मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

घोषणा झाली...

अजय जोशी · · जे न देखे रवी...
लेखनविषय:
घोषणा झाली मला फेटाळलेली... 'हुश्श' झाली आसवें कंटाळलेली माणसे झाली पहा आता शहाणी फार पूर्वी भोवती घोटाळलेली पालवी कोठे नसू द्या फार मोठी आणि ती नक्की नको नाठाळलेली एकही अश्रू दिसेना आज कोठे गोष्ट होती आजही रक्ताळलेली नेहमी असते खर्‍याची गोष्ट मागे जातसे जत्रा पुढे वाचाळलेली मद्य कसले घेत बसता धुंद होण्या....? जीवने बनवा नशा फेसाळलेली..! खोल आहे मी समुद्रासारखा; पण... आजही देतो उन्हें गंधाळलेली फायदा नसतो उधारी फेडण्याचा माणसे गेल्यावरी सांभाळलेली आजही गावाकडे लज्जा दिसावी... जीवनाची लक्तरे गुंडाळलेली..! टेकला माथा जिथे, तेथेच फुटला... जीवनें इतकी कशी खडकाळलेली..? एकदा ना एकदा होतील विजयी... आजही दु:खे उरी कवटाळलेली

वाचने 1759 वाचनखूण प्रतिक्रिया 9
फारच अंतर्मुख करणार्‍या ओळी. आपली "स्मरण असावे" कविता वाचल्यापासून मी आपली फॅन आहे. >> नेहमी असते खर्‍याची गोष्ट मागे जातसे जत्रा पुढे वाचाळलेली >> क्या बात है! >> खोल आहे मी समुद्रासारखा; पण... आजही देतो उन्हें गंधाळलेली>> हे खासच. >> घोषणा झाली मला फेटाळलेली... 'हुश्श' झाली आसवें कंटाळलेली>> कळस

बिपिन कार्यकर्ते 06/11/2010 - 19:33
छान!

In reply to by बिपिन कार्यकर्ते

विसोबा खेचर 09/11/2010 - 11:14
सहमत..

प्राजु 13/11/2010 - 03:14
अतिशय आशय संपन्न गझल!! सुरेख! एकही अश्रू दिसेना आज कोठे गोष्ट होती आजही रक्ताळलेली नेहमी असते खर्‍याची गोष्ट मागे जातसे जत्रा पुढे वाचाळलेली मस्तच!