Skip to main content

रेखाटन

मोनालिसाच्या गूढ स्मिताची विलक्षण रहस्यकथा (भाग २)

लेखक चित्रगुप्त यांनी शुक्रवार, 26/01/2018 16:06 या दिवशी प्रकाशित केले.
यापूर्वीचे कथानक (मोनालिसाच्या गूढ स्मिताची विलक्षण रहस्यकथा भाग १): https://www.misalpav.com/node/41194 पॅरिस मध्ये ‘मोनालिसा’ चे चित्र बघताना मला ती तिथून सोडवण्याची विनंती करत असल्याचा भास झाला.

( काल रातीला सपान पडलं )

लेखक गबाळ्या यांनी सोमवार, 11/12/2017 09:44 या दिवशी प्रकाशित केले.
हा ।। गुरु महिमा ।। चाच पुढील विस्तार आहे. ( बऱ्याच जणांच्या म्हणण्यानुसार विडंबन हि स्वतंत्र कविता आहे व ते स्वतंत्र धाग्यावर असावे म्हणून हा स्वतंत्र धागा. ) गेल्या काही दिवसांत मी काही कवींचे व त्यांच्या कवितांचे विडंबन केले. खरे तर एखाद्या कवीचे काव्य दुसऱ्या कोणाला नवनिर्मितीसाठी / विडंबनसाठी प्रोत्साहित करत असेल तर त्याचे श्रेय मूळ कविलाच जाते. त्यामुळे मूळ कवीचे श्रेष्ठत्व आणखीनच वाढते. मूळ कवीने विडंबन हे त्यांच्या कवितेचा अनादर आहे असे मुळीच समजू नये.

गाज २

लेखक अबोली२१५ यांनी गुरुवार, 16/11/2017 18:00 या दिवशी प्रकाशित केले.
गाज१ http://www.misalpav.com/node/41462 विश्वा आता हाताशी आला हाय. आता त्याच लगीन करून दिल पाहिजे. म्हणजी तो वाया जाणार नाय, आजकाल काही चांगल्या लोकांशी संगत नाय हाय. तो आजकाल अण्णा मलबऱ्याशी संग करतु. विश्वला फकस्त त्याच्या अंगावरच दागिनं आणि त्याचा पैका दिसतु. त्यो अण्णा कुठं कुठं फिरत असतोय. कधी तालुका, कधी मुंबई, कधी मद्रास भिंगरीचं अस्तेय त्याच्या पायाला. एक दोन वेळा पोलीस पण आल्ती होती त्यांचा घरला. गंणप्याची विचारांची लडी तात्यांच्या हाळीने तुटली "काय र ! कधी पासून हाका देतुया पण, लक्ष कुठं हाय तुज" "आर !

गाज

लेखक अबोली२१५ यांनी सोमवार, 13/11/2017 19:36 या दिवशी प्रकाशित केले.
श्रीवर्धन तालुक्याच्या कुशीत रममाण छोटे खाणी दिवेआगर.दिवेआगर म्हणजे सृष्टीला पडलेलं स्वप्न... नारळ पोफळीच्या बागांनी नटलेल निसर्गान पुष्कळ दान केलं. जसे श्रीवर्धनला अतिप्राचीन आणि ऐतिहासिक परंपरा लाभलेलं आहे त्याचप्रमाणे दिवेआगर हि अतिप्राचीन गावांपैकी एक ठरत असून देवविद्या पारंगत घैसास, देवल, मावलभट आदी ब्राम्हणाची वस्ती होती. समुद्रमार्गानी येणाऱ्या अरब चाच्यांनी या गावाला वेळोवेळी लुटलं. पण, भट आणि बापट या दोघा भावंडानी सिद्धीच्या परवानगीने याचा कायापालट केला.

काय हवंय?

लेखक अमलताश_ यांनी मंगळवार, 18/07/2017 18:03 या दिवशी प्रकाशित केले.
एका मैत्रिणीची २५ अपेक्षांची चेकलिस्ट होती. लग्न झाल्यावर म्हणाली कि " हि इज एन आन्सर टू माय प्रेयर्स" . मजाच वाटली मला. म्हणजे यार माझी काही चेकलिस्ट च नाहीये ना ! आयुष्यात चांगला घडावं एवढी अपेक्षा आहे. नेहमी चांगलंच घडणार नाही हेही माहित आहे. पण त्या भविष्याच्या "सरप्राईज एलिमेंट" मध्ये एक थ्रिल वाटतं. म्हणूनच ज्योतिष वगैरे मध्ये कधी रस वाटला नाही. माणसाचं असणं हे भावनेशी जुळलेलं आहे. म्हणून दुःख सुद्धा आपण माणूस असण्याचा भाग आहे. खरं तर प्रेमात पुन्हा पुन्हा पडून दुःख करायची नशा अनुभवलेल्या माणसाला दुःख म्हणजे पुन्हा प्रेमात पडायचं निमित्त वाटतं असतं. मग नेमकं काय हवं असतं?

(why is there nothing rather than something ???????)

लेखक मुक्त विहारि यांनी शुक्रवार, 30/06/2017 12:28 या दिवशी प्रकाशित केले.
डिस्क्लेमर : सध्या आम्हाला फावला वेळ भरपूर असल्याने आणि ...... आणि....... आणि......... आणि........हा लेख टाकला आहे.आमच्या लेखात कुठलेही वैचारिक धन नसल्याने, विचारवंतांनी ह्या धाग्याकडे दुर्लक्ष करावे, टवाळांनी, टवाळांसाठी काढलेला हा टवाळ धागा आहे.

पाऊसवेड

लेखक अमलताश_ यांनी मंगळवार, 30/05/2017 12:45 या दिवशी प्रकाशित केले.
पाऊसवेड म्हणजे मज्जा असते. हे म्हणजे त्या गुलाबी का कसल्या थंडीसारखं नाही हं... काय तर, बाहेर जग धुक्याच्या रजईत आणि आपण आत लोकरीच्या! पावसात खिडक्या उघडून ओली चिंब थंडी आत घ्यायची. चेहऱ्यावर ओला वारा झेलत बाहेरची गम्मत बघायची. बाहेर झाडं, घरं, रस्ते, गाड्या, सगळ्यावर पाणीच पाणी. आणि पाऊस ना, त्या सगळ्यांच्या कडा विरघळल्या सारख्या पुसट करून टाकतो. नीट नेटकं असं राहत नाही काही. आपला आकार विसरून गेल्यासारखी पानं, चिमण्या, झाडं, सगळेच! थरथरणारे. खिडकीवरच्या थेंबात उलटे दिसणारे. एकमेकात मिसळून जातायत कि काय असं वाटतं एक क्षण. पावसाचं हे कडा आणि टोकं विरघळून टाकणं आवडतं मला.

गजावरील राणी

लेखक हृषिकेश पांडकर यांनी मंगळवार, 11/04/2017 13:35 या दिवशी प्रकाशित केले.
परवाच्या दुपारी टळटळीत उन्हात 'पित्तशामक नीरा' घशाखाली सारत असताना किलकिल्या डोळ्यांनी या वाड्याला न्याहळत असताना हे दृश्य दिसले.एप्रिल महिन्याचा दिवस असूनही टांगलेला आकाशकंदील येथे साजऱ्या होणाऱ्या वार्षिक दीपावलीच्या साक्ष देत होता.त्या खाली नजर टाकली आणि आश्चर्य वाटले. पुण्यातील सगळ्यात जुनी पेठ म्हणून आपण जिचे वर्णन वाचतो ती हि कसबा पेठ.पुणेरी खोचकपणा,टोपी,कोट धोतर आणि अनुनासिक आवाज,तिरकसपणा,ओतप्रोत भरलेला उपहास,पुणेरी पगडी आणि टांगा या गोष्टींचे उगम स्थान आणि पर्यायाने केंद्रबिंदू.छत्रपती वास्तव्यास येऊन गेले,पेशवे सरले,टिळक,गोखले,आगरकर वावरले,त्याबरोबर गोरा साहेबाची इथून

प्रमोशन

लेखक किसन शिंदे यांनी गुरुवार, 23/03/2017 17:11 या दिवशी प्रकाशित केले.
माॅर्निंग ब्रेकची वेळ. ब्रेकफास्ट काऊंटरवर मार्निंग शिफ्टच्या एम्प्लाॅईजची तुरळक गर्दी होती. बेनमेरीमधल्या स्टीलच्या ट्रेमधून अनेक पदार्थांचा संमिश्र असा वास दरवळत होता, पण त्यातूनही रस्समचा वास ब-यापैकी नाकाला ठसका देत होता. मधूनच बाजूला टांगलेल्या निळ्या रंगाच्या फ्लाय किलरमध्ये माश्या चिकटल्याबरोबरचा 'चट..चट' आवाज काही नवख्या एम्प्लाॅईजचे लक्ष वेधत होता. लॉगईन करून दोन चार कामाचे मेल चेक केल्यानंतर रोहन आणि मिंजल कॅन्टीनमध्ये ब्रेकफास्टसाठी आले होते.

अंगारा - भाग २ (अंतिम भाग)

लेखक शब्दानुज यांनी मंगळवार, 21/03/2017 00:51 या दिवशी प्रकाशित केले.
अंगारा - भाग १ http://www.misalpav.com/node/38784 अंगारा - भाग २ (अंतिम भाग) मी त्याच्याकडे पहातच राहिलो. आधी आमची भेट होण्याचा काही संबंधच नव्हता. तरीही त्याच्या पाणीदार डोळ्यातील नजर मला आश्वासक वाटली. डोक्यावरचे ब-यापैकी केस पिकलेले.अंगात भगवे कपडे. खांद्यावर एक शबनमची पिशवी लटकत होती. खांद्यावरुन सारख्या घसरणा-या पिशवीला सांभाळत तो घोग-या आवाजात बोलू लागला. "म्या निलकंठेश्वर. ह्यो लोकांचा तू मला डाक्टर म्हणू शकतो.