मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

छायाचित्रणकलेच्या १७५ व्या वाढदिवसानिमित्त स्पर्धा क्र. ४: उत्सव प्रकाशाचा

संपादक मंडळ ·
http://www.misalpav.com/node/28571 http://www.misalpav.com/node/28729 http://www.misalpav.com/node/28931 ******************************************** नमस्कार मंडळी! दिवाळीच्या फराळाचा फन्ना उडवला का नाही! आणि दिवाळी अंकही बरेच वाचून झाले असतील! आता जराशा विश्रांतीनंतर छायाचित्रणकलेच्या १७५ व्या वाढदिवसानिमित्त चौथी स्पर्धा सुरू करूया चला!. नुकतीच दिवाळी संपली आहे. दिवाळी म्हणजे प्रकाशाचा उत्सव. म्हणून या स्पर्धेचा विषय राहील उत्सव प्रकाशाचा! मग तो उत्सव एका पणतीचा असेल किंवा लखलखत्या रोषणाईचा, किंवा आकाशातल्या नैसर्गिक रोषणाईचा.

एकदा तरी पहावा असा.

नाखु ·
लेखनविषय:
डॉ.प्रकाश बाबा आमटे.
      मराठी चित्रपट जगतात सध्या (हिंदीच्या तुलनेने) चांगले आशयघन/नाविन्य विषय्/नवीन प्रयोग असलेले चित्रपट येऊ लागले आहेत्.सकस विषय आणि दर्जेदार निर्मिती बरोबर जाहीरात-वितरण यावर विशेष लक्ष्य दिल्याने चित्रपट व्यवस्थित कमाई करू शकतो हे बालक पालक्/पोष्टर बॉईज ने दाखवून दिले आहे. नमन झाल्यावर आता मुळ विषयः डॉ.प्रकाश बाबा आमटे कालच पाहिला. सरळ रेघ (आवडलेल्या गोष्टी/जमेच्या बाजू):
      • वेगळा विषय निवड तसेच प्रसिद्धी पासून दूर व्रतस्थपणे काम करणार्या माणसांची समाजाला ओळख करून देणे
      • उच्च निर्मिती मुल्ये (कुठेही हात आखडता घेतल

घेऊन जा

सह्यमित्र ·
लेखनविषय:
काव्यरस
गंध मातीत, पहिल्या सरीत भिजल्या रानात, घेऊन जा || श्रावणसरीत, रंगल्या नभात सोनेरी उन्हात, घेऊन जा || साजणवेळात, भिजल्या क्षणात रंगल्या गाण्यात, घेऊन जा || चिंब रातीत, मंद ज्योतीत धुंदल्या मिठीत, घेऊन जा ||

चहा, सिगरेट आणि गप्पा - थंडी

खोंड ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
हाताची चार बोटं वर करून न बोलताच जोश्या नि ऑर्डर दिली. "कसली थंडीये …. " यंत्रमानवाच्या आवाजात कुडकुडत जोशी म्हणाला. "मिष्टर झिरो फिगर … अंगावर थोडी तरी चरबी जमवा … एवढी पण थंडी नाहीये … " "च्याक… पहिल्या सारखी थंडी नाही राहिली … " चहा आला.

माझी बायको

आंबट चिंच ·
ढुषक्लेमेरः- सदर कविता ही ज्यांची बायको आयटी क्षेत्रात काम कराणारी पण नवरा बिगर आयटीवाला आहे अश्यां करीता आहे अशी कोणी समजुत करुन घेवु नये. तसेच ज्यांना हे वर्णन आपल्या बायकोशी मिळतेजुळते असे वाटत असेल तर तो निव्वळ योगायोग समजु नये. द्या मला एक झाडु आणुनी घर लक्ख करेन मी बायको ती येई कामावरुनी द्या मला एक फुंकणी आणुनी जेवण असे फक्कड करेन बायकोचा दास मी गुणी द्या मला एक पान आणुनी लवंग काथ केवडा घालुनी विडा बायकोला देईन दशगुणी द्या मला एक पावा आणुनी गाइन सुरेल गाणी बायको जाईल झोपुनी

अंधार क्षण भाग २ - अलाॅयस फाॅलर (लेख ६)

बोका-ए-आझम ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
अंधार क्षण - अलाॅयस फाॅलर १९३३ मध्ये नाझींच्या हातात जर्मनीची सत्ता आल्यावर पहिली गोष्ट जर त्यांनी केली असेल तर ती म्हणजे सर्व विरोधी आवाज बंद करणं. हिटलरचा उजवा हात हर्मन गोअरिंग प्रशियाचा म्हणजे जर्मनीतल्या सर्वात मोठ्या राज्याचा गृहमंत्री होता. त्याने नाझी निमलष्करी संघटना आणि प्रशियन पोलिस यांचं एकीकरण घडवून आणलं. त्यामुळे नाझींच्या हातात पोलिसांचे अधिकार आले आणि ते त्यांनी विरोधकांच्या दडपशाहीसाठी सर्रास वापरले.   त्यांना विरोध करणं म्हणजे स्वत:चा मृत्यू ओढवून घेणं होतं.

मिपादेवीची विनवणी?

आनन्दा ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
अनेक शतकी धागे पाहुनि, नावे मजला ठेवू नका। मीच विनविते हात जोडुनी उगाच मजला छळू नका।। जिलब्यांचा अतिदिव्य वारसा मिसळपाविनो तुम्हा मिळे। उणे कुणाचे दिसता किंचित दवंडी द्याया विसरू नका।| व्हा ज्ञानाचे वाढपी तुम्ही, जिलबीमारा करीत रहा । कलम चालवा सालभर तरी सण शिमग्याचा आणु नका।| जिलब्यांच्या उत्साहावरती कधीच विरजण घालू नका। टीआरपीच्या धाग्यांवरती मागे कोणी राहू नका।| जिलबी पाडा, काकू पाडा, जमले तर मग लेखही पाडा। पण काकूचे काश्मीर करताना बर्फामध्ये पडू नका।| मिपा आपुले करा नामांकित परी, इतरा नावे ठेवू नका। डु आयडी ने लिहिता लिहिता वरिजनलला विसरू नका ।| कंपू पेरा अपुल्या भवती, पिंक पिंकेने रंगतसे।

पंचप्राण

चलत मुसाफिर ·
लेखनविषय:
काव्यरस
ती नसेल तर होईल आर्त एक कल्लोळ झपाटलेल्या पिंपळावर विरहविजेचा लोळ ती नसेल तर होईल विरक्त जीवनगाणे बैराग्याच्या थाळीतले भकास पै-आणे ती नसेल तर होतील प्रश्नच अंतर्धान जपून ठेवेन मुठीत विझते पंचप्राण

पुण्यदेवीची विनवणी

पगला गजोधर ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
अनेक शतकी उमर गाठली, नावे मजला ठेवू नका। मीच विनविते हात जोडूनी, पुण्यावरती जळू नका।। शिवसूर्यचा दिव्य वारसा शहरवासियो तुम्हा मिळे। उणे कुणाचे दिसता किंचित देत दवंडी फिरू नका।| व्हा ज्ञानाचे जोतीबा इथे तुम्ही, शेणमारा हा करू नका । कलम करी ये तरी सालभर सण शिमग्याचा ताणू नका।| सरस्वतीच्या देवळातले स्तंभ घणाने तोडू नका। इथेच गर्दी, इथेच महागाई, असे शंखच, पोकळ फुंकू नका।| निव्वळ रस्ते मॉल बिल्डिंगा, म्हणजे शहर मानू नका। लाख लाख जन माझ्याअंतरी रमले वसले, हे कदापी विसरू नका।| गावं आपुले करा नामांकित परी, करमणुकीच्या गटारगंगेत मला तुम्ही क्षाळु नका। मजला देवी म्हणुनी भजू नका, पण दासी म्हनोणही पिटू