Skip to main content

भाषांतर

द स्केअरक्रो भाग ३

लेखक बोका-ए-आझम यांनी शनिवार, 20/06/2015 00:39 या दिवशी प्रकाशित केले.
द स्केअरक्रो भाग १ द स्केअरक्रो भाग २ द स्केअरक्रो भाग ३ (मूळ लेखक मायकेल कॉनेली) माझ्या दुःखात सहभागी व्हायला मी सोडून मोजून ३ जण आले होते. लॅरी बर्नार्ड तर होताच आणि दोन क्रीडापत्रकार होते. ते कदाचित दररोज शाॅर्ट स्टाॅपला जात असतील. शाॅर्ट स्टाॅप बार एल्.ए. च्या एको पार्क भागात सनसेट अॅव्हेन्यूवर होता. एल्.ए.डाॅजर्सचं स्टेडियम त्याच भागात होतं. कदाचित बेसबाॅलमधल्या एका पोझिशनवरुन शाॅर्ट स्टाॅप हे नाव आलं असेल.

द स्केअरक्रो - भाग २

लेखक बोका-ए-आझम यांनी रविवार, 14/06/2015 00:36 या दिवशी प्रकाशित केले.
द स्केअरक्रो भाग २. मूळ लेखक - मायकेल काॅनोली क्रेमरच्या केबिनमधून मी बाहेर पडलो तेव्हा पूर्ण न्यूजरुमचे डोळे माझ्यावर खिळलेले होते. शुक्रवारचा दिवस म्हणजे बांबू मिळण्याचा दिवस. प्रत्येकाला केबिनमध्ये मला का बोलावलंय ते माहीत होतं. प्रत्येकाचा जीव भांड्यात पडला असणार - कारण त्यांच्यावर ही पाळी आली नव्हती. पण ही एक भीती होतीच की पुढच्या शुक्रवारी कदाचित त्यांच्यावरही अशीच वेळ येऊ शकेल. कुणाकडेही न बघता मी माझ्या जागेवर येऊन बसलो. मला थोड्या वेळासाठी तरी इतरांच्या नजरा चुकवायच्या होत्या. ताबडतोब माझा फोन वाजला. काॅलर आयडीवर मी माझा मित्र आणि सहकारी लॅरी बर्नार्डचं नाव वाचलं.

द स्केअरक्रो भाग १

लेखक बोका-ए-आझम यांनी शनिवार, 13/06/2015 16:29 या दिवशी प्रकाशित केले.
द स्केअरक्रो भाग १ (मूळ लेखक - मायकेल काॅनोली ) कार्व्हर कंट्रोल रूममध्ये येरझा-या घालत होता. सगळे डेटा टाॅवर्स त्याच्यासमोर नीटपणे एका ओळीत उभे होते. त्यांचं काम अगदी शांतपणे आणि वेगाने चालू होतं. त्यांच्याविषयी सगळं माहित असूनही कार्व्हरच्या मनात एक प्रकारची भारावून गेल्याची भावना आली. त्याच्यासमोर माहितीचा ओघ नव्हे तर धबधबा वाहत होता आणि तोही दर दिवशी. त्याच्यासमोर असलेल्या या पोलादी टाॅवर्समधला प्रत्येक टाॅवर म्हणजे माहितीचा खजिना होता. त्याने तापमान दाखवणा-या स्क्रीनकडे एक नजर टाकली. सगळं काही अपेक्षेप्रमाणे आणि व्यवस्थित चाललं होतं.

ये दोस्ती ......

लेखक शिव कन्या यांनी मंगळवार, 09/06/2015 22:04 या दिवशी प्रकाशित केले.
( १८ एप्रिल २०१५ रोजी या http://www.bbc.co.uk/news/blogs-ouch-32325809 संकेत स्थळावर दोन मित्रांची एक प्रेरणादायी कहाणी वाचनात आली. तिचे मराठी कथेत रुपांतर करताना, केवळ आणि केवळ एकच हेतू मनात आहे – लिहिणाऱ्या/वाचणाऱ्या सर्वांनी ‘एक तरी झाड लावावे, जगवावे, वाचवावे!’ ) हेग्झिया आणि वेंकी. उत्तर चीन मधील येली या छोट्याशा खेड्यातील दोन शाळूमित्र. दोघांत एखाद वर्षाचा फरक. पाठच्या भावंडासारखे सोबत वाढले. हसले. खेळले. ..... आणि दोघांच्या वाट्याला आलेले दुर्दैव आणि त्यावर केलेली मातही जगावेगळी! ..... ........

प्राधिकरण कट्टा २९ मे २०१५

लेखक कॅप्टन जॅक स्पॅरो यांनी शनिवार, 30/05/2015 14:37 या दिवशी प्रकाशित केले.
लेख लिहायच्या सगळ्यात आधी मुविंचे कट्ट्याच्या आयड्याच्या कल्पनेबद्दल आभार मानतो. कट्ट्याच्या निमित्ताने का होईना मिपामंडळी आपल्या व्यस्त वेळापत्रकामधुन वेळ काढुन आली. हा संपुर्ण वृत्तांत नाही. कारण मी कट्ट्याची सुरुवातीची पंधरा मिनिट आणि शेवटचे दोन-तीन महत्त्वाचे तास नव्हतो. त्यामुळे संपुर्ण वृत्तांताची जबाबदारी नाखु'न'काका आणि वल्ली धरलेणीकर ह्यांच्यावर सोपावण्यात येत आहे. मी हमालीकामामधुन जेमतेम चिंचवडपर्यंत पोचतोय नं पोचतोय तोपर्यंत नाखु'न'काकांचा फोन येउन गेला.

अंधार क्षण भाग ५ - जॅक्स लेराॅय (लेख २७)

लेखक बोका-ए-आझम यांनी बुधवार, 27/05/2015 19:29 या दिवशी प्रकाशित केले.
अंधार क्षण - जॅक्स लेराॅय (लेख २७) आज जेव्हा नाझींचं चित्रण केलं जातं - टेलिव्हिजनवर किंवा चित्रपटांमध्ये - तेव्हा नाझीवादाचा संबंध फक्त जर्मनीशी जोडला जातो. नाझीवादाने जर्मनीबाहेरच्या अनेक लोकांवर भुरळ टाकली होती हे सोयिस्करपणे विसरलं जातं. अगदी ब्रिटन आणि अमेरिकेतही नाझीवादाचे आणि फॅसिझमचे चाहते होते. ब्रिटनमध्ये सर ओस्वाल्ड मोस्ले आणि स्वीडनमध्ये पेअर एन्गडाल यांनी फॅसिस्ट संघटना स्थापन केल्या होत्या आणि या संघटनांना चांगला लोकाश्रय लाभला होता. नाझींमध्येही सर्वचजण कट्टर होते असं म्हणता येणार नाही. हिटलरलाही याची कल्पना होती.

जरुरत है, जरुरत है......

लेखक शिव कन्या यांनी रविवार, 10/05/2015 17:03 या दिवशी प्रकाशित केले.
मुल्ला नसरुद्दिन करडी दाढी [स्वतः ची] कुरुवाळीत, निवांत गप्पा छाटीत बसला होता. गप्पा मारता मारता मित्राने विचारले, “ नसरुद्दिन, तू कधी लग्नाचा विचार नाही का केला?” नसरुद्दिनची दाढी हसली. म्हणाला, “केला तर! कधीकाळी आम्ही पण तरुण होतोच कि! एकदा मी निश्चय केला - आपण स्वतः साठी एक आदर्श स्त्री शोधायची आणि तिच्याशी निकाह लावायचा. ठरवले. निघालो. वाळवंट ओलांडून दमास्कसला पोहचलो. नशीब बलवत्तर. तिथे एक स्त्री भेटली. अत्यंत देखणी. धर्मपरायण. संपूर्ण कुराण तोंडपाठ असलेली!” “मग?” “पण..... तिला काव्यशास्त्रविनोदातले ओ कि ठो कळत नव्हते. आणि व्यवहारज्ञान म्हणशील तर, शून्य. काय करायचीय अशी बेगम?

एक "टवाळ" संध्याकाळ

लेखक कॅप्टन जॅक स्पॅरो यांनी रविवार, 03/05/2015 13:30 या दिवशी प्रकाशित केले.
बर्याचं दिवसांपासुन व्हॉट्स अॅप गृप वरती किमान ३००० वेळा कट्टा करायच्या गोष्टी चाललेल्या होत्या. गेले २-३ आठवडे हो-ना-हो-ना करता करता शेवटी काल मोदक, मी, कपिलमुनी आणि अनाहितांचा लाडोबा असे चार जणांचा कट्टा ठरला. त्याचा एक वृत्तांत लिहायचा एक माफक प्रयत्न. कट्ट्याचं आयोजनं करतानाचं माझ्याकडुन एक मोठी चुक झाली ती म्हणजे वल्लींना फोन करायचा राहुन गेला :( (वल्ली मनापासुन सॉरी!! ). अन्या दातार कोल्हापुरला गेल्यानी आणि गुर्जीं फुलराणीच्या शोधात मार्केट यार्डामधे असल्यानी येउ शकले नाहीत.

हडळीचा आशिक

लेखक शिव कन्या यांनी गुरुवार, 30/04/2015 18:35 या दिवशी प्रकाशित केले.
हडळीचा आशिक जपानमध्ये हितोशी नावाचा एक माणूस रहायचा. तो एका पाषाणरह्रद्यी बाईच्या प्रेमात पडला. तिला राजी करायला त्याने भलते कष्ट उपसले. ती म्हणजे त्याला सर्वस्व वाटायची. तिच्या वाचून त्याला स्वतःचे आयुष्य फोलफोल वाटायचे. शेवटी एकदाची ती बया त्याच्यावर प्रसन्न झाली. त्याच्याशी लग्न करायला तयार झाली. पण हाय! नेमक्या त्याच दिवशी, आपण एका असाध्य रोगाने ग्रस्त आहोत, आपण काही फार दिवस जगणार नाही, हे तिच्या लक्षात आले. तरी आपला हिरो तिच्याशी लग्न करतो. तिचे शेवटचे दिवस सुखात जावेत म्हणून आटापिटा करतो. पण, मृत्यू शय्येवर असताना मात्र हि बया त्याला म्हणते, “ मला एक वचन द्या.

अष्टवृक्षासौभाग्यवती

लेखक शिव कन्या यांनी मंगळवार, 21/04/2015 20:24 या दिवशी प्रकाशित केले.
महमूद दरवेश या पालेस्तिनी लेखकाच्या 'If Only the Young Were Trees!' या ललितलेखाचा मुक्त अनुवाद. झाड झाडांचे सहोदर.