अलविदा मिसळपाव!
अलविदा, मिसळपाव!
या शेवटच्या लेखासह मी तात्पुरता 'मिपा'वरून एक "सहभागी लेखक" म्हणून नाहींसा होत आहे.
या संस्थळावर मी आलो तो तात्यांच्या आग्रहावरून. आल्यापासूनच मला कधीच comfortable (याला मराठी प्रतिशब्द सुचत नाहींय्) वाटले नाहीं. कदाचित् हा माझ्या वयाचा परिणाम असेल. कदाचित् श्री सामंत याच कारणाने बाहेर पडले असतील. पण मला आता इथे बरे वाटत नाहीं म्हणून मी रजा घेत आहे.
मला इथे अनेक नवीन "पुतणे-पुतण्या" मिळाल्या. कांहींची तर खूपच गट्टी झाली. एक सभासद तर (खराखुरा) भाचा निघाला. या सर्वांची आठवण येऊन कांहींसे औदासिन्य वाटेलच.
मिसळपाव