✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

नाणेपुराण

द
देवदत्त यांनी
Sun, 05/11/2008 - 16:39  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
20175 वाचन

💬 प्रतिसाद (40)

प्रतिक्रिया

स
स्वाती दिनेश Sun, 05/11/2008 - 16:57 नवीन

१०रु चे नाणे..

नाणेपुराण आवडले, १०रु चे नाणे... ही नवीच माहिती मिळाली, स्वाती
  • Log in or register to post comments
द
देवदत्त Sun, 05/11/2008 - 18:02 नवीन

पुन्हा १०

पुन्हा १० चे नाणे काढणार आहेत असे ऐकले. पाहूया.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्वाती दिनेश
ग
गणपा Mon, 05/12/2008 - 00:15 नवीन

१० रुपये.

१० रुपयाचे नाणे माझ्या संग्रही आहे. पण सध्या ते भारतात आहे नाहितर फोटो काढुन इथे टाकला असता. --गणपा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्वाती दिनेश
र
रामदास Sun, 05/11/2008 - 17:20 नवीन

आपलं नाणं

नाण्याच्या नादाचा आणि चारीत्र्याचा संबंध जुना आहे. आपलं नाणं खणखणीत असल्याचा दावा सगळेचं करतात. १० रुपयाचे ते नाणे आहे माझ्याकडे. मुंबईला पी. एम. रोड वर रिजर्व बॅंकेचे नाणे संग्रहालय पाहण्यासारखे आहे.
  • Log in or register to post comments
द
देवदत्त Sun, 05/11/2008 - 17:58 नवीन

धन्यवाद

आपलं नाणं खणखणीत असल्याचा दावा सगळेचं करतात. असली वाक्ये ही आठवली नव्हती हो. नाहीतर आणखी मजा आली असती मला लिहायला. धन्यवाद. ह्यावरूनच खोटा सिक्का हा शब्द प्रयोग, प्रत्येक नाण्याच्या दोन बाजू असतात हा वाक्प्रचारही आठवला. :) ते १० रुपयाचे नाणे कधीचे आहे हो? मुंबईला पी. एम. रोड वर रिजर्व बॅंकेचे नाणे संग्रहालय पाहण्यासारखे आहे. नक्की जाईन पहायला वेळ जमल्यास.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रामदास
प
प्रभाकर पेठकर Sun, 05/11/2008 - 17:45 नवीन

मस्त आठवणी...

आपल्या लेखाने खूप जुन्या-जुन्या आठवणी जाग्या झाल्या. मस्त लिहिले आहे. अभिनंदन.
  • Log in or register to post comments
द
देवदत्त Sun, 05/11/2008 - 18:01 नवीन

आठवणी

धन्यवाद.. आपल्या लेखाने खूप जुन्या-जुन्या आठवणी जाग्या झाल्या. पेठकर काका, तुमच्या अनुभवाच्या पोतडीतून काढा की त्या आठवणी. आम्हालाही मजा येईल वाचायला. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रभाकर पेठकर
ब
बिपिन कार्यकर्ते Sun, 05/11/2008 - 18:59 नवीन

नाणे पुराण...

नाणे पुराण आवडले... मला पण असं काही काही लिहावसं वाटतं, पण काय करणार, आपलंच नाणं खोटं... :''(
  • Log in or register to post comments
र
रामदास Sun, 05/11/2008 - 19:00 नवीन

खणखणीत

नाण्याचा आवाज त्यातल्या धातू मुळे असतो.सगळे धातू सोनोरस नसतात. जे असतात ते महाग असतात. उदा. कथील. त्यामुळे खोटी नाणी बनवणारे त्यात शिसे वापरतात. नाणे बद्द वाजते.गंमत म्हणजे आजही नाणे हातात घेउन केवळ वजनाच्या आधारावर खरे -खोटे सांगणारे मी पाहिलेत. बेल मेटल हा मिश्र धातू खणखणीत आवाजाचे एक उत्तम उदाहरण. मोनल दुसरे. हो मोनल हा मिश्र धातू आहे. आणखी माहिती साठी एकदा कपूर चे मेटालर्जी चे पुस्तक बघा. असो. लेखापेक्षा प्रतीक्रिया मोठी व्हायला नको.
  • Log in or register to post comments
श
शितल Sun, 05/11/2008 - 19:19 नवीन

मस्त.

लेख छान जमला आहे. माझ्या मिस्टरा॑नाही नाणे जमविण्याचा छ्॑द आहे, माझ्याकडे एक रूपयाचे एक नाणे आहे त्यावर ज्ञानेश्वर माऊलीचे चित्र आहे.
  • Log in or register to post comments
प
प्रभाकर पेठकर Sun, 05/11/2008 - 19:22 नवीन

नोटा..

मला नोटा जमवायला आवडते. मी त्या बँकेत साठवून ठेवतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शितल
क
कुंदन Sun, 05/11/2008 - 19:30 नवीन

मग माझ्याकडे द्या ....

कंगाल बँकेत ठेवायला...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रभाकर पेठकर
र
राजे (verified= न पडताळणी केलेला) Sun, 05/11/2008 - 22:37 नवीन

माझ्या कडे

माझ्या कडे ही एक नाणे आहे तांब्याचे दोनशे वर्षापुर्वीचे आहे... मला कोठे मिळाले हे आठवत नाही आहे पण माझ्याकडे ते लहान पणापासूनच आहे. व चिल्लर जमा करण्याची सवय मला लहान पणापासूनच.. खुप उपयोगी पडते ही सवय... लहानपणी आम्ही मातीच्या गुल्लक मध्ये जमा करत होतो.. कधी आई कडून तर कधी बाबाच्याकडून.. जे मिळाले ते गुल्लक मध्ये जमा.. व दिवाळीच्या आदल्या दीवशी त्याचा नारळ करुन टाकायचा ;) राज जैन जेव्हा तुम्ही कर्म करण्यामध्ये कमी पडता तेव्हा नशीबाला दोष देता !
  • Log in or register to post comments
स
स्वाती राजेश Mon, 05/12/2008 - 00:31 नवीन

नाणेपुराण

छान लिहिले आहे. नविन माहिती मिळाली.
  • Log in or register to post comments
प
प्रियाली Mon, 05/12/2008 - 00:46 नवीन

नाणेपुराण आवडले.

भारतात माझ्याकडे बर्‍याच देशांतील नाण्यांचा संग्रह होता. त्यात युरोप आणि आखातातील बरेचसे देश, नेपाळ, श्रीलंका, बांग्लादेश, पाकिस्तान, थायलंड, सिंगापूर, ऑस्ट्रेलिया, यूएसए, कॅनडा इ. इ. अनेक देशांची आणि भारतातील जुनी नाणीही जमवली होती. सध्या ती घरात कुठे आहेत की गेली त्याचा पत्ता नाही.
Head की Tails? आधी बरे होते, छापा की काटा ठरवण्याकरीता नाण्याची किंमत अर्थात आकडे लिहिले ते काटा व अशोकस्तंभाचे चिन्ह असलेला भाग म्हणजे छापा.
नाण्यांवर बरेचदा एखाद्या मोठ्या व्यक्तीचे चित्र असते. ती व्यक्ती बरेचदा देशाची, राज्याची प्रमुख किंवा नेता (हेड) असते. म्हणून नाण्याच्या या भागाला हेड्स म्हणतात तर विरूद्ध भागाला टेल्स म्हणायची पद्धत रूढ झाली. परंतु, हेड्सची ही पद्धत मूळची ग्रीकांची. ग्रीकांच्या नाण्यांवर त्यांच्या प्रमुखांचे चित्र छापलेले असे. ग्रीकांच्या (अलेक्झांडरच्या) स्वारी नंतर भारतातही हीच पद्धत रूढ झाली. असो, नाणेपुराणावर एक समग्र लेख लिहायचे बरेच दिवस मनात होते पण वेळ होत नाही हल्ली.
  • Log in or register to post comments
द
देवदत्त Mon, 05/12/2008 - 19:20 नवीन

नाण्यांवर

नाण्यांवर बरेचदा एखाद्या मोठ्या व्यक्तीचे चित्र असते. ती व्यक्ती बरेचदा देशाची, राज्याची प्रमुख किंवा नेता (हेड) असते. म्हणून नाण्याच्या या भागाला हेड्स म्हणतात तर विरूद्ध भागाला टेल्स म्हणायची पद्धत रूढ झाली. ह्या बाबतीत जास्त माहिती नव्हती. आणि खरं तर कधी शोधायचा प्रयत्न ही नाही केला.:( माहितीबद्दल धन्यवाद :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रियाली
ई
ईश्वरी Mon, 05/12/2008 - 01:16 नवीन

वेगळ्या

वेगळ्या विषयावरचा हा लेख आवडला. छान जमलंय नाणेपुराण. नाण्याच्या नादाचा आणि चारीत्र्याचा संबंध जुना आहे. आपलं नाणं खणखणीत असल्याचा दावा सगळेचं करतात. नाण्यासंदर्भात अजून एक वाक्प्रचार आठवला: एकाच नाण्याला दोन बाजू असतात. ईश्वरी
  • Log in or register to post comments
व
विसोबा खेचर Tue, 05/13/2008 - 08:35 नवीन

सहमत..

वेगळ्या विषयावरचा हा लेख आवडला. छान जमलंय नाणेपुराण. सहमत आहे.. दत्तराव, तुमचे नाणेपुराण आवडले. आता नोटापुराणही येऊ द्या! :) आपला, (पैशांचा लोभी) तात्या. अवांतर - याच लेखाला इतर काही संस्थळांवर मिळालेले प्रतिसाद पाहून मिपाच्या जिवंतपणाबद्दल अभिमान वाटतो! आपला, (निरिक्षक) तात्या.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ईश्वरी
द
देवदत्त Tue, 05/13/2008 - 20:17 नवीन

धन्यवाद

धन्यवाद तात्या.. नोटापुराणाचाही प्रयत्न करतो. अवांतर - याच लेखाला इतर काही संस्थळांवर मिळालेले प्रतिसाद पाहून मिपाच्या जिवंतपणाबद्दल अभिमान वाटतो! सहमत. मलाही छान वाटले.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विसोबा खेचर
च
चतुरंग Mon, 05/12/2008 - 05:14 नवीन

नाणेपुराण चांगलेच रंजक आहे.

माझे मूळ गाव नगर. तिथे एक ऐतिहासिक वस्तूसंग्रहालय आहे त्यात मी शिवराई बघितली आहे. मीही काही काही जुनी नाणी जमवली होती. अशीच सातवी आठवीत असताना जमवलेली. त्यात काही जुनी तांब्याची होती. एक (बहुधा रुप्याचे) पंचकोनी नाणे होते त्यावर पंचम जॉर्जचा मुखवटा होता बरंच जुनं होतं. त्यानंतर आपल्याकडचीच एक, दोन, पाच, दहा, वीस, पंचवीस, पन्नास पैसे अशीही नाणी होती. काही कॅनडियन आणि अमेरिकन नाणीही होती. जुना एक आणा होता. मला वाटतं ढब्बू पैसाही असावा. त्यानंतर कधीतरी तो नाद सुटला, त्याला छंदाचं स्वरुप मी देऊ शकलो नाही. सध्या माझ्या मुलासाठी मी नव्याने तो धागा पुन्हा सुरु करायच्या बेतात आहे. अमेरिकेच्या पन्नास संस्थानांच्या नावाची क्वार्टर्स (पंचवीस सेंट्स) ची नाणी आहेत. त्यापैकी ३६ संस्थानांची आम्ही जमवली आहेत उरलेल्याच्या शोधात आहोत. चतुरंग
  • Log in or register to post comments
प
प्रमोद देव Mon, 05/12/2008 - 08:58 नवीन

इथे पाहा काही नोटा आणि नाणी.

विकिपिडिया वर ची माहिती बघा. एक नमुना खाली पाहा. Image removed. मराठी भाषा हा माझा प्राणवायू आहे
  • Log in or register to post comments
ऋ
ऋचा Mon, 05/12/2008 - 10:02 नवीन

माझ्याकडे

माझ्याकडे जुनी खुप नाणी आहेत. बाकीच्या देशांचीपण आहेत, हा लेख छान आहे आवडला,
  • Log in or register to post comments
आ
आर्य Mon, 05/12/2008 - 10:48 नवीन

लेख छान आहे.

वाचून मजा आली...................खरच काही आठवणींना ऊजाळा मिळाला घरी आल्यावर मी आजही खिशातील नाणी ऐक डब्यात टाकतो, वेळेवर उपयोगी पडातात. एक रुपयाच्या नाण्याला छिद्र पाडुन दोरा बांधायचा...............परत वर ओढून घ्यायचे - दाखवीन कधी तरी दाखवीन ते नाणं, आमच्या महाविद्यालयीन जीवनातील हि ऐक आठवण माझ्या ऐका मित्राने जपुन ठेवली आहे. आणि हो माझ्याकडे ही १० रू चे नाणे आहे. १ रु चे नाणे मिस कॉल द्यायलाही उपयोगी पडायचे त्याच बरोबर कॉल ही फुकट करता यायचा - पुण्यात कॉलेजच्या ग्रंथालया बाहेर ऐक कॉईन बॉक्स होता, आमच्या सुदैवाने (तो डबा गंडला होता) त्या वरुन ४/५ सेकंद फुकट बोलता यायचे, नाणे नंतर आत पडायचे. अशा तर्‍हेने ऊशीरा येणार्‍यांना सगळे जमल्याची वर्दी देत द्यायला उपयोगी पडायचा- SMS चा पण खर्च होऊ दिला नाही दुरसंचार निगमने आमचा. (त्या बद्दल पुन्हा ऐकदा धन्यवाद) (काही मि पाव कर दुरसंचार निगम मधे असल्याने त्या कॉईन बॉक्सचा पत्ता येथे नमुद केलेला नाही) आपला आर्य
  • Log in or register to post comments
म
मैत्र Mon, 05/12/2008 - 16:14 नवीन

पाच रुपयांचे इंदिरा गांधी असलेले मोठे नाणे

हे नाणे माझ्याकडे होते पण घर बदलताना कुठे तरी हरवले... परत कोणाकडे पाहिले नाही... इतक्या मोठ्या आकाराचे दुसरे नाणेही परत निघाले नाही.. साधारण १७-१८ वर्षांपुर्वी होते... दोन रु. च्या मोठ्या नाण्यापेक्षा सुमारे दुप्पट व्यासाचे आणि चांगले जड होते... दहा पैशांचे अतिशय छोटे स्टील चे नाणे छान होते... आणि त्या बरोबरचे गेंडा वाले २५ पैशांचे ही... ही नाणी नंतर बंद करण्यात आली...
  • Log in or register to post comments
द
देवदत्त Mon, 05/12/2008 - 19:18 नवीन

५ रुपयाचे नाणे

ते पाच रुपयाचे नाणे होते आमच्याकडेही. बहुधा ५ नाणी होती. आता मलाही माहित नाही कुठे आहेत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मैत्र
म
मदनबाण Tue, 05/13/2008 - 01:41 नवीन

मलाही.....

मलाही नाणी जमवायचा छंद आहे...देशी आणि विदेशी. माझ्या कडे काही जुनी नाणी सुद्धा आहेत्,,,,अगदी कुठल्या नवाबापासुन ते जिवाजी राव सिंधीया असे लिहले असलेल्या नाण्यापर्यन्त..... १ पैश्या चे नाणे तर मला फार आवडते.....(भांगेमधे ते उगाळले की जबरदस्त चढते असे एकुन आहे.....) १० पैश्याचे मागे गेंडा असलेले नाणे सुद्धा मस्तच दिसते..... (संग्रहक) मदनबाण.....
  • Log in or register to post comments
र
रामदास Tue, 05/13/2008 - 10:30 नवीन

.....(भांगेमध

.....(भांगेमधे ते उगाळले की जबरदस्त चढते असे एकुन आहे.....)चढणारच. अल्कलॉइड आणि कॉपर सॉल्ट.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मदनबाण
द
देवदत्त Tue, 05/13/2008 - 20:23 नवीन

१ पैश्या

१ पैश्या चे नाणे तर मला फार आवडते.....(भांगेमधे ते उगाळले की जबरदस्त चढते असे एकुन आहे.....) पैशाचा नशा म्हणतात ते हेच का? ;) १० पैश्याचे मागे गेंडा असलेले नाणे सुद्धा मस्तच दिसते १० च्या मागे? गेंडा २५ पैशाच्याच मागे पाहिला हो मी.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मदनबाण
इ
इनोबा म्हणे Tue, 05/13/2008 - 20:46 नवीन

देवा

१० च्या मागे? गेंडा २५ पैशाच्याच मागे पाहिला हो मी. अरे,देवा! त्या गेंड्याला १० आणि २५ पैशातला फरक काय कळणार? तो गेला बिचारा पायजे तिथं. जाऊ दे! बाकी वेगळ्या विषयाचा हा लेख आपल्याला जाम आवडला. असेच वेगवेगळे विषय हाताळून मिपाला समृद्ध करत रहावे. कर्मण्ये वाधिकारस्ते | मां फलकेशू कदाचनं : कार्यकर्त्यांनी कर्म करीत रहावे,आपल्या नावाचे फलक लागतील अशी अपेक्षा करु नये. -इनोबा म्हणे -मराठमोळे वॉलपेपर
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: देवदत्त
म
मदनबाण Wed, 05/14/2008 - 09:45 नवीन

१० च्या मागे

१० च्या मागे? गेंडा २५ पैशाच्याच मागे पाहिला हो मी. तुम्ही बरोबर आहात.....१० पैशाच्या नाण्या मागे गेंड्याचे चित्र नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: देवदत्त
ड
डॉ.प्रसाद दाढे Wed, 05/14/2008 - 09:37 नवीन

माझ्याकडे

माझ्याकडेसुद्धा थोरल्या महाराजा॑च्या दोन शिवराया आहेत (प्रतापगडावर सापडलेल्या). तसेच माझ्या आजोबा॑नी मला पारत॑त्र्यातील भारताची काही चा॑दीची नाणी दिली आहेत (प॑चम जॉर्ज, सातवा एडवर्ड इ). त्या खजिन्यात एक निजामाचे नाणे आहे व एक ढब्बू पैसासुद्धा आहे. तशा शिवराया पुष्कळ सापडतात पण शिवाजी महाराजा॑चे सुवर्ण होन मात्र फारच दुर्मिळ आहेत. भारतातील उपलब्ध स॑ख्या दहा-बारापेक्षा जास्त नसावी.
  • Log in or register to post comments
म
मदनबाण Wed, 05/14/2008 - 10:56 नवीन

माझ्या कडील.....

माझ्या कडील काही नाण्यांची छायाचित्रे येथे देत आहे..... Image removed. Image removed. (ही तिन्ही नाणी १ पैश्याचीच आहेत....) Image removed. Image removed. Image removed. Image removed. मदनबाण.....
  • Log in or register to post comments
स
स्वाती दिनेश Wed, 05/14/2008 - 12:19 नवीन

मस्त..

किती दिवसांनी ही नाणी पाहिली..मला २० पैशांचं नाणं फार आवडायचं..आणि ती मी बरीच जमाही केली होती अर्थात तेव्हा ती चलनात असल्याने,सुटे पैसे लागले की ती नाणी घरातली मोठी मंडळी वापरायची..
  • Log in or register to post comments
प
प्राजु Wed, 05/14/2008 - 14:36 नवीन

मस्त लेख..

माझ्याकडेही भरपूर नाणी होती... जुन्या आठवणी जाग्या झाल्या. - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/
  • Log in or register to post comments
द
देवदत्त Sun, 05/18/2008 - 22:04 नवीन

आणखी काही..

सर्वांच्या प्रतिक्रियांबद्दल धन्यवाद. आणखी काही माझ्याकडे असलेली नाणी जी वर नमूद नाहीत :) आणखीही मिळाल्यावर इथे टाकेन. Image removed. Image removed. २५ पैशाच्या नाण्यावरून दिसते की तेव्हा सरकारने आशियाई खेळांकरीता भरपूर जाहिरातबाजी, प्रोमोशन (ह्याला मराठीत काय म्हणतात?) केले असेल. महाराष्ट्र राज्य परिवहन वापरत असलेल्या एशियाड गाड्याही तेव्हाच काढल्या होत्या असे ऐकिवात आहे. त्या फक्त खेळाडूंच्या परिवहनाकरीता वापरत होते काय? तसेच ५ पैशाचे तांबे-निकेल चे नाणे माझ्याकडे आले तेव्हा थोडे वेगळे वाटायचे कारण त्यावेळी ५, १० आणि २० पैशाची अल्युमिनिअमची नाणी, २५ व ५० पैशांची जी नाणी वापरात होती ती तेवढी जड नव्हती. पण हे ५ पैशाचे नाणे त्या मानाने बर्‍यापैकी जड होते, नाणेफेकीप्रमाणे अंगठ्याने उडविले की मस्त खण्ण्ण्ण्णऽऽऽ असा आवाज यायचा. म्हणून मी ते नेहमी खिशात ठेवायचो.
  • Log in or register to post comments
र
रामदास Sun, 05/18/2008 - 22:17 नवीन

महाराष्ट्

महाराष्ट्र राज्य परिवहन वापरत असलेल्या एशियाड गाड्याही तेव्हाच काढल्या होत्या असे ऐकिवात आहे. त्या फक्त खेळाडूंच्या परिवहनाकरीता वापरत होते काय? होय. खेळाडूंची ने -आण करण्यासाठी वापरल्या होत्या. एशियाड चे खेळ संपल्यानंतर सगळ्या राज्यांना सारख्या वाटून दिल्या. महाराष्ट्र सरकारने नको म्हणून सांगीतल्यावर त्या आंध्र प्रदेशनी घेण्यासाठी होकार दिला. एक सनदी अधिकारी (सचीव) मुख्यमंत्र्याशी चक्क भांडले. म्हणून त्या गाड्या आपल्याकडे राहील्या. सचीवांनी आपले वचन पाळले. एका वर्षात एशियाड गाड्यांनी महामंडळाला नफ्यात आणले.
  • Log in or register to post comments
व
विद्याधर३१ Mon, 05/19/2008 - 07:26 नवीन

आणी ......

त्या गाड्यांचे Design / बांधणी पुण्याच्या दापोडी S. T. Workshop मध्ये झाली होती...... =D> विद्याधर ( मी नास्तिक आहे........ देवाशप्पत..)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रामदास
स
संग्राम Mon, 01/10/2011 - 14:07 नवीन

रंजक माहिती

मला आलेल्या एका ढकलपत्रानुसार, Indian coins are mainly produced in 4 cities 1. Delhi 2. Mumbai 3. Hyderabad 4. Kolkata The production in city puts an identification mark under the year of issue. Coins produced in: 1. Delhi - have a dot 2. Mumbai - have a diamond 3. Hyderabad - have a star 4. Kolkata - Nothing beneath the year Isn’t it amazing? Check your coins now :)
  • Log in or register to post comments
द
देवदत्त Mon, 01/10/2011 - 20:33 नवीन

हे माहित नव्हते. माहितीबद्दल

हे माहित नव्हते. माहितीबद्दल धन्यवाद. तसेच ह्या बातमीनुसार २५ पैशांची नाणी अधिकृतरित्या चलनातून बाद होणार आहेत. तेव्हा कोणाकडे असतील तर वापरात काढून घ्या.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संग्राम
स
सुनील Mon, 01/10/2011 - 20:46 नवीन

छान

माहितीपूर्वक लेख आणि प्रतिक्रिया.
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा