Skip to main content

भाषांतर

सच्चे वरण

लेखक श्रीगुरुजी यांनी रविवार, 06/09/2015 13:06 या दिवशी प्रकाशित केले.
सच्चे वरण ह्याचा अर्थ ’mageireména fakés / kalós fakés’ (ग्रीक शब्द) ", "gut Linsen (जर्मन शब्द)", "bien lentilles (फ्रेंच शब्द)" म्हणजेच "चांगले शिजलेले एकजीव झालेले वरण" असा होतो. प्रत्येक व्यक्तीला जेवणाची सुरवात चांगल्या वरणभाताने आणि शेवट चांगल्या ताकभाताने व्हावा असे वाटते. परंतु ते आपल्या हातात नसते. ’सच्चे वरण हवे’ असे अंथरूणाला खिळलेल्या आजारी व्यक्तीने सांगितले तरी घरातल्यांना ते पटत नाही. अंथरूणाला खिळलेल्या वृद्ध व रूग्णांना सच्चे वरण देणे अवघड असते. नवरा किंवा बायको असली तर त्यातल्या त्यात चांगले.

द स्केअरक्रो - भाग ‍२३

लेखक बोका-ए-आझम यांनी शनिवार, 05/09/2015 16:58 या दिवशी प्रकाशित केले.
द स्केअरक्रो भाग २२ द स्केअरक्रो भाग २३ (मूळ लेखक मायकेल कॉनेली) कार्व्हरने आधी रॅशेलशी हात मिळवला, मग माझ्याशी. आम्ही आपापली नावं त्याला सांगितली. “योलांडा तुम्हाला वीस मिनिटांनी घ्यायला येणार आहे. तेवढ्या वेळात मी तुम्हाला इथली संपूर्ण माहिती देण्याचा प्रयत्न करीन. तुम्ही आमच्या टीमला भेटलात की नाही? हा कर्ट आणि हा मिझ्झू. मोठी हुशार मुलं आहेत. दोघेही आज सर्व्हर सपोर्ट इंजिनीअर्स आहेत.

चाय, चिलम, चपाटी : लाझ येई भारत भेटी (५: अंतिम भाग)

लेखक बहुगुणी यांनी शनिवार, 05/09/2015 05:39 या दिवशी प्रकाशित केले.
भारतभेटीला प्रथमच येणार्‍या एका परदेशस्थ व्यक्तीला आपला देश कसा वाटला हे आपण शक्य तितक्या अलिप्तपणे अनुभवावं, म्हणून त्याच्या पत्रांच्या मराठी रुपांतराचा हा प्रयत्न.

चाय, चिलम, चपाटी : लाझ येई भारत भेटी (४)

लेखक बहुगुणी यांनी शुक्रवार, 04/09/2015 09:12 या दिवशी प्रकाशित केले.
================================================================== भारतभेटीला प्रथमच येणार्‍या एका परदेशस्थ व्यक्तीला आपला देश कसा वाटला हे आपण शक्य तितक्या अलिप्तपणे अनुभवावं, म्हणून त्याच्या पत्रांच्या मराठी रुपांतराचा हा प्रयत्न.

नात्यातले लुकडे जाडे

लेखक श्रीगुरुजी यांनी गुरुवार, 03/09/2015 20:45 या दिवशी प्रकाशित केले.
कोणत्याही नात्यामध्ये दोघांपैकी जो वजनाने मोठा असतो त्याचेकडून सतत डाएटिंगची आणि जास्त कामाची अपेक्षा केली जाते. केवळ वजनाने मोठा आहे म्हणून सगळ्यांचे त्याला ऎकून घ्यावे लागते व खाण्यापिण्याला आणि आरामाला मुरड घालावी लागते. पण हाच जाड्या असलेला व्यक्ती जेव्हा लुकड्याला एखादा उपदेश करतो, दोष दाखवतो, आज्ञा करतो तेव्हा मात्र लुकडा जर त्याचे ऎकत नसेल आणि जाड्याला योग्य तो मान मिळत नसेल तर मात्र त्या नात्याला एकतर्फी नाते म्हणता येईल.

चाय, चिलम, चपाटी : लाझ येई भारत भेटी (३)

लेखक बहुगुणी यांनी गुरुवार, 03/09/2015 05:56 या दिवशी प्रकाशित केले.
=============================================================== भाग १ ------------ भाग २ ------------- भाग ३ ----------- भाग ४ ----------- भाग ५ ================================================================ Hello family! कुठे सुरूवात करू? ५०० सीसी Royal एन्फ़ील्ड बुलेट मोटरसायकल पासून सांगतो. हिच्यावर हिमालय-दौड करणं यासारखा अप्रतिम अनुभव नाही!

चाय, चिलम, चपाटी : लाझ येई भारत भेटी (२)

लेखक बहुगुणी यांनी बुधवार, 02/09/2015 04:41 या दिवशी प्रकाशित केले.
=============================================================== भाग १ ------------ भाग २ ------------- भाग ३ ----------- भाग ४ ----------- भाग ५ ================================================================ भारतभेटीला प्रथमच येणार्‍या एका परदेशस्थ व्यक्तीला आपला देश कसा वाटला हे आपण शक्य तितक्या अलिप्तपणे अनुभवावं, म्हणून

द स्केअरक्रो - भाग ‍२२

लेखक बोका-ए-आझम यांनी रविवार, 30/08/2015 00:15 या दिवशी प्रकाशित केले.
द स्केअरक्रो भाग २१ द स्केअरक्रो भाग २२ (मूळ लेखक मायकेल कॉनेली) आदल्या रात्री जेवताना आम्ही पाण्यासारखी रम प्यायली होती. त्यामुळे सकाळी उठल्यावर दोघांचंही डोकं बऱ्यापैकी दुखत होतं. पण कसेबसे आम्ही बाहेर पडलो आणि वेस्टर्न डेटाच्या रस्त्याला लागलो. थोडाफार वेळ होता, त्यामुळे आम्ही आधी हायटॉवर ग्राउंडमध्ये जाऊन गरमागरम कॉफी घेतली.

द स्केअरक्रो - भाग ‍२१

लेखक बोका-ए-आझम यांनी शनिवार, 29/08/2015 00:14 या दिवशी प्रकाशित केले.
द स्केअरक्रो भाग २० द स्केअरक्रो भाग २१ (मूळ लेखक मायकेल कॉनेली) फिनिक्सच्या स्काय हार्बर एअरपोर्टवर जेव्हा रॅशेल बाहेर आली, तेव्हा तिचं माझ्याकडे अजिबात लक्ष गेलं नाही. मीही तिथे आलेल्या आणि हातांत येणाऱ्या लोकांच्या नावाचे फलक घेऊन वाट बघत असणाऱ्या लिमोझिन ड्रायव्हर्सच्या गर्दीत उभा होतो. तिने मला पाहण्याआधी मी तिला पाहिलं. ती डावीकडे आणि उजवीकडे बघत होती आणि मी तिच्यासमोर उभा होतो. ती रेलिंगच्या दुसऱ्या बाजूला आल्यावर मी सरळ जाऊन तिच्या पुढ्यात उभा राहिलो.

लोणीभक्ती आणि पराठे

लेखक डॉन व्हिटो कॉर्लिऑन यांनी मंगळवार, 25/08/2015 22:49 या दिवशी प्रकाशित केले.
आमचा पेर्णास्त्रोतः मातृभक्ती आणि मराठे या देहाची लोणीभक्ती, लोणीप्रेम वादातीत आहे. लोणी देवो चवः, लोणी देवो सवः, पराठे देवो भवः असे म्हणतानाच पराठ्याबरोबरच्या लोण्याच्या चवीचे महत्त्व सुभाषितकाराने सांगीतलेलं आहे. लोण्याचा सुवर्णकाळ, शतके ज्यांनी लोकांच्या पोटावर राज्य केलं असे 'अमुल' त्यांची ती अमुलकन्या सुरभी, आपल्या पराठ्यावर चापुन लोणी लावत असे. लोणीप्रेमावतंस पराठापती *** पराठावाले. ह्यांच्या बालपणापासुनचं प्रत्येक पराठ्यांवर त्यांच्या पाकसम्राज्ञी आईसाहेबांचा प्रभाव आढळतो.