(थंड झाले खाकरे गं)

३_१४ विक्षिप्त अदिती's picture
३_१४ विक्षिप्त अदिती in जे न देखे रवी...
18 Aug 2011 - 1:53 am

बरेच दिवस खुणावणारी वाचनखूण आज काढता येईल. हुश्श.

थंड झाले खाकरे गं अन्नपूर्णे माफ कर
विसर तो स्वयपाक सारा, गटकूनिया साफ कर

वेड लागे मम खिशाला विकतचेही खायला
वेड लावे याद मजला, या समोसा खायला
यायचे ते का न मजला, अरण्यरूदन बास कर
थंड झाले खाकरे गं अन्नपूर्णे माफ कर

भाजण्याही भाकर्‍या मम दादला आला पुढे
फोडण्या या चढविता का ओगराळी खडखडे?
ना कुणी तुझ भरवण्याला तू अपेक्षा लाख कर
थंड झाले खाकरे गं अन्नपूर्णे माफ कर

काय जळले, का करपले, शोधिता इथल्या खुणा
मी नि माझीच पाककॄती बाकी कुणी काही म्हणा
वाट लावू पूर्णब्रह्मी "खाद्यरसिका तूच मर!"
थंड झाले खाकरे गं अन्नपूर्णे माफ कर

दोष कोणा काय देऊ अन्नपूर्णे, सांग ना
'पाकी' जे कौशल्य नाही हा कसा ठरला गुन्हा
चाड ना मेहेनतीची, हेच आता मान्य कर
थंड झाले खाकरे गं अन्नपूर्णे माफ कर

खाउनी मग तामसी होईल थोडी बोंबही
खर्चुनी नोटा जरा घेईन त्यावर दारूही
वेदना संवेदनांची आज काशी केली तर
थंड झाले खाकरे गं अन्नपूर्णे माफ कर

(हे पूर्ण करण्यात मदत करणार्‍या काही मित्रमैत्रीणींचा ऋणनिर्देश करणे अनावश्यक आहे.)

भयानकविडंबन

प्रतिक्रिया

ढब्बू पैसा's picture

18 Aug 2011 - 2:05 am | ढब्बू पैसा

अदितीबै, खाकरे थंडच खातात त्यामुळे इतकी माफी मागण्याची गरज नाही!

अवांतर :फारच आगावू आहेस बै तू! एकाच दिवसात दोन धागे, त्यातला एक विचाप्रवर्तक वेग्रे आणि दुसरं विडंबन! कित्ती कित्ती व्हर्साटाईल आहेस! (विडंबन झक्कास हेवेसांन;) )

बहुगुणी's picture

18 Aug 2011 - 2:59 am | बहुगुणी

_/\_!

प्रियाली's picture

18 Aug 2011 - 3:47 am | प्रियाली

:) :) :) :) आले बॉ एकदाचे ;)

आमचे एक वरिजनल विडंबन होते, ते अर्धवटच राहिले. मिटिंगांचा खेळ लय वाईट. :(

हलकट्ट सारी लेकरे रे, संकेतस्थळा माफ कर ;)

राजेश घासकडवी's picture

18 Aug 2011 - 4:15 am | राजेश घासकडवी

येणार येणार, कोणीतरी टाकेल, हातरी नाहीतर तोतरी, असं म्हणत असताना आदिती यांच्याकडून आलं विडंबन.

लय भारी.

प्रियाली यांना : मी तुमच्या विडंबनाची पुढची ओळ सुचवतो, बघा आवडते का?

हलकट्ट सारी लेकरे रे, संकेतस्थळा माफ कर
विसरती ज्येष्ठां सुधा, ढळढळित अपमानपर

ह. घ्या. - याचा अर्थ तुम्ही हलकटपणे घ्या असा लावलात तर त्याला मी जबाबदार नाही.

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

18 Aug 2011 - 4:26 am | ३_१४ विक्षिप्त अदिती

येणार येणार, कोणीतरी टाकेल, हातरी नाहीतर तोतरी, असं म्हणत असताना आदिती यांच्याकडून आलं विडंबन.

हीतरी नाहीतरी तोतरी म्हणायला हरकत नव्हती. असो, कोटीसाठी इथे माफ करण्यात आल्या गेलं आहे.

कवितेत शुद्धलेखनाचं स्वातंत्र्य घेतलं गेलं हे ठीक आहे, पण प्रतिसादात मला आदिती म्हणण्याचा क्षूद्रपणा का बरं?

प्रियाली's picture

18 Aug 2011 - 5:28 am | प्रियाली

पुढली ओळ मस्तच होती, हे घ्या आणखी थोडे पण वेळेअभावी एक ओळ सुचत नाही. सुचवता का? पण हा प्रतिसाद उडण्याची शक्यता आहे हे हलकट्टपणेच सांगते. ;)

हलकट्ट सारी लेकरे रे, संकेतस्थळा माफ कर
विसरती ज्येष्ठां सुधा, ढळढळित अपमानपर

वेड होते त्या जिवाला मनोगताशी भांडला
वेड 'तात्या'ला _____________________
यायचे ते ना पुन्हा, तू वाट बघणे बास कर..
हलकट्ट सारी लेकरे रे, संकेतस्थळा माफ कर

गाळलेल्या जागा भरा. तिरक्या अक्षरांतील ओळ तशीच आहे, त्यात बदल नाही. समझनेवालोंको इशारा काफी है| ;)

पंगा's picture

18 Aug 2011 - 4:38 am | पंगा

का ते सांगणे कठीण आहे, पण मजा आली नाही. कसेही जुळवायचेच म्हणून उगाच ओढूनताणून जुळवल्यासारखे वाटले.

एक उदाहरणच घ्यायचे झाले, तर 'वाट लावू पूर्णब्रह्मी'ला 'भाडखाऊ लोकशाही'चा ठसका नाही, शिवाय त्याच्या जवळपासही जात नाही. (भकारादि शब्द असलाच पाहिजे असे म्हणणे नाही, किंबहुना त्याचे खास आकर्षणही नाही, पण मूळ कवितेत वापरलेल्या शब्दाची केवळ ध्वनिसाधर्म्याने आठवण करून देऊ शकणारा एखादा शक्यतो भकारादि क्याटेगरीत न मोडणारा परंतु तितकाच ठसकेबाज शब्द वापरता आला असता, तर कौशल्य दिसते. असा कोणता शब्द वापरता येईल तो मी सुचवू शकणार नाही, ती माझ्या बस, झुकझुकगाडी, जहाज किंवा विमानाची बात नाही. ती डोकेदुखी कवयित्रीची.)

बाकी तांत्रिकदृष्ट्या वृत्तात वगैरे ठिकठिकाणी गंडले आहे, ते वेगळेच.

एकंदरीत काही खास वाटले नाही. पुविशु.

(अवांतर: मिपावर सध्या एक बुज़ुर्ग विडंबनसम्राज्ञी तूर्तास सुप्तावस्थेत आहेत. त्यांनी मनावर घ्यायचे ठरवलेच तर बहार आणू शकतील असे वाटते. चूभूद्याघ्या.)

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

18 Aug 2011 - 10:52 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

आक्षेप मान्य आहे.

'वाट लावू पूर्णब्रह्मी'ला 'भाडखाऊ लोकशाही'चा ठसका नाही, शिवाय त्याच्या जवळपासही जात नाही

'काड्याघालू' वगैरे शब्द सुचले होते. पण मात्रांचा घोळ होतो ना. असो, स्वतःलाच पुविशु देते.

आत्तापर्यंत सर्वात आवडलेली कविता :) छान लिहीली आहेस आदिती.

शहराजाद's picture

18 Aug 2011 - 6:45 am | शहराजाद

मस्त विडंबन!

विजुभाऊ's picture

18 Aug 2011 - 7:51 am | विजुभाऊ

शंका: खाकरे हा प्रकार थंडच खातात (थंड याच अर्थ तव्यावरून उतरवून बराच वेळ झाला आहे असे.):

अवांतर: अरे अरे अरे.... स्वतन्त्र प्रतिभेच्या व्यक्तीमत्वावर विडंबनासारख्या परोपजिवी प्रकार हाताळण्याची वेळ यावी?
स्वगतः बिचार्‍या घासु गुर्जीनी तरी कशाकशाला म्हणून "लै भारी" असे म्हणायचे ?

मनराव's picture

18 Aug 2011 - 11:02 am | मनराव

छाण...........

श्रावण मोडक's picture

18 Aug 2011 - 11:13 am | श्रावण मोडक

*&^%$#%&*(*
असो!

श्रावण मोडक's picture

18 Aug 2011 - 11:14 am | श्रावण मोडक

प्रकाटाआ

सूड's picture

18 Aug 2011 - 12:56 pm | सूड

__/\__
आवडल्या गेले आहे.

बिपिन कार्यकर्ते's picture

18 Aug 2011 - 1:06 pm | बिपिन कार्यकर्ते

अदिती, घासुगुर्जी, प्रियाली : _/\_

प्राजक्ता पवार's picture

18 Aug 2011 - 2:01 pm | प्राजक्ता पवार

छान !

अत्रुप्त आत्मा's picture

18 Aug 2011 - 2:29 pm | अत्रुप्त आत्मा

लगे रहो....ठपाठप....ठपाठप....:smile:

सुवर्णमयी's picture

18 Aug 2011 - 4:51 pm | सुवर्णमयी

थंड झाले खाकरे गं अन्नपूर्णे माफ कर
विसर तो स्वयपाक सारा, गटकूनिया साफ कर

झाल .. पुढच काही वाचायची गरजच नाही!

परिकथेतील राजकुमार's picture

18 Aug 2011 - 6:30 pm | परिकथेतील राजकुमार

मंद काही अनिवासी सॅमकाका माफ कर...

ह्या विडंबनाचे पुढे काय झाले ?

रमताराम's picture

18 Aug 2011 - 8:24 pm | रमताराम

दुरुस्ती करू का जरा?
नवश्रीमंत या शब्दाप्रमाणेच 'नवअनिवासी' असा शब्दप्रयोग सुचवू का?
(अदिती दूरदेशी असल्याने मार टाळता येत असल्यानेच हे धाडस करतो आहे. )
(हलकेच घे गं, नायतर तिकडून सुपारी देशील माझी. शाब्दिक कोटी करण्याची उबळ आली की आमचा अगदी पुल होतो, स्थळकाळाचे म्हणा की कोणाशी पंगा घेतोय त्याचे भान रहात नाही.)

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

18 Aug 2011 - 8:27 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

नाही, माझी अजिबात हरकत नाही. पण मात्रा हुकतात ना! आता मूळ कवितेतल्या मात्र मोजताना माझं गणित हुकलं ते तर ठीकच, पण आता तुझी सूचना आहे तर तूच लिही की दोन चार ओळी!
बाकी मी तशी हिंसक नाहीच, उरता उरले शाब्दिक फटाके, ते काय दूरदेशातूनही फोडता येतात.

रमताराम's picture

18 Aug 2011 - 10:34 pm | रमताराम

आता तुझी सूचना आहे तर तूच लिही की दोन चार ओळी!
मी?....मी??...मी कविता लिहू.... एकदम कविता???
नाही म्हातारपणी बुद्धी भ्रष्ट होते म्हणतात ते मान्य आहे, पण एवढाही काही 'हा' झालो नाही मी. आपली कविता लिहिण्याची लायकी आपल्याला ठाऊक आहे. काही जालकविता वाचून हा सुज्ञपणा आणखी काही लोकात असता तर कित्ती बरं झालं असतं असा विचार चाटून जातो. (अर्थात हा टोमणा तुला नाही हे वे. सां. न. ल.)
आणि मात्रांचे म्हणाल तर आता या वयात आमचा संबंध फक्त 'सूतशेखर' किंवा तत्सम मात्रेशी.
पण एखाद्या वैयाकरणाला विचारलेस तर तो लगेच 'नवअनिवासी' ऐवजी 'नवऽनिवासी' असा शब्द वापरून एक मात्रा कशी वाचते ते समजावून सांगेल कदाचित.

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

19 Aug 2011 - 2:59 am | ३_१४ विक्षिप्त अदिती

मंद सारे अनिवासी सॅमकाका माफ कर
बदल व्हीजा नियम आता जाळुनीया राख कर

वेड लावे आयटी अन गोरटेली यौवना
वेड कसले रॅटरेसच, थांबला तो संपला
जायचे हरित देशी, आणि म्हणणे 'फॉर हियर'
मंद सारे अनिवासी सॅमकाका माफ कर

पुढचं कोण लिहीणारे?

प्रभो's picture

18 Aug 2011 - 6:50 pm | प्रभो

खंगरी!!

प्रयत्नातून बनलेला खुसखुशीत खाकरा आवडला! ;)

बाकी मदत करणार्‍यांच्या ऋणात कायम राहण्यासाठी त्यांचा निर्देश न करणं ही आदितीची कल्पना आवडली! ;)

(खाकरेप्रेमी)रंगा

प्रियाली's picture

18 Aug 2011 - 6:59 pm | प्रियाली

बाकी मदत करणार्‍यांच्या ऋणात कायम राहण्यासाठी त्यांचा निर्देश न करणं ही आदितीची कल्पना आवडली!

अं.. उह उह! (खाकरले... खाकरण्याचा आवाज कसा लिहायचा हे माहित नसल्याने जे लिहिले ते गोड मानून घ्यावे.)

चतुरंग's picture

18 Aug 2011 - 7:02 pm | चतुरंग

असा केला तरी चालले असते आम्ही समजून घेतले असते! ;)

(समजूतदार्)रंगा

कवितानागेश's picture

18 Aug 2011 - 7:41 pm | कवितानागेश

:D

पैसा's picture

18 Aug 2011 - 8:56 pm | पैसा

खाकरा स्वतः खायची वेळ आली? मला वाटलं नवरा हा असल्या प्रयोगांसाठी असतो!!

आपण वर्षातून एकदा का होईना स्वयंपाक करतो हे दाखवण्याचा क्षीण प्रयत्न! ;-)