अविचार करण्याआधी
एक काम कर
कृत्रिम जगाच्या चौकटीतून
एकदातरी बाहेर पड
दऱ्याखोऱ्या कडेकपारीतून
पाखरासारखं उडून बघ
खळाळणाऱ्या नदीमध्ये
मासोळीसारखं पोहून बघ
फेसाळ धबधब्याखाली
निमुट उभा रहा
पावलं थकेपर्यंत
बेलगाम धावून पहा
रस्ता हरवलेल्या पावलांना
खोलवर जंगलात ने
गळा फाटेपर्यंत ओरड
आसवं संपेपर्यंत रडून घे
संध्याकाळ झाली की
डोंगरमाथ्यावर जा
सावल्या लांबताना अन
सुर्य हरवतांना पहा
शक्य झाल्यास रात्रीही थांब तिथं
जंगल अंगावर येईल,
रातकिड्यांचे आवाज ओरबाडतील
हरवलेल्या दाही दिशा,
गळा दाबायला सरसावतील
पण लवकरच जिवंतपणा घेऊन
पहाटकिरणं उगवतील
अंधाररस्ता उजळेल
पक्षी आशेचं गीत गातील
आता थंडगार वारा पिऊन
परत फिर घरी
तिथेच असेल तू बांधलेली
गळफास अन दोरी
तुला पाहून कळेल त्यांना
काहीतरी बदल झालाय
ठणकावून सांग संकटांना
कालचा तू केव्हाच मेलाय
--------------------------------------------
| लेखनविषय: |
|---|
वाचने
3227
प्रतिक्रिया
13
मिसळपाव
प्रतिक्रिया
सुरेख!
वा!
उत्तम !
शेवटचं कडवं असं होईल का पाहा
संकटांशी कवि बोलतोयं म्हटल्यावर
In reply to शेवटचं कडवं असं होईल का पाहा by अॅस्ट्रोनाट विनय
-^-
In reply to संकटांशी कवि बोलतोयं म्हटल्यावर by संजय क्षीरसागर
@पद्मावती, पैसा
सुरेख कविता.
मला पन आवडली.
In reply to सुरेख कविता. by सतिश गावडे
मससससससस्त!
सुरेख!
आवडली
छान!!