मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

रेखाटन

निशाण

म्हसोबा ·
लेखनविषय:
तू मला हसायला शिकवलंस कधी धड रडलोही नव्हतो त्या आधी मी तू मला उभं राहायला शिकवलंस कधी धड पडलोही नव्हतो त्या आधी मी आठवांचा पूर येतो कधी या एव्हढ्याशा दोन डोळ्यात माझ्या कधी वाटते लोटली युगे आता कधी वाटतात त्याच आठवणी ताज्या तुझा हात सुटला तो क्षण कोरला आहे मनावर लेण्यातील शिलालेखासारखा त्याचीही पडझड होईल कधीतरी याच आशेवर जगतोय आता मी चातकासारखा मिटून जातील मग निशाण सारे तू तर नाहीसच आता इथे, मी ही नसेन तेव्हा काय होईल याची आता क्षिती कशाला काळ आपल्या फटकार्‍याने सारे मिटेन हे जेव्हा

< < < < मजबूरी हय > > > >

चांदणे संदीप ·
मिकादा, पैजारबुवा, अभ्यादादा आऊर रातराणीतै के पिच्चे पिच्चे मै भी कस्काय चल पड्या कायच म्हैती नाही. पन मेरा भी जळके करपा मस्सालाभात हुवा इस्लीये मयनेभी हिन्दिक्की चिंदी करनेका ठाणच डाल्या. मंग काय...एक आय अपने पोरट्याको कयसे धोपातटी हय वैच्च चित्र कविता मे उतारके इद्दर डालरा हू!

डॉ.कुमार विश्वास..

अनिरुद्ध प्रभू ·
लेखनविषय:
कोई दिवाना केहता है, कोई पागल समजता है, पर इस धरति कि बैचैनी तो बस बादल समजता है मैन तुमसे दुर कैसा हुँ तु मुझसे दुर कैसी है, ये तेरा दिल समजता है या मेरा दिल समजता है. हळुहळू मुक्तक पुढे सरकत जातं आणि आपल्याला कुमार विश्वास या नावाची, त्यांच्या शब्दांची नशा चढु लागते. संपूर्ण माहोल बदलून जातो, नजर पोह्चते तिथपर्यंत जमलेली गर्दी, त्यांच्या टाळ्या-शिट्ट्या, मधेच हास्याचा फवारा आणि या सगळ्यात मनाला भिडणारी डॉक्टरांची शायरी.....काही काळासाठी एक वेगळीच दुनिया निर्माण होते. मग आपल्या समोर पुढचं मुक्तक डॉ.

मी अश्व!!

चांदणे संदीप ·
'शक्तिमान'ला ही माझी काव्यांजली समर्पित! वेग अफाट शक्ती अचाट अंगी डौल मोल अमोल निष्ठा घोर इतिहास थोर करारी बाणा सखा महाराणा बनता दळ सैन्या बळ आजीचे कथन पऱ्यांचे वाहन नीज गहाण वया परिमाण लौकिकी मती प्राणी जगती अडीच पावली चौसष्ठ आलयी पौरुष नामांकन दिव्य आभूषण मिळता सात तिमिरा मात ऋणी विश्व मी अश्व!! - संदीप चांदणे

एका उत्तुंग व्यक्तिमत्त्वाच्या महामानवाला कोटी कोटी प्रणाम

शान्तिप्रिय ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
१४ एप्रिल. डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची १२५ वी जयंती. या महामानवास कोटी कोटी प्रणाम आणि विनम्र अभिवादन. कर्मठ हिंदु समाजातील काही अतिकर्मठ लोक माणसा माणसांत भेद्भाव करुन रानटी पणे वागत असताना या जनतेला त्यांचे हक्क मिळवून देण्यासाठी बाबासाहेबांनी जीवाचे रान केले. त्यांच्या प्रयत्नामुळे महाड चे चवदार तळे सर्वांना खुले झाले. जिथे तिथे अस्प्रुश्यतेची माणुसकीहीन परंपरा चालू असताना त्यांनी तिथे तिथे एल्गार पुकारला. याशिवाय भारतीय राज्यघट्ना तयार करण्या साठी त्यांनी अविश्रांत परिश्रम घेतले. त्या दिवसांत ते दिवसांतून १८ तास काम करीत.

शब्दांच्या, रानातल्या गप्पा!

चांदणे संदीप ·
"दादा, तुमची ही कविता जरा समजून सांगाल का. म्हणजे, हे निसर्गचित्रण आहे का यात काही रूपकात्मक शृंगार दडला आहे जो मला नेमका दिसत नाहीये." आणि मग त्यांनी पुढे जे काही त्या कवितेतल्या चित्रणाबद्दल सांगीतले ते ऐकून/समजून माझ्या लक्षात आले की, आपण अजून कविता बुद्रूकलाही जाऊन पोचलो नाहिये, कविता खुर्द हे गाव तर लांबच! कविता होती, "जाळीवरती वाळत लुगडे, उभा हसे जरतारी काठ...." आणि कवि अर्थातच, महाराष्ट्राचे 'शेतकवी', कवि ना. धो. महानोर! रविवार दि. १०/४/२०१६ रोजी त्यांच्या राहत्या घरी म्हणजे अजिंठ्याच्या जवळ पळसखेड्याला त्यांना भेटायचा सुवर्णयोग आला होता. भेटतील का नाही? भेटतील तर कुठे? कसे?

घोस्टहंटर - पायरेट ऑफ़ अरेबिया ४

DEADPOOL ·
वाचकहो घोस्टहंटरला झालेल्या अक्षम्य दिरंगाईबद्दल मी माफी मागतो. भ्रमणध्वनि वर टंकण करत असल्याने मालिकेस उशीर झाला. पुढील भाग लवकर येतील याची खात्री बाळगावी! १. तर मंडळी रोला अजूनही समजत नव्हते की पायरेटचा अंत कसा करावा, कारण पायरेट कोणत्याही शस्त्र अथवा अस्त्र याने घायाळ होत नव्हता. शैतानाच्या दूताकडून त्याला ही जहाज मिळाली होती.त्या जहाजाच्या प्रत्येक भागावर त्याची हुकुमत चालू होती. जहाजाची प्रत्येक दोरी म्हणजे एक साप होतात. असे अनेक प्रकारचे साप तिथे होते. रो कंटाळून त्याच्या ऑफीसमध्ये बसला होता.

ताम्हणकर

हकु ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
आज अनेक वर्षं झाली मी आमच्या आळीतल्या गणेशोत्सवात उत्साहाने कार्यरत आहे. जसं वर्षं नवीन तशी सजावट नवीन, मूर्ती नवीन आणि संकल्पना सुद्धा नवीन. पण तसं बघायला गेलो तर दर वर्षीच्या या गणेशोत्सवाची कथा, पटकथा, पात्रे आणि अगदी संवाद सुद्धा जसेच्या तसे असतात. जरी वर्ष नवीन असलं तरी जणू काही आपण मागेच पाहिलेल्या एखाद्या चित्रपटाचे 'रिपीट टेलिकास्ट' पाहतोय असा भास व्हावा. नाही म्हणायला दर वर्षी 'बावा', 'शिरी', 'वाचव' अश्या निरर्थक शब्दांची भर पडत असते इतकेच. मात्र या चित्रपटाची नेहमीची सर्व पात्रं उल्लेखनीय आणि वैशिष्ट्यपूर्ण.

कमा आणि कमळू

हकु ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
अनेक दिवसांपासून बाळगून ठेवलेली उत्सुकता दिनांक १८ फेब्रुवारी २०१६ ला रात्री शिगेला पोहोचली होती. सर्वांनीच उराशी जपून ठेवलेलं एक स्वप्न पूर्ण होण्याच्या मार्गावर होतं. आम्ही साक्षात अलंग-मदन-कुलंग ट्रेक करायला जात होतो. अंगात उत्साह सळसळत होताच. अनेक दिवस (?) पूर्वीपासून एकमेकांना प्रोत्साहन देत शारीरिक तंदुरुस्ती टिकवून ठेवण्याचा सर्वांचा प्रयत्न झाला होता आणि त्या तंदुरुस्तीच्या, उत्साहाच्या आणि एकमेकांवर असलेल्या विश्वासाच्या आणि तितक्याच श्रद्धेच्या जोरावर आपण सर्व जण आपलं 'लक्ष्य' गाठणार हा विश्वास प्रत्येकाला वाटत होता. हा विश्वास नि:संशय रास्त होताच.

एका विधवेच नव-याला पत्र

धुरंधर ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
आमच्या सरांनी FB टाकलेलं हेे पत्र.... एका विधवेचे नवऱ्याला पत्र. प्रिय ----- काल तुझा अकाली मृत्यू झाला. वय 41 फक्त. म्हणजे आयुष्यात स्थिरस्थावर होऊन आनंद उपभोगण्याचे , मुलांबरोबर फिरण्याचे, खेळण्याचे ,बायकोबरोबर गप्पगोष्टी, थट्टामस्करी करण्याचे वय. परंतु त्या सुखाला तू मुकालासच पण या आनंदाला तुझी बायको मुलंही पारखी झाली. काय कारण होतं या सगळ्याचं? तू खोट्या आनंदात रममाण झाला होतास. त्यामुळे खऱ्या आनंदाला तू मुकतो आहेस याचे तुला भानच राहिले नाही. लग्न झाल्यापासून पाहतेय, तू कायम मित्रांच्याच गराड्यात cheers करत असायचास.