इयत्ता चौथी- विषय-" एक प्रवास"
दोन आठवड्यांपूर्वी आईबरोबर मामाच्या गावी जाऊन आलो. प्रवासाला जायच म्हणून कधी नव्हे ते भल्यापहाटे उठलो. नाष्टा आवरून घरातून बाहेर पडलो. रिक्षातून जावूया असा हट्ट धरला तरीही बर स्थानक फार लांब नाही अशी समजूत घालून आईने एक मैलभर चालवल. एवढ चालून स्थानकावर पोहोचलो परत भूक लागली. पायही दुखायला लागले होते. पण सगळी नुसता धुरळा होता किंवा लोकांनी पान खावून थुंकल्यामुळे काही जागा रंगल्या होत्या. बसायला धड जागा मिळाली नाही. ताटकळत उभा रहाव लागलं. नेहमीप्रमाणे बस उशीरा येणार होती. तोपर्यंत एक मुलगा चॉकलेट विकायला आला.