ठरवून मुलुख सारा,भिजवून परतलो मी
कळ आतल्या जीवाची,चेतवून परतलो मी |
अतृप्त आर्त वारा,त्रासून प्राशिला मी
मर्जी नसे मनाची,भिजवून चाललो मी ||
बेरंग या जगाला, रंगून टाकताना
रुधीरार्त आर्त माझे हलकेच सांडताना |
तुज रंग रंजीताचा,रक्तरंज हा दिसेना
मनी माझिया सखी हे,काहूर हासवेना ||
न्हावून घे बरे तू ,आसुसल्या सुखाने
दुखवू कसा पुन्हा मी बोलू कुण्या मुखाने?
कोंडून दुःख सारे,विस्फोट आज व्हावे
हे देह संचिताचे,भेदून लखलखावे ||
येशील का जगी तू,बनुनी पुन्हा धरा ती
मी मूक (कि मुक्त )मेघ नभीचा,बरसेल बेहीसाबी |
सोसून वेड सारे,रुजूदे पुन्हा मलाही
समजू नकोस काटा,मी पुष्प ते गुलाबी ||
रुजुनि तुझ्या ऊराश