Skip to main content

क्रांती -- काही असे काही तसे ,,, पुन्हा पुन्हा जगावेसे

लेखक ५० फक्त यांनी गुरुवार, 18/08/2011 23:34 या दिवशी प्रकाशित केले.
हल्ली असे क्षण फार कमी येतात आपल्या आयुष्यात की जे पुन्हा पुन्हा जगावे वाटतात, म्हणजे मागच्या पिढितल्यांना त्यांचे सगळं आयुष्य पुन्हा जगावसं वाटत असेल असं नाही, पण म्हणुनच हा लेखनप्रपंच तायडीच्या म्हणजे क्रांतीच्या जीवनातल्या अनेकोत्तम सुखी क्षणांपैकी काही क्षण पुन्हा जगवण्यासाठी.(अशी जड जड वाक्यं सुरुवातीला टाकली म्हणजे आता उशिर झाल्याबद्दल शिव्या नको खायला). मा.

वादळाची जात अण्णा

लेखक गंगाधर मुटे यांनी गुरुवार, 18/08/2011 08:02 या दिवशी प्रकाशित केले.
अण्णा हजारे
वादळाची जात अण्णा माणसे खंबीरतेने, टाकतेया कात अण्णा इंडियाला भावला हा, एक झंझावात अण्णा धर्म सत्तेचा कळेना, का असा सोकावलेला? भ्रष्ट नेते मोकळे अन, कोठडीच्या आत अण्णा भ्रष्ट आचारास सत्ता, मुख्य झाला स्रोत आहे घाव घाला केंद्रस्थानी, एकदा द्या मात अण्णा एक आशेचा

आमची बी एक

लेखक मुक्तसुनीत यांनी गुरुवार, 18/08/2011 01:55 या दिवशी प्रकाशित केले.
आमची प्रेरणा : ही भयभीषण कविता कुंथताति अक्षरे गे आदिती तू बास कर विसर षंढ-गंध आता , जाळुनीया राख कर वेड होते त्या मिपाला, मांडिशी तू भोंडला वेड 'तात्या'ला तुझे जो, कायमीचा झोपला यायचे ते ना पुन्हा, तू वाट बघणे बास कर.. कुंथताति अक्षरे गे आदिती तू बास कर टांगण्या वेशीवरी तव लक्तरे सारे पुढे चिंधड्या तव "कव्वितेच्या" फ़ाडती शेंबडी मुले ना कुणी तुज तारीफेला , तू अपेक्षा लाख कर!! कुंथताति अक्षरे गे आदिती तू बास कर कोण झोपे, काय झाले, ना इथे पडले कुणा "भीक नाही , काव्य आवर" बाकी कुणी काही म्हणा "जळ्ळीं मेली लक्षणे ती, हे रसीका तूच मर!"

माझी ललाटरेषा

लेखक गंगाधर मुटे यांनी शनिवार, 13/08/2011 17:37 या दिवशी प्रकाशित केले.
माझी ललाटरेषा धुंदीत वैभवाच्या, मस्तीत चूर झाली माझी ललाटरेषा, मजला फितूर झाली तब्बेत माणसाची, आहे जटील कोडे जी काल भ्याड होती, ती आज शूर झाली ते वीर स्वाभिमानी, जे झुंजले रणाला औलाद आज त्यांची, का "जी हुजूर" झाली? घे घट्ट आवळूनी, करपाश रेशमाचे भासे असे जसे की, दमछाक दूर झाली घे हा 'अभय' पुरावा, त्यांच्या परिश्रमाचा ती माणसेच होती, जी कोहिनूर झाली                                  गंगाधर मुटे ------------------------------------------

आयुष्य-पुष्प

लेखक अभिजीत राजवाडे यांनी गुरुवार, 11/08/2011 17:06 या दिवशी प्रकाशित केले.
तुला पाहिले मी बाकि काही पाहिले ना, आयुष्य पुष्प फक्त!, अन्य काही वाहिले ना. उध्वस्त झाले गाव, मला काय त्याचे, मी विचारले कि, माझे घर राहिले ना? तुच्छ वाटे मजला दुःख कोणतेही, फसवे वचन तुझे ते सांग साहिले ना. जे पाहिले होते मी तुझ्या संगतीने, ते विश्व चांदण्यांचे अद्याप पाहिले ना.

अंधार

लेखक अभिजीत राजवाडे यांनी रविवार, 07/08/2011 22:28 या दिवशी प्रकाशित केले.
स्वप्नांच्या सुंदर वाटेवर ,मी धडपडतो आहे, समईची येते याद, अंधार वाढतो आहे. मोत्यांना मानेवरच्या, शेवटी पाहिले होते, शुभ्रधवल तो मोती, नयनात दाटतो आहे. तुटलेल्या त्या नात्यांना मी किड लावली होती, इतुकी की माझ्या मी, मनात सडतो आहे. माहित नाही मजला गाडलो किती मी आहे घावात क्षणाच्या येथे, मी अजुन सापडतो आहे.

गात येथे तू उगा का थांबलेला

लेखक विदेश यांनी गुरुवार, 28/07/2011 17:48 या दिवशी प्रकाशित केले.
गात येथे तू उगा का थांबलेला वाहवा तो करुन मारा पेंगलेला ! जाउ दे त्याला किती उंचावरीही - दोर आम्ही नीट त्याचा कापलेला तोंड भरुनी मानलेला जो सलोखा पाठ फिरताना गळा का दाबलेला ?
काव्यरस

क्रांतितै चे अभिनंदन

लेखक परिकथेतील राजकुमार यांनी मंगळवार, 26/07/2011 11:46 या दिवशी प्रकाशित केले.
आपल्या मिपाची सभासद क्रांतितै हिच्या दोन पुस्तकांचे प्रकाशन नागपूरला यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान सभागृह, शंकर नगर येथे संपन्न होत आहे. दि. ७-८-२०११रोजी सायंकाळी ६ वाजता,मान्यवर श्री. भीमराव पांचाळे, गझलनवाज यांच्या शुभहस्ते, श्री. गिरीश गांधी यांच्या प्रमुख उपस्थितीत आणि डॉ. सुलभा हेर्लेकर यांच्या अध्यक्षतेखाली "असेही-तसेही" हा गझलसंग्रह आणि "अग्निसखा" हा काव्यसंग्रह प्रकाशित होणार आहे.

शिल्लकेला जीव जर का आणखी

लेखक धनंजय यांनी गुरुवार, 21/07/2011 23:13 या दिवशी प्रकाशित केले.
शिल्लकेला जीव जर का आणखी - - - - - शिल्लकेला जीव जर का आणखी ढंग जगण्याचा ठरवला आणखी - उष्णता नरकामध्ये ती काय-शी जाळ दुखर्‍या अंतरीचा आणखी - रागरुसवे खूप त्यांचे पाहिले आज त्यावर कळस झाला आणखी - का निरोप्या पत्र देता निरखतो? तोंडचा संदेश का बा आणखी?

कुणाला कुणाचे कशाला हवे

लेखक धनंजय यांनी मंगळवार, 12/07/2011 07:56 या दिवशी प्रकाशित केले.
कुणाला कुणाचे कशाला हवे
- - -
जळाला तळ्याचे कशाला हवे मनाला जनाचे कशाला हवे
.
कुठे काय झाले कधी अन् कसे कुणाला कुणाचे कशाला हवे
.
दुखवट्यामध्येही मुखवटे बरे रडे काळजाचे कशाला हवे
.
चिता चंदनाची ढिगाने फुले मढे माणसाचे कशाला हवे