मी अश्व!!
काव्यरस
'शक्तिमान'ला ही माझी काव्यांजली समर्पित!
वेग अफाट
शक्ती अचाट
अंगी डौल
मोल अमोल
निष्ठा घोर
इतिहास थोर
करारी बाणा
सखा महाराणा
बनता दळ
सैन्या बळ
आजीचे कथन
पऱ्यांचे वाहन
नीज गहाण
वया परिमाण
लौकिकी मती
प्राणी जगती
अडीच पावली
चौसष्ठ आलयी
पौरुष नामांकन
दिव्य आभूषण
मिळता सात
तिमिरा मात
ऋणी विश्व
मी अश्व!!
- संदीप चांदणे
वाचने
3780
वाचनखूण
प्रतिक्रिया
9
अशोककुमारच्या "रेल गाडी" ची चाल छान बसतेय!
सुंदर काव्य. आवडले!
छान प्रयोग. आवडला.
>
काव्यान्जली असली की भावाना महत्वाची ठरते. ती पोहोचली.
शेवट खास आवडला. :)
काहीही हां चांसं =))))
कच्चा माल :)
सन्दीप जी.. खूप मस्त कविता.. आवड्ली
चौथीत असताना केली होती का हि कविता!!!
रेल गाडी