द स्केअरक्रो भाग २७
द स्केअरक्रो भाग २८ (मूळ लेखक मायकेल कॉनेली)
बुधवारी सकाळी मी जेव्हा ऑफिसमध्ये आलो तेव्हा परत लोकांच्या नजरा माझ्याकडे वळल्या. दोन आठवड्यांपूर्वी जेव्हा असं झालं होतं, तेव्हा माझी नोकरी गेली होती आणि प्रत्येकजण माझ्याकडे कीवभरल्या नजरेने बघत होता. गेल्या आठवड्यात अँजेलाचा मृतदेह माझ्या घरात सापडला होता आणि प्रत्येकाच्या नजरेत राग आणि संशय होता. आज मी अँजेलाच्या खुन्याला मारून तिच्या मृत्यूचा सूड उगवल्याप्रमाणे सगळेजण पाहात होते. माझी प्रतिक्रिया तिन्ही वेळा सारखीच होती.