Skip to main content

मांडणी

सॉफ़्ट्वेअर क्षेत्र – मी पाहिले तसे.

लेखक sandeepn यांनी मंगळवार, 22/06/2010 17:33 या दिवशी प्रकाशित केले.
भारताने खुले अर्थिक धोरण अवलंबले आणि बोलता बोलता जागतिकीकरणाचे वारे भारतात वाहू लागले आणि यात सगळा भारत वाहत गेला. नारायण मुर्ती,अझिझ प्रेमजी यासारख्या वल्लींनी सॉफ़्ट्वेअर उद्योगामधे उल्लेखनिय कामगिरी करून दाखवली.आणि पाश्चात्य देशांना कमी किमतीत सॉफ़्ट्वेअर बनवुन देणारी खाण सापडली. बोलता बोलता सॉफ़्ट्वेअर सेवा क्षेत्रामधे भारत अग्रगण्य बनला.सुरवातीला लोकांची कामे कॉम्पुटर करील व लोकांच्या नोकय्रा धोक्यात येतील असे भाकीत वर्तवण्यात आले. पण त्याच कॉम्पुटरमुळे खूप सारय्रा नोकरय्रा उपलब्ध झाल्या.आणि मागणी तसा पुरवठा या मार्गाने सॉफ़्ट्वेअर इजिंनियर लोकांची एक फ़ळीच तयार झाली.

मायभूमीची नवी मराठी वेबसाईट

लेखक मड्डम यांनी गुरुवार, 03/06/2010 14:17 या दिवशी प्रकाशित केले.
मायभूमी.कॉम महाराष्‍ट्राच्‍या कडेकपा-या आणि दगड-मातीतून इथला इतिहास दरवळतो. आपल्‍या तलवारीच्‍या बळावर इतिहास घडविणारी पोलादी मनगटाची नररत्ने जशी या भूमीत जन्‍माला आली तशीच आपल्‍या अनुभव विश्‍वाच्‍या आणि शिक‍वणुकीच्‍या बळावर पोलादी समाज मन घडवणा-या संत विभूतींनीही या भूमीला आपल्‍या अस्तित्‍वाने पावन केले आहे.

आपल्या आवडत्या websites कोणत्या ते कळेल का? खरोखर नवीन

लेखक शानबा५१२ यांनी सोमवार, 31/05/2010 02:05 या दिवशी प्रकाशित केले.
हे ठळक अक्षरात लिहलेल नवीन आहे. पहील्यांदा पुण्याचे पेशवे ह्यांचे आभार.......त्यांच्या खवमधील प्रतिसादासाठी. आवडती website म्हणजे ज्यावर आपण कमीतकमी दीड तास आरामशीर टाईमपास करु शकतो अशी असावी. म्हणुन ह्या काही देतोय....... http://www.ugo.com/channels/comics/heromachine/classic.asp ह्यावर आपण आपल्या कल्पेनेतला हीरो आकारु शकतो,मी जेव्हा पहील्यांदा ह्याला भेट दीली तेव्हा २-३ तास रेखाटल एक पात्र आता format मारल्यावर नाहीये ते माझ्याकडे. Know yourself अस टाईप केल्यानंतर ज्या खुप साईट्स गूगल दाखवत त्यात ही अव्वल आहे.

नवनिर्माण समिती

लेखक सरपंच यांनी रविवार, 23/05/2010 23:30 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार, आधी जाहिर केल्याप्रमाणे मिसळपाववर सुधारणा करण्यासाठी खालिल समितीची स्थापना करीत आहे. १. नवनिर्माण समिती या समितीने मिसळपाववर असलेल्या तांत्रिक सुविधांचा अभ्यास करावा आणी त्यांतील त्रुटी शोधून काढाव्यात. तसेच मिसळपाववर कोणत्या तांत्रिक सुधारणा अपेक्षित आहेत याचाही आढावा घ्यावा. मिसळपावचे रुपरंग बदलण्यास वाव असेल तर तसेही सुचवावे. काही नविन सुविधा देता येणे शक्य असल्यास त्यांच्या अहवालात तसा उल्लेख करावा. या समितीचा अहवाल प्राप्त झाल्यावर तो लोकाभिमुख होईल, आणी नंतर अहवालातील सुचवण्यांनुसार बदल केले जातील.

नवीन संपादक

लेखक सरपंच यांनी रविवार, 23/05/2010 23:14 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार, मिसळपावचा वाढता व्याप लक्षात घेता या लेखाद्वारे मिसळपाववर तीन नवीन संपादकांच्या नावाची घोषणा करतो आहे. १) रामदास २) छोटा डॉन ३)निखील देशपांडे या आधीच्या संपादकांप्रमाणेच हे सुध्दा मिसळपाव.कॉम वरील संपादनाच्या कामात असतील. त्यांनी सक्रिय काम करावे ही अपेक्षा आहे. लवकरच मिसळपाव मध्ये काही बदल घडणे अपेक्षीत आहे. त्या योगे सध्याचे संपादक मंडळ सक्रिय सहभाग देत आहेतच. आता या नवीन सहकार्‍यांमुळे कामाला गती येईल.

~*~*~*~ राजीव'जींना भावपूर्ण श्रद्धांजली ~*~*~*~

लेखक मृगनयनी यांनी शुक्रवार, 21/05/2010 10:25 या दिवशी प्रकाशित केले.
राजीव गांधी!... आपल्या सर्वांचं एक आदरणीय आणि लाडकं व्यक्तिमत्व! भारताचे यशस्वी -माजी पंतप्रधान! २१ मे १९९१, रोजी रात्री, कोणाच्याही ध्यानीमनी नसताना तामिळनाडू येथे घडवून आणलेल्या मानवी बॉम्ब-हल्ल्यात झालेला राजीव'जींचा मृत्यू केवळ भारतीयांनाच नव्हे तर संपूर्ण विश्ववासीयांना मोठा मानसिक आघात देऊन गेला!..... राजीवजींच्या स्मृतीला विनम्र अभिवादन! ..... *~*~*~* STILL WE MISS YOU.... RAJEEV'JI...... LOVE YOU.......

काही छंद

लेखक सुचेल तसं यांनी शुक्रवार, 21/05/2010 06:52 या दिवशी प्रकाशित केले.
बायो-डेटामधे हॉबीज म्हणून एक सेक्शन असतो. मला वाटतं ९०% लोकांच्या हॉबीज अगदी सारख्या निघतील. वाचन, संगीत, क्रिकेट (पहाणं ), पोहोणं, इत्यादि. आपले असे पण काही छंद असू शकतात की जे आपण तिथे लिहू शकत नाही. ते छंद पाहून मुलाखत तिसरीकडेच भरकटेल म्हणून कदाचित लोकं (ज्यात मी पण आलो) उल्लेख करत नसतील. मला लहानपणी काडेपेट्यांचे कव्हर (टिक्के) जमवायचा छंद होता. त्या नादापायी मी आणि माझा चुलतभाऊ नाही नाही तिथे भटकलो. शाळा सुटली रे सुटली की ३-३, ४-४ किलोमीटर आम्ही वणवण हिंडायचो आणि नजर रस्त्याच्या दोन्ही बाजूंना. आता लक्षात येतंय की समोरच्याला ते एकदम येडछापसारखं दिसत असणार.