Skip to main content

इतर भारतीय भाषांमधुन मराठीत अनुवादीत पुस्तके सुचवा.

इतर भारतीय भाषांमधुन मराठीत अनुवादीत पुस्तके सुचवा.

लेखक जेपी
Published on गुरुवार, 03/09/2015 प्रकाशित मुखपृष्ठ
नमस्कार मिपाकरांनो, या धाग्यावर इतर भारतीय भाषांमधुन मराठीत अनुवादित पुस्तके सुचवावी ही विनंती. भारतीय लेखकांची इंग्रजीतुन मराठीत अनुवादित पुस्तकेही चालतील. धन्यवाद. प्रतिसादातुन भर टाकेन.
लेखनविषय:
लेखनप्रकार

याद्या 17162
प्रतिक्रिया 57

प्रतिक्रिया

अनु-विद्या शर्मा. आसामध्ये चहाच्या मळ्यात राबायला आणलेल्या चिनी लोकांची कहाणी. आपल्यांनी झिडकारलेल्या आणी परक्यांनी नाकारलेल्या लोकांची कथा. मुळ कादंबरी असमिया भाषेत आहे.

भैरप्पांची सर्वच. शिवराम कारंथ (कन्नड) -अशी ही धरतीची माया,चोमा महार, मुकज्जी, डोंगराएव्हढा(हे मात्र कुठेच मिळत नाही) तकळी शिवशंकर पिल्लै (मल्ल्याळी) - दोन शेर धान, चेम्मीन भीष्म सहानी (हिंदी) - तमस रावबहादुर कुलकर्णी (कन्नड़) - ग्रामायण घरी असलेली आता इतकीच आठवत आहेत. बाकीची घरी गेल्यावर पाहून सांगतो.

भैरप्पांची , काठ - लग्न संबधाची न होऊ शकणारी उकल मांडणारी कांदबरी. पर्व- मी काय सांगणार !महाभारतावर आधारीत. आवरण- सेक्युलर विचारसरणीची सडेतोड प्रतिवाद करणारी कादंबरी.

In reply to by द-बाहुबली

अमिशची शिवा ट्रीलोजी अत्यंत फालतु मालीका आहे. वेळ आणी पैसा वाया जातो. हुच्च लोकांचा बिनडोक पणा कसा डोक्यावर घेतला जातो याचे उदाहरण. भग्गुला पण याच्यात जोडा. अमिशचे इश्वाकु ही अत्यंत फालतु आहे.

In reply to by द-बाहुबली

शिवा ट्रीलॉजी इतके भंपक आणि फालतु पुस्तक आजतागायत वाचले नाही. इंग्रजीत वाचतानाच इतके वाटते काय सांगु

दिनकर जोशी यांनी गुजरातीत लिहिलेली कादंबरी. याचा स्मीता भागवत यांनी केलेला अनुवाद 'प्रकाशाची सावली' जरूर वाचा. गांधीजींच्या मुलांवर आधारीत आहे. तसेच 'शाम आवोनी आंगने' या कादंबरीचा मराठी अनुवाद 'परतुनी ये घनशाम' हेसुद्धा वाचनीय आहे. कृश्णाच्या मृत्युनंतरची कथा आहे पण कथानायक तरीही कृष्णचं. ही सुध्हा दिनकर जोशी लिखीत आहे. या दोन्ही कादंबर्‍या शाळेत असताना वचल्या होत्या.या व्यतीरीक्त डॉक्टर झिवागो बोरीस पॅस्त्रोवनिक व पॅवेलियन ऑफ वूमन ही पर्ल बक लिखीत कादंबर्‍यांचा मराठी अनुवाद उपलब्ध आहे. अनुवादक आठवत नाही.

In reply to by अमृत

प्रकाशनो पडछायो चे लेखक दिनकरभाई जोषी हे आपले आडनाव जोषी असे लिहिण्याबद्दल आग्रही आहेत हे कळल्यावर सुरुवातीला थोडा अचंबा वाटला होता. याच पुस्तकावरून गांधी वर्सस गांधी हा हिंदी सिनेमा आणि मराठी नाटक निघाले होते. यात म. गांधी आणि त्यांचा पुत्र हरिलाल यांमधला संघर्ष, नात्यातला ताणतणाव दाखवला आहे.

माझ्या प्रोफाईलला विजीट दे. त्यामधली बहुतांश पुस्तकं भाषांतरीत आहेत आणि जबरदस्त आहेत. त्यामधे तोत्तोचान, २०००० लीग्स अंडर द सी, जर्नी टु द सेंटर ऑफ अर्थ, स्पेस ट्रँगल ही कादंबरी, द टाईम मशिन (एच.जी.वेल्स वाली) अ‍ॅडव. जशी सुचेल तशी पुस्तकं सुचवेन तुला. अधिक माहितीकरता व्यनि कर.

गुजराथी लेखक धृव भट्ट यांची अंजली नरवणे यांनी अनुवादित केलेली ३ पुस्तके - सागरतीरी, तत्त्वमसि,अकूपार. कविता महाजनांनी भारतीय लेखिका नावाची एक मालिका संपादित केलेली आहे. त्यात विविध भारतीय भाषांमधल्या लेखिकांच्या उत्कृष्ट साहित्याचा मराठीत अनुवाद आहे. मी ओडिया पुण्यतोया आणि तमिळ अम्बई वाचलंय. गुलजार च्या रावीपार चा विजय पाडळकरांनी केलेला अनुवाद विशेष आवडला नाही. नॅशनल बुक ट्रस्ट ची कथा भारती योजने अंतर्गत येणारी कन्नड्,तमिळ,पंजाबी, उर्दू, बंगाली, तेलुगु आणि गुजराथी भाषांमधुन मराठीत अनुवादित कथासंग्रह आहेत. अंमृता प्रीतम च्या बर्‍याच पुस्तकांचे मराठी अनुवाद उपलब्ध आहेत. रविंद्रनाथ ठाकुरांची पोरवय ही लघुकादंबरी मराठीत फार छान अनुवादित केली आहे. अनुवादक आठवेनात. एकविंशति हा रविंद्रनाथांचाच मोठा कथा संग्रह मराठीत उपल्ब्ध आहे. अक्षयपात्र - मूळ लेखिका बिंदु भट्ट (गुजराथी)अनुवाद अंजली नरवणे लेडीज कूपे - मू ले - अनिता नायर अनु- अपर्णा वेलणकर पथेर पांचाली- मू ले - विभुतीभूषण बॅनर्जी - अनु - प्रसाद ठाकूर सध्या एवढेच आठवतायत. घरात शोधुन सांगते अजून..

In reply to by मितान

पोरवय मला वाटतं पु.ल.देशपांड्यांनी अनुवादित केलं आहे. मोहन राकेश यांच्या एकांकिकांचाही अनुवाद विजय तेंडुलकर आणि पुल यांनी केलेला आहे. तस्लीमा नसरीन यांचं मेयेर बेला कुंवारपण या नावाने अशोक शहाणे यांनी अनुवादित केलं आहे. संपूर्ण शरच्चंद्रांना मामा वरेरकरांनी मराठीत आणलं आहे. बंकिमचंद्रही मराठीत आले आहेत. गीतांजलीचे अनेक अनुवाद आहेत. मल्याळी स्त्रीवादी लेखिका पी. मानसी यांच्या अतिलघुकथांचा अनुवाद मला वाटते प्रफुल्ल शिलेदार यांनी केला आहे. मीरेच्या भजनांचा स्वैरानुवाद पाडगावकरांनी केला आहे. रवीन्द्रनाथही मराठीत आले आहेत. नष्ट नीड, नौकाडूबी, हंग्री स्टोन्स हे सर्व मराठीत आहे. नंदिनी आत्मसिद्ध यांनीही तीन कन्या या नावाचे पुस्तक (यात एकोणिसाव्या शतकातल्या बंगालातल्या तीन प्रसिद्ध स्त्रियांची चरित्रे आहेत) अनुवादित केले आहे. मेहता प्रकाशन हे अशा अनुवादात अग्रगण्य आहे. (जरी त्यातली खूपशी पुस्तके मूळ इंग्लिशमधली असतात तरी.) मुंबईत पॉप्यूलर प्रकाशनही अनुवाद प्रसिद्ध करते. शिवाय रामदास भटकळ यांनीच स्थापन केलेली 'आंतरभारती अनुवाद सुविधा केंद्र' ही संस्थासुद्धा (अनुवाद छापीत नसली तरी) अनुवादक्षेत्रात भरीव कार्य करीत आहे. शिवाय केल्याने भाषांतर ही पुण्याची संस्था ललितेतर साहित्यात काम करीत आहे.

तमस - भीष्म सहानी जयकांतनच्या गोष्टी - तमिळ लेखक जयकांतनच्या अनुवादित कथांचा संग्रह मैला आँचल - फणीश्वरनाथ रेणू फेलूदाच्या रहस्यकथा यातल्या एकाचेही अनुवादक आठवत नाहीत :(

In reply to by आदूबाळ

फेलूदाच्या रहस्यकथा
याबद्दल अधिक माहिती मिळेल का? म्हणजे एकच पुस्तक आहे का अनेक आहेत. मराठीत कोणी / कोणत्या प्रकाशकाने भाषांतर केले आहे आणि सर्वात महत्वाचे मराठी अनुवाद सहजासहजी उपलब्ध आहेत का?

In reply to by सौंदाळा (verified= न पडताळणी केलेला)

खालच्या प्रतिसादात सिरुसेरी यांनी माहिती दिली आहेच. अशोक जैनांच्या आधी एका अनुवादिकेने अनुवाद केलेली "बॅगेचे रहस्य", "हत्यापुरी" आणि "टिनटोरेटोचा येशू" अशी तीन पुस्तकं आली होती. ती राजहंस प्रकाशनाची होती. गोपा मजुमदारांनी केलेला इंग्रजी अनुवाद पेंग्विनने दोन खंडांत आणला आहे. तो अतिशय वाचनीय आहे.

बाली बेलसरे यांनी अनुवादित केलेल्या आहेत. विलास गीते यांनी केलेला अनुवादही प्रसिद्ध आहे. पोरवय पु.लं.नी अनुवादित केलेलं आहे बहुतेक. मनगंगेच्या काठी हे सबिता गोस्वामींचं आत्मचरित्र आहे. सुंदर आहे.

हे वाचा... http://www.misalpav.com/node/31787

अमिशची शिवा ट्रीलोजी अत्यंत फालतु मालीका आहे. वेळ आणी पैसा वाया जातो. हुच्च लोकांचा बिनडोक पणा कसा डोक्यावर घेतला जातो याचे उदाहरण. भग्गुला पण याच्यात जोडा. अमिशचे इश्वाकु ही अत्यंत फालतु आहे.
१००% सहमत आहे . अश्या कादंबर्यांवर खरं तर बंदी घालायला हवी

व्यक्तिशः मला अनुवादीत पुस्तके वाचायला आवडत नाही.. (आजकाल वाचायचाच कंटाळा येतो, ही गोष्ट अलहीदा). कमीत कमी ज्या भाषा येतात (हिंदी आणि इंग्रजी मुख्यतः, अहोमियाची सवय चांगल्याप्रकारे जडण्याआधीच सुटली), त्यांत तरी मुळ भाषेत पुस्तक वाचणे जास्त आवडते. म्हणजे "जॉन ट्रिनीटी स्केअरवरुन अ‍ॅलिस्टर अ‍ॅवेन्युला जाण्यासाठी सिल्व्हेस्टर लेनवर वळला" असं काही वाचतांना डो़कंच दुखेल माझं.. :-) कदाचित आतापर्यंत चांगले अनुवाद वाचले नसतील, त्यामुळेही असेल, पण हे एक 'इनहिबीशन' आहेच. मात्र भारतातल्या आणि जगातल्या ज्या शेकडो भाषा येत नाहीत आणि शिकणेपण अशक्य आहे, त्यांतील चांगली पुस्तके कळायला अनुवादच वाचावे लागतील. म्हणून ही वाखु साठवत आहे. मी लहानपणी 'मांजरीचे डोळे' नावाची एक कादंबरी वाचली होती. जास्त काही आठवत नाही, पण मुळ भाषा कदाचित कन्नड होती आणि त्यावेळी ती कादंबरी फार आवडल्याचे आठवते..

पं नेहरूंची इंदिरेस पत्रे, कर्नल मनोहर माळगावकरांची अनेक पुस्तके, (यातल्या कान्होजी आंग्रे ह्या चरित्राचा पु.ल.देशपांडे यांनी उत्कृष्ट अनुवाद केला आहे.) अरुंधती रॉय, सर विद्याधर नायपॉल, नीरद चौधरी, सलमान रशदी, विक्रम सेठ, झुम्पा लाहिरी, चेतन भगत, अरविंद अडिगा यांची पुष्कळशी पुस्तके मराठीत आहेत. तॉल्स्टॉय, दस्तयेवस्की, चेकोव, हे इंग्रजीतून मराठीत आले आहेत. बाकी इंग्रजी लेखकांमध्येमध्ये जेम्स हॅडले चेस सारखे अनेक थ्रिलर्स, भयकथालेखक, युद्धधकथा, संदेहकथा, रहस्यकथा, एस्केप-स्टोरीज, पॉप्युलर पल्प फिक्शन, पॅपिलॉन वगैरे) मराठीत आहेत. पूर्वी कुमुदिनी रांगणेकर (या रामकृष्ण भांडारकरांच्या पणती) या चाळीसपन्नास वर्षांपूर्वी अ‍ॅगथा ख्रिस्ती वगैरेंचे महिला-अनुकूल (कस्टमर-फ्रेंड्ली प्रमाणे) सरळ साधे पण वाचनीय अनुवाद करीत आणि ते त्या वेळच्या ललना, माहेर इ. दिवाळी अंकात छापून येत. त्यात मिल अँड बून टाइप रोमान्स-कथाही असत. व्यंकटेश माडगूळकर यांनी काही शिकारकथा, पर्यावरणकथा (सेरेन्गटी शुड नॉट डाय) यांचे अनुवाद केलेले आहेत. मॅन-ईटर्स ऑव्ह कुमाऊं मराठीत आहे. मराठीतला अनुवादसाहित्य विभाग संपना आहे आणि तो अधिकाधिक संपन्न होत चालला आहे.

सर्वांचे आभार. सदरील धागा हा इतर भारतीय भाषांमधुन मराठीत अनुवादीत पुस्तकांसाठी आहे. मुळ विदेशी लेखक (उदा.डॅन ब्राऊन) यांची पुस्तके न सुचवावी हि आशा.

फेलूदाच्या रहस्यकथा - मुळ लेखक - सत्यजीत रे , अनुवादक - अशोक जैन , रोहन प्रकाशन , पुणे . यांतील गाजलेल्या कथा - सोन्याचा किल्ला , बादशाहि अंगठी तसेच ब्योमकेश बक्षी यांच्या रहस्यकथांचेही अनुवाद उपलब्ध आहेत .

मनोहर माळगांवकर या तुलनेने दुर्लक्षित भारतीय लेखकाच्या पुस्तकांचे मराठी अनुवाद आहेत. "अ बेंड इन द गँजेस" आणि "द प्रिन्सेस" (the princes) या दोन्ही खिळवून ठेवणाऱ्या कादंबर्या आहेत. कान्होजी आंग्रे यांच्यावरच्या चरित्रात्मक ग्रंथाचा अनुवाद पु ल देशपांड्यांनी केला आहे.

आजवर वाचलेली आणि आवडलेली अनुवादित पुस्तके एका कोळियाने- अनुवादन पु.ल. देशपांडे टेल मी युअर ड्रिंम्स-मुळ लेखक सिडने शिल्डन रुद्रप्रयागचा नरभक्षक चित्ता- मुळ लेखक जिम कोर्बेट पोपिलॉन- लेखक आणि अनुवादक दोन्ही आठवत नाहीत

In reply to by एक एकटा एकटाच

तरुणकाली ही सर्व माझीही अत्यंत प्रिय पुस्तके होती. पण धागाकर्त्याने अपेक्षा केल्याप्रमाणे ही पुस्तके (इतर)भारतीय भाषातील अथवा लेखकांची (इंग्रजीची अनुवादीत) नाहीत. अवांतरः- पॉपीलॉनचा दुसरा भाग बँको हा सुधा रोचक आहे. वाचुन काढा.

किरण नगरकर यांची cuckold अर्थात मराठीत अनुवादित 'प्रतिस्पर्धी'...अप्रतिम आहे!!

अरुंधती रॉयची 'गॉड अॉफ स्मॉल थिंग्ज' वेगळ्याच विश्वात घेऊन गेली. एक भारावलेले दु:खद सावट संपुर्ण कांदबरीभर आहे. खुप आवडली.

प्रकाशातल्या सावल्या.. ले- गायत्री रामप्रसाद,अनु- सुनेत्रा आगाशे. आत्मचरित्र,लेखिकेच्या मानसिक आजाराबद्दल भाष्य करणार. एकदा वाचणेबल. आत्मचरित्र आवडत नाहीत पण हे आवडल.

परवाच भैरप्पांचं तंतू आणि पारखा (तब्बलियु निनदे मणगे) ही दोन उमा कुलकर्णींनी अनुवादित केलेली पुस्तके घेतली. तंतू तर महाकादंबरी आहे.

In reply to by प्रचेतस

भैरप्पांची "पारखा" अप्रतीम आहे.यात पिढ्यांचा संघर्ष थेट न दाखवता..मुल्याधिष्ठीत दाखवला आहे.. कादंबरी संग्रही ठेवण्यात येत आहे.

In reply to by जेपी

अप्रतिमच आहे ह्यात शंकाच नाही. व्यक्तिचित्रे खुलवण्याचं भैरप्पांचं कसब वाखाणण्याजोगं.

मेहता नी तर अनुवादाचं दुकानच काढलं आहे पुस्तकं खुपचंच डिस्कांऊट मध्ये असतात पदरी चांगले अनुवादकहि आहेत, एव्हडी पुस्तकं वाचणार कधी नॉट विदावूट माय डॉटर आवर्जून वाचा, एकदम मस्त

और ईन्सान मर गया - रामानंद सागर [रामायण मालिकेचे निर्माते] फाळणीच्या वेळी आलेले अनुभव, कोणी अनुवाद केला आहे आठवत नाहीत. अग्निपंख- अब्दुल कलाम काबुलीवाला- रविंद्रनाथ टागोर येस, आय डेअर- किरण बेदी

और इन्सान मर गया अनुवाद चुकत नसेल तर श्रीपाद जोशी

अकूपार, तत्वमसि आणि अतरापि. - मूळ लेखक ध्रुव भट. गुजराथी भाषेतून ही पुस्तके मराठीमध्ये भाषांतरीत झाली आहेत. अकूपार आणि तत्वमसिचे भाषांतर अंजनी नरवणे ह्यांनी केले आहे. समुद्रांतिके ह्याही कादंबरीचे भाषांतर नरवणे ह्यांनी केले आहे, जी आता मिळत नाही.

शिवराम कारंथ यांचे 'डोंगराएव्हढा' कुणाकडे आहे का? आवृत्ती संपल्याने ते कुठेही मिळत नाहीये. अनुवाद- उमा कुलकर्णी.

In reply to by यशोधरा

मला हवे वाचायला किंवा फोटोकॉपी तरी करुन हवी.

विना लवनकर यांची एक होता काव्ह॔र कथा.खूप inspirational आहे.Jorg Vashington karver नावाच्या अमेरिकन शास्ञज्ञाची ही कथा आहे. जो 4 महिन्यांचा असल्यापासून अनाथ असतो. त्यांच्या अफाट जिद्दीचे फारच सुंदर वण॔ण लेखिकेन केलय.

नॉट विदाउट माय डॉटर काबुलीवाल्याची बायको.

गुजराती भाषेतील स्त्री जाणीवेच्या प्रतिनीधीक वेगवेगळ्या लेखकांच्या 19 कथांचा अनुवाद. प्रत्येक राज्याची एक उपसंस्क्रुती असते. मुळ कथेतील मुळ भाषा वाचकाला समजेल इतपत अनुवाद चांगला आहे.

प्रतिसाद स्पॉयलर असु शकतो. वर वल्लिदाने सुचवलेली भैरप्पांची "तंतु" कादंबरी वाचुन झाली.त्याची थोडी ओळख करुन देण्याचा प्रयत्न. ८०० पेक्षाजास्त पानांची "तंतु"च मुख्य पात्र आहेत, राजेंद्र (एका राष्ट्रीय दैनीकाच्या प्रादेशीक आवृत्तीचा संपादक),त्याची पत्नी कांती,कुमारवयीन मुलगा अनुप. तंतुचा कालखंड आणीबाणी पुर्व १०-१२ वर्षावर आधारीत,तत्कालीन राजकिय,सामाजीक्,आर्थीक परिस्थीती कशी बदलत गेली, हे सांगत कादंबरी आपल्याला आणीबाणी पर्यंत आणुन सोडते. राजेंद्र्,त्याची पत्नी,मुलगा. राजेंद्र चे मित्र असलेला गांधीवादी विचाराचा आण्णया,संगितप्रेमी होन्नती,आणी त्या अनुषंगाने येणारी अगणीत पात्र,यांची ओळख करुन देण्यासाठी भैरप्पांनी कित्येक प्रकरण खर्ची केली आहेत. भैरप्पाची आधीच लिखाण यात पुन्हा भेटत राहत्,विवाहबाह्य संबध(काठ),मुल्याधीष्ठीत संघर्ष (पारखा),आवरण,तडा. कादंबरीत आपल्याला आणीबाणी थेट भेटत नाही,त्यामुळे थोडा हिरमोड होतो.पण एकुण कादंबरी संग्रही ठेवण्यासारखी आहे.