मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

नाणेपुराण

देवदत्त ·

In reply to by स्वाती दिनेश

गणपा 12/05/2008 - 00:15
१० रुपयाचे नाणे माझ्या संग्रही आहे. पण सध्या ते भारतात आहे नाहितर फोटो काढुन इथे टाकला असता. --गणपा.

रामदास 11/05/2008 - 17:20
नाण्याच्या नादाचा आणि चारीत्र्याचा संबंध जुना आहे. आपलं नाणं खणखणीत असल्याचा दावा सगळेचं करतात. १० रुपयाचे ते नाणे आहे माझ्याकडे. मुंबईला पी. एम. रोड वर रिजर्व बॅंकेचे नाणे संग्रहालय पाहण्यासारखे आहे.

In reply to by रामदास

देवदत्त 11/05/2008 - 17:58
आपलं नाणं खणखणीत असल्याचा दावा सगळेचं करतात. असली वाक्ये ही आठवली नव्हती हो. नाहीतर आणखी मजा आली असती मला लिहायला. धन्यवाद. ह्यावरूनच खोटा सिक्का हा शब्द प्रयोग, प्रत्येक नाण्याच्या दोन बाजू असतात हा वाक्प्रचारही आठवला. :) ते १० रुपयाचे नाणे कधीचे आहे हो? मुंबईला पी. एम. रोड वर रिजर्व बॅंकेचे नाणे संग्रहालय पाहण्यासारखे आहे. नक्की जाईन पहायला वेळ जमल्यास.

In reply to by प्रभाकर पेठकर

देवदत्त 11/05/2008 - 18:01
धन्यवाद.. आपल्या लेखाने खूप जुन्या-जुन्या आठवणी जाग्या झाल्या. पेठकर काका, तुमच्या अनुभवाच्या पोतडीतून काढा की त्या आठवणी. आम्हालाही मजा येईल वाचायला. :)

रामदास 11/05/2008 - 19:00
नाण्याचा आवाज त्यातल्या धातू मुळे असतो.सगळे धातू सोनोरस नसतात. जे असतात ते महाग असतात. उदा. कथील. त्यामुळे खोटी नाणी बनवणारे त्यात शिसे वापरतात. नाणे बद्द वाजते.गंमत म्हणजे आजही नाणे हातात घेउन केवळ वजनाच्या आधारावर खरे -खोटे सांगणारे मी पाहिलेत. बेल मेटल हा मिश्र धातू खणखणीत आवाजाचे एक उत्तम उदाहरण. मोनल दुसरे. हो मोनल हा मिश्र धातू आहे. आणखी माहिती साठी एकदा कपूर चे मेटालर्जी चे पुस्तक बघा. असो. लेखापेक्षा प्रतीक्रिया मोठी व्हायला नको.

शितल 11/05/2008 - 19:19
लेख छान जमला आहे. माझ्या मिस्टरा॑नाही नाणे जमविण्याचा छ्॑द आहे, माझ्याकडे एक रूपयाचे एक नाणे आहे त्यावर ज्ञानेश्वर माऊलीचे चित्र आहे.

राजे 11/05/2008 - 22:37
माझ्या कडे ही एक नाणे आहे तांब्याचे दोनशे वर्षापुर्वीचे आहे... मला कोठे मिळाले हे आठवत नाही आहे पण माझ्याकडे ते लहान पणापासूनच आहे. व चिल्लर जमा करण्याची सवय मला लहान पणापासूनच.. खुप उपयोगी पडते ही सवय... लहानपणी आम्ही मातीच्या गुल्लक मध्ये जमा करत होतो.. कधी आई कडून तर कधी बाबाच्याकडून.. जे मिळाले ते गुल्लक मध्ये जमा.. व दिवाळीच्या आदल्या दीवशी त्याचा नारळ करुन टाकायचा ;) राज जैन जेव्हा तुम्ही कर्म करण्यामध्ये कमी पडता तेव्हा नशीबाला दोष देता !

प्रियाली 12/05/2008 - 00:46
भारतात माझ्याकडे बर्‍याच देशांतील नाण्यांचा संग्रह होता. त्यात युरोप आणि आखातातील बरेचसे देश, नेपाळ, श्रीलंका, बांग्लादेश, पाकिस्तान, थायलंड, सिंगापूर, ऑस्ट्रेलिया, यूएसए, कॅनडा इ. इ. अनेक देशांची आणि भारतातील जुनी नाणीही जमवली होती. सध्या ती घरात कुठे आहेत की गेली त्याचा पत्ता नाही.
Head की Tails? आधी बरे होते, छापा की काटा ठरवण्याकरीता नाण्याची किंमत अर्थात आकडे लिहिले ते काटा व अशोकस्तंभाचे चिन्ह असलेला भाग म्हणजे छापा.
नाण्यांवर बरेचदा एखाद्या मोठ्या व्यक्तीचे चित्र असते. ती व्यक्ती बरेचदा देशाची, राज्याची प्रमुख किंवा नेता (हेड) असते. म्हणून नाण्याच्या या भागाला हेड्स म्हणतात तर विरूद्ध भागाला टेल्स म्हणायची पद्धत रूढ झाली. परंतु, हेड्सची ही पद्धत मूळची ग्रीकांची. ग्रीकांच्या नाण्यांवर त्यांच्या प्रमुखांचे चित्र छापलेले असे. ग्रीकांच्या (अलेक्झांडरच्या) स्वारी नंतर भारतातही हीच पद्धत रूढ झाली. असो, नाणेपुराणावर एक समग्र लेख लिहायचे बरेच दिवस मनात होते पण वेळ होत नाही हल्ली.

In reply to by प्रियाली

देवदत्त 12/05/2008 - 19:20
नाण्यांवर बरेचदा एखाद्या मोठ्या व्यक्तीचे चित्र असते. ती व्यक्ती बरेचदा देशाची, राज्याची प्रमुख किंवा नेता (हेड) असते. म्हणून नाण्याच्या या भागाला हेड्स म्हणतात तर विरूद्ध भागाला टेल्स म्हणायची पद्धत रूढ झाली. ह्या बाबतीत जास्त माहिती नव्हती. आणि खरं तर कधी शोधायचा प्रयत्न ही नाही केला.:( माहितीबद्दल धन्यवाद :)

ईश्वरी 12/05/2008 - 01:16
वेगळ्या विषयावरचा हा लेख आवडला. छान जमलंय नाणेपुराण. नाण्याच्या नादाचा आणि चारीत्र्याचा संबंध जुना आहे. आपलं नाणं खणखणीत असल्याचा दावा सगळेचं करतात. नाण्यासंदर्भात अजून एक वाक्प्रचार आठवला: एकाच नाण्याला दोन बाजू असतात. ईश्वरी

In reply to by ईश्वरी

विसोबा खेचर 13/05/2008 - 08:35
वेगळ्या विषयावरचा हा लेख आवडला. छान जमलंय नाणेपुराण. सहमत आहे.. दत्तराव, तुमचे नाणेपुराण आवडले. आता नोटापुराणही येऊ द्या! :) आपला, (पैशांचा लोभी) तात्या. अवांतर - याच लेखाला इतर काही संस्थळांवर मिळालेले प्रतिसाद पाहून मिपाच्या जिवंतपणाबद्दल अभिमान वाटतो! आपला, (निरिक्षक) तात्या.

In reply to by विसोबा खेचर

देवदत्त 13/05/2008 - 20:17
धन्यवाद तात्या.. नोटापुराणाचाही प्रयत्न करतो. अवांतर - याच लेखाला इतर काही संस्थळांवर मिळालेले प्रतिसाद पाहून मिपाच्या जिवंतपणाबद्दल अभिमान वाटतो! सहमत. मलाही छान वाटले.

चतुरंग 12/05/2008 - 05:14
माझे मूळ गाव नगर. तिथे एक ऐतिहासिक वस्तूसंग्रहालय आहे त्यात मी शिवराई बघितली आहे. मीही काही काही जुनी नाणी जमवली होती. अशीच सातवी आठवीत असताना जमवलेली. त्यात काही जुनी तांब्याची होती. एक (बहुधा रुप्याचे) पंचकोनी नाणे होते त्यावर पंचम जॉर्जचा मुखवटा होता बरंच जुनं होतं. त्यानंतर आपल्याकडचीच एक, दोन, पाच, दहा, वीस, पंचवीस, पन्नास पैसे अशीही नाणी होती. काही कॅनडियन आणि अमेरिकन नाणीही होती. जुना एक आणा होता. मला वाटतं ढब्बू पैसाही असावा. त्यानंतर कधीतरी तो नाद सुटला, त्याला छंदाचं स्वरुप मी देऊ शकलो नाही. सध्या माझ्या मुलासाठी मी नव्याने तो धागा पुन्हा सुरु करायच्या बेतात आहे. अमेरिकेच्या पन्नास संस्थानांच्या नावाची क्वार्टर्स (पंचवीस सेंट्स) ची नाणी आहेत. त्यापैकी ३६ संस्थानांची आम्ही जमवली आहेत उरलेल्याच्या शोधात आहोत. चतुरंग

ऋचा 12/05/2008 - 10:02
माझ्याकडे जुनी खुप नाणी आहेत. बाकीच्या देशांचीपण आहेत, हा लेख छान आहे आवडला,

आर्य 12/05/2008 - 10:48
वाचून मजा आली...................खरच काही आठवणींना ऊजाळा मिळाला घरी आल्यावर मी आजही खिशातील नाणी ऐक डब्यात टाकतो, वेळेवर उपयोगी पडातात. एक रुपयाच्या नाण्याला छिद्र पाडुन दोरा बांधायचा...............परत वर ओढून घ्यायचे - दाखवीन कधी तरी दाखवीन ते नाणं, आमच्या महाविद्यालयीन जीवनातील हि ऐक आठवण माझ्या ऐका मित्राने जपुन ठेवली आहे. आणि हो माझ्याकडे ही १० रू चे नाणे आहे. १ रु चे नाणे मिस कॉल द्यायलाही उपयोगी पडायचे त्याच बरोबर कॉल ही फुकट करता यायचा - पुण्यात कॉलेजच्या ग्रंथालया बाहेर ऐक कॉईन बॉक्स होता, आमच्या सुदैवाने (तो डबा गंडला होता) त्या वरुन ४/५ सेकंद फुकट बोलता यायचे, नाणे नंतर आत पडायचे. अशा तर्‍हेने ऊशीरा येणार्‍यांना सगळे जमल्याची वर्दी देत द्यायला उपयोगी पडायचा- SMS चा पण खर्च होऊ दिला नाही दुरसंचार निगमने आमचा. (त्या बद्दल पुन्हा ऐकदा धन्यवाद) (काही मि पाव कर दुरसंचार निगम मधे असल्याने त्या कॉईन बॉक्सचा पत्ता येथे नमुद केलेला नाही) आपला आर्य

मैत्र 12/05/2008 - 16:14
हे नाणे माझ्याकडे होते पण घर बदलताना कुठे तरी हरवले... परत कोणाकडे पाहिले नाही... इतक्या मोठ्या आकाराचे दुसरे नाणेही परत निघाले नाही.. साधारण १७-१८ वर्षांपुर्वी होते... दोन रु. च्या मोठ्या नाण्यापेक्षा सुमारे दुप्पट व्यासाचे आणि चांगले जड होते... दहा पैशांचे अतिशय छोटे स्टील चे नाणे छान होते... आणि त्या बरोबरचे गेंडा वाले २५ पैशांचे ही... ही नाणी नंतर बंद करण्यात आली...

मदनबाण 13/05/2008 - 01:41
मलाही नाणी जमवायचा छंद आहे...देशी आणि विदेशी. माझ्या कडे काही जुनी नाणी सुद्धा आहेत्,,,,अगदी कुठल्या नवाबापासुन ते जिवाजी राव सिंधीया असे लिहले असलेल्या नाण्यापर्यन्त..... १ पैश्या चे नाणे तर मला फार आवडते.....(भांगेमधे ते उगाळले की जबरदस्त चढते असे एकुन आहे.....) १० पैश्याचे मागे गेंडा असलेले नाणे सुद्धा मस्तच दिसते..... (संग्रहक) मदनबाण.....

In reply to by मदनबाण

देवदत्त 13/05/2008 - 20:23
१ पैश्या चे नाणे तर मला फार आवडते.....(भांगेमधे ते उगाळले की जबरदस्त चढते असे एकुन आहे.....) पैशाचा नशा म्हणतात ते हेच का? ;) १० पैश्याचे मागे गेंडा असलेले नाणे सुद्धा मस्तच दिसते १० च्या मागे? गेंडा २५ पैशाच्याच मागे पाहिला हो मी.

In reply to by देवदत्त

इनोबा म्हणे 13/05/2008 - 20:46
१० च्या मागे? गेंडा २५ पैशाच्याच मागे पाहिला हो मी. अरे,देवा! त्या गेंड्याला १० आणि २५ पैशातला फरक काय कळणार? तो गेला बिचारा पायजे तिथं. जाऊ दे! बाकी वेगळ्या विषयाचा हा लेख आपल्याला जाम आवडला. असेच वेगवेगळे विषय हाताळून मिपाला समृद्ध करत रहावे. कर्मण्ये वाधिकारस्ते | मां फलकेशू कदाचनं : कार्यकर्त्यांनी कर्म करीत रहावे,आपल्या नावाचे फलक लागतील अशी अपेक्षा करु नये. -इनोबा म्हणे -मराठमोळे वॉलपेपर

In reply to by देवदत्त

मदनबाण 14/05/2008 - 09:45
१० च्या मागे? गेंडा २५ पैशाच्याच मागे पाहिला हो मी. तुम्ही बरोबर आहात.....१० पैशाच्या नाण्या मागे गेंड्याचे चित्र नाही.

माझ्याकडेसुद्धा थोरल्या महाराजा॑च्या दोन शिवराया आहेत (प्रतापगडावर सापडलेल्या). तसेच माझ्या आजोबा॑नी मला पारत॑त्र्यातील भारताची काही चा॑दीची नाणी दिली आहेत (प॑चम जॉर्ज, सातवा एडवर्ड इ). त्या खजिन्यात एक निजामाचे नाणे आहे व एक ढब्बू पैसासुद्धा आहे. तशा शिवराया पुष्कळ सापडतात पण शिवाजी महाराजा॑चे सुवर्ण होन मात्र फारच दुर्मिळ आहेत. भारतातील उपलब्ध स॑ख्या दहा-बारापेक्षा जास्त नसावी.

मदनबाण 14/05/2008 - 10:56
माझ्या कडील काही नाण्यांची छायाचित्रे येथे देत आहे..... (ही तिन्ही नाणी १ पैश्याचीच आहेत....) मदनबाण.....

किती दिवसांनी ही नाणी पाहिली..मला २० पैशांचं नाणं फार आवडायचं..आणि ती मी बरीच जमाही केली होती अर्थात तेव्हा ती चलनात असल्याने,सुटे पैसे लागले की ती नाणी घरातली मोठी मंडळी वापरायची..

प्राजु 14/05/2008 - 14:36
माझ्याकडेही भरपूर नाणी होती... जुन्या आठवणी जाग्या झाल्या. - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/

देवदत्त 18/05/2008 - 22:04
सर्वांच्या प्रतिक्रियांबद्दल धन्यवाद. आणखी काही माझ्याकडे असलेली नाणी जी वर नमूद नाहीत :) आणखीही मिळाल्यावर इथे टाकेन. 25 Paise 50 Paise २५ पैशाच्या नाण्यावरून दिसते की तेव्हा सरकारने आशियाई खेळांकरीता भरपूर जाहिरातबाजी, प्रोमोशन (ह्याला मराठीत काय म्हणतात?) केले असेल. महाराष्ट्र राज्य परिवहन वापरत असलेल्या एशियाड गाड्याही तेव्हाच काढल्या होत्या असे ऐकिवात आहे. त्या फक्त खेळाडूंच्या परिवहनाकरीता वापरत होते काय? तसेच ५ पैशाचे तांबे-निकेल चे नाणे माझ्याकडे आले तेव्हा थोडे वेगळे वाटायचे कारण त्यावेळी ५, १० आणि २० पैशाची अल्युमिनिअमची नाणी, २५ व ५० पैशांची जी नाणी वापरात होती ती तेवढी जड नव्हती. पण हे ५ पैशाचे नाणे त्या मानाने बर्‍यापैकी जड होते, नाणेफेकीप्रमाणे अंगठ्याने उडविले की मस्त खण्ण्ण्ण्णऽऽऽ असा आवाज यायचा. म्हणून मी ते नेहमी खिशात ठेवायचो.

रामदास 18/05/2008 - 22:17
महाराष्ट्र राज्य परिवहन वापरत असलेल्या एशियाड गाड्याही तेव्हाच काढल्या होत्या असे ऐकिवात आहे. त्या फक्त खेळाडूंच्या परिवहनाकरीता वापरत होते काय? होय. खेळाडूंची ने -आण करण्यासाठी वापरल्या होत्या. एशियाड चे खेळ संपल्यानंतर सगळ्या राज्यांना सारख्या वाटून दिल्या. महाराष्ट्र सरकारने नको म्हणून सांगीतल्यावर त्या आंध्र प्रदेशनी घेण्यासाठी होकार दिला. एक सनदी अधिकारी (सचीव) मुख्यमंत्र्याशी चक्क भांडले. म्हणून त्या गाड्या आपल्याकडे राहील्या. सचीवांनी आपले वचन पाळले. एका वर्षात एशियाड गाड्यांनी महामंडळाला नफ्यात आणले.

In reply to by रामदास

विद्याधर३१ 19/05/2008 - 07:26
त्या गाड्यांचे Design / बांधणी पुण्याच्या दापोडी S. T. Workshop मध्ये झाली होती...... =D> विद्याधर ( मी नास्तिक आहे........ देवाशप्पत..)

संग्राम 10/01/2011 - 14:07
मला आलेल्या एका ढकलपत्रानुसार, Indian coins are mainly produced in 4 cities 1. Delhi 2. Mumbai 3. Hyderabad 4. Kolkata The production in city puts an identification mark under the year of issue. Coins produced in: 1. Delhi - have a dot 2. Mumbai - have a diamond 3. Hyderabad - have a star 4. Kolkata - Nothing beneath the year Isn’t it amazing? Check your coins now :)

In reply to by संग्राम

देवदत्त 10/01/2011 - 20:33
हे माहित नव्हते. माहितीबद्दल धन्यवाद. तसेच ह्या बातमीनुसार २५ पैशांची नाणी अधिकृतरित्या चलनातून बाद होणार आहेत. तेव्हा कोणाकडे असतील तर वापरात काढून घ्या.

नुकतेच मटामध्ये भारत सरकारच्या टांकसाळीची जाहिरात पाहिली की, "पहिल्या स्वातंत्र्य युद्धाची १५० वर्षे" च्या स्मृतीत १०० रू ची नाणी इच्छुकांना विकण्यासाठी नोंदणी सुरू आहे. त्यांच्या संकेतस्थळावरही अशीच काही १०० रुपयांची नाणी उपलब्ध आहेत. अर्थात ही नाणी चलनात नसतील हे ही त्यांनी नमूद केले आहे. मी ती नाणी घेण्याची शक्यता नाही. पण ते वाचून मी पाहिलेली वेगवेगळी नाणी व त्यांचे वापर डोळ्यासमोर येऊन गेले. नुकतेच चलनात आलेले नवीन नाणे म्हणजे ५ रू चे स्टीलचे नाणे. ५० पैशाच्या नाण्यासारखेच वाटणारे.

थोडे असे, थोडे तसे

देवदत्त ·

विसोबा खेचर 12/04/2008 - 01:18
हम्म! लेखन बर्‍यापैकी वैचारिक झाले आहे! छान आहे! :) गेल्या वर्षी एक चांगला विचार कुठल्याशा विपत्रातून (अर्थात ढकलपत्रातून) आला. मुख्य म्हणजे पुढे ढकललेले इपत्र येथे जसेच्या तसे प्रकाशित न करता त्यातील मुद्द्यावर देवदत्तरावांनी स्वत:ही काही लेखन केले आहे, हे मी महत्वाचे मानतो! 'सभासदांनी येथे स्वत:चे लेखन करावे' या मिपाच्या धोरणाला हे साजेसेच आहे. अभिनंदन! तात्या.

In reply to by विसोबा खेचर

देवदत्त 28/04/2008 - 23:08
धन्यवाद तात्या.. आणखी बरेच विचार असतात असे पण इथे येऊन लिहेपर्यंत काही विसरून जातो, काही वेळा दोन्ही मुद्दे आठवत नाही. आता एक आठवला तो लिहितो... वीजमंडळ भारनियमन करते काही कारणाकरीता. पण त्यातूनही असे वाटते. भारनियमन चांगले आहेच. ठराविक वेळ वीज न वापरल्याने वीजेची बचत होतेच. पण मग लगेच वाटते, अरे पण फायदा काय? जी वीजेची उपकरणे मी ती दिवसभरात त्याच प्रकारे वापरणार. त्यात जवळपास तेवढाच वीज वापर आहेच. पण मग तेच क्रिकेट, इतर समारंभात आपण वीज खर्ची घालतोच.

गेल्या वर्षी एक चांगला विचार कुठल्याशा विपत्रातून (अर्थात ढकलपत्रातून) आला. एक माणूस आपल्या मुलीसोबत बाजारात गेलेला असतो. गर्दीत तो मुलीला म्हणतो, "तू माझे बोट किंवा हात पकडून ठेव, म्हणजे गर्दीत तू हरवणार नाहीस. माझ्या सोबतच राहशील." ह्यावर मुलगी म्हणते, "नको बाबा, त्यापेक्षा तुम्ही माझा हात पकडून ठेवा. गर्दीत माझा हात सुटू शकतो. तुम्ही पकडलेला हात नाही सुटणार." खरोखरच चांगला विचार. तेव्हाच हात धरण्यावरून मला हा विनोद आठवला, एकदा एक माणूस रस्त्यावरून चालता चालता एका खड्ड्यात पडतो.(कसा? माहीत नाही बुवा ;)) त्याला वर काढण्याकरीता लोक म्हणतात,"तुमचा हात द्या.

सूर्योदय

ॐकार ·

विसोबा खेचर 19/02/2008 - 18:55
लाईन नंबर ३ मधली तीनही चित्रे सर्वाधिक आवडली..! अरे ओंकारा, लेका तुही छान छान फोटू काढतोस हे माहितच नव्हते! :) बाय द वे, मिपावर एखादं छानसं रेखाचित्र टाक की! तात्या.

केशवराव 19/02/2008 - 22:42
ओंकार, सर्व प्रकाश - चित्रें उत्तमच आहेत. अशी प्रकाश - चित्रें खेचायची म्हणजे संयम हवाच. लोकेशन प्लॅन देण्याची कल्पना छान. निसर्ग वेडा ...केशवराव.

सर्वसाक्षींच्या सूर्यास्तामुळे मला ही सूर्योदयाची चित्रे टाकावीशी वाटली... नव्या घरातून टिपलेल्या उगवत्या सूर्याच्या छटा... (खालील चित्रप्रतिमेवर क्लीक करा आणि पिकासा अल्बममध्ये चित्रे पहा, किंवा इथे स्लाईड शो पहा)

पत्ता शोधणे - एक कला

देवदत्त ·

सहज 26/11/2007 - 06:08
इतका वेळ झाला तरी प्रतीसादाचा पत्ताच नव्हता. म्हणुन म्हणलं आपणच सांगावा. ;-) स्ट्रीट डायरेक्टरी असता जवळ पत्ता शोधण्यास मिळे बळ :-)

विसोबा खेचर 26/11/2007 - 07:59
चांगला लेख. माझा अनुभव - पत्ता शोधून काढणे पुष्कळदा सोपं जातं परंतु काही वेळेला मात्र ते अत्यंय जिकिरीचं काम होऊन बसतं! पुण्यातली मंडळी पुष्कळदा अगदी बिनदिक्कत चुकीचा पत्ता सांगतात असाही अनुभव आहे! :) तात्या.

In reply to by विसोबा खेचर

कोलबेर 26/11/2007 - 08:10
पुण्यात एकदा एका स्कुटरवाल्याला वाल्याला पत्ता विचारला असता, 'आता तू असं कर,पुढच्या चौकात डावीकडं वळंच!' असं मार्गदर्शन करुन तो माझ्या दुचाकीचा पाठलाग करत मी पुढच्या चौकात खरंच डावीकडं वळतोय ना ते पहायला आला होता.

In reply to by आजानुकर्ण

सर्किट 26/11/2007 - 23:24
त्यातही कुणी हिंदी भाषिकाने पाता विचारल्यासः समोरके गल्लीसे डावीको वळो, लेकीन जरा हलू, उधर बालू पसरा हुवा है !! - सर्किट

In reply to by विसोबा खेचर

सर्किट 26/11/2007 - 08:28
पुण्यातली मंडळी पुष्कळदा अगदी बिनदिक्कत चुकीचा पत्ता सांगतात असाही अनुभव आहे! :) म्हणूनच ठाण्यातली मंडळी पुण्यात आल्यावर अमेरिकेतून पुण्यात आलेल्या मंडळींना मार्गदर्शनासाठी बोलावून घेतात की काय ? आणि मार्गदर्शन कुणाच्या घराचे ? तर ज्यांचे मन क्षुल्लक गोष्टींनी मिसळपावावरून उडते, त्यांच्या ? तात्या, अमेरिकेत येशील तेव्हा तुला नॉर्थ क्यारोलिनाचे दिशादर्शन करेन ;-) - (सारथी) सर्किट

In reply to by सर्किट (verified= न पडताळणी केलेला)

विसोबा खेचर 26/11/2007 - 08:39
म्हणूनच ठाण्यातली मंडळी पुण्यात आल्यावर अमेरिकेतून पुण्यात आलेल्या मंडळींना मार्गदर्शनासाठी बोलावून घेतात की काय ? :)) आणि मार्गदर्शन कुणाच्या घराचे ? तर ज्यांचे मन क्षुल्लक गोष्टींनी मिसळपावावरून उडते, त्यांच्या ? अरे जाऊ दे रे! जे आपले होते/आहेत, ज्यांना मिसळपावबद्दल आपुलकी वाटेल तेच इथे राहतील. बाकीचे मन उडून निघून जातील! चालायचंच.... तात्या, अमेरिकेत येशील तेव्हा तुला नॉर्थ क्यारोलिनाचे दिशादर्शन करेन ;-) हो, नक्की कर. पोष्ट्या गजाननाच्या घरी एखादी चक्कर टाकीन म्हणतो! नाहीतरी एकदा मला सिंडीला भेटायला अमेरिकेत यायचंच आहे! बाकी देवदत्तरावांनी आय पी पत्ते शोधण्याबद्दल विशेष काही लिहिलेले नाही. तो लेख तू लिहावास असं वाटतं! :) आपला, (सिंडीचा दिवाना!) तात्या.

In reply to by विसोबा खेचर

आय पी पत्ते शोधण्याबद्दल विशेष काही लिहिलेले नाही. तो लेख तू लिहावास असं वाटतं! :) सहमत !!!
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

In reply to by विसोबा खेचर

देवदत्त 26/11/2007 - 21:30
आय पी पत्ते शोधण्याबद्दल विशेष काही लिहिलेले नाही. तो लेख तू लिहावास असं वाटतं! सहमत. अहो, मला त्यातील खरे तर जास्त काही माहीत नाही. आणि असल्यास पुन्हा चुकू नये. ;) त्यापेक्षा माहितगारांनीच लिहावे :)

जुना अभिजित 26/11/2007 - 11:15
विकिपेडीआचे संदर्भ देणे जरा हास्यास्पद वाटले तरी विकीमॅपिआ पत्ता शोधण्यासाठी वापरणे नक्कीच उपयुक्त आहे. पत्त्यावरून एक आठवलं. ऑफिस ऑफिस मालिकेत मुसद्दीलाल म्हणतो, "हमारे घर के सामने कचरे का ढेर इतने दिनोंसे है की हम ऍड्रेसमे कूडेके ढेर के पीछे ऐसे लिखते थे" छान लेख. पत्ता शोधण्याच्या निमित्ताने आम्हीही नव्या वाटा चोखाळल्या आहेत. अभिजित

देवदत्त 26/11/2007 - 21:52
अहो, एक लिहायचे राहिलेच.... माझ्या माहितीत असलेल्याच्या कंपनीच्या बसचा चालक नेहमी बदलतो. दर संध्याकाळी पहिला प्रश्न... "रस्ता कुणाला माहित आहे? कोण सांगेल? " आता काय म्हणावे? मनात एक प्रश्न हा ही येतो.. शेवटच्या माणसाला सोडल्यावर तो परत कसा जाईल? ;)

अजय भागवत 30/03/2009 - 21:30
पुण्यात पाट्या असतात ना? सहज म्हणुन आंतर्जालावर गुगल केल्यावर ही वेब्साईट मिळाली पुणेरी पाट्यांना वाहिलेली- http://www.busybeescorp.com/puneripatya/thumbnails.asp

६४ कला कोणत्या आहेत हो? त्यात पत्ता शोधणे ही कला ही समाविष्ट आहे का? नसल्यास करता येईल का? का? सांगतो. सिनेमा चालबाज: शक्ति कपूर पहिल्यांदा शहरात येतो. तो कादर खानला एक पत्ता (अनुपम खेरचा) विचारतो. कादर खान चाकू काढून त्याच्याकडील सामान लुटून घेतो. शक्ति कपूर विचारतो, " अरे, पत्ता तर सांग". कादर खान म्हणतो," ऐसा करो, यहाँ से आगे जाओ. चौक पे बायें मुड जाना. अगले चौक से बायें मुड जाना. तो फिर आगे एक और चौक आयेगा. वहा से फिर बायें मुडना. अंत में और एक बार बाये मुडना. तुम यहॉं आओगे. तुम मुझे मिलोगे. मैं फिर तुम्हे लूट लुंगा." हा झाला सिनेमातला गंमतीचा भाग.

अतिदीर्घ बोधकथा (संपूर्ण काल्पनिक)

आजानुकर्ण ·

सर्किट 15/11/2007 - 11:52
कुणीतरी ह्या आजानुकर्णाला गुरुनाथ आबाजिंचे अथवा त्यांच्या चेल्याच्या आवडीचे पुस्तक द्या रे ;-) बोधकथांमुळे मळमळायला होतेय हल्ली ;-) (येथे सर्व वराहगंधर्वांनी आपापले दूषित "मळमळणे" ह्या शब्दाभोवती घोळवावे ;-) - सर्किट

सहज 15/11/2007 - 12:07
.....नारदमुनी: "मग तू स्वर्गात चल. यू डिझर्व बेटर." वराहगंधर्वः "पण तिथे रस्त्याच्या कडेने वाहणारे सांडपाणी, ताजी स्वच्छ घाण मिळेल ना?" नारदमुनी: "अरे वेड्या, स्वर्गात हे कुठे मिळणार? आणि तुला ते हवे तरी कशाला?" वराहगंधर्वः पण नारदमुनी जर का मी अजुन ५ जातभाई किंवा "क्लोन" आणले तर काही सोय होऊ शकेल का? नारदमुनी: तुझ्या नम्रवाणीने मी प्रसन्न झालो आहे, बघतो काय होऊ शकेल का? कदाचित "आपापसात" असे काही करता येईल. वराहगंधर्वः **** ***** #%#$% (*&&^%$# ^%$# :-) (संपूर्ण काल्पनिक)

In reply to by विसोबा खेचर

बेसनलाडू 15/11/2007 - 12:15
नारदमुनी आले की वराहगंधर्व (की त्याचा क्लोन) माहीत नाही, पण पळा मुलांनो पळा! (मस्तीखोर)बेसनलाडू

लोकसत्तेच्या लोकमुद्रा ४ नोव्हे २००७ मध्ये वाचक लिहितात मध्ये स.बा. यशवंत यानी खालील दहा गंधर्व दिले आहेत. १) देव गंधर्व - भास्करबुवा बखले २) सवाई गंधर्व - रामचंद्र गणेश कुंदगोळकर ३) कुमार गंधर्व = शिवपुत्र सिद्धरामय्या कोमकोळी ४) बालगंधर्व - नारायण श्रीपाद राजहंस ५) छोटा गंधर्व- सौदागर नागनाथ गोरे ६) नुतन गंधर्व - विनायक कृष्ण देशपांडे ७) हिंद गंधर्व - शिवरामबुवा दिवेकर ८) महाराष्ट्र गंधर्व - सुरेश विनायक हळदणकर ९) आनंद गंधर्व - आनंद बलवंत भाटे १०) भाव गंधर्व - हृदयनाथ दिनानाथ मंगेशकर वंचित गंधर्व प्रकाश घाटपांडे

ही कथा खरे तर नेहमीच्या स्टँडर्डप्रमाणे लघुकथा आहे. मात्र काही आधुनिक कथांशी तुलना करता तिला कादंबरी किंवा अतिदीर्घ कथा म्हणणे योग्य ठरेल. शिवाय नारदमुनी वगळता सर्व कथापात्रे (म्हणजे उरलेले एक) काल्पनिक. नेहमीप्रमाणे पगाराचा करमुक्त भाग असणारा लीव्ह ट्रॅव्हल अलाउंस क्लेम करण्यासाठी रजा घेऊन नारदमुनी पृथ्वीवर आले (अन्यथा त्या पैशावर त्यांना कर भरावा लागला असता.) मंडळी करांविषयी नंतर कधीतरी. मिसळपाववरच! पृथ्वीवर त्यांना एक गोंडस डुक्कर दिसले. काय त्याचे सौंदर्य वर्णावे महाराजा.