मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

सल्ला हवाय

बार्नी ·
नमस्कार, मी गेल्या वर्षी सी ओ ई पी महाविद्यालयातून बी टेक पूर्ण केले असून , सध्या एका मेक कंपनी मधे काम करत आहे. पुढे एम बी ए (mostly IIMs) करुन फायनान्स मधे नोकरी करण्याचा विचार आहे. परंतु मी बारावीत असताना मला स्किझोफ्रेनिया असल्याचे निदान झाले होते. mba करुन खाजगी नोकरी करण्याएवजी सरकारी नोकरी (low stress environment ) करावी असे माझ्या डॉक्टर चे म्हणणे आहे. पण सरकारी नोकरी मधे मला रस वाटत नाही. टेक्निकल फिल्ड मधे जास्त आवड नसल्याने लेक्चरर होण्यातही रस नाही. मानसिक आजार असून खाजगी नोकरी करणे शक्य आहे का ?

पाठलाग..

बोबो ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
पाठलाग.. ***************************************************** बराच वेळ आम्हा दोघांपैकी कुणीही एकसुद्धा शब्द बोललं नाही. दोघेही शांत,चिडीचूप. पण मग मलाच राहवेना. विचारू की नको असा विचार मी करत होतो. कारण निर्णय मनाविरुद्ध गेला तर मी ते कसं पचवणार याची भीती वाटत होती. या आधीचा माझा एक अनुभव अतिशय वाईट होता. त्या अनुभवानंतर आलेल्या डिप्रेशनमधून मोठ्या मुश्किलीने मी स्वतःला सावरलं होतं. आणि आता पुन्हा एकदा विषाची परीक्षा घ्यायची वेळ आली होती. मनाशी देवाचा धावा केला. म्हटलं,"देवा महाराजा, या वेळेस सुद्धा जर निर्णय माझ्या मनासारखा लागला नाही तर ते सहन करण्याची शक्ती मला दे.

घालीन लोटांगण

शिरीष फडके ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
कलमनामा – ३१/०८/२०१४ – लेख १ - घालीन लोटांगण घालीन लोटांगण वंदीनं चरण, डोळ्यांनी पाहिन रूप तुझे, प्रेमे आलिंगन आनंदे पूजन, भावे ओवाळीन म्हणे नामा ही आरती गणपतीच्या दिवसात नेहमीच ऐकली जाते, म्हटली जाते किंवा गायली जाते. ही आरती बर्याच जणांची आवडती आरती आहे. त्याची कारणं वेगवेगळी आहेत. इतर आरत्यांपेक्षा ही आरती जरा वेगळी आहे म्हणून काहींना आवडते तर काहींना या आरतीची चाल गतिमान आहे म्हणूनदेखील ही आरती आवडते. (तसंच या आरतीला वाजवल्या जाणार्या टाळ्यांमध्येदेखील एक विशिष्ट गती आहे).

मॅक्रो फोटोग्राफी - भाग १

हुकुमीएक्का ·
मॅक्रो फोटोग्राफीचा प्रयत्न. . .       दिवाळीत खुप बिझी असल्याने "उत्सव प्रकाशाचा" या स्पर्धेत सहभागी होता आले नाही. सर्व स्पर्धकांचे व विजेत्यांचे अभिनंदन. सर्व फोटो पाहून फोटोग्राफीसाठी नवीन जोश आला.       पावसाळ्यानंतर पहिल्यांदा कॅमेरा हातात घेतला तो म्हणजे दिवाळीत. दिवाळीनंतर जो वेळ मिळाला त्यात थोडा वेळ काढून मॅक्रो फोटोग्राफीवर जास्त वेळ दिला. माझा कॅमेरा Canon SX50 HS आहे. अर्थात Point n Shoot कॅमेरा असल्याने DSLR ची सर त्याला येउच शकत नाही. परंतू तरीही कॅमेराच्या किमान features चा कमाल वापर करण्याचा प्रयत्न केला आहे.

पुस्तक परिचय - अंधारछाया कादंबरी

शशिकांत ओक ·
लेखनविषय:
लेखनप्रकार

पुस्तक परिचय - अंधार छाया

मित्रांनो, नुकतेच ईसाहित्य प्रतिष्ठान च्या सौजन्याने अंधारछाया ही कादंबरी ईबुक रूपुात प्रसिद्ध झाली आहे. त्याचा अल्पपरिचय सादर. ही कादंबरी मोफत डाऊन लोड करायची सोय आहे. इच्छुकांनी ई साहित्य.कॉम वर किंवा मला विचारणा केली तर ती मी आपल्याला मिळवून द्यायची सोय करू शकेन.

इंटरस्टेलारच्या निमित्ताने...

सतिश गावडे ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
इंटरस्टेलार हा मी भारतातील थियेटरला पाहिलेला पहिला इंग्रजी चित्रपट. एका हॉलीवूड चित्रपटवेडया मिपाकर मित्राच्या आग्रहास्तव त्याच्या सोबत हा चित्रपट पाहायला गेलो. इंग्रजी चित्रपटातील उच्चार कळत नसल्यामुळे चित्रपट कितपत समजेल याबद्दल साशंक होतो. मात्र चित्रपट सुरु होताच पडद्याच्या खालच्या बाजूला इंग्रजी सब टायटल्स दिसू लागली आणि मी निश्चिंत झालो. चित्रपट अतिशय सुंदर असल्यामुळे नजर पडद्यावर खिळली होती. काही प्रसंग अक्षरशः श्वास रोखून धरायला लावत होते. आता पृथ्वीचा विनाश जवळ आला आहे.

ही वाट भटकंतीची: १२ हिमाचल

गणेशा ·
प्रत्येक वर्षी नोव्हे-डिसे मध्ये महाराष्ट्रा बाहेर फिरायला जायचे असे ठरवले होते, पण काही कारणाने या काळात जाता न आल्याने वाईट वाटले. आणि मग त्याची कसर भरुन काढण्यासाठी उन्हाळ्यात कोठे फिरायला गेले पाहिजे याची लिस्ट काढणे सुरु झाले. काश्मीर की हिमाचल या २ ठिकाणांपर्यंत फायनल झाले. पण नक्की कोठे जायचे ते काही फायनल होईना. सरते शेवटी हिमाचल (शिमला.. कुल्लू..मनाली) ला जाण्याचे ठरवले. पुन्हा उन्हाळ्यात जायचे म्हणजे, मुलांच्या (दूसर्‍यांच्या) परीक्षा संपलेल्या, लग्न झालेली उत्साही मंडलींची गर्दी हे टाळलेच पाहिजे असे वाटले. त्यामुळे प्लॅन थोडा आधी करावा असे वाटले.

आनंद-कार्लसन, सोची २०१४ - डाव ३

चतुरंग ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
वीकांताला आनंद डाव हरला आणि १.५ वि.०.५ असा गुणांनी मागे पडला. कालचा विश्रांतीचा दिवस आज काय घेऊन येतोय बघूयात. आनंदसाठी जिंकणे अनिवार्यच आहे कारण पांढरी मोहोरी आहेत आणि पराभवाचे घाव ताजे आहेत!! आतापर्यंत आनंद ज्याज्यावेळी डाव हरला आहे त्या त्यावेळी त्यापुढचा डाव लगेच जिंकलाय अपवाद मागची जगज्जेतेपदाची स्पर्धा! यावेळी तो अपवाद होता हे सिद्ध करु शकेल का आनंद? कामाचा दिवस असल्याने मला सलग येणे शक्य नाही रसिकांनी डाव पुढे चालू ठेवावा. आनंदने डी४ प्याद्याने डाव सुरु केलाय. पहिल्या ५ मिनिटातच १५ खेळ्या झाल्यात. आनंदचे सी प्यादे बघता बघता सातव्या पट्टित पोचले आणे आणि सी स्तंभ मोकळा झालाय.

अलिगढ मुस्लीम विद्यापीठाच्या वाचनालयास, 'स्त्रीया परक्या'

माहितगार ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
स्त्रीयांनी धार्मीक संस्कृतीच जतन करावं मात्र इतर क्षेत्रांएवढच शिक्षण क्षेत्र स्त्रीयांपासून कसे दूर ठेवले जाईल याचा प्रत्येक प्रयत्न प्रत्येक धर्मातील धर्ममार्तंड करत असतात किंवा केलेला असतो. सध्या बातम्यात येत आहे ती अलिगढ मुस्लीम विद्यापीठाचे वाचनालय ज्या मुख्य वाचनालयात सर्वाधिक पुस्तकांची उपलब्धता आहे त्या मौलाना आझाद वाचनालयात मस्जिदी प्रमाणेच प्रवेश बंद आहे. हा प्रवेश बंद असणे हि गोष्ट नवीन नाही.