड पदभ्रमण मोहीम आयोजित केली गेली आणि सोबत ज्येष्ठ इतिहास अभ्यासक आप्पा परब असणार अशी माहिती फेसबुकवर बघितली. आप्पांना आधीही भेटलो होतो, त्यांची पुस्तकं वाचलेली आहेतच.

अंधार क्षण भाग ३ (लेख ९)- वंश

लेखक बोका-ए-आझम यांनी सोमवार, 10/11/2014 या दिवशी प्रकाशित केले.
अंधार क्षण भाग ३ - वंश वंश आणि त्याच्या अनुषंगाने येणारे इतर सांस्कृतिक मुद्दे दुस-या महायुद्धात फार महत्त्वाचे होते. या भागात ज्या ४ जणांच्या मुलाखती आहेत ते सर्वजण - २ जपानी, १ अमेरिकन आणि १ जर्मन - या युद्धात सैनिक म्हणून लढले आहेत. यांच्या मुलाखती जरी इथे एकाच भागात असल्या तरी मी त्या वेगवेगळ्या ठिकाणी (स्पष्टपणे सांगायचं तर तीन वेगवेगळ्या खंडांमध्ये) आणि वेगवेगळ्या काळात घेतलेल्या आहेत.

विसावा भाग १

लेखक मालविका यांनी सोमवार, 10/11/2014 या दिवशी प्रकाशित केले.
विसावा २०१०मध्ये आम्ही (मी आणि नवरा)आम्ही ब्लेक फोरेस्टच्या ट्रिपला होतो.बरेच दिवस फिरायला जायच म्हणत होतो पण कुठे ते ठरत नव्हत.शेवटी घाई गडबड नको,दगदग नको असा विचार करून आम्ही ब्लेक फोरेस्टची निवड केली.फार फिरायचं नाही पण जाऊन ४ दिवस विश्रांती तरी घ्यायची.दोघानाही रोजच्या दिनक्रमातून काहीतरी विसावा हवा होता.शिवाय तेव्हाच मी गरोदर असल्याने अजिबात धावाधाव करायची नव्हती.फक्त विश्रांती साठी जायचं हे पाहिलं आणि मग तिथली प्रेक्षणीय स्थळ पाहन असा आमचा एकूण मूड होता.अशा मूड साठी ब्लेक फोरेस्ट हे योग्य ठिकाण आहे. सुरवात तयारीपासून होती.कुठून जायचं,कस जायचं याची माहिती इंटरनेट वरून काढायची काढायची त्य