मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

गझल

घोषणा झाली...

अजय जोशी ·
लेखनविषय:
घोषणा झाली मला फेटाळलेली... 'हुश्श' झाली आसवें कंटाळलेली माणसे झाली पहा आता शहाणी फार पूर्वी भोवती घोटाळलेली पालवी कोठे नसू द्या फार मोठी आणि ती नक्की नको नाठाळलेली एकही अश्रू दिसेना आज कोठे गोष्ट होती आजही रक्ताळलेली नेहमी असते खर्‍याची गोष्ट मागे जातसे जत्रा पुढे वाचाळलेली मद्य कसले घेत बसता धुंद होण्या....? जीवने बनवा नशा फेसाळलेली..! खोल आहे मी समुद्रासारखा; पण... आजही देतो उन्हें गंधाळलेली फायदा नसतो उधारी फेडण्याचा माणसे गेल्यावरी सांभाळलेली आजही गावाकडे लज्जा दिसावी... जीवनाची लक्तरे गुंडाळलेली..! टेकला माथा जिथे, तेथेच फुटला... जीवनें इतकी कशी खडकाळलेली..? एकदा ना एकदा होतील

लेले..

गवि ·
लेखनविषय:
अब्द फाटलेले आभाळ रापलेले इडलीमधून वाफा उ:श्वास तापलेले. ओठांतुनी निघाला चमचा तसाच उष्टा त्या कृष्ण कुन्तलाने सांबार गाठलेले.. पार्श्वात काय माझ्या ही वेदना कळेना पंकातल्या बुटांनी नाकाड घासलेले. स्वप्नात का असेना तो मेघ प्राशलेला आयुष्य मात्र सारे श्वानास घातलेले.

माझ्या व्यथे... (गझल)

स्वानंद मारुलकर ·
लेखनविषय:
काव्यरस
परतून सांग तुजला बोलावणार कैसा? नाहीस तू मनाला समजावणार कैसा? पुरते अटून गेले डोळ्यामधून पाणी कल्लोळ भावनांचा मी दावणार कैसा? जहरी तुझ्या स्वरांनी शिवलेस ओठ माझे संवाद अंतरीचा पण थांबणार कैसा? चाहूल पावसाची सुर्या फितूर झाली भेगाळला उन्हाळा ओलावणार कैसा? कंटाळलो कितीही बेरंग जीवनाला आयुष्य तू दिलेले अव्हेरणार कैसा? मी हात लावल्याने कोमेजली बिचारी निष्पाप त्या फुलांना रागावणार कैसा? ना सांगता कधीही येतेस तू समोरी माझ्या व्यथे तुला मी हुलकावणार कैसा? - स्वानंद

... स्मरण असावे (गझल)

अजय जोशी ·
लेखनविषय:
विजयी झाल्यावर याचेही टिपण असावे 'मोठेपणही माणुसकीला शरण असावे..' भेद मोडुया आज असा की सर्व म्हणावे... 'जन्म घेतला त्या धर्मातच मरण असावे' एवढेच मी सांगू शकतो सरळ मनाने.. जीवनासही कोणतेतरी वळण असावे पानोपानी जीवन भरले रसरसलेले.. ती कुठली प्रतिभा होती की दळण असावे..? आज कशाने भावुक झालो..?

नाते तुझे नि माझे ना सापडे अताशा

स्वानंद मारुलकर ·
लेखनविषय:
ज्याची मनास भीती तेची घडे अताशा कोणीच ना पहाते माझ्याकडे अताशा दिसती दुभंगलेले मज सोबती जिवाचे डोळ्यांस काय माझ्या गेले तडे अताशा? मी बोलतो तुझ्याशी साध्यासुध्या मनाने त्यातून शोधिसी का तू वाकडे अताशा दूरातूनी विराणी सनई उदास गाते ह्रदयास घाव देती अन चौघडे अताशा इतके जपून होते ह्रदयात ठेवले की नाते तुझे नि माझे ना सापडे अताशा पूर्वी तुझ्या मनाशी बेबंद बोलणारे- मन बोलता स्वतःशी का गडबडे अताशा? इतके गढूळ झाले जीवन प्रदूषणाने लोकांस तारणारी गाथा बुडे अताशा हुंड्या परी अताशा गेल्या जुन्या प्रथाही दिसतात संपलेले हिरवे चुडे अताशा -स्वानंद

हिंदूर

सन्जोप राव ·
लेखनविषय:
काव्यरस
मिलिंद फणसेंची अप्रतिम सिंदूर आणि आसपासच्या समाजात साचत चाललेली समृद्ध अडगळ यांची मनात गल्लत झाल्याने उमटलेले हे काही वेडेवाकुडे नि:शब्द होत गेलो, मजबूर होत गेलो हिंदू वाचुवाचूनी हिंदूर होत गेलो ठिणग्या विझून गेल्या, पिकल्या जरी मिशाही हसले पुन्हा नेमाडे मी धूर होत गेलो धारा न अमृताच्या पानेच ही सहाशे डोळ्यात नीज येता मगरुर होत गेलो ही कोसलाबिढारे वाचून पाठ होती 'हिंदू' जुन्या बाजारी - मी शूर होत गेलो स्मरणातुनी पुसेना पुसता कथा 'खंड्या'ची काहीच वाचवेना, मी दूर होत गेलो

तु आणि मी (मिसळपाव स्टाईल!)

इंटरनेटस्नेही ·
नमस्कार, मिसळपावच्या इतिहासात प्रथमच खफ वरील साहित्य इथे प्रकाशित करतो आहे. आपण धाग्याचा खफ अनेकदा झालेला पाहिला असेल पण ही अशी ही पहिलीच वेळ असावी की आम्ही खफचाच धागा करुन एक प्रकारे बॅकवर्ड इंटीग्रेशन केले आहे. तरी कोणत्याही पुर्वग्रहदुषित नजरेने आमच्या सदर धाग्याचा आस्वाद घ्यावा आणि प्रतिक्रियांचा पाऊस त्यावर पाडावा ही न्रम विनंती. हे साहित्य आमचे एकट्याचे नसुन आमच्या ह्या योजनेत अभावितपणे सहभागी झालेल्या श्री नावातकायआहे, श्री भेन्डिबाजार, श्री कुक, श्री स्वानंद व सौ.

हिशेबाची माय मेली?

गंगाधर मुटे ·
लेखनविषय:
हिशेबाची माय मेली? कशी झोपडी हीच अंधारलेली? कुण्या उंदराने दिवावात नेली? पुजारी पुसे एकमेकांस आता नटी कोणती आज नावाजलेली? तिला घाबरावे असे काय आहे अशी काय ती तोफ़ लागून गेली? किती नाडती आडदांडे तराजू कशी रे हिशेबा, तुझी माय मेली? कुणी हासला तो कळ्या कुस्करोनी कशी दरवळावीत चंपा चमेली? म्हणालेत आम्ही तुरुंगात डांबू जरी तू कधी अभय फ़िर्याद केली..! गंगाधर मुटे ,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,, (वृत्त - भुजंगप्रयात)