Skip to main content

देखावे..

लेखक विसोबा खेचर यांनी मंगळवार, 29/06/2010 19:01 या दिवशी प्रकाशित केले.
ओळखीचे होते सारे तिथे देखावेच होते न्यारे तिथे! गाईन गीत आता खुशीने वाहतील मोकळे वारे तिथे! लाभेल शांती तिच्या जिवाला आनंदे वाहीन भारे तिथे! फेसाळेल मद्य प्याल्यात आता कोंडाळतील हावरे सारे तिथे! मी आस्तिक, मी नास्तिक उघडीन सारी दारे तिथे! -- तात्या अभ्यंकर.

मास्टर मदन - जगाला पडलेले एक अद्‌भूत स्वप्न !

लेखक जयंत कुलकर्णी यांनी बुधवार, 23/06/2010 11:27 या दिवशी प्रकाशित केले.
मास्टर मदन मास्टर मदन (जन्म २८-१२-१९२७. मृत्यू :६-६-१९४२) २८ डिसेंबरला परमेश्वराच्या हातून एक मोठी चूक घडली. त्या चुकीसाठी मला नाही वाटत तो स्वत:ला कधी माफ करु शकेल. या दिवशी त्याने त्याच्या विश्वातल्या एका गाणार्‍या स्वर्गिय गंधर्वाला चुकून या मर्त्य जगात पाठवले. ते साल होते १९२७. अवघ्या १४ वर्षाच्या आयुष्यात गायनाच्या कुठल्या पातळीवर तो पोहोचला होता ते आता आपण बघुया. हा शापीत गंधर्व पंजाबमधल्या जालंदर लिल्ह्यातल्या एका खानेखाना नावाच्या गावात एका शीख कुटूंबाच्या घरात अवतीर्ण झाला. त्याचे नाव “मास्टर मदन”.

संजीवनी

लेखक मृत्युन्जय यांनी बुधवार, 16/06/2010 12:18 या दिवशी प्रकाशित केले.
रंग होते राग होते गंध होते सोबती या जीवणिचे हास्य तरीही स्पंदने माझे मागती चन्द्र होता, होत्या तारका माझ्या संगती हस्ताचे नक्षत्र तरीही तृषार्त ओठ माझे मागती एकाचवेळी प्राजक्त आणि रातऱाणी माझ्या सभोवती या मिठीचा एक क्षण हीच मात्र माझी संजीवनी कोवळेसे उन होते आज माझ्या अंगणी मागतो मी मात्र त्या निष्पर्ण तरुची सावली वाहून गेली कित्येक युगे डोळ्यासमोरूनि उरल्या मागे केवळ काही क्षणांच्या आठवणी
काव्यरस

नको तेच झाले

लेखक क्रान्ति यांनी शुक्रवार, 11/06/2010 14:44 या दिवशी प्रकाशित केले.
पुन्हा पेच झाले; असेही, तसेही नको तेच झाले; असेही, तसेही जरा बोलले मी; रुढीहून काही निराळेच झाले; असेही, तसेही किती सोडवावे? पुन्हा उत्तरांचे उखाणेच झाले; असेही, तसेही मुके राहणेही विरोधात माझ्या, पुरावेच झाले; असेही, तसेही फुका बोलबाला ऋतूपालटाचा, उन्हाळेच झाले; असेही, तसेही कशाला निमित्ते हवी भेटण्याची? दुरावेच झाले; असेही, तसेही मला हासताना हसे शेवटी या जगाचेच झाले; असेही, तसेही

चाँद तनहा है..

लेखक मस्त कलंदर यांनी शुक्रवार, 04/06/2010 11:14 या दिवशी प्रकाशित केले.
एके काळी मस्त लाईफ होती.. रोज संध्याका़ळी लायब्ररीत जाऊन नवीन पुस्तक आणायचं.. येईल तसा स्वयंपाक पक्षी: माझ्या नि फ्लॅटमेटच्या पोटावर प्रयोग करणारं काहीतरी बनवायचं.. ती आली की जेवायचं.. त्यानंतरच्या आवराआवरीचं आणि सास-बहू सिरियल पाहाण्याचं काम तिचं!! नि मी पळायचे माझ्या बेडरूममध्ये.. हातात पुस्तक.. नि सोबतीला.. विन ९४.६ वरचं खनक विथ रोशन अब्बास!!!! मस्त गाणी लागायची.. एक वाजेपर्यंत पुस्तक वाचून संपायचं आणि मी दुसर्‍या दिवशी नवीन पुस्तक आणायला सज्ज व्हायचे.. (रोज मला कुठलं पुस्तक द्यायचं म्हणून तिथले लोक बिचारे वैतागले होते). खनक आम्हा बर्‍याच जणांचा आवडता कार्यक्रम!!

दिले नादान तुझे हुआ क्या है.......

लेखक जयंत कुलकर्णी यांनी शनिवार, 29/05/2010 18:26 या दिवशी प्रकाशित केले.
दिले नादान तुझे हुआ क्या है.... ही ग़ालीबची गज़ल माहीत नसणारा माणूस भारतात मिळणे कठीण. याचा अर्थ खरच समजवून घ्यायचा असेल तर आपल्याला सुफी संप्रदायाबद्दल थोडीशी माहीती करुन घ्यायला लागेल. आपण ही माहीती या सारख्या गज़लेच्या आणि गालीब सारख्या कवींच्या बाबतीतच फक्त करुन घेऊ. सुफी संप्रदायावर मी लवकरच www.jayantpune.wordpress.com वर लिहीणार आहे त्यात आपल्याला अधिक माहीती मिळेळ. सुफी संप्रदायाच्या मते आपल्या अध्यात्माच्या प्रवासात आपल्याला सात टप्पे ओलांडावे लागतात. या प्रवासाला ते “मार्ग” म्हणतात आणि जो हे करायचा प्रयत्न करतो त्याला सालिक म्हणतात.

सस्नेह आमंत्रण : गझल सहयोग तर्फे गझल मुशायरा

लेखक अजय जोशी यांनी शुक्रवार, 21/05/2010 00:24 या दिवशी प्रकाशित केले.
अजय अनंत जोशी आणि भूषण कटककर (बेफिकीर) सादर करीत आहेत गझल सहयोग तर्फे गझल मुशायरा.... " ऋतु गंधाळुनी गेले " दिनांक २३ मे २०१०, रविवार रोजी सायंकाळी ६ ते ८ यावेळात... विशाल सह्याद्री सदन, सदाशिव पेठ, अभिनव कला महाविद्यालयाच्यामागे, हॉटेल विश्वची गल्ली, टिळकरोड जवळ, पुणे ३० या ठिकाणी... आपणा सर्वांना सस्नेह आमंत्रण ! " ज्येष्ठ शायर ईलाही जम

सजा

लेखक क्रान्ति यांनी रविवार, 16/05/2010 12:13 या दिवशी प्रकाशित केले.
उदासी नसे, मौन हे बोलते खुशाली विचारी मला रोज ते! दिले सोडुनी मी मनाला, जसे प्रवाहात कोणी दिवे सोडते धरेला नकोशी असे काय मी? खचे ती, जिथे पाय मी रोवते! अरे चित्रगुप्ता, जरा सांग ना, कसे पुण्य अन् पाप ते कोणते? पुराव्यानिशी सिद्ध निष्पाप मी, न केल्या गुन्ह्याची सजा भोगते!

जाऊन जराशी येते

लेखक sur_nair यांनी शुक्रवार, 23/04/2010 22:28 या दिवशी प्रकाशित केले.
जाऊन जराशी येते, तू सांगून गेलीस होती मी अजुनी पिसतो पाने, क्षण जाती बघ निसटुनी जाण्या आधीचा डाव, मी जिंकून नेला होता हा दोष असे पानांचा, का व्यर्थ रोष माझ्याशी? दोघात तुझ्या नि माझ्या, तू राजा आणिक राणी हे भाग्य असे गे माझे, होतसे तुझी गुलामी आयुष्य असो की पाने, हा डाव घडी दो घडीचा भोगून घे खेळापुरती, शेवट जाई विखरुनी सुरेश नायर http://sites.google.com/site/surmalhar/
काव्यरस

गझलचे छन्द्शास्त्र...

लेखक प्रदीपा यांनी मंगळवार, 13/04/2010 12:18 या दिवशी प्रकाशित केले.
मिपा वर गझल वर बरच काही वाचायला मिळाले... मनात आल, आपल्याला माहीती असलेल बा़कीच्याना ऐकवाव. नाहीतरी समर्थ सान्गुन गेले आहेत ..जे जे आपणासी ठावे, ते ते दुसर्याशी सान्गावे, शहाणे करुन सोडावे - सकल जन... तर... असो!... आता जरा ह्या शेराकडे लक्श द्या. ' तोच रस्ता त्याच वाटा, चालतो आहे नव्याने .. तीच दु:खे, त्याच जखमा सोसतो आहे नव्याने' .....कसा आहे? अजुन एक पहा.... ' रस्ता असा मिळाला कोठेच झाड नव्हते, माझ्याच सावलीवर आता विसावतो मी' अथवा... ...."त्या च भिन्ती, तीच दारे-फक्त नाही आत कोणी . आज मी माझ्या घराला पाहतो आहे नव्याने...' जबरदस्त आहे ना? ....लोकहो, गैरसमज नको...