Skip to main content

मांडणी

कार्ट्यांस...

लेखक नगरीनिरंजन यांनी शनिवार, 16/04/2011 12:05 या दिवशी प्रकाशित केले.
मिपावरच्या सर्व कार्ट्यांस समर्पित. (चालः चल री सजनी अब क्या सोचे) लिही रे भावा तू अपुल्या मनचे डोहाळे कशाला प्रतिक्रियांचे लिही रे... टाकून खरडी भिक्षा मागणे जमवून कंपू गोंधळ घालणे असं काही ऽऽ करू नकोऽऽ, करू नकोऽ रे लिही रे... असेलही तुझी लेखणी धमाल करिती इथले सगळेचि लाल स्वतःचीऽऽ, स्वतःचीऽऽ, स्वतःचीऽच रे लिही रे... लिहीले जरी तू ओतुनि तनमन गेले जरी पुढच्या पानी ते पटकन दबलेलाऽ कोळसाऽ तो होईल हिरा रे लिही रे... जुन्या जाणत्यांचे लागावे चरणी आतल्या गोटात लावावी वरणी भाषा नाहीऽ शैली नाहीऽ पीआर हवा रे लिही रे...

फोरिनची पाटलीण

लेखक मृत्युन्जय यांनी बुधवार, 13/04/2011 13:16 या दिवशी प्रकाशित केले.
एक तृप्तीचा ढेकर देउन शंकरराव पाटावरुन उठले आणि ओसरीवर येउन बसले. आता एकेक करत मंडळी येतील आणि दुपारचा चहा होइस्तोवर पंचायतीची कामं उरकुन घेता येतील असा शंकररावांचा कयास होता. शंकररावांकडे तशी गावची पाटीलकी पिढीजात होती त्यात सरपंचपद पण त्यांच्याकडेच होते. त्यामुळे ते गावात आब राखुन होते. वर्षाकाठी एकदा पालकमंत्री, शिक्षणमंत्री गावच्या शाळेला भेट देउन जातील याकडे ते जातीने लक्ष घालत त्यामुळे आजुबाजुच्या गावांमध्ये पण त्यांचा वट होता.

मेघस्पर्षी

लेखक मृत्युन्जय यांनी मंगळवार, 12/04/2011 13:11 या दिवशी प्रकाशित केले.
सकाळचा ७.३० चा गजर झाला आणि "तो" नाइलाजाने उठला. त्या आधी सव्वासातचा आणि सातचा गजरही वाजुन बंद झाला होता. कुंभकर्णापुढे नगारे वाजवले तरी तो उठणार नाही हे सरावाने माहिती झाल्यामुळे घरच्यांनीही दुर्लक्ष केले. उठताना त्याचा हात चुकुन उशीला लागला आणि स्वतःचीच लाळ हाताला लागली. झोपताना खंडाळ्याच्या बोगद्यासारखे सताड उघडे असलेले तोंड, त्यातुन आघाडीच्या सरकारमधुन आतबाहेर करणार्‍या प्रादेशिक पक्षांसारखे आतबाहेर करणारे डास आणि तोडातुन लिटर दीड लिटर बाहेर पडणारी लाळ या सगळ्याचीच त्याला किळस यायची. स्वतः बद्दल त्याला न आवडणार्‍या अनेक गोष्टींपैकी ती एक होती.

अशीच भटकंती

लेखक पाषाणभेद यांनी गुरुवार, 07/04/2011 03:25 या दिवशी प्रकाशित केले.
छायाचित्र १ छायाचित्र २ छायाचित्र ३ छायाचित्र ४ छायाचित्र ५ छायाचित्र ६

सावधान! 'व्हर्चुअल फ्रेंड ' ची 'रियालिटी ' भोवली.

लेखक विनायक बेलापुरे यांनी मंगळवार, 05/04/2011 11:04 या दिवशी प्रकाशित केले.
चाळीशीच्या इसमाकडून २० वर्षीय तरुणीचा विनयभंग इंटरनेटवर चैटिंग करत घट्ट मैत्रीत अडकलेल्या २० वर्षीय तरुणीला प्रचंड मानसिक त्रासाला सामोरे जावे लागले आहे. व्हर्चुअल फ्रेंडशी तरुण तरुणींनी किती मैत्री वाढवावी याबाबत सावधानता बाळगावी, असे आवाहन पोलिसांनी केले आहे. मेडिकलच्या तिसऱ्या वर्षात शिकणाऱ्या २० वर्षीय तरुणीचा विनयभंग केल्या प्रकरणी ४१ वर्षीय व्यक्तीला डेक्कन पोलिसांनी अटक केली आहे. या प्रकरणी कोथरूड येथील तरुणीने डेक्कन पोलिसात तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी सलील भालचंद्र नानल (वय ४१ वर्षे रा.

अंतर ठेवा...

लेखक विनीत संखे यांनी मंगळवार, 29/03/2011 21:40 या दिवशी प्रकाशित केले.
मिपाचे सदस्यगण हो, कृपया मला एक सांगावे. मला काही सदस्यांकडून सांगण्यात आले आहे की मी लिखाणात अंतर ठेवावे. मी मिपावर टाकलेल्या माझ्या लिखाणांमध्ये एका दिवसाचे अंतर ठेवतोच. माझे हे लेखन आधीपासूनच तयार आहे. म्हणूनच मी ते इतक्या लवकर मिपावर टाकतोय. जर खरोखरच तुम्हाला जर माझ्या लिखाणात अंतर हवे असेल तर किती ते सांगावे ही विनंती. धन्यवाद विन्या. (मला माहित आहे की वरच्या शीर्षकावरून हा कुटुंबनियोजनाचा विषय वाटतो. त्यामुळे तसा विचार करून वाचणार्‍या सदस्यांना क्षमस्व. ;) मुद्दामून फसवण्याचा हेतू नव्हता.)

ती .....१

लेखक Antarang यांनी सोमवार, 21/03/2011 19:38 या दिवशी प्रकाशित केले.
मागच्या कम्पणीत join करुण २-३ आठवडे झाले असतील्....Free pool वर होतो...प्रोजेक्ट अलोकेशन सुरु होते... Client interview बाकी होता आणि त्याला पण १-२ आठवडे लागणार होते....त्यामुळे आरामच आराम्...Joining Batch मधल्यान मुलानबरोर दीवस भर कम्पणीत एकडे तीकडे भटकायचो.... Pool, Cafeteria , Lawn नाहीतर Net Browsing ...

होळी २०११

लेखक Antarang यांनी रविवार, 20/03/2011 17:57 या दिवशी प्रकाशित केले.
पुण्यात येवुन जवळ ४ वर्ष होत अलीत.... पण कधीच पुण्यातील होळी पाहण्याची इच्छा अथवा योग आला नाही... घरी होतो तेव्हा या सणाना फार महत्व होते आणी आज पण आहे... तेव्हा कमीत कमी शाळा/कोलेजला सुट्टी तरी असायची कीव्हा घरात काहीना काही गोड धोड बनत असायचे ... पण बाहेर असल्यावर ह्या गोष्टी अनुभवायला काय पहायला पण मीळत नाही... काल आमच्या सोसायटीतल्या (आमची एक अपार्टमेन्ट) मन्ड्ळीनी होळी साजरी करायचा बेत आखला होता..त्यात शनीवार असल्याने बाजुच्या काकु आणि ताईनी होळी बघायला बोलावले होते....

होश वालो को खबर क्या !!!!

लेखक किरन वनारे यांनी शुक्रवार, 18/03/2011 14:59 या दिवशी प्रकाशित केले.
होश वालो को खबर क्या !!!! काल सन्ध्याकाळी महत्वाचा सामणा म्हणुन Indies Vs England पाहत होतो पण दोन्ही टीम फारच टाईम पास करत होत्या ... असेच T.V.Channel change करता करता ....एका Channel वर माझ्या आवडत्या चीत्रपटा पैकी एक चीत्रपट नुकताच सुरु झालेल होता. "सरफरोश" १९९९ साली प्रदर्षित झालेला जोन मथ्यु मथन दिग्दर्शीत, अमिर खान, सोनाली बेन्द्रे आणि नसीरुद्दीन शहा अभिनयीत. मी त्यातील त्या गझल ची वाट पाहत होतो ज्यामुळे तो चीत्रपट जास्त लक्षात आहे..... आणि बरयाच दिवसात न एकलेली "होश वालो को खबर क्या" गझल गुण-गुण ली ...बरयाच दिवसा पासन एकत आलो असलो तरी आजपण एकताना त्यात तेवडाच नविनपणा जाणवत होता..

Onsite (I.T.) -1

लेखक किरन वनारे यांनी शुक्रवार, 18/03/2011 13:58 या दिवशी प्रकाशित केले.
Onsite (I.T.) -1 ज्या गोष्टी दुरुन (चान्गल्या) दिसतात त्या मनाला नेहमी भुरळ घालतात आणि आपला मोह वाढत जातो...कारण त्या फक्त पाहिलेअल्या किवा एकलेल्या असतात पण स्वताहा अनुभवलेल्या नसतात ... जो स्वताहा अनुभवते त्यालाच त्यातले तथ्य माहित असते ..... जोपर्यत आपण स्वता त्या अनुभवत नाहि तोपर्यन्त त्या एका स्वप्ना सारख्या वाटतात.... मग समोरिल अनुभवलेल्या वक्तिने कितिहि समजावले तरीहि आपण त्याला मुर्खातच काढतो... प्रत्येक I.T. Company त काम करणारया "कामगाराचे" एकच स्वप्न असते कि एक वेळा onsilte opportunity मिळायला हवी यार .... मग लाइफ सेटल... त्याला कारण पण तशीच असतात...