मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

राहती जागा

एक टुमदार गाव - माझे माधवनगर

शशिकांत ओक ·
एक टुमदार गाव - माझे माधवनगर भाग १- (सन १९६० ते १९७०च्या आसपासच्या आठवणी) माधवनगर गाव तस फार लहान. पण आखीव आणि टुमदार. सांगली व बुधगाव संस्थानांच्या मधे पुणे-बंगलोर मीटर गेजलाईनवर मिरजेच्या आधीचे स्टेशन. तर दुसऱ्या बाजूला किर्लोस्करवाडी जवळचे. पुण्याहून सांगलीला उतरणाऱ्यांना सोईचे म्हणून रेल्वेस्टेशनवर गर्दी. तरतरीत घोड्याचे व गोंडेदार टांगे, एसटी बस वाहतुकीची साधने तर बाकीचे सायकल स्वार. बुधगावच्या वाटेवर स्व. गंगाधर नातू शेठजींची माधवनगर कॉटन मिल तर सांगलीच्या रस्यावर स्व.

(घाईची वेळ)

शाहरुख ·
काव्यरस
घाईची वेळ होई गुडगुड | जोरदार कळ || बहूतेक मिसळ | कालची || भरली बादली | घातली स्लिपर || उभे लायनीच्या | शेवटाशी || सगळे गप्पांत | रमत गमत || आमचाच प्राण | कंठाशी || घामाघूम झाला | सदरा फार || गाठही गुंतली | लेंग्याची || दहा भाडेकरु | एकची संडास || उद्धारली नाती | मालकाची || अखेरीस आला | आमचा नंबर || लाईनही मागे | वाढलेली || केली लगबग | घुसलो आत|| झाली शांती | आत्म्याची || उद्याही पुन्हा | असेलच घाई || लावेन नंबर | प्रभाती || -कवी शाहरुख मुळ कविता वाचून शांत होतो पण

माझं कुमामोतो

सुबक ठेंगणी ·
लेखनप्रकार
मी जिथे रहाते ते कुमामोतो शहर, माझं याबे गाव आहे तरी कसं? ते पहायचं असं कित्तीतरी दिवस वाटत होतं. पण "आज जाऊ, उद्या जाऊ" असं करता करता चक्क दोन वर्ष उलटून गेली. आणि मग ह्यावर्षी आईबाबांबरोबर त्यांची दुभाषी म्हणून जायचा योग आला. आणि मी कुमामोतोच्या प्रेमात पडले. का? त्याचं हे (प्रकाश)चित्रमय उत्तर... माऊंट आसो...ऊर्फ आसोसान हा अगदी माझ्या "बगल मे" म्हणावा तसा. घरापासून गाडीने फक्त चाळीस मिनिटांवर. जपानमधला सर्वात मोठा जिवंत ज्वालामुखी. खरं म्हणजे हे चार पर्वत. पण ह्यातला एकच जिवंत आहे. (नशीब!) ह्याचं सहाशे मीटर रुंदीचं मुख पाहिलं की आपलं मुख उघडं पडतं.

बदलाबदली !

भोचक ·
बदल हा माणसाचा स्थायीभाव आहे. बदलतो तो माणूस. बदलला म्हणून माणूस इथवर पोहोचला. असली बदलाबदलीची वाक्ये ऐकून, वाचून कान आता किटले नि डोळे विटले आहेत. अस्मादिक 'ठेविले अनंते तैसेचि रहावे' या तुकारामी प्रवृत्तीचे. त्यामुळे बदलाचं वारं काही झेपत नाही. मग तो बदल वैयक्तिक असो की सार्वजनिक. वैयक्तिक बाबतीत लिहायचं तर, अगदी हाफिसमधली जागा असो, खुर्ची असो, कम्प्युटर असो की आणखी काही. यातलं काही काही बदललेलं चालत नाही. मालकाने पैसे मोजून ठेवून घेतलं असलं तरी या 'ठेविले अनंते' वृत्तीचा माज मात्र त्याला सहन करावाच लागतो. कारण माझ्याकडून होणार्‍या कामातूनच त्याला 'चित्ती समाधान' लाभत असतं.

घरघर!

प्रकाश घाटपांडे ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
सदर लेख हा माझी बायको मंजिरी हिने लिहिला असुन आम्ही फक्त त्याचे वाहक आहोत. तिच्या रिअल इस्टेट मॅनेजमेंट व सर्व्हिसेस या व्यवसायातील अनुभवांवर आधारित आहे. मिपाकरांना आपल्या आयुष्यात घर घेताना कदाचित त्याचा उपयोग होउ शकेल.
घरघर
(मंजिरी घाटपांडे) आयुष्यात कित्येकदा अशा वेळा येतात की जुन्या म्हणींवर अंधविश्वास ठेउन चालत नाही. ते त्याच्या जागी आपण आपल्या जागी अस वाटायला लागत. किंवा निदान त्या म्हणी त्यांचे अर्थ तपासुन तरी पहावेसे वाटतात.

महाजालावर कोल्हापुर

विनायक पाचलग ·
लेखनप्रकार
सध्या माझे मित्र राजे हे आमच्या गावाबद्दल अर्थात कोल्हापुरबद्दल खुप लिहित आहेत त्यामुळे अनेकाना कोल्हापुरबद्दल उत्सुकता असेल ती उत्सुकता ऑनलाइन भागवण्यासाठी हा लेख सध्याचे युग हे संगणक युग आहे यापुढे सर्व व्यवहार संगणकावर होणार आहेत त्यामुळे सध्या महाजालावर कोल्हापुरची स्थिती काय आहे याचा यानिमित्याने आढावा घेणे आगत्याचे ठरते आणि म्हणुनच एक नेटीझन म्हणुन घेतलेला हा आढावा तर प्रथम आपण गुगल कडे वळु गुगलवर एखाद्या गावाला योग्य स्थान असणे म्हणजे त्याबद्दलची योग्य माहिती उपलब्द्ध असणे महत्त्वाचे आहे आणि आनंदाची गोष्ट म्हणजे कोल्हापुरची दखल गुगल कडे आहे गुगल मॅप द्वारे(http://maps.google.co.in/maps