मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

राहती जागा

सीमालढागीतः भिऊ नको मराठी जना

पाषाणभेद ·
काव्यरस
सीमालढागीतः भिऊ नको मराठी जना
भिऊ नको मराठी जना, काय तूझा गुन्हा राहीला सीमाभागी वेळ काढ जराशी जरा, येशील महाराष्ट्री पुन्हा चाल कर मोर्च्यात अग्रभागी ||धृ|| दिलेत भरपूर लढे, रक्ताचे पडले सडे विचार नको करू, नको मनामधे झुरू समजू नको अभागी चाल कर मोर्च्यात अग्रभागी ||१|| आम्ही जोर जुलूम तोडू, कन्नडीगांची कंबर मोडू अन्यायाला वाचा फोडू, सीमाभाग महाराष्ट्रा जोडू जरी लाठ्या डोक्यास लागी चाल कर मोर्च्यात अग्रभागी ||२|| जय महाराष्ट्र बोलू बोल, मराठीचे उपकार अनमोल झालो मोठे त्य

बेळगावी मराठी बांधवांवर हल्ला: सीमावासीयांनो आमचा तुम्हाला पाठिंबा आहे

पाषाणभेद ·
लेखनप्रकार
काल दि. १२ जुलै २०१० रोजी बेळगाव शहरात सीमावासीयांनी मराठीचा झेंडा फडकावत बेळगावात उत्स्फूर्तपणे काढलेल्या मोर्चावर कर्नाटक सरकारने अमानुष लाठीमार केला. शांततेने चालणार्‍या मोर्चावर अचानक लाठीमार करून सीमावासीयांच्या भावना कर्नाटकी सरकारने पायदळी तुडवल्या. म्हातार्‍या कोतार्‍या माणसांनाही पोलीसांनी सोडले नाही. केंद्रसरकारला अजून किती वेळा लाठीमार व सीमावासीयांचे बळी हवेत? न्याय्य मागण्यांना न्याय मिळेल की नाही? सीमाबांधवांनो, तुम्ही एकटे समजू नका.

महाराष्ट्र कर्नाटक सीमावादावरील गीत : उठ रे मराठी गड्या तू चल सीमेवर

पाषाणभेद ·
काव्यरस
उठ रे मराठी गड्या तू चल सीमेवर
उठ रे मराठी गड्या तू चल सीमेवर उचल मराठी झेंडा जावूदे वर वर ||धृ|| उचल तुझे हात नको भिऊ आता आपूलाच जय होईल सीमेत शिरता झेंडा मराठीचा फडके बेळगाव मनपावर उठ रे मराठी गड्या तू चल सीमेवर ||१|| राज्य आपले एक व्हावे मराठी भाषकांचे वेगळे न राहू आता एक घर करू बांधवांचे सुपीक प्रदेश ताब्यात आणू निप्पाणी कारवार उठ रे मराठी गड्या तू चल सीमेवर ||२|| पुर्वज आपले खपले तेथे विसरतो कशाला महाराष्ट्र एकीकरण समिती आहे तुझ्या पाठीला सामिल करू हलियाल,भा

भारतीय टपाल खात्यातर्फे आता नागरिकांसाठी पोस्टल ओळखपत्र

अरुंधती ·
लेखनप्रकार
भारतीय टपाल ऑफिस गाईडच्या ६३ व्या कलमान्वये आता पोस्टल ओळखपत्र देण्यात येणार आहे. अनेकदा लोक आपापले निवासस्थान बदलतात. त्यांना आपल्या नव्या पत्त्याचा सरकारी पुरावा सादर करणे बर्‍याचदा अवघड होऊन बसते. भारतीय टपाल खात्याने त्यावर एक उपाय शोधला आहे. टपाल खात्याकडून तुम्हाला आता तुमच्या निवासाचा पुरावा तुमच्या फोटोसहित मिळवता येतो. टपाल खाते हे केंद्र सरकारच्या अखत्यारीत येत असल्यामुळे त्यांच्याकडून मिळणारे ओळखपत्र हे ड्रायव्हिंग लायसन्स, मतदार ओळखपत्र इत्यादींप्रमाणेच प्रमाणित ठरते.

"संधी दृष्टीकोन बदलण्याची....!!"

डावखुरा ·
"लोकांची सत्ता येईल तेव्हाच लोकशाही मजबुत होईल. लोकांच्या हितासाठी कायदे येतील तेव्हाच लोकसत्ता येईल." कायदा कितीही उपयुक्त बनला तरीही तो अंमलात आणण्याची राजकीय ईच्छा शक्तीही तितकीच महत्त्वपुर्ण आहे. पण या नोकरशाही-भ्रष्टाचारयुक्त समजात योजनांचा लाभ गरजुंपर्यत पोहोचवणे ही स्वप्नवत भासणारी गोष्ट केवळ अशक्यप्राय आहे.

सा S S प!!!

मीनल ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
होळी विशेषांक -हास्यगाऽऽरवा यात मी लिहिलेल्या अजगर या लेखात `जर-तर` ची गोष्ट होती. कल्पनाविलास करून हसवण्याचा प्रयत्न केला होता. पण आताचे लेखन हे प्रत्यक्ष घेतलेला अनुभव आहे. --- इथे अमेरिकेत स्प्रिंग सिझन सुरू झाल्यावर निसर्गातील चैतन्य जणू आमच्यातही उफाळून आले. आमची बागही हरवीगार करण्याची इच्छा झाली. मागच्याच आठवड्यात नर्सरीत जाऊन छान फुलांची २ मोठी झाडे आणली. टोमॅटो, बारीक मिरची आणि काकडीची इवली इवली रोपे आणली. त्यासाठी ज्यात रोगप्रतिकारक औषधे, फर्टीलाझर्स आहेत अशी महागाईची माती आणली.

माझे जग

पाषाणभेद ·
लेखनप्रकार
माझे जग
काही दिवसांपुर्वी एखाद्या वर्षापुर्वी मी एकटी होते. नाही म्हणायला माझ्या इतर दोन भगिनी होत्या घरात. तसं आम्ही तिघेही समोरासमोरच होतो. दररोज सकाळी जाग आल्यावर आमचे बोलणी व्ह्यायची व्ह्यायची. आमच्या काही चुलत बहिणी पण वरच्या मजल्यावर होत्या. त्या आता काही दिसत नव्हत्या. आम्हाला येथे आणण्याच्यावेळी एका गाडीत आम्ही एकमेकांच्या पाठीला पाठ लावून आलेलो होतो तेव्हांचेच काय ते बोलणे त्यांच्याशी. आता फक्त खालच्या मजल्यावरील आम्ही तीन भगीनीच एकमेकांशी बोलू शकतो, पाहू शकतो. नव्याचे नउ दिवस असतात तसे आमचे रंग नविन होते.

एक टुमदार गाव - माझे माधवनगर - भाग - २.

शशिकांत ओक ·
एक टुमदार गाव माझे माधवनगर - सन १९६० ते १९७० दसकातील आठवणी भाग - २.
मागेवळून पाहता कधी आठवतात मजेशीर गोष्टी ... बुधवार पेठेत स्वर्गात न्यायाला विमान येणार म्हणून पत्रके वाटून मोठी तयारी केलेले श्रद्धाळू जाखोटिया... त्यांचा भसाड्या नाकाचा राजा... रेल्वे स्टेशनच्या पलिकडील सुंदर विठ्ठल मंदिरात हभप वासुदेवराव जोशींची टाळ मृदुंगाच्या तालावर होणारी हरिपाठाच्या अभंगांवरील कीर्तने... त्यानंतर नातू शेठजींचे ‘इष्टी’ कथन... त्यात बालगंधर्वांचे भजन गायन... ६७ सालातील भुकंपानंतरची रात्र... चोरट्यांच्या बंदोबस्तासाठी रात्री 2 ते 4 गस्त घालण्याची कामगिरी...