"हाॅटेलमधील आरोग्यदायी जेवण"
"रोगी चिरप्रवासी परान्न .भोजी परावसथशायी।
यज्जिवती तन्मरणं यन्मरणं सो स्य विश्राम:।"
अर्थ - आजारी व्यक्ती,नेहमी हिंडणारा ,बाहेरचे खाणारा,दुसर्याच्या आश्रयाने राहणारा यांचे जीवन मृत्युसमान असते.(आरोग्यास हानिकारक)
आजच्या काळात मात्र फिरतीवर असणे व बाहेरचे खाणे ही जीवनशैली बनली असून ती अनिवार्य आहे.
हाॅटेल मधील जेवण,फास्ट फुड,शीतपेय हे सारं नकळत तुमच्या -माझ्या आयुष्याचा अविभाज्य भाग होवून गेले आहेत. हाॅटेलमधील जेवण हे आजकाल बहुतांशवेळा स्वच्छतेच्या दृष्टीने काटेकोर असते. पण टिकाऊपणासाठी वापरलेली रसायने, आकर्षकतेसाठी शरीरास अहितकर गोष्टीदेखील वापरल्या जातात.