मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

चारोळ्या

माझ्या मनाचे बोल..

सोहम कामत ·
सतावते मनास तुझी, हवीहवीशी वाटणारी साथ.. एकांतात या घ्यावासा वाटतो, हाती तुझाच हात.. तुझे अलगद मंदहास्य माझ्या, हृदयाला थेट चिरते.. तुझ्या आठवणींच्या संग्रहात माझे, मन नकळत विरते....

सुख म्हणजे काय असते?

निनाव ·
सुख म्हणजे काय असते? - निनाव (१६.०९.२०१६) सुख म्हणजे काय असते? ओंजळीत भरलेले पाणीच जणु! जमवले तर बसते लहानश्या जागेत, सोडले जर का सैल, जाते वाहून नवीन काठ शोधत - न सापडणारे!

काही क्षणिका - स्त्री

विवेकपटाईत ·
(१) वस्त्रांत देह स्त्रीचा पुरुषांनी गुंडाळला. भोगदासी झाली स्त्री त्या क्षणापासूनच. (२) पद्मिनीने म्हणे चितेत उडी घेतली. आगीत वासनेच्या नाही ती जाळली. (३) देह वासनेचा अग्नीत हा जाळला उरले फक्त आता अमर प्रेम तराणे.

सैराट - काव्यांजली

जव्हेरगंज ·
==================================== "सैराट" बघून एक दोन चारोळ्या सुचल्या! त्या अशा.... °°°° झुडपात जाऊन तोंडाला लय फासलाय साबण चाललू हिरीत मुटका मारायला तर आरची म्हणली " हु म्हागं" - लंगडा प्रदीप °°°°°° केळीच्या बागा तुडवून पाय दुखतात सारखे आसं काय करती येड्यावणी "घरची उठत्याल की आरचे" - परश्या ================================== "सैराट"मधल्या एक-दोन कविता (नोटीस बोर्डावर लावलेल्या, आठवतंय का?) जशाच्या तश्या खाली टाकतोय! मला तर आवडल्या !!

सदाफुली

अभिषेक पांचाळ ·
कधीतरी आयुष्यात , सदाफूली व्हावं सुख बनून मातीत , आनंदाने फुलावं अंत स्वतःचा , माहीत असून देखील भेटणाऱ्या प्रत्येकाला , आनंदी करावं - अभिषेक पांचाळ

घोस्टहंटर - पायरेट ऑफ़ अरेबिया ४

DEADPOOL ·
वाचकहो घोस्टहंटरला झालेल्या अक्षम्य दिरंगाईबद्दल मी माफी मागतो. भ्रमणध्वनि वर टंकण करत असल्याने मालिकेस उशीर झाला. पुढील भाग लवकर येतील याची खात्री बाळगावी! १. तर मंडळी रोला अजूनही समजत नव्हते की पायरेटचा अंत कसा करावा, कारण पायरेट कोणत्याही शस्त्र अथवा अस्त्र याने घायाळ होत नव्हता. शैतानाच्या दूताकडून त्याला ही जहाज मिळाली होती.त्या जहाजाच्या प्रत्येक भागावर त्याची हुकुमत चालू होती. जहाजाची प्रत्येक दोरी म्हणजे एक साप होतात. असे अनेक प्रकारचे साप तिथे होते. रो कंटाळून त्याच्या ऑफीसमध्ये बसला होता.

अनाचे दोडोबा.. (शिमगा पेश्शल)

नाखु ·
उंच गुढीतच तपशीलाची गाठी सकस धाग्यात अनाचे दोडोबा.. संकृताचा थाट, नवरसाची दावी वाट न चुकता (मारी)हजरजबाबी खुट्टा.. विनोद्बुद्धी सबूत, संवादही मजबूत संदर्भाचा तर खजिना अबाबा... धाग्यात दरारा सदा (घ्यावाच) लागतो प्रवक्त्यांचा सासुरवास सदानकदा मालोजींकडे जातो घेऊन साथी शिवकालीन चीजा आणि शिवबा.. त्रिकाळी वाचन, सतत (पंग्यास)तयार चतुरस्त्रा ज्ञानी दोडोबा.. जरी सारासार(विवेका)चा अर्क हा तरी, (का रे देवा) प्रवक्त्यांना नडणे हाच (ठेवी) मनसुबा .. .........

पहिली चाचणी

कवि मनाचा ·
कविता लिहिल्यावर करतो मी गुणवत्ता तपासणी, अर्थात बायकोवरच असते त्याची पहिली चाचणी, कवितेचे नाव काढताच पडते ती बुचकळ्यात, पण ऐकल्यानंतर, निष्कर्ष लगेच कळतो तिच्या डोळ्यांत !! डोळ्यांत हरवते ती माझ्या, लवते न तिची पापणी, लगेच टपकतो अश्रू, जणू सुखावता माहेरच्या आठवणी, ग्यासवर दूध ऊतू गेल्याचे, शल्य मनी नसते या क्षणी, विविधभारतीवर रमतो दोघे, ऐकत सुरेल प्रणय-गाणी.

गद्य-पद्य

कवि मनाचा ·
ताव मारीता जीभेने, विसरुन सारे ते पथ्य बळ लाभता ओठांना, सुरसुरते ते मद्य भाव उधळता मनाने, तोडून सारे जे बंध्य कळ लागता जीवाला, सरसर सुचते ते पद्य