अन्नदाता सुखी भव भाग १ - PL 480
(मागील भागाच्या सुरवातीला थोडीशी छपाईची गल्लत झाल्याने "अन्न दाता सुखी भव" या नंतर दिसणारा विसर्ग असा दिला गेला की "भव" हा शब्द "…सुखी भव : भाग १" असा दिसण्याऐवजी "…. सुखी भवः भाग १" असा दिसत होता. त्यांत आता योग्य ती सुधारणा केली आहे. सध्याच्या काळांत संस्कृत भाषेचा असा अजाणता देखील केलेला चुकीचा वापर अक्षम्य ठरेल. तरीही क्षमस्व!)
काळाच्या गरजेनुसार लोकमान्य टिळकांनी गणेशोत्सव आणि शिवजयंती हे उत्सव सुरू केले. हे उत्सव लोकांना एकत्र जमवून जनजागृती करण्याकरता केंद्र बिंदू ठरावेत हे अपेक्षा होती.