Skip to main content

शब्दक्रीडा

एक 'मळमळ-झल'

लेखक स्वामी संकेतानंद यांनी मंगळवार, 21/03/2017 21:09 या दिवशी प्रकाशित केले.
रात्री डब्यात आलेले छोले खाऊन सोडलेली ही 'मळमळझल' पेश-ए-खिदमत आहे. उथळ जळाची खळखळ अटळ वळूची मळमळ कशास या वेटोळ्या कशास रे ही वळवळ सुरी असे ही बोथड उगाच का ही चळचळ? जखम दिसावी गहिरी खरी असावी कळकळ झुळूक वाहत नसली तरी असावी सळसळ इनो जरासा घ्यावा रुकेल तुमची जळजळ भरून येती डोळे प्रवाह वाहे भळभळ कळी कळे का कोणा? करा कशाला खळखळ? कुटाळ टाळा 'स्वामी' विटाळ आहे चळवळ - स्वामी संकेतानंद

नवीन नियमावली

लेखक अॅस्ट्रोनाट विनय यांनी मंगळवार, 14/03/2017 14:40 या दिवशी प्रकाशित केले.
प्रशासनातर्फे नवीन नियमावली जारी करण्यात येत आहे. ती वाचून ध्यानात घ्यावी. काही अडचण, शंका असल्यास या धाग्यावर चर्चा करावी. बदलत्या काळात टिकून रहायचं असेल, प्रगती साधायची असेल तर बदल आवश्यक असतात. आजकाल सगळ्याच क्षेत्रात झपाट्याने बदल होत आहेत, जुन्या कार्यपद्धती मागे पडून नवनवीन संकल्पना समोर येत आहेत. म्हणून आपणहीआपल्या जुनाट कार्यपद्धतींमध्ये सुधारणा करत आहोत. १. सबंध भारतात झाडांची संख्या कमी होत चालली आहे. त्यातल्या त्यात आपल्या बांधवांना प्रिय वड, पिंपळ, चिंच अशी झाडे तर दुर्मिळच म्हणावी लागतील. त्यामुळे निवाऱ्याचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे.

कदाचित (भयगुढ कविता)

लेखक अॅस्ट्रोनाट विनय यांनी बुधवार, 22/02/2017 11:00 या दिवशी प्रकाशित केले.
कदाचित ही फक्त हवा असेल जी चाल करून येतीये विव्हळणाऱ्या जीर्ण फांद्यांना खिडक्यांवर फटकारतीये कदाचित हा फक्त पाऊस असेल जो ढगांना प्रसवतोय दाराछतातून टपटपून अंगावर बर्फशहारे आणतोय कदाचित ह्या फक्त सावल्या असतील ज्या श्वापदांसारख्या दिसताहेत सराईत शिकाऱ्यासारख्या मला चारीबाजूंनी घेरताहेत कदाचित हा फक्त कावळा असेल जो आत्ताच खिडकीवर धडकलाय रक्ताळलेली चोच आदळून काचांना तडे देत सुटलाय कदाचित हा फक्त भास असेल कुणीतरी जोरात किंचाळल्याचा आपोआप दिवे विझल्याचा अन मानेवरच्या उष्णगार श्वासांचा कदाचित भासच असेल हा कदाचित स्वप्न असेल कदाचित... ती आली असेल -------------------

एवढं करंच...

लेखक अॅस्ट्रोनाट विनय यांनी रविवार, 19/02/2017 14:15 या दिवशी प्रकाशित केले.
अविचार करण्याआधी एक काम कर कृत्रिम जगाच्या चौकटीतून एकदातरी बाहेर पड दऱ्याखोऱ्या कडेकपारीतून पाखरासारखं उडून बघ खळाळणाऱ्या नदीमध्ये मासोळीसारखं पोहून बघ फेसाळ धबधब्याखाली निमुट उभा रहा पावलं थकेपर्यंत बेलगाम धावून पहा रस्ता हरवलेल्या पावलांना खोलवर जंगलात ने गळा फाटेपर्यंत ओरड आसवं संपेपर्यंत रडून घे संध्याकाळ झाली की डोंगरमाथ्यावर जा सावल्या लांबताना अन सुर्य हरवतांना पहा शक्य झाल्यास रात्रीही थांब तिथं जंगल अंगावर येईल, रातकिड्यांचे आवाज ओरबाडतील हरवलेल्या दाही दिशा, गळा दाबायला सरसावतील पण लवकरच जिवंतपणा घेऊन पहाटकिरणं उगवतील अंधाररस्ता उजळेल पक्षी आशेचं गीत गा

प्रेम

लेखक पराग देशमुख यांनी मंगळवार, 14/02/2017 12:08 या दिवशी प्रकाशित केले.
प्रेम म्हणजे साला , अंधार झालाय अंधार . अब्रू वेशींवर टांगलेली नि, भावनांचा चाललेला व्यापार . नजर वखवखणारी असूनही येथे, कोवळ्या कळ्यांना धुमारे फुटू लागतात. अन प्रेमाचा पाऊस पडला तरी कुजण्याइतकी, नात्यांची बीजे भिकार असतात. पैशाच चामडं पांघरून इथ , वा
काव्यरस

१०० नंबरी प्रेम

लेखक अॅस्ट्रोनाट विनय यांनी मंगळवार, 14/02/2017 10:47 या दिवशी प्रकाशित केले.
--------------------------------------------- बायकांच्या बडबडीने जेव्हा इच अँड एव्हरीजण कंटाळला 'रोज शंभरच शब्द बोलायचे' सरकारने नियम काढला मला फारसा त्रास नव्हता नेहमीच मी कमी बोलायचो गप्पा,भांडण,उपदेश मोजक्या शब्दांत मांडायचो नियम लागू व्हायच्या थोडं आधी मला भलताच नाद लागला एका गोग्गोड बडबड्या पोरीवर नकळंत जीव जडला व्हॅलेंटाईन डे च्या दिवशी तिला प्रपोज करायचं ठरवलं शंभर शब्द काय बोलायचे गणित मांडायला घेतलं "हॅपी व्हॅलेंटाईन डे" ऐवजी "हॅपी व्हॅलेंटाईन" पण चालून जाईल "माझं तुझ्यावर प्रेम आहे" पेक्षा "आय लव्ह यू" त कमी शब्दहानी होईल "तुझं हसणं, रुसणं, सत्तत बडबडणं मला आव

तुझ्या अंतरीची (चारोळी)

लेखक पराग देशमुख यांनी सोमवार, 06/02/2017 15:44 या दिवशी प्रकाशित केले.
तुझ्या अंतरीची, मला जाण आहे; जरी गीत माझे, तुला ताण आहे. जरी ना निथळली, कधी कांत माझी; तुझे पावसाळे, मला रोष आहे. ..............................................मुकुंद

रंगपंचमी

लेखक पराग देशमुख यांनी बुधवार, 01/02/2017 19:01 या दिवशी प्रकाशित केले.
रंग मनाचा,रंग क्षणाचा, क्षणाक्षणाला विरघळणारा. क्षणात हसरा,क्षणात हळवा, डाव्या गाली ओघळणारा. पुसता अश्रू आवेगाने, रंग काजळी विस्कटणारा. अंमळ उसासे स्फुंदत असता, रंग बोचरा गहिवरणारा. मित्रांची ती चौकट जमता, रंग खुशीचा खळखळणारा. कातरवेळी काहुरणारा, पिंग गुलाबी रंग बावरा. रंग कोणता शौर्येन्द्राचा, निधड्या छाती वार झेलता? रंग कांतीचा गौर वेगळा, चाहुलीसरशी थरथरणारा. अवखळ,चंचल,शुद्ध-कांचनी

म्हणून हा पाऊस मला आवडत नाही.....

लेखक पराग देशमुख यांनी शुक्रवार, 27/01/2017 19:26 या दिवशी प्रकाशित केले.
अजून एक काव्यकथा घेऊन आलोय, अजून एक हृदयव्यथा घेऊन आलोय. वेदना जुनीच..., पावसामुळे पुन्हा फुललेली, कॉफीच्या वादळासह, पुन्हा मनात सललेली. अंगणभर पसरलेला पाऊस, कुंपणाशी गुंतलेला गारवा, उंच भिंतीच्या आडोशाला, गारठलेला पारवा | गारठलेला मी, अन् थिजलेल्या स्मृती, जुन्या जखमा पालवण्याच्या, पावसाच्या या जुन्याच रिती || म्हणून हा पाऊस मला आवडत नाही..... रेडिओवर लागलेला मल्हार, नि स्वयंपाकघरातील खमंग वास ऊबदार शालीत लपेटलेला मी, पण आठवणींच्या हुद्क्यांनी विखुरलेला श्वास | निरवलेले डोळे, अन् मनात पावसाच्या सरींचे मंथन भिजण्याच्या भीतीने धावणारी पावले, अन् हळूच किणकिणणारी पैंजण|| त्या दिवशी सार आभा

शतजन्म शोधिताना.....

लेखक पराग देशमुख यांनी मंगळवार, 24/01/2017 17:07 या दिवशी प्रकाशित केले.
ठरवून मुलुख सारा,भिजवून परतलो मी कळ आतल्या जीवाची,चेतवून परतलो मी | अतृप्त आर्त वारा,त्रासून प्राशिला मी मर्जी नसे मनाची,भिजवून चाललो मी || बेरंग या जगाला, रंगून टाकताना रुधीरार्त आर्त माझे हलकेच सांडताना | तुज रंग रंजीताचा,रक्तरंज हा दिसेना मनी माझिया सखी हे,काहूर हासवेना || न्हावून घे बरे तू ,आसुसल्या सुखाने दुखवू कसा पुन्हा मी बोलू कुण्या मुखाने? कोंडून दुःख सारे,विस्फोट आज व्हावे हे देह संचिताचे,भेदून लखलखावे || येशील का जगी तू,बनुनी पुन्हा धरा ती मी मूक (कि मुक्त )मेघ नभीचा,बरसेल बेहीसाबी | सोसून वेड सारे,रुजूदे पुन्हा मलाही समजू नकोस काटा,मी पुष्प ते गुलाबी || रुजुनि तुझ्या ऊराश