मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

अनाठाई

सुमित_सौन्देकर ·
निशाचर ह्रिदयाला, जाग या जन्माची जुडली कित्येकदा ही जणू... निद्रेची नशा सारून गेली अबोला थोडासा... आणि निराशेच्या सानिध्यात जगतो दिवस बाकी ... आतल्याआत घुटमळण्यात जातो बेधुंध होता कोणे एके काळी... आपल्याच ठोक्यांसवे आता हरवतो... शोधतो... अनोळखी स्पंदने उजाडता लागतो वेध तारकां परतण्याचा चंद्राच्या प्रकाशात छंद ... सूख वेचण्याचा विरळ होणारे छापिल नाव जपण्याची धडपड जरा कुठे पुसटता रेघ... अवेळी धडधड तिच स्पंदने , श्वासांची घालमेल हवीशी ठोका चुकावा पून्हा एकदा... भेटण्यापूर्वी शेवटाशी

... असंही होतं ना कधी कधी....

शिव कन्या ·

प्रभास 17/09/2016 - 10:50
एखादे रानफुल हसून बोलतंच कि एखादा निळा पक्षी गिरक्या घेतोच कि! पण अभेद्य पाषाणाखालून थंडगार झरे झुळझुळतातच कि! जबरदस्त बहर आलाय प्रतिभेला... एक नंबरच...

... असंही होतं ना कधी कधी.... अंगणातलं सुखाचं बी बहरातली पाखरांची गाणी हरवून जातात कुठंकुठं.... पण मनाचा सर्च कायम असतो दिसलं जरी एखादं पातं हिरवंगार मनातलं मांजर हसतंच कि मजेदार! ... असंही होतं ना कधी कधी.... बियांना कोंब येईपर्यंत आपलाच नसतो पेशन्स ! दु:खाच्या माजणार्या ताणावर आपलाच नसतो कंट्रोल! वैफल्याने सगळंच उकरून फेकून देतो, पण तशा वैराण रानातही एखादे रानफुल हसून बोलतंच कि एखादा निळा पक्षी गिरक्या घेतोच कि! ...

मणाचा एकान्त

सुरवंट ·
censor ने बंदी घातलेला तरीही पायरेटेड सीडी शोधून घेतलेला निव्वळ प्रौढासांठी गोलातलं A चिन्ह असलेला कुठलातरी तमीळ चित्रपट पाहतोचकी आपण एकही 'सीन' नसलेला कधी pause, play, fast forward तर कधी zoom, backward, resume करत दुसरं काय असतो एकांत म्हणजे तरी?

वाट पहात आहे.....

शिव कन्या ·
त्या पक्ष्याची वाट पहात आहे..... बसेन ते झाड माझे, शिटेन ती फांदी माझी, असले त्याचे आक्रमण नाही! घरटोघरटी माझी पिले माझ्याच पिढ्या, माझेच वंश असली माणुसकी त्याची नाही! मैत्री कधी कुणाशी केली नाही, पण बुडत्या मुंगीसाठी पान टाकायचे विसरला नाही! चमचमणारी छाती फुगवणे नाही,कि तोऱ्याने मान फिरवणे नाही! पंखांचे मिटणे केवळ सुंदर जणू मौनाचे शिल्प पुरातन! पाय कधी दिसू नयेत इतके त्याचे असणे प्रगाढ, युगायुगांची पौर्णिमा उजळावी इतके त्याचे पंख सतेज! स्थलांतरावर जगत रहावे इतकी त्याची तकतक नाही, घिरट्या घ्याव्यात एकाच किनाऱ्यावर इतके उड्डाण तोकडे नाही! किनाऱ्या किनाऱ्या

< < < < मजबूरी हय > > > >

चांदणे संदीप ·

निळ्याशार स्तब्ध तळ्याच्या काठावरुन तळ्यात भिरकावलेल्या टिपरी सारखे असते बाबा तुमचे बदडणे टिपरी पाण्यावर दोन तीन् उड्या मारुन बुडूक आवाज काढत अलगद पाण्यात नाहिशी होते पण त्याचे तरंग मात्र बराच वेळ तळ्याच्या काठाला धडका मारत असतात तशी तुम्ही मारलेली एकच थप्पड बराचवेळ झिणझीणत रहाते अगदी मी जिथे असेन तिकडुन घरी पोचे पर्यंत आणि तुमच्या ह्याच दहशती मुळे मला गावभर सैरावैरा धावावे लागते आणि मला शोधुन काढण्यासाठी तुम्हाला प्रत्येक गल्ली धुंडाळावी लागते सतत नवनविन उद्योग करत रहाणे ही माझी जन्मजात खोड आहे आणि मी समोर दिसलो की काहिही ऐकुन न घेता मला झोडपणे ही तुमची जुनी खोड आहे फेस (पळुन पळुन तोंडाला सुटलेला) पैजारबुवा,

In reply to by चांदणे संदीप

नुसती आठवण आली तरी कानाखाली झिणझिण्या येतात. असे कोणी समदु:खी भेटले की आपण सगळी एकाच बापची लेकरे आहोत हा सिध्दांत पटतो. पैजारबुवा,

मिकादा, पैजारबुवा, अभ्यादादा आऊर रातराणीतै के पिच्चे पिच्चे मै भी कस्काय चल पड्या कायच म्हैती नाही. पन मेरा भी जळके करपा मस्सालाभात हुवा इस्लीये मयनेभी हिन्दिक्की चिंदी करनेका ठाणच डाल्या. मंग काय...एक आय अपने पोरट्याको कयसे धोपातटी हय वैच्च चित्र कविता मे उतारके इद्दर डालरा हू!

< < < मजबूरी है > > >

रातराणी ·

नीलमोहर 16/05/2016 - 11:55
असे हाल कोणाच्याही वाट्याला येऊ नये, दु:खात सहभागी आहे. 'ठहरे हुए पानी मे, कंकड न मार साँवरी, मनमें हलचल सी मच जाएगी बावरी..' गाण्यातील हिरो ओळखा पाहू कोण ??

In reply to by नीलमोहर

हा काय प्रश्र्ण झाला का? आपले सगळ्यांच्या लाडक्या मिथुनदांच्या दलाल या जगप्रसिध्द चित्रपटातले हे गानकोकीळ कुमारदांनी गायलेले गाणे आहे आणि संगित अर्थात बप्पी दादांचे आ.न. पैजारबुवा,

पैजारबुवा के पाऊल पे पाऊल डालते हुए मयभी इधर अपनी एक मजबूर रचना प्रस्तुत करती हूँ. मिकादादा, पैजारबुवा, एसभाय, और अपने मोहल्ले के आन बान शान अभ्या दो डॉट सबकी माफी पयलेसे ले लेती हूँ. दुनियाकी हर एक औरत अपने नवरे का सबसे ज्यादा म्हणजे लयच गुस्सा कब करती मालूम? जब वो घोरता है तब.

नाडलेल्या लोकांची कहाणी .............

माम्लेदारचा पन्खा ·

आदिजोशी 30/04/2016 - 22:53
मल्ल्या निदान युके मधे आहे हे माहिती तरी आहे, इथे तर ठावठिकाण्याचीही बोंब. पुलंनी लिहील्यावर जसं आपल्याच मनातलं लिहिले असं लोकांना वाटायचं, तसंच ही कविता वाचून शे दोनशे मिपाकरांना वाटेल ह्यात शंका नाही. असो. रात गई बात गई असं म्हणुन पुढे जायचं. किसका मिला है जो तेरा मिलेगा.

खरी मदत मागायला कोणी येई दारामध्ये त्याच्यासाठी जाईल का हात खिश्यामध्ये ? ========================================= अजिबात जात नाही... दूधाने तोंड पोळले की मांजर पण सुधारते..... असो, == ===

मागून मागून थकलेली माणसं आली कोणी , उतरले तोंड डोळा सुटलेले पाणी ला ला ला ला , ला ..ला ला गेलेच आहेत पैसे आता खिशात काही नाही पैसे कुणा मागू आता मला कोण देई बडबडत बसतो सारखा गेले पैसे पाण्यात व्याज गेले माझे तरी मुद्दल द्या हातात सांगायची आहे माझ्या शहाण्या मुला नाडलेल्या लोकांची ही कहाणी तुला ..... ला ..ला ला ला ला , ला ..ला ला ला ला....

बाई सोडून गेली

नीलमोहर ·

स्त्रीमुक्तीच्या गप्पा कितीही मारा, खरेच का मुक्तता मिळाली एका बाईच्या स्वातंत्र्याच्या बदल्यात दुसरी मुक्त झाली शेवटी बाई सोडून गेली स्त्रीमुक्ती वाल्यांनी समानतेसाठी आंदोलने जरी किती केली लढण्यासाठी बाहेर त्या पडता, कोण करत असेल कामे घरातली जर बाई सोडून गेली वरती मजेशीर वाटते कविता. पण या २ कडव्यात कटु सत्य आहे आयुष्याचं.

सस्नेह 18/04/2016 - 11:17
भापो...!! खरंच कटू सत्य.
तरी बयेस कधी न कामास जुंपले, कायम लाडीगोडी केली तऱ्हा तिच्या सांभाळत, आंजारत गोंजारत कामे करून घेतली तरीही बाई सोडून गेली
अगदी, अगदी ! यांच्या तऱ्हा संभाळता संभाळता स्वत:च्या तऱ्हांना मुरड घालावी लागते. तरीही जातातच सोडून, मेल्या ! रच्याकने जरा नवरोजींना लावा की कामाला !

कविते मध्ये अतिशयोक्ती रस ठासून भरला आहे. कारण घरी हक्काचा, बीनपागारी, मान खाली घालून, सगळे निमुट पणे ऐकणारा व पडेल ते काम विनातक्रार करणारा, गडी असला तर, स्त्रीयांना या समस्या भेडसावत नाहीत असे एका निरीक्षणं आहे. पैजारबुवा,

एस 18/04/2016 - 13:03
'कामवाली सोडून गेली' असं म्हणा. एकतर मराठी अस्मिता म्हणून आणि दुसरं म्हणजे शीर्षकावरून काहीतरी भलतंच वाटलं होतं म्हणून..! असो. बाकी 'नवरोजी' क्याट्यागरीत मोडत असलो तरी भापो.

नाखु 18/04/2016 - 14:14
बोलवायचा शीर्षासन प्रयोग भारी आहे.. पुढील कामवालीकरीता शुभेच्छा!!!! काम्सू आणि काम्चुकार याच्या मधला नाखु

अवचित ते घडले, जणू आभाळ फाटले, धरणी कंपली एक सुनामी आली की जगबुडी झाली, अन बाई सोडून गेली किती केली विनवणी, तिज आमिषेही दिली पाषाणहृदयी त्या बालेला परि दया जराही न आली अन बाई सोडून गेली म्हणे तुम्हास बाई मिळेल दुसरी, जर शोधाशोध केली जीव माझा जरी गेला, काळजी का कोणा इथे वाटली अन बाई सोडून गेली तरी बयेस कधी न कामास जुंपले, कायम लाडीगोडी केली तऱ्हा तिच्या सांभाळत, आंजारत गोंजारत कामे करून घेतली तरीही बाई सोडून गेली म्हटले चला तर आता, कामाला लागायची वेळ झाली बाई मंगळावर जरी पोचली, घरची कामे का तिला चुकली कशी बाई सोडून गेली झाडून काढता काढता, जळमटे डोक्यातली निघाली फरशी पुसता पुसता, लख्ख सफाई

तू फूल कुणाचे देखणे?

शिव कन्या ·

वा! ताई! तुमची स्वतंत्र स्टाईल लगेच ठाव घेते मनाचा. अप्रतिम लिहिता. अजून लिहीत रहा! वाचत राहू! चल उड जा रे पंछी के अब ये देस हुआ बेगाना या गीताची आठवण झाली.

आशयाची शब्दांशी गट्टी नाही जमली नको म्हणता धरलेली फुगडीही सुटली स्वारी, नाही आवडली! Sandy

माहितगार 17/04/2016 - 15:13
कवितेतील रुपक कदाचित वेगळ्या परिस्थितीवर असेल, पण का कोण जाणे ते मला सहजच मोठ्याशहरात आलेल्या शहरी कष्टाच्या उन्हात होरपळून निघणार्‍या बालकामगारांवर अथवा कोवळ्या वयातील तरुणांवर लावावे वाटले.

In reply to by माहितगार

प्रभास 14/09/2016 - 00:46
अगदी बरोबर... असेच वाटते... पण मूळ रचनाच इतकी सुंदर आहे की तिच्या गर्भरेशमी अर्थाच्या कोंदणातून बाहेर पडूच नये असे वाटते... :)

पथिक 14/09/2016 - 15:19
तू फूल कुणाचे देखणे? नको उन्हात हासत राहू! तू श्वास फुलांचा हलका जा निघून त्यांच्या देशा!
काय ओळी आहेत ! अवघी कविताच सुंदर आहे.

तू फूल कुणाचे देखणे? नको उन्हात हासत राहू! तू श्वास फुलांचा हलका जा निघून त्यांच्या देशा! रुजताना होईल अंत नसेल कोणास खंत तू जीव कुणा मायेचा? जा निघून हलक्या पायाने.... तू फूल कुणाचे देखणे? नको उन्हात हासत राहू..... -शिवकन्या

काळ असा.......

शिव कन्या ·

माहितगार 01/04/2016 - 18:52
सुंदर अशी सत्ये जात्यातून पूर्ण भरडले गेल्यावरच समजली पाहीजेत असे काही असते का ?
बाबा, पक्ष्याचे चित्र काढा ना!’ मी करड्या रंगात ब्रश बुडवला, गज आणि कुलूपांनी बंदिस्त असा एक चौकोन काढला.
पक्ष्यांप्रमाणे स्वातंत्र्याची इच्छा विरुद्ध बंदीस्त करणारी संस्कृती
मग मुलाने माझ्यासमोर, पेन, पेन्सिल, कागद, रंगांचा बॉक्स माझ्या समोर ठेवले आणि म्हणाला, ‘बाबा, माझ्यासाठी आपल्या देशाचे चित्र काढा ना!’ माझ्या हातातला ब्रश अजूनही थरथरतो आणि अश्रूंच्या सागरात मी पार बडून जातो.......
हे रिअलायझेशन सगळ्यांना येते तर ! इथे देश शब्द काढला की तुकड्यांची स्वप्ने पाहणारे जन्मतात त्याचा शेवट खालील प्रमाणे होतो हे बर्‍याच जणांना समजणे का कठीण असावे ?
मुला, काळ असा कठीण आलाय, कि अन्न शस्त्रांकित, धर्म शस्त्रसंपन्न संस्कृती शस्त्रकुलोत्पन्न, आणि पक्षी सशस्त्र झालेयत. तू भाकरी विकत घ्यायला जाशील, तर त्यात शस्त्र सापडतील, रानाबागेतील गुलाब घेऊ जाशील तर, त्यांचे काटे तुला बोच्कारून काढतील, आणि हो, कुठले पुस्तक हातात घेशील तर, तुझ्या बोटांमध्ये विस्फोटांचे रण माजेल!'
केवळ नियती म्हणावे ? :(

चाणक्य 02/04/2016 - 06:53
नविन रचनेची ओळख करून दिल्याबद्दल. अश्या अजून काही असतील तर वाचायला आवडतील.

नाखु 02/04/2016 - 10:06
शब्दात कमाल आशय... अत्यंत सुंदर-तरल अनुवादाबद्दल धन्यवाद.

शिव कन्या 02/04/2016 - 17:02
तर्राट जोकर ,जव्हेरगंज, माहितगार, बोका-ए-आझम,ज्ञानोबाचे पैजार, रेवती,नाद खुळा ..... अनुवाद आवडल्याचे सांगितलेत, आभार.

[अरबी साहित्यातील निजार कब्बानी या नामवंत सिरीयन कवीच्या काही कवितांचा स्वैर अनुवाद! त्यातील ‘ A Lesson in Drawing!’ या कवितेचा अनुवाद मिपाकरांसाठी! बाकी माहिती Google वर आहेच!] माझ्या मुलाने माझ्यासमोर रंगांचा बॉक्स ठेवला, म्हणाला, ‘बाबा, पक्ष्याचे चित्र काढा ना!’ मी करड्या रंगात ब्रश बुडवला, गज आणि कुलूपांनी बंदिस्त असा एक चौकोन काढला. त्याने आश्चर्याने डोळे विस्फारले, ‘............. पण बाबा, हा तर तुरुंग आहे!