मावशी थायलंड ला चाललीस न ,येतांना माझ्यासाठी पेन्सील शार्पनर्स आणायला विसरू नकोस" राजू मावशीला म्हणाला.पलीकडून मावशी म्हणाली "अरे तू सांगायला विसरला असतास तरी मी आणायचे ठरवलेच आहे, कारण स्टेशनरी मध्ये पेन्सील शार्पनर्स बघीतली कि आम्हाला तूच आठवतोस .किचन म्हधून आई कौतुकाने ऐकत होती.
राजूचा पेन्सील शार्पनर्स चा संग्रह प्रचंडच वाढला होता.वेगवेगळ्या रंगांचा ,आकारांचा हा संग्रह पाहून घरात येणारे इम्प्रेस होत ,मग राजूची कॉलर टाइट.रोज ती ढीगभर पेन्सील शार्पनर्स राजू पुसून ठेवायचा आणि शाळेतून आला कि आधी त्या कॉर्नरवर एक नजर टाकणार, जर एक हि वस्तू एकद्च तिकडे झाली कि त्याला कळायचे मग राजूचा त्रागा आण