Skip to main content

शतजन्म शोधिताना.....

लेखक पराग देशमुख यांनी मंगळवार, 24/01/2017 या दिवशी प्रकाशित केले.
ठरवून मुलुख सारा,भिजवून परतलो मी कळ आतल्या जीवाची,चेतवून परतलो मी | अतृप्त आर्त वारा,त्रासून प्राशिला मी मर्जी नसे मनाची,भिजवून चाललो मी || बेरंग या जगाला, रंगून टाकताना रुधीरार्त आर्त माझे हलकेच सांडताना | तुज रंग रंजीताचा,रक्तरंज हा दिसेना मनी माझिया सखी हे,काहूर हासवेना || न्हावून घे बरे तू ,आसुसल्या सुखाने दुखवू कसा पुन्हा मी बोलू कुण्या मुखाने? कोंडून दुःख सारे,विस्फोट आज व्हावे हे देह संचिताचे,भेदून लखलखावे || येशील का जगी तू,बनुनी पुन्हा धरा ती मी मूक (कि मुक्त )मेघ नभीचा,बरसेल बेहीसाबी | सोसून वेड सारे,रुजूदे पुन्हा मलाही समजू नकोस काटा,मी पुष्प ते गुलाबी || रुजुनि तुझ्या ऊराशी,इकवार जन्म घ्यावा हर याक्ष-प्रश्निकाला,जगुनी जवाब द्यावा | ते मूक प्रेम माझे,स्पर्शून सांगताना देईन साथ तुजला,शतजन्म शोधिताना.... || व्यथा कधी न कळली हि कथा असे कोणाची? "नभ-आर्त धरित्रीची" वा "प्रेम-प्रेमिकांची" | मज पामरे बळेची इतुकेच फक्त झाले ते दिव्य प्रेम त्यांचे, मी शब्दबद्ध केले || -मुकुंद.

वाचने 3129
प्रतिक्रिया 12

प्रतिक्रिया

धन्यवाद...!!! आत्मबंध,कवि मानव, पैसा आणि हतोळकरांचा प्रसाद...धन्यवाद कवितेचं शीर्षक एका महाकवीच्या लिखाणातून उसण घेतलेलं आहे त्यामुळे कोणाला आवडेल कि नाही अशी धाकधूक होती आता हायस वाटतंय.

छानच आहे!!

मदनबाण, शार्दुल_हातोळकर, यशोधरा प्रतिक्रियांसाठी आभार

आवडेशच... (माफ करा पण जरा लांबल्यासारखी वाटली.) पुलेशु !