मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

शब्दक्रीडा

(चंम्मतग)

ज्ञानोबाचे पैजार ·
पेरणा हायवे वरच्या वाटेवरचे वळण द्यायचे हाक "लोक काय म्हणतील कृत्रीम बंधन सत्वर तोडुनी टाक !" बायको नामक भूत बाटलीस कायम भिववीत होते त्या भीतीने तरल काहिसे ग्लासातून निसटत होते गोळा करूनी धैर्य, ठरविले, नको गाय छाप मळलेली वाट खोकुनी माझी लावीते, वीडी कोंदटलेली, जेडी, शिवास, टिचर्स, यांच्यात अवघडून बसलेली ओल्ड माँक ती ग्लासामध्ये, विमुक्त होता निर्मळ हसली त्या हसण्याचा खळाळ ध्वनि मज सांगुनी गेला काही, "कितीही प्या, पण ध्यानी ठेवा..चखण्याविण "गंमत" नाही !" भूछत्री

ही कविता फॉरवर्ड करा

vcdatrange ·
ही कविता फॉरवर्ड करा ही कविता फॉरवर्ड करा, नाही तर पाप येईल रात्री झोपल्यानंतर, तुमच्या घरात साप येईल पाच जणांना फॉरवर्ड करा, हरवलेली वस्तु सापडेल नाही केली तर, भुत तुमच्या कानाखाली झापडेल दहा जणांना फॉरवर्ड करा, सोन्याचा हार मिळेल नाही केली तर, पाठीवर मार बेसूमार मिळेल पंचवीस जणांना फॉरवर्ड करा, स्टॉक मार्केट चढेल, नाही केली तर कावळ्याचं शिट डोक्यावर पडेल पन्नास जणांना फॉरवर्ड करा, नोकरीत प्रमोशन होईल नाही केली तर, सकाळ संध्याकाळ लूज मोशन होईल शंभर जणांना फॉरवर्ड करा, लॉटरी मिळून जाईल नाही केली तर, बायको तिच्या मित्राबरोबर पळून जाईल

कथुकल्या १४ ( अंतिम भाग )

अॅस्ट्रोनाट विनय ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
१ .गडदघटनांचे लिखित, छापील अवशेष 1

2

3

4

(why is there nothing rather than something ???????)

मुक्त विहारि ·
लेखनविषय:
डिस्क्लेमर : सध्या आम्हाला फावला वेळ भरपूर असल्याने आणि ...... आणि....... आणि......... आणि........हा लेख टाकला आहे.आमच्या लेखात कुठलेही वैचारिक धन नसल्याने, विचारवंतांनी ह्या धाग्याकडे दुर्लक्ष करावे, टवाळांनी, टवाळांसाठी काढलेला हा टवाळ धागा आहे.

कथुकल्या १३

अॅस्ट्रोनाट विनय ·
लेखनविषय:
१. गोष्ट “पप्पा सांगा न लवकर गोष्ट.” “ कुठली सांगू बरं… न्यूट्रोफायटा आणि लेडी अॅस्ट्रोनटची ?” “नको ती बोअर आहे.” “मग गुरुवरच्या चेटकीणीची ?” “ती सांगितलीये तुम्ही चारपाच वेळा.” “बोलकी निळी झाडं, जादुई रोबो, टेट्रोग्लॅमसचं सोनेरी अंडं ?” “सगळ्या सांगितल्यात ओ पप्पा. एखादी नवीन सांगा न.” नेफीसने थोडावेळ डोकं खाजवलं. “ठिकेय एक नवीन गोष्ट सांगतो. पृथ्वीवरच्या माणसांची.” “चालेल.” शेनॉय गोष्ट ऐकायला सावरून बसला. “खूप खूप वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. ðζ सूर्यमालेत पृथ्वी नावाचा एक ग्रह होता.

कथुकल्या १२ अद्भुतिका ( फॅण्टसी ) विशेष

अॅस्ट्रोनाट विनय ·
लेखनप्रकार
१. आयला ऑफिसला जाण्याआधी कश मारावा या हेतूपोटी नागेशने सिगारेट बाहेर काढली. पण लायटर पेटवताच त्यातून हिरवट रंगाचा चमकदार धूर बाहेर पडला. थोड्याच वेळात धुराचा छोटासा ढग तरंगू लागला अन ढगातून जिन प्रकट झाला. “हॅपी न्यू इयर मेरे आका. बोलीये क्या हुक्म है “ नागेश आश्चर्याने पाहू लागला “तू जिन आहेस ?!!” “हो हुजूर.” नागेशने स्वतःला एक चिमटा घेतला. “हे स्वप्न नाहीये मालिक.” “पण तू लायटरमधे कसाकाय ? जिन तर जादूच्या दिव्यात सापडतो ना” “बरोबर. तो मोठा जिन… बड़े भाईजान. मी छोटा जिन.” “आयला असंही असतं का ?” “जी हाँ.” “तू माझ्या इच्छा पूर्ण करशील न पण ?” “बेशक.

कथुकल्या ११

अॅस्ट्रोनाट विनय ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
१. तुझ्याविना… निखिलने डोळे उघडले अन टेबलावरच्या घड्याळात पाहिलं. आज उठायला तब्बल एक तास उशीर झाला होता. त्याने पटापट आवरलं अन ड्रेस बदलून तयार झाला. कॉलरवरच्या हिरवट डागाकडे पाहून तो जरा नाराज झाला पण एका आर्ट टीचरसाठी हे नेहमीचच होतं. जाताजाता त्याने प्रियाकडे वळून पाहिलं. ती त्याच्याकडे तोंड करून झोपली होती. लांबसडक सोनेरी केसांनी मुखचंद्रमा अर्धवट झाकला होता. डोळे मिटलेला तिचा सुंदर चेहरा शांत, प्रसन्न दिसत होता. “सॉरी डियर.

कथुकल्या १०

अॅस्ट्रोनाट विनय ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
१. अपघात रात्रीचे अकरा वाजले होते. अशोक पानसे त्याच्या अंधाऱ्या बेडरुममध्ये बसलेला. झोपणे तर दूर, गेल्या एक तासापासून तो जागचा हललाही नव्हता. तो अॅक्सीडंट राहून राहून त्याच्या नजरेसमोर येत होता. सिग्नलचा दिवा लाल झाला पण तो घाईगडबडीत होता, दिव्याकडे लक्ष न देता त्याने गाडी सुसाट पुढे पळवली. त्याच्या उजव्या बाजूचा सिग्नल केशरी झाला. पुढच्याच क्षणाला वाहनांचा लोंढा अन त्याच्या अग्रभागी असलेला बाईकवाला वेगात समोर आला. ब्रेक दाबायचं कुणालाच जमलं नाही. धडक बसली अन बाईकवाला दूरवर फेकला गेला. हॉर्न वाजत होते, लोक ओरडत होते.पण अशोकची दृष्टी बधिर झाली होती.

कथुकल्या ९ [ बोलीभाषा विशेष ]

अॅस्ट्रोनाट विनय ·
लेखनप्रकार
( शंभर ते दोनशे शब्द लांबीच्या ह्या कथुकल्या आहेत. बोलींचा क्रम पश्चिमेकडून पूर्वेकडे ) --------------------------------------------- १. अमावशेची रात ( मालवणी ) “मजा आली का नाही.” “हाव गड्या. थयसून निघायचं मनच होत नव्हतं बघ. पोटभर जेवलो आज.” “आता चालायचाबी वेग वाढव. सकाळ होईलोक ठिकाण्यावर पोहचायचय.” “बरं बरं.” “सध्या आपण कुठपर्यंत पोहचलो?” “हडळीच्या माळावर” “एवढं अंतर कसं निघून गेलं समजूकच नाय.” “मका आठवतो तो रात. आजच्यासारखीच अमावशा होती. मी एकटा चाललो होतो इथून.

कथुकल्या ८

अॅस्ट्रोनाट विनय ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
१. शेवटची इच्छा "तात्या, पाणी तर वाढतच चाललंय. आता काय करायचं ?" "चिंता करू नको. निलगिरीचं ते उंचच उंच झाड दिसतंय ना, त्यावर जाऊयात." झाडाच्या फांद्यांनी अलगद तोललेल्या आपल्या लाकडी घरातून त्या तिघांनी आवश्यक तेवढं सामान गोळा केलं. फळे, कंदमुळे, आजूबाजूच्या पाण्याने वाहून आणलेल्या मृत मासोळ्या थैल्यांमध्ये भरल्या. बाहेर गेल्या दहा दिवसांपासून पावसाचा कहर माजला होता, विजा आकाशीचा नगारा बडवत गर्जत होत्या, सोसाट्याच्या वाऱ्याने लहानमोठ्या झाडांना तर केव्हाच उपटून फेकून दिलं होतं.