माझीही फोटोग्राफी

मला फोटोग्राफीमधील जास्ती काही कळत नाही. मॅन्युअल सेटिंग्ज वापरून काढलेले काही फोटो. Trial and Error करून ही छायाचित्रे काढली आहेत. Blur effect यावा म्हणून हे शटर स्पीड कमी करून काढलेले काही फोटो.

गुड मॉर्निंग म्योदेन

लेखनप्रकार
मिपाकरांसाठी एक छायाचित्र म्योदेन हे त्या रेल्वे स्टेशनचे नाव आहे.

सुगरण ??

लेखनप्रकार
मध्यतंरी कोल्हापुरला गेलो होतो. त्यावेळी चिमण्यांचा आकाराचे काहि पोटावर पिवळसर झाक असलेल पक्षी अचानकच दिसले. सहजच म्हणून घराच्या मागच्या बाजुला गेलो आणि बघतोय तर काय मला दिसली ही एक सुखी समृद्ध कॉलनी. तिच नाव बहुद्धा "आदर्श कॉलनी"च असेल बॉ. :) बघा बघा तुम्हीदेखील बघा. मग जरा ह्या कॉलनीतील रहिवाशी कसे आहेत आणि काय करत आहेत हे बघुया म्हणल तर हे महाशय दिसले. बहुद्धा मनातच म्हणत असतील, "छे एक घर असताना देखील ह्या आमच्या बयेन दुसर घर बांधायला सांगितलय. तिला काय जातय नुसतच सांगायला.

आमची पी.एम.टी.

लेखनविषय:
लेखनप्रकार
पी.एम.टी.
डिस्क्लेमर : खालील लेखात प्रत्येक ऊल्लेख हा केवळ पी.एम.टी. शी संबंधित आहे. नोंद घ्यावी. काय, पी.एम.टी ? कान टवकारले ना ? अहो नामकरन झालं ना? पी.एम.टी आणि पी.सी.एम.टी. विलीनीकरण झालंरे टार्‍या... "अर्रे होन दे रे भई... अप्पन तो ईसको मरते दम तक पी.एम.टी. इच बोलेंगा !" हुह्ह! काही दिवसांपुर्वी ख.फ. वरील चर्चेत पी.एम.टी.चा विषय निघाला आणि मनात असलेल्या कडू गोड आठवणींनी या लेखातून मोकळी वाट काढली.

बंगळुरु आणि २५ जुलै २००८

लेखनविषय:
लेखनप्रकार
शुक्रवार, २५जुलै, २००८. नेहमीप्रमाणेच बंगळुरु सकाळी सकाळी आळोखे पिळोखे देत जागं होत असतं. नेहमीप्रमाणे मी सकाळची फिरुन परत येते, तेह्वा सकाळचे ७-७.१५ होत असतात. सकाळी बंगळुरुमधली हवा एकदम मस्त असते, रात्रीचा पाऊस झाल्याने, हवेत आल्हाददायक गारवा असतो. पुण्याची हवाही अशीच होती कधीतरी... माझ्या मनात विचार आल्याशिवाय रहात नाही... नेहमीप्रमाणे रस्त्यावरची बरीचशी दुकानं बंदच असतात. इथले दुकानदारही तसे पुण्यातल्या दुकानदारांचे भाऊबंदच!! आरामात साडेनऊ - दहाला आपापली दुकानं उघडणार!! अगदी इस्त्रीवाल्यापासून ते मॉलवाल्यांपर्यंत सगळे जण या परंपरेचं न चुकता पालन करणार...

हैदराबाद येथे झालेले मराठी बालनाट्य : 'राजकन्येची बाहुली'

लेखनप्रकार
हैदराबाद येथील रंगधारा नाट्यसंस्थेच्या वतीने घेण्यात आलेल्या मराठी बालनाट्य प्रशिक्षण शिबिराचा सांगता समारंभ पोट्टी श्रीरामलु तेलुगु युनिव्हर्सिटीच्या एन्.टी. रामाराव कलामंदिरात दि. २२ जून २००८ रोजी संपन्न झाला. यावेळी 'राजकन्येची बाहुली' हे बालनाट्य आणि 'ओले,ओले, टीव्ही बोले' हे लघुनाट्य सादर करण्यात आले. दोन्ही बालनाट्ये अत्यंत उत्कृष्टरित्या सादर झाली.

अमराठी मुलखात अस्सल मराठी बालनाट्य

लेखनप्रकार
हैदराबाद: येथील 'रंगधारा' या नाट्यसंस्थेच्या वतीने दि. १२ मे २००८ पासून बालनाट्य प्रशिक्षण शिबिर सुरू आहे. यात भाग घेणारी सर्व मुले अमराठी शाळेत शिकतात. त्यांना मराठी नीटसे बोलताही येत नाही. कारण घराबाहेर (क्वचित घरातही) असलेले अमराठी वातावरण. (मराठी वाचण्याची तर बातच सोडा. ) परंतु तरीही ती ८ ते १३ वर्षे वयाची मुले एक अस्सल मराठी बालनाट्य सादर करणार आहेत. ते आहे -"राजकन्येची बाहुली".
Subscribe to राहती जागा