पांढरा रस्सा
खर तर पांढरा रस्सा म्हटल की कोल्हापूर डोळ्यासमोर आल्याशिवाय राहत नाही. कोल्हापूरी स्पेशल मेनू मध्ये गणला जाणारा हा पांढरा रस्सा आणि सोबत असणारा तांबडा रस्साही नाव काढल्याबरोबर अगदी तोपासु होत. कोल्हापूरात ह्यासाठी लागणारे मसाले खास गिरणीत दळून आणतात असे ऐकले आहे. कोल्हापूरकर ह्यावर अजून माहीती देतीलच. माझ्या वाचनात ही रेसिपी आली आणि ती करून मी करून पाहीली. फारच झ्याक (टेस्टी) लागला हो. पारंपारीक पद्धत अजून वेगळी असू शकते ती जाणून घ्यायची इच्छा आहे कोल्हापूरवासियांकडून. तर मी केलेला पांढरा रस्सा खालील प्रमाणे:
साहित्यः
१ किलो चिकन (तुकडे करून व स्वच्छ धुवून)
४ चमचे आल, लसुण पेस्ट
२ छोटे कांदे चिरून
१ चमचा तेल
सुके वाटण
२ चमचे तिळ
दिड चमचा खसखस
अर्धा चमचा जीर
अर्धा चमचा शहाजीर
१ चमचा धणे
८-१० मिरी
१०-१५ काजू
फोडणी
२ मोठे चमचे तूप
५-६ मिरी
३-४ लवंगा
३-४ तमाल पत्र
१ डालचीनी काडी मोडून
१ ओल्या नारळाचे दूध
मिठ
पाककृती:
१)पहिला धुतलेल्या चिकनला आल्-लसुण पेस्ट लावून साधारण १ तास मुरवत ठेवा.
२) वरील सुक्या वाटणातील जिन्नस थोडे भाजून थंड करून त्याची मिक्सरमध्ये पूड करून घ्या.
३) एका भांड्यात तेल गरम करून त्यावर कांदा गुलाबी रंग येई पर्यंत तळून त्यावर चिकन परतवा. थोडे मिठ घाला. हे चिकन वाफेवर शिजवून घ्या. शिजताना चिकनला पाणी सुटते. जर शिजण्यासाठी आवश्यक वाटले तरच थोडेसे पाणी घाला.
४) दुसर्या भांड्यात तुप गरम करून त्यावर मिरी, लवंग, तमालपत्र, दालचीनीची फोडणी द्या. सुके वाटण घाला. त्यात शिजलेले चिकन घालून नारळाचे दूध घाला. थोडेसे मिठ घालून थोडावेळ गॅसवर ठेवा. (मिठ कमी घाला कारण आधी चिकन मध्ये घातलेले आहे.)
झाला पांढरा रस्सा तयार.
आता आपल्या जेवणाच्या ताटात ह्या वाटीला मानाने बसवून जेवणाचा आस्वाद घ्या.

वाचने
16100
वाचनखूण
प्रतिक्रिया
26
झकास. आहाहाहाहाहाहाहाहाहाहाहा
तोंड खवळले...
रेसिपी मध्ये सुके वाटण
कहर!
तांबडाही येऊदे...
तोंपासु
सहिच
In reply to सहिच by सौंदाळा (verified= न पडताळणी केलेला)
ये. कुछ काम का इन्फ्रमेशन हय.
In reply to सहिच by सौंदाळा (verified= न पडताळणी केलेला)
अहो काय सांगता
In reply to सहिच by सौंदाळा (verified= न पडताळणी केलेला)
पत्ता
In reply to पत्ता by कपिलमुनी
पिंपरी पुलाखाली मंडई आहे
In reply to पिंपरी पुलाखाली मंडई आहे by सौंदाळा (verified= न पडताळणी केलेला)
सकाळी भेटशील का महादेवकडे?
In reply to सकाळी भेटशील का महादेवकडे? by प्रचेतस
अर्र
In reply to पिंपरी पुलाखाली मंडई आहे by सौंदाळा (verified= न पडताळणी केलेला)
.
In reply to . by hitesh
मुंबईत कुठे मिळेल माहित नाही
वा.... काय मस्त दिसतोय पांढरा
वा!
झक्कासच! तोंपासू.
मस्तच.
एकच नंबर!!
आ हा करुन बगाय पायजे !!
आता ह्या रविवारी करणं आलं!!
बहुगुणी धन्स. मी पाहीले
झक्क्कास !!!
फोटो सुंदर आहेत
वावा..