Skip to main content

भाषांतर

द स्केअरक्रो - भाग ‍२०

लेखक बोका-ए-आझम यांनी रविवार, 23/08/2015 18:44 या दिवशी प्रकाशित केले.
द स्केअरक्रो भाग १९ द स्केअरक्रो भाग २० (मूळ लेखक मायकेल कॉनेली) न्यूजरूममधून बाहेर पडून मी माझ्या गाडीत बसलो, तेव्हा मला जरा बरं वाटलं. एकेकाळी हीच न्यूजरूम सोडून घरी जायलाही मी तयार नसायचो. कधी घरी गेलोच, तर दुसरा दिवस कधी उजाडतोय आणि मी कधी ऑफिसला जातोय असं व्हायचं मला. पण ते दिवस आता इतिहासजमा झाले होते. क्रेमर आणि त्याच्यासारख्या कॉर्पोरेट लांडग्यांनी तिथे उच्छाद मांडला होता. मला तिथून बाहेर पडायलाच हवं होतं. मी सरळ फ्रीवेवर गेलो आणि तिथून समुद्राच्या दिशेने. सगळी वाहतूक यावेळी उलट दिशेला चालली होती.

द स्केअरक्रो - भाग ‍१९

लेखक बोका-ए-आझम यांनी शनिवार, 22/08/2015 01:08 या दिवशी प्रकाशित केले.
द स्केेअरक्रो भाग १८ द स्केअरक्रो भाग १९ (मूळ लेखक मायकेल कॉनेली) सोमवारी सकाळी मी एकदम फ्रेश होतो. रॅशेलचा फोन कधीही येऊ शकला असता. मला त्याच्यासाठी तयार राहायचं होतं. त्यामुळे सकाळी सहा वाजताच मी टाइम्सच्या ऑफिसमध्ये पोहोचलो. मला फाईल्सवर काम करायचं होतं. आमची न्यूजरूम पूर्णपणे रिकामी होती. अगदी एखादं चिटपाखरूही नव्हतं. एकही रिपोर्टर किंवा एडिटर नव्हता. भविष्यकाळाच्या कल्पनेने माझ्या मनात चरकलं. एकेकाळी हीच न्यूजरूम म्हणजे जगातली सर्वोत्तम जागा होती काम करण्यासाठी.

द स्केअरक्रो - भाग ‍१८

लेखक बोका-ए-आझम यांनी रविवार, 16/08/2015 00:22 या दिवशी प्रकाशित केले.
द स्केअरक्रो भाग १७ द स्केअरक्रो भाग १८ (मूळ लेखक मायकेल कॉनेली) पहाट जवळपास संपत आली होती. आता कधीही उजाडलं असतं. कार्व्हरला दूरवरच्या पर्वतांच्या शिखारांमागचं आभाळ हळूहळू गुलाबी होताना दिसत होतं. तो एका मोठ्या दगडावर बसला होता, आणि समोर काम करणाऱ्या स्टोनकडे पाहात होता. तो खड्डा खोदत होता. भुसभुशीत माती संपून आता कठीण मुरूम लागला होता. त्यामुळे स्टोनला खणणं कठीण जात होतं. त्या दगडावर त्याच्या कुदळीचा आवाज येत होता.

द स्केअरक्रो भाग १७

लेखक बोका-ए-आझम यांनी शनिवार, 15/08/2015 00:18 या दिवशी प्रकाशित केले.
द स्केअरक्रो भाग १६ द स्केअरक्रो भाग १७ (मूळ लेखक मायकेल काॅनेली) कार्व्हर त्याच्या गाडीत, अंधारात बसला होता आणि समोर असलेल्या घराकडे पाहात होता. तो जे काही करायला इथे आला होता, ते करायला अजून वेळ होता. त्याला थोडं थांबावं लागणार होतं. पण त्याने त्याला काहीही फरक पडत नव्हता. तसंही त्याला अंधारात एकटं राहायला आवडायचं. त्याच्या आयपॉडवर असलेलं त्याचं आवडतं गाणं – लिझार्ड किंगचं I am a changeling, see me change – तो ऐकत होता. या गाण्याने त्याला आयुष्यभर साथ दिलेली होती.

द स्केअरक्रो भाग १६

लेखक बोका-ए-आझम यांनी रविवार, 09/08/2015 00:25 या दिवशी प्रकाशित केले.
द स्केअरक्रो भाग १५ द स्केअरक्रो भाग १६ (मूळ लेखक मायकेल काॅनेली) शनिवारी सकाळी मी क्योटो ग्रँडमधल्या माझ्या खोलीत बसून लॅरी बर्नार्डने लिहिलेली पहिल्या पानावरची स्टोरी वाचत होतो. अलोन्झो विन्स्लोची अखेरीस अल्पवयीन गुन्हेगारांच्या तुरुंगातून सुटका झाली होती आणि तीही सरकारने सगळे आरोप मागे घेतल्यामुळे. त्या वेळी मला हॉलीवूड डिव्हिजनमधल्या एका माझ्या ओळखीच्या डिटेक्टिव्हचा फोन आला. तिने मला सांगितलं की मी आता परत माझ्या घरी जाऊ शकतो कारण फोरेन्सिक डिपार्टमेंटमधल्या लोकांनी आपला तपास संपवलेला आहे.

द स्केअरक्रो - भाग ‍१५

लेखक बोका-ए-आझम यांनी शनिवार, 01/08/2015 09:40 या दिवशी प्रकाशित केले.
द स्केअरक्रो भाग १४ द स्केअरक्रो भाग १५ (मूळ लेखक मायकेल कॉनेली ) कार्व्हर त्याच्या ऑफिसमध्ये बसून अगदी लक्षपूर्वक सिक्युरिटी स्क्रीनकडे पाहात होता. दोघेजण जिनिव्हाला त्यांचे बॅजेस दाखवत होते. त्याने बॅजेसवर झूम इन करून ते कोणाकडून आलेले आहेत हे पाहण्याआधीच दोघांनीही बॅजेस परत खिशात ठेवून दिल्यामुळे ते नक्की कोणत्या एजन्सीकडून आलेले आहेत ते कार्व्हरला समजू शकलं नाही. जिनिव्हाने तिच्यासमोरचा इंटरकॉम उचलला आणि तीन नंबर्स हलकेच दाबले. ती मॅकगिनिसच्या ऑफिसमध्ये फोन करते आहे, हे त्याच्या लक्षात आलं.

द स्केअरक्रो - भाग ‍१४

लेखक बोका-ए-आझम यांनी रविवार, 26/07/2015 22:13 या दिवशी प्रकाशित केले.
द स्केअरक्रो भाग १३ द स्केअरक्रो भाग १४ (मूळ लेखक मायकेल कॉनेली ) मी गुरुवारी दुपारपर्यंत टाइम्सच्या ऑफिसमध्ये जाऊ शकलो नाही. तिथे पोचल्यावर एक प्रकारची अस्वस्थ ऊर्जा सगळीकडे जाणवली. बरेच रिपोर्टर्स आणि एडिटर्स दिसले. अशी मधमाशांच्या पोळ्यासारखी लगबग गेल्या बऱ्याच दिवसांत दिसली नव्हती. आणि याचं कारण उघड होतं. अँजेला कुकचा खून. प्रत्येक दिवशी थोडंच असं घडतं की तुमच्या एका सहकाऱ्याचा खून झालाय आणि दुसरा सहकारी त्याच्यात कुठल्या ना कुठल्या प्रकारे गुंतलाय! आमची सिटी एडिटर डोरोथी फाऊलर न्यूजरूममध्ये होती.

द स्केअरक्रो - भाग ‍१३

लेखक बोका-ए-आझम यांनी शनिवार, 25/07/2015 00:15 या दिवशी प्रकाशित केले.
द स्केअरक्रो भाग १२ द स्केअरक्रो भाग १३ (मूळ लेखक मायकेल कॉनेली) अँजेलाला तिथे बघून मला एवढा धक्का बसला की मी प्रतिक्षिप्त क्रियेने मागे झालो आणि माझी पाठ जोराने जवळच्या कपाटाला आदळली. त्याच्यावर एक जुन्या पद्धतीचा, लँपशेड असलेला दिवा ठेवलेला होता. तो खाली पडला आणि फुटला. रॅशेल ओरडली, “ काय झालं जॅक?” मी कसंबसं पलंगाकडे बोट दाखवलं, “अँजेला...ती...ती पलंगाखाली आहे.” रॅशेल माझ्या बाजूला आली आणि तिनेही पलंगाखाली वाकून पाहिलं, “ओ माय गॉड!

द स्केअरक्रो - भाग ‍१२

लेखक बोका-ए-आझम यांनी रविवार, 19/07/2015 07:13 या दिवशी प्रकाशित केले.
द स्केअरक्रो भाग ११ द स्केअरक्रो भाग १२ (मूळ लेखक मायकेल कॉनेली) अँजेलाचं घर नक्की कुठे आहे याबद्दल मला काहीही कल्पना नव्हती. मी रॅशेलला तिच्याबद्दल मला जे काही माहित होतं ते सगळं सांगितलं. अगदी तिला पोएट केसबद्दल असलेल्या आकर्षणाबद्दलसुद्धा. तिचा ब्लॉग आहे हे मला माहित होतं पण मी तो कधीही वाचला नव्हता. आम्ही हेलिकॉप्टरने नेल्लीसला जायला निघण्याआधी रॅशेलने ही सगळी माहिती एल.ए.मधल्या एका एफ.बी.आय.एजंटला सांगितली. हेलिकॉप्टरच्या आवाजामुळे संभाषण शक्यच नव्हतं.

द स्केअरक्रो - भाग ‍११

लेखक बोका-ए-आझम यांनी शनिवार, 18/07/2015 00:10 या दिवशी प्रकाशित केले.
द स्केअरक्रो भाग १० द स्केअरक्रो भाग ११ (मूळ लेखक मायकेल कॉनेली ) एली तुरुंगाच्या मोठ्या दरवाज्यातून आत जाताना तर माझी मनःस्थिती पूर्णपणे नैराश्यमय होती. मी यांत्रिकपणे तिथले सगळे सोपस्कार पार पाडले आणि वकील आणि त्यांचे सहाय्यक यांच्यासाठी एक वेगळा प्रवेश होता, तिथून आत गेलो. स्किफिनोने मला दिलेलं पत्र तिथल्या कॅप्टनला दाखवलं. त्याला बहुधा त्यात काही वावगं वाटलं नाही आणि त्याने मला एका खोलीत बसायला सांगितलं. जवळजवळ अर्ध्या तासाने दरवाजा उघडून तो कॅप्टनच आत आला. ब्रायन ओग्लेव्हीचा पत्ता नव्हता. “मि.