Skip to main content

मांडणी

मांडणी — विषयांची नेटकी मांडणी करणारे मराठी लेख. विचारांची सुसूत्र मांडणी आणि विश्लेषण येथे वाचा.

ताप

लेखक मितभाषी यांनी रविवार, 01/08/2010 16:32 या दिवशी प्रकाशित केले.

तुम्हाला वाजते का थंडी.
आणि कळपाची भीती.
का भरलाय तुम्हाला ताप.
तोंड दाबुन बुक्क्याचा मार.
शब्दांना नसते दु:ख.
फक्त ओझे वाहणारे आपण.
सवत आनली म्हणे.
ग्यानबाची बायको हरवली.
आता जास्त विचारत नाही.
कारण तुमच्याकडे उत्तर नाही.
राम रावण युध्द होणार
अनिरुध्द मिशा पिळणार
मी झाडावर लपणार
।। निश्चित ।।
ही कविता संपादकांना अडचणीत तर नाही ना आणनार??????????

.
.
.
कविवर्य भावसार.

माझे लेखन

लेखक प्रभो यांनी सोमवार, 26/07/2010 19:42 या दिवशी प्रकाशित केले.

सध्या बरेच जण 'माझे लेखन'ची लिंक नसल्याचे लिहीत आहेत, खालील लिंक त्यांसाठीच.

माझे लेखन (https://www.misalpav.com/mytrack) ही लिंक तुमच्या बूकमार्क्स मधे साठवून ठेवा. ह्या लिंकवर तुमचे स्वतःचे सगळे लेखन मिळेल. :)

-प्रभो

गोड गोड माणूस .

लेखक हेमंत रायकर यांनी गुरुवार, 15/07/2010 19:42 या दिवशी प्रकाशित केले.

नमस्कार .मी हेमंत रायकर. व्यवसायानी प्रकाशक. आमचा हा व्यवसाय जयहिंद प्रकाशन -रायकर ब्रदर्स या नावानी प्रसिध्द आहे. आमचे वडील (कै) ग.का. रायकर यांनी हा व्यवसाय सुरु केला आणि नावारुपाला आणला. तो काळ मराठी साहीत्याचा -मराठी मासिकांचा -दिवाळी अंकांचा सुवर्णकाळ होता. श्री दीपलक्ष्मी आधी मासिक होते. सध्या श्री दीपलक्ष्मी हा दिवाळी अंक नियमीत स्वरुपात येतो. या व्यवसायाच्या निमीत्ताने माझ्याकडे उत्तमोत्तम साहीत्याचा खजीना उपलब्ध आहे. या खजीन्यातून काही निवडक लेख मिसळपावच्या वाचकांना द्यायचा मनसुबा आहे*. या मालीकेतला हा पहीला लेख जयवंत दळवींचा आहे.

माझे किडे

लेखक jaypal यांनी मंगळवार, 13/07/2010 13:47 या दिवशी प्रकाशित केले.

परवाच्या रविवारी(११/७/२०१०) येउर जंगल भटकंती दरम्यान......
hjkh

gdfg

FSD

CZX

असच काहीसं

लेखक नेहमी आनंदी यांनी शनिवार, 03/07/2010 11:26 या दिवशी प्रकाशित केले.

निर्ढावलेला श्वास अंतरंगात कोंडतो आहे
उसळलेला अश्रू सांडण्या साठी तळमळतो आहे
शकले माझ्या मनाची झाली.....
होतील अजुन ही........
भाव मनीचा सामोरी पोचण्या अडखळतो आहे
कसे रोखू या आत्म्याच्या तडफडीला
जाता जाता श्वास का घुसमटतो आहे
चाहुल कुणाची लागली........
का लागली........
परतीची वाट आता घरंगळती आहे...

कानात गुज तुझी माझ्या झंकारु दे
ओठातले स्मित माझ्या तुझ्या नयनात दिसु दे

काव्यरस

मिपा सुपर सिलेक्टर - मिपाकरांची फुटबॉल टीम

लेखक छोटा डॉन यांनी गुरुवार, 01/07/2010 17:34 या दिवशी प्रकाशित केले.

डिस्केमर :
१. हा खेळ केवळ मौजमजा आणि विरंगुळा इथपर्तंच मर्यादित असावा.
२. स्कोअर सेटर करणे, वैयक्तिक चिखलफेक, वाद-विवाद, गदारोळ आदी बाबी आढणारे व अनावश्यक फाटे फोडणारे प्रतिसाद अपेक्षित नाहीत.

वि. सु. : फुटबॉल वर्ल्डकपच्या निकालानंतर इथे निवडल्या गेलेल्या "बेस्ट टीम ऑफ मिपाकर फॉर फुटबॉल" ह्याला मिपाच्या 'फिफापानाच्या मुखपॄष्ठावर ( जमल्यास ) " स्थान दिले जाईल.
असो.

काय मग ?
फुटबॉल वर्ल्डकपची मज्जा घेत आहात ना ?
तुमची कोणती तरी फेव्हरिट टीम असेल, आवडते खेळाडु असतील, आवडते फॉर्मेशन असेल, आवडता गेम्-प्लान असेल वगैरे वगैरे ...

(पारध)

लेखक अवलिया यांनी बुधवार, 30/06/2010 16:23 या दिवशी प्रकाशित केले.

प्रेरणा... भर बाजारात पाध्यांनी फोडलेले थोबाड.

वस्ती लेखकांची स्थिरावलेली होती
हाव पाध्यांची उफाळलेली होती

नशा हो सत्तेची नित्य चढत होती
भूक जुगाडाची चाळवलेली होती

प्रतिसादांत त्या मैथुनी क्लांतता* नव्हती
तरी लाईन तिरकी सर्वच उडवली होती

प्रतिसाद डिलीट ही चाल धूर्त होती
मैत्रीमधेच "त्या" त्यांची मने गुंतली होती

नव्या पाध्यांचे चाळे पुन्हा बहरती
जुन्या नानाची ओळख त्यांना नव्हती

* असे शब्द असलेले लेख प्रतिसाद उडवले जात नाहीत असे समजल्यावरुन.

काव्यरस

सॉफ़्ट्वेअर क्षेत्र – मी पाहिले तसे.

लेखक sandeepn यांनी मंगळवार, 22/06/2010 17:33 या दिवशी प्रकाशित केले.

भारताने खुले अर्थिक धोरण अवलंबले आणि बोलता बोलता जागतिकीकरणाचे वारे भारतात वाहू लागले आणि यात सगळा भारत वाहत गेला. नारायण मुर्ती,अझिझ प्रेमजी यासारख्या वल्लींनी सॉफ़्ट्वेअर उद्योगामधे उल्लेखनिय कामगिरी करून दाखवली.आणि पाश्चात्य देशांना कमी किमतीत सॉफ़्ट्वेअर बनवुन देणारी खाण सापडली. बोलता बोलता सॉफ़्ट्वेअर सेवा क्षेत्रामधे भारत अग्रगण्य बनला.सुरवातीला लोकांची कामे कॉम्पुटर करील व लोकांच्या नोकय्रा धोक्यात येतील असे भाकीत वर्तवण्यात आले. पण त्याच कॉम्पुटरमुळे खूप सारय्रा नोकरय्रा उपलब्ध झाल्या.आणि मागणी तसा पुरवठा या मार्गाने सॉफ़्ट्वेअर इजिंनियर लोकांची एक फ़ळीच तयार झाली.