... स्मरण असावे (गझल)
लेखनविषय:
विजयी झाल्यावर याचेही टिपण असावे
'मोठेपणही माणुसकीला शरण असावे..'
भेद मोडुया आज असा की सर्व म्हणावे...
'जन्म घेतला त्या धर्मातच मरण असावे'
एवढेच मी सांगू शकतो सरळ मनाने..
जीवनासही कोणतेतरी वळण असावे
पानोपानी जीवन भरले रसरसलेले..
ती कुठली प्रतिभा होती की दळण असावे..?
आज कशाने भावुक झालो..? प्रेम दाटले..?
आज पहा, चंद्राला नक्की ग्रहण असावे
क्षणाक्षणाला बदलत असते 'हो' की 'नाही'
नशीबासही कोणतेतरी बटण असावे
लुकलुकणारे डोळे धापा टाकत होते
आयुष्याच्या अंतीसुद्धा चढण असावे...?
देव नाकारला पण विवेक सुटला नाही
त्यांच्या अंगी निश्चीतच देवपण असावे
सात्विक वृत्ती अधिक जरा आकर्षित बनण्या..
थोडकेच, पण जीवनातही लवण असावे
एवढा कसा मोठा झाला इतक्यामध्ये ?
नक्की तेथे कोणते असे कुरण असावे..?
असे म्हणत नाही मी, की तू उचलुन घ्यावे..
एवढेच म्हणतो की थोडे स्मरण असावे
वाचने
1395
वाचनखूण
प्रतिक्रिया
6
अतिशय सुंदर गझल ..
विजयी झाल्यावर याचेही टिपण असावे
'मोठेपणही माणुसकीला शरण असावे..'
हा मतलाच खुप मोठे विचार सांगुन गेला .. अतिशय सुंदर विचार अआणि तितकेच सुंदर शब्द.
-
असे म्हणत नाही मी, की तू उचलुन घ्यावे..
एवढेच म्हणतो की थोडे स्मरण असावे
अतिशय जबरदस्त शेवट ...
------------
गझलच्या शेवटच्या शेरा मध्ये स्वता बद्दल कींवा तशे येणार्या भाव बद्दल लिहिणे हा एक रुल होता ..
आजकाल बर्याच गझल मध्ये तसे पाहवयास नाही मिळत .. परंतु तुम्ही छान लिहिले आहे...
लिहित रहा .. वाचत आहे
पुढिल गझल लिहिण्यास शुभेच्छा ..
पुढील वेळेस ह्रस्व दिर्घ प्रत्येक ओळीतील फॉलो झाल्यास बघा.
खुप मज्जा येते तसे लिहायला ..
वाचण्यास उत्सुक ...
गणेशा,
मनापासून धन्यवाद!
पुढील वेळेस ह्रस्व दिर्घ प्रत्येक ओळीतील फॉलो झाल्यास बघा.
खुप मज्जा येते तसे लिहायला ..
तुम्ही हे लिहिलेत म्हणून सांगतो की तशा माझ्या किमान ६० गझला असतील ज्यात लघु-गुरू प्रमाणे क्रम आहे. असो. पुन्हा धन्यवाद!
In reply to गणेशा, मनापासून by अजय जोशी
[:)]
तुमच्या ह्या गझल वरुनच ते लक्षात येते आहे, की तुम्ही बरेच गझल लिहिल्या असतील असे
असो द्यावे हळु हळु .. नक्की वाचेन ...
(पुणेरी असुनही मुंबईकर)
गणेशा
सुंदर आहे गझल.
रचना आवडली.
विजयी झाल्यावर याचेही टिपण असावे
'मोठेपणही माणुसकीला शरण असावे..'
एवढेच मी सांगू शकतो सरळ मनाने..
जीवनासही कोणतेतरी वळण असावे
आज कशाने भावुक झालो..? प्रेम दाटले..?
आज पहा, चंद्राला नक्की ग्रहण असावे
लुकलुकणारे डोळे धापा टाकत होते
आयुष्याच्या अंतीसुद्धा चढण असावे...?
सात्विक वृत्ती अधिक जरा आकर्षित बनण्या..
थोडकेच, पण जीवनातही लवण असावे
असे म्हणत नाही मी, की तू उचलुन घ्यावे..
एवढेच म्हणतो की थोडे स्मरण असावे
या कल्पना छान. :)
"आकर्षित" च्या ऐवजी "आकर्षक" असे हवे काय?
अतिशय सुंदर गझल .. विजयी